ग्रहस्थिती : रवि मेष राशीत, हर्षल वृषभ राशीत, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत, मंगळ कर्क राशीत, केतू कन्या राशीत. दिनविशेष : २० मे रोजी कालाष्टमी, २३ मे रोजी अपरा एकादशी.
मेष : आनंदी वातावरणात कामे पुढे सरकतील. गुरुंचे मार्गदर्शन मिळेल. तरुणांना यश मिळेल. आर्थिक नियोजनात गडबड होईल. चैन, मौजमजेवर खर्च होईल. व्यवसायात चुका होतील. कामाच्या नवीन संधींमधून पैसे मिळतील. प्रवासात घाई टाळा. कुटुंबाला वेळ द्या. संततीकडून उत्साहवर्धक बातमी कळेल. व्यवसायात अडचणीचे प्रसंग सोडवताना काळजी घ्या. मोठा निर्णय घेण्याआधी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. मनासारखी कामे होतील. नोकरीत बदल स्वीकारा. खेळाडू, कलाकारांना यशदायी काळ.
वृषभ : आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक अडचणी कमी होतील. कामगारांशी वाद टाळा. सकारात्मक विचार करा. मुलांना यशदायक काळ. नोकरीत नव्या कामाची संधी मिळेल. युवावर्गाने यशामुळे हुरळून जाऊ नये. नवीन नोकरी मिळेल. शिक्षण व संगीत क्षेत्रात चांगला काळ. नोकरीत आनंददायी बातमी कळेल. मौजमजेसाठी खर्च होतील. अहंकारी वृत्ती दूर ठेवा. घरात वातावरण आनंदी ठेवा. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. घाई टाळा.
मिथुन : नोकरीत कामाचे कौतुक होईल. त्याचे भविष्यात चांगले लाभ मिळतील. व्यवसायात अपेक्षित फायदे मिळतील. नवी कामे पुढे सरकतील, पण अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो. तरुणांच्या नव्या संकल्पनांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. नियोजन करा. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. ज्येष्ठांशी वागताना बोलताना काळजी घ्या. जुनी कामे मार्गी लागतील. मित्रांशी वागताना काळजी घ्या. अनपेक्षित घटना उत्साह वाढवेल. वाद टाळा. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल.
कर्क : कोणतीही कामे विचारपूर्वक पुढे न्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने काम सोपे होईल. तरुणांनी नवी संधी स्वीकारताना काळजी घ्यावी. लेखक, चित्रकार, शिल्पकारांसाठी चांगला काळ. आरोग्याचे प्रश्न दूर होतील. नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. विदेशात जाण्याची संधी मिळेल. घरासाठी खर्च वाढेल. नातेवाईकांशी वादांमध्ये जास्त अडकू नका. कोर्ट-कचेरीतील प्रलंबित प्रश्न सुटणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी जपून वागा. अचानक धनलाभ होतील. व्यवसायात काम व वेळेचे नियोजन करा.
सिंह : नव्या कामाच्या संधी मिळून बँक बॅलन्स वाढेल. आश्वासने देऊ नका. घरात अरेरावी टाळा. मित्रांबरोबर बेताल बडबड टाळा. व्यवसायात मनासारखी आवक राहील. समाजकार्यात मन रमेल. कामाची ऊर्जा वाढेल. तरुणांनी हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी कष्टांची तयारी ठेवावी. मनस्थिती बिघडू शकते. उधार-उसनवारीत काळजी घ्या. कुटुंबात वाद घडतील. ध्यान, योगामधून समाधान मिळेल. अचानक खर्च वाढतील. जनसंपर्क क्षेत्रात उत्कर्ष होईल. नोकरीत प्रगती होईल.
कन्या : कामानिमित्ताने प्रवास कराल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. घरात वातावरण बिघडलेले राहील. व्यवसायात आर्थिक गणित बिघडेल. नोकरदारांना भरभराटीचा काळ. अचानक खर्च वाढेल. नियोजन करा. मुलांकडे लक्ष द्या. तरुणांचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक ताळमेळ घालताना गोंधळ उडेल. पत्रकार, संपादक, लेखकांचा सन्मान होईल. कामाच्या नियोजनात काळजी घ्या. मनस्वास्थ्य उत्तम राखा. शेअर, सट्टा, लॉटरीपासून दूर राहा. ताप, सर्दीने बेजार व्हाल. प्रवासात काळजी घ्या.
