• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

तारें जमीन पर!

- प्रशांत केणी (आप कतार में हैं...)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 15, 2022
in घडामोडी
0
तारें जमीन पर!

जो दिखता है हमको लगता है, है… और जो नहीं दिखता हमको लगता है, नहीं है… लेकिन कभी कभी जो दिखता है, वो नहीं होता… और जो नहीं दिखता, वो होता है… या ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील शिक्षक आमिर खानच्या विश्लेषणात्मक संवादासारखी सध्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उत्तरार्धाची स्थिती होत चालली आहे.
तारांकित फुटबॉलपटू देशाला जगज्जेतेपद मिळवून देतील, तर बिगरतारांकित खेळाडूंचे संघ लवकर गाशा गुंडाळतील, असे कोणत्याही चर्चेतल्या स्पर्धेविषयी अंदाज बांधले जातात, तसेच विश्वचषक फुटबॉलबाबतसुद्धा बांधले गेले होते. पण ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार यांचे मोठेपण संघाला यश मिळवून देऊ शकले नाही. पोर्तुगाल आणि ब्राझील हे दोन्ही फुटबॉल जगतातील यशस्वी आणि रूबाबदार संघ. पण या दोन्ही संघांच्या वाटचालीला अनपेक्षितपणे पूर्णविराम मिळाला. खेळापेक्षा मोठा होऊ पाहात असल्यामुळे सर्वांचा नावडता होत चाललेल्या रोनाल्डोच्या कारकीर्दीतील ही अखेरची विश्वचषक स्पर्धा. रोनाल्डो विरुद्ध मेसी ही जगज्जेतेपदाची अंतिम झुंज होईल, असे स्वप्नवत अंदाज वर्तवण्यात आले होते. पण रोनाल्डो आणि नेमार या दोघांवरही शोकाकुल अवस्थेत मैदान सोडण्याची नामुष्की ओढवली. नेमारने तर सामन्यानंतर भवितव्याबाबतची अनिश्चितता प्रकट करून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

रोनाल्डोचे मोठेपण धोकादायक

पेले, दिएगो मॅराडोना हे फुटबॉलच्या क्षितिजावरील तेजस्वी तारे म्हणजेच ‘सुपरस्टार’. दोघांनीही अचाट कर्तृत्वाच्या देशाला विश्वचषक जिंकून दिला, हे त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे वैशिष्ट्य. पण हा पराक्रम खात्यावर नसतानाही देशासाठी आणि क्लबसाठी आपल्या चतुरस्र खेळाने स्वत:ची ‘ब्रँड व्हॅल्यू’ निर्माण करणारा फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. एके काळी १० क्रमांकाच्या जर्सीचा महिमा अपरंपार मानला जायचा. पण ‘सीआर-सेव्हन’मुळे सात क्रमांकाच्या जर्सीलाही महत्त्व प्राप्त झाले. रोनाल्डो जसजसा खेळाडू म्हणून मोठा होत गेला, तसतसा त्याचा अहंकारही मोठा होत गेला. स्वार्थी आणि घमेंडी खेळाडू असे आरोप त्याच्यावर होऊ लागले. यात बहुतांशी तथ्यही होते. मैदानावरील त्याचा वावर संघहितापेक्षा वैयक्तिक कामगिरीत धन्यता मानणारा. त्यामुळेच रोनाल्डो मैदानावर वावरताना त्याचे पदलालित्य, त्याची तंदुरुस्ती हे सारे छाप पाडणारे असायचेच… पण एकट्याचीच, संघाची नव्हे. रोनाल्डोसोबत खेळणार्‍या अनेकांनी तो स्वार्थी आहे, वैयक्तिक गोल हेच त्याचे लक्ष्य असल्याचे आरोप बिनधास्तपणे केले आहेत. यंदाच्या विश्वचषकात ते बर्‍याचदा सिद्धही झाले. त्यासाठीच पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी रोनाल्डोला मर्यादित काळ मैदानावर ठेवण्याची रणनीती आखली. रोनाल्डो नसताना सांघिक खेळ बहरताना आढळायचा. अगदी गोन्सालो रामोसनेही स्वित्झर्लंडविरुद्ध गोलची हॅट्ट्रिक लगावली होती. या संपूर्ण स्पर्धेत रोनाल्डोने एकमेव गोल नोंदवला आणि पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा खेळाडू हा विक्रम आपल्या नावावर केला. पण तो एक गोलसुद्धा पेनल्टीद्वारे होता, मैदानी नव्हता. रोनाल्डो आणि मेसी यांच्या कामगिरीची तुलना केल्यास मेसीच्या गोल-आकडेवारीप्रमाणेच गोल सहाय्य सांख्यिकीसुद्धा लक्षणीय आहे. म्हणजे स्वत: गोल करण्याबरोबरच त्याने इतरांना गोल करण्यासाठी सहाय्यही लक्षणीय प्रमाणात केलेलं आहे. रोनाल्डोचे सांघिकतेला महत्त्व देणारे गोलसहाय्य मात्र निराशाजनक आहे.
गेल्या महिन्याभरातील त्याचे प्रशिक्षकांशी झालेले वाद ड्रेसिंगरूमच्या सीमा ओलांडून चव्हाट्यावर आले. त्यामुळे नायक रोनाल्डो हा खलनायक बनून चाहत्यांच्या मनातून उतरू लागला. २० नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आणि २२ तारखेला रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेडशी असलेला करार समझोतापूर्वक स्थगित करण्यात आला. रोनाल्डोने युनायटेडकडे परतल्यानंतर पहिला हंगाम प्रीमियर लीगमधील सर्वाधिक १८ गोलसह गाजवला होता. लीग फुटबॉलमधील आपला प्रभाव आणि ब्रँड शाबूत असल्याचे सिद्ध केले होते. परंतु ऑगस्टमध्ये युनायटेडचे नवनिर्वाचित प्रशिक्षक टेन हॅग आणि रोनाल्डो यांच्यात वादाची ठिणगी पडली. थायलंड आणि ऑस्ट्रेलियातील हंगामपूर्व दौर्‍यांची हॅग