तूळ : भेडसावणारे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत संयम पाळा. आर्थिक बाजू उत्तम राहील. व्यवसायात दगदग होईल. योगा, वाचनातून आनंद मिळेल. तरुणांच्या मनासारखी कामे होतील. मित्रांना वेळ द्याल. कलाकारांचे कर्तृत्व उजळेल. पुरस्कार मिळेल. कौटुंबिक तीर्थयात्रा कराल. समाधान मिळेल. सामाजिक क्षेत्रात आनंददायी काळ. व्यवसायात जपून व्यवहार करा. सरकारी कामे सरळमार्गानेच करा. बँकेची कामे मार्गी लागतील. शेअर ब्रोकर, इस्टेट एजंट, शेतीविषयक उपकरणांचे व्यापारी फायद्यात राहतील.
वृश्चिक : नोकरीत मनासारखी स्थिती राहील. व्यवसायात किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. भागीदारीत वाद टाळा. तरुणांचा कल मौज-मजेकडे राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. खर्च वाढतील. वेळेचे नियोजन करा. व्यवसायात कामांना विलंब होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. नातेवाईकांची मदत होईल. महिलांना आरोग्य समस्या त्रास देतील. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लावताना वाद टाळा. नोकरीत वरिष्ठ शाबासकी देतील.
धनु : नोकरीत सुखद घटना अनुभवाल. मित्रांशी जमवून घ्या. विवाहेच्छुकांचे शुभमंगल जुळेल. तरुण मौजमजेत रमतील. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. मनस्वास्थ्य उत्तम राखा. कोणत्या घटनांमध्ये भावनिक अडकू नका. विदेशात व्यवसाय वाढवण्याचे प्रयत्न नियोजनपूर्वक करा. नोकरीत नव्या प्रोजेक्टवर वाढीव कष्ट घ्या. गुंतवणुकीच्या प्रलोभनाला फसू नका. सार्वजनिक जीवनात संयमाने वागा. पत्नीशी बोलताना गोडवा राखा. नोकरीत वरिष्ठांचे ऐका. घरात आनंद वाढेल. राग व्यक्त करू नका.
मकर : मालमत्तेच्या चर्चा पुढे सरकतील. नातेवाईक, मित्रांशी जमवून घ्या. व्यवसायात काम व आमदनी वाढेल. घरासाठी महागड्या वस्तूची खरेदी होईल. नवे वाहन घ्याल. नोकरीत वाद होतील. महिलांना यशदायी काळ. बँकांची कामे करताना जपून. भागीदारीत सामोपचार ठेवा. व्यवसायात धावपळ, दगदग होईल. प्रलंबित काम मध्यस्थामार्फत मार्गी लागेल. कागदपत्रे तपासून सही करा. वाणीवर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ घटना ़कळेल. प्रवासात काळजी घ्या. खेळाडूंना यश मिळेल.
कुंभ : भावंडांचे मन दुखावू नका. व्यवसायात आर्थिक बाजू चांगली राहील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात, व्यवसायात यश मिळेल. तरुणांनी कामे झाली नाहीत तरी मन आनंदी ठेवावे. व्यवसायात येणे वसूल होईल. नव्या नोकरीची संधी मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. ब्रोकर, रियल इस्टेट क्षेत्रात चांगला काळ. कवी, संगीतकार, चित्रकारांचा सन्मान वाढेल. सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून निर्णय घ्या. व्यवसायात युक्तीने कामे तडीस न्या. नोकरीत बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मीन : घरातील वातावरण आनंदी राहील. तरुणांना यश मिळेल. नव्या वास्तूच्या चर्चा पुढे सरकतील. महिलांना आरोग्याचे प्रश्न सतावतील. लेखक, पत्रकारांचा सन्मान होईल. समाजकार्यात आत्मविश्वास वाढेल. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रांशी मस्करी टाळा. नोकरीत नव्या कामासाठी प्रवास घडेल. व्यवसायात अचानक धनप्राप्तीचे योग. भागीदारीत आपले म्हणणे पुढे रेटू नका. तरुणांनी वाद टाळावे. विदेशात शिक्षणाला जाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. सहल लांबणीवर पडेल. कमी बोला, जास्त काम करा.