यांनी रणनीतीच्या दृष्टीने आखणी केली होती. पण रोनाल्डोने वैयक्तिक कारणास्तव दौर्‍यातून माघार घेतली. मग ब्रेंटफोर्डने युनायटेडला ४-० असे नामोहरम केले. त्यानंतर टोटेनहॅम हॉटस्पूरविरुद्ध मिळवलेल्या विजयात हॅग यांनी रोनाल्डोसाठी बदली खेळाडू म्हणून योजना आखली होती. परंतु ही नीती रोनाल्डोने मान्य केली नाही आणि सामना संपण्याची शिटी वाजण्याअगोदरच मैदान सोडले. ‘‘हॅग माझा आदर करीत नाही. मग मीसुद्धा त्यांचा आदर करणार नाही,’’ असा बाणा रोनाल्डोने दाखवल्यामुळे हा वाद आणखी चिघळला. हे इथवरच थांबले नाही. विश्वचषकाच्या काही दिवसआधी रोनाल्डोने ‘‘युनायटेडने विश्वासघात केला, मला जबरदस्तीने संघाबाहेर काढण्यासाठीचे षडयंत्र रचले जात आहे,’’ आरोप केला. मग काही दिवसांतच आर्थिक तडजोडीवर चर्चेनंतर रोनाल्डो संघाबाहेर पडला. फुटबॉल हा आपला ‘व्यवसाय’ असून, चाळिशीपर्यंत खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. या सर्व प्रकरणात युनायटेडचा म्हणजेच ब्रिटनच्या क्लबचा संबंध असल्यामुळे इंग्लिश प्रसारमाध्यमांनी रोनाल्डोचा खलनायकी चेहरा दिसेल, याची पुरेशी काळजी घेतली.
कालांतराने काही दिवसांतच व्यावसायिक क्लबच्या प्रशिक्षकांशी मतभेदाची पुनरावृत्ती राष्ट्रीय संघातही पाहायला मिळाली. पोर्तुगालने गटसाखळीच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध १-२ अशी हार पत्करली. या सामन्यात सांतोस यांनी रोनाल्डोला ६५व्या मिनिटाला बदली केले, हे त्याला रुचले नाही. या सामन्यातील निर्णायक गोल कोरियाने निर्णायक वेळेत नोंदवला. मैदानाबाहेर येरझार्‍या घालणारा रोनाल्डो नैराश्य लपवू शकला नाही. सांतोस यांनीही रोनाल्डोचे वागणे अयोग्य असल्याची टिपण्णी करीत या मस्तीखोर विद्यार्थ्याला सरळ करण्याचा चंग बांधला. सांतोस यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या प्रारंभीपासून रोनाल्डोला खेळवणे प्रकर्षाने टाळले. असे रोनाल्डोबाबत घडतेय, यावरच मुळी अनेकांचा विश्वास बसेना. पण रोनाल्डोशिवाय संघाने दमदार आघाडी घेतली. रोनाल्डोची घुसमट वाढत होती. उरल्यासुरल्या ७३व्या मिनिटाला रोनाल्डोला बदली खेळाडू म्हणून सांतोस यांनी संधी दिली. हीच चाल त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत पुन्हा रचली. रोनाल्डोला ५१व्या मिनिटाला मैदानावर आणले. पण या दोन्ही सामन्यांत रोनाल्डो झगडताना आढळला. त्याच्या खेळाची जादू ओसरत चालल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.
रोनाल्डो आता ३७ वर्षांचा आहे. सर्वाधिक ११८ आंतरराष्ट्रीय गोलचा विक्रम त्याच्या खात्यावर आहे. पोर्तुगालने अद्याप कधीही विश्वविजेतेपद मिळवले नसले तरी युरो २०१६चे पहिले प्रतिष्ठेचे जेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. पण या कर्तृत्वाच्या बळावर किती काळ रोनाल्डोच्या अहंकाराने तग धरावा? नव्या पिढीचे शिलेदार त्याची जागा घेण्यासाठी सज्ज आहेत, हेच रामोसने सिद्ध केले आहे.

नेमारचे मर्यादित तेजोवलय!

ब्राझीलच्या समस्या तशा वेगळ्या होत्या. सर्वाधिक पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणार्‍या ब्राझीलला फुटबॉल क्षेत्रात अढळ स्थान मिळवून देण्याचे कार्य पेले यांनी केले. तसे अनुकूल वातावरण तिथे आधीपासूनच होते, त्यामुळे तेथे फुटबॉल संस्कृती निर्माण झाली. मग १९७० ते १९९४ असा २४ वर्षांचा कालखंड ब्राझीलसाठी दुष्काळासम ठरला. मग रोनाल्डोच्या (रोनाल्डो नझरियो) करिश्म्याने ब्राझीलने पुन्हा जगावर राज्य केले. ही यशोमालिका २००२पर्यंत कायम राहिली. सध्या सुरू असलेला हा दुष्काळसुद्धा मागच्याप्रमाणेच दोन तपांचे अंतर घेतो आहे, हे स्पष्ट झाले आहे. पण या कालखंडात जे खेळाडू नावारूपास आले. त्यापैकी नेमारने क्लब आणि राष्ट्रीय संघाकडून आर्थिक आणि खेळाची मोठी कीर्ती मिळवली. पण तरीही मेसी आणि रोनाल्डो यांच्यातील जुगलबंदीच्या चर्चेत नेमारला स्थान नव्हते. किंबहुना तारांकित तेज हे मर्यादित राहिले.
तारांकित खेळाडूंच्या खेळाच्या बळावर सांघिक यशसुद्धा मिळवता येते, याचे अनेक दाखले जागतिक क्रीडाक्षेत्रात आढळतात. पेलेच्या कारकीर्दीत चारपैकी तीनदा ब्राझीलने विश्वविजेतेपद जिंकले होते. ब्राझीलने गेल्या काही वर्षांत सलग दोनदा कोपा अमेरिकाही (२०१९, २०२१) जिंकले आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ब्राझिलच्या यशोप्रवासात नेमारचा वाटा नाकारणे तसे अवघड आहे. त्याच्या खात्यावरील ७७ गोलसुद्धा ब्राझीलकडून सर्वाधिक गोल नोंदवणार्‍या पेले यांच्याइतकेच. याशिवाय गोलसहाय्य करण्यातही तो तरबेज. पण मोक्याच्या क्षणी होणारी दुखापत ही नेमारसाठी चिंतेची बाब. २०१४च्या विश्वचषकाचे यजमानपद ब्राझीलकडे होते. नेमार देशाला सहाव्यांदा जगज्जेतेपद मिळवून देणार, अशी आशा होती. परंतु कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ‘गड आला; पण सिंह गेला’. चार गोल करीत ब्राझीलच्या यशातील महत्त्वाचा शिलेदार ठरलेल्या नेमारच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्याला विश्वचषकातूनच माघार घ्यावी लागली. सामन्यातून त्याला स्ट्रेचरवर नेण्यात आले, तेव्हा अनेकांचे हृदय हेलावले. उपांत्य फेरीत नेमारप्रमाणेच निलंबित कर्णधार थियागो सिल्व्हाची ब्राझीलला तीव्र उणीव भासली. जर्मनीने हे योग साधून ब्राझीलला ७-१ अशा दणदणीत विजयासह धूळ चारली आणि नंतर ते विश्वविजेते झाले. तारांकित फुटबॉलपटू होण्याची नामी संधी नेमारने दवडली.
यंदाच्या विश्वचषकात सर्बियाविरुद्ध नेमार पहिला सामना खेळला. परंतु पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीचे निमित्त झाले आणि गट साखळीतील उर्वरित दोन सामन्यांना त्याला मुकावे लागले. सुदैवाने दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात तो दुखापतीतून सावरत मैदानावर उतरला. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात त्याने गोलसुद्धा केला. पण पेनल्टी शूटआऊमध्ये ब्राझीलने हा सामना गमावला. आक्रमक आणि मध्यरक्षण यात कमालीचा सामर्थ्यवान असलेल्या ब्राझीलच्या बचावफळीच्या उणिवा बर्‍याचदा समोर आल्या.
नेमारला पेले, रोनाल्डो यांच्याइतकी लोकप्रियता मिळाली नाही. कारण मैदानावरील त्याचा बाळबोधपणा आणि नाटकीपणा
फुटबॉल चाहत्यांपासून लपून राहिला नाही. ‘‘नेमारने दिमाखदार खेळाने ब्राझीलला मोहित केले, पण संपूर्ण जगाला नाराज केले,’’ असे भाष्य ब्राझीलमधील ‘ओ ग्लोबोने’ या प्रतिथयश वृत्तपत्राने केले होते. हे झाले नेमारबाबत. पण ब्राझीलमधील नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर फुटबॉलच नव्हे, तर एकंदरीतच क्रीडाक्षेत्राबाबतची मानसिकता बदलली आहे. याला मागच्या दशकातील दोन महत्त्वाच्या घडामोडी कारणीभूत आहेत. ब्राझीलने २०१४च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आणि नंतर २०१६मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद सांभाळले. जागतिक क्रीडाविश्वातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धांच्या यजमानपदांमुळे ब्राझीलचे अर्थकारण कोलमडले. त्यामुळेच विश्वचषक फुटबॉलमधील पिवळ्या जर्सीतल्या खेळाडूंबाबत आत्मीयतेची भावना देशवासियांमध्ये नव्हती. हे बदललेले सामाजिक समीकरण संघाच्या प्रगतीसाठी हानीकारक ठरते. त्यामुळे नेमारने ब्राझीलचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भवितव्याबाबत अनिश्चितता प्रकट केली. तूर्तास, ब्राझील संघाची आगामी वाटचाल कशी होते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Previous Post

शिवसेनेचा मुंबई महानगरपालिकेत दणदणीत प्रवेश!

Next Post

चला वसईला, हिवाळी पिकनिकला!

Related Posts

घडामोडी

सोनम कपूर बनली ‘प्रेगा न्यूज’ची पार्टनर

September 12, 2023
घडामोडी

हर्षल प्रधान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

August 31, 2023
आम्हाला अजून तरूण ठेवणारा… गारवा!
इतर

आम्हाला अजून तरूण ठेवणारा… गारवा!

July 27, 2023
मुंबई सिटी एफसीच्या क्लब मानचिन्हाचे अनावरण
घडामोडी

मुंबई सिटी एफसीच्या क्लब मानचिन्हाचे अनावरण

July 18, 2023
Next Post
चला वसईला, हिवाळी पिकनिकला!

चला वसईला, हिवाळी पिकनिकला!

कालबाह्य न ठरणार्‍या `चारचौघी'!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.