• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

पैसावसूल जवान

- संदेश कामेरकर (सिने परीक्षण)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 15, 2023
in मनोरंजन
0

एक गाव… जवान कोमात आहे आणि बाहेर शत्रूचे सैन्य गावातली निरपराध गावकर्‍यांना धडाधड गोळ्या घालून मारतायत. गावातला बुजुर्ग माणूस देवाकडे प्रार्थना करतो, आम्हाला वाचवायला कुणीतरी मसीहा पाठव, तरच आमचा तुझ्यावरचा विश्वास अढळ राहील. देव त्या माणसाची प्रार्थना ऐकतो आणि त्या जवानाला जाग येते. गोळ्या मारणार्‍या शत्रूच्या एका सैन्याच्या छातीत त्याच्या ध्यानीमनी नसताना एक भाला घुसतो. जवानाची करामत इथून सुरू होते, तो तलवार हातात घेऊन एक एक करत सर्व शत्रू सैन्याला नेस्तनाबूत करतो आणि गावकर्‍यांचे प्राण वाचवतो. हिरो पडद्यावर आल्यावर शत्रूच्या बंदुका कुठे गायब होतात याचा ठावठिकाणा लागत नाही. त्या शत्रू सैन्याने या जवानाला गोळ्या का घातल्या नाहीत, असा लॉजिकल प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण हा प्रसंग पडद्यावर खरा वाटेल असा अभिनय करणारा तो जवान सुपरहिरो शाहरुख खान असतो. दिवारमध्ये अमिताभ पीटरला म्हणतो, ‘तुम मुझे बाहर ढूँढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था! ये लो चाबी, अब ये चाबी मैं तुम्हारे जेब से निकालूंगा…’ तेव्हा एक हडकुळा लंबूटांग माणूस समोरील आठ पहिलवान लोकांना कसा लोळवणार, हा प्रश्न तेव्हा आपल्याला पडला नव्हता आणि आजही पडत नाही.
‘जवान’ सिनेमात एका महिला वैâदी तुरुंगाचा तुरुंग अधिकारी आझाद (शाहरुख खान) देशातील भ्रष्ट सरकारी कारभाराविरुद्ध लढा पुकरतो. पण या चांगल्या कार्यासाठी आझादने अवलंबलेला मार्ग मात्र गुन्हेगारी वळणाचा आहे. या कामासाठी तो तुरुंगातील काही निष्पाप महिला कैद्यांची टीम बनवतो. देशात सार्वजनिक हिताच्या ज्या गोष्टी गेल्या पन्नास वर्षांत झाल्या नाहीत त्या इथे आझादच्या मार्गाने पाच तासात झालेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात आझादबद्दल द्वेष निर्माण न होता प्रेम दिसू लागतं. तो जननायक बनू लागतो.
दुसरीकडे या गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी सरकारकडून डॅशिंग सुपर कॉप महिला अधिकारी नर्मदा (नयनतारा) हिची नेमणूक होते. गुन्हेगार आणि पोलीस यांची लढाई सुरू असतानच आझाद आणि नर्मदा यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येऊन ते दोघेही एकमेकांसमोर एका वेगळ्या भूमिकेत उभे ठाकतात. या दोघांच्या गोष्टी सोबत सिनेमाचा प्रमुख खलनायक काली (विजय सेतुपती) तसेच आझादला मदत करणार्‍या महिला कैद्यांचीही गोष्ट या सिनेमात गुंफलेल्या आहेत. सिनेमात ज्याचं नाव वारंवार घेतलं जातं तो कॅप्टन विक्रम राठोड कोण आहे? आझादशी त्याचं नातं काय आहे? कालीशी त्याची काय दुष्मनी आहे? आणि वाईट प्रवृतींपासून देशाला वाचविण्यात आझाद आणि त्याची टीम यशस्वी होते का, या प्रश्नाची उत्तरे आपल्याला हा सिनेमा पाहताना मिळतील.
या चित्रपटाची कथा पटकथा लिहिताना सामान्य माणूस विरूद्ध भ्रष्ट सिस्टम अशी थीम योजली आहे. श्रीमंत उद्योगपतींची कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, आरोग्य व्यवस्थेची वाईट अवस्था, त्यातील भ्रष्टाचार अशा अनेक सामाजिक विषयांना ही कथा स्पर्श करते आणि आपल्या पद्धतीने त्यावर उत्तरे देखील शोधते. दक्षिणेतील यशस्वी दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी ‘जवान’ची चित्रपटाची कथा गुंफताना सिनेमाचा नायक शाहरुख खान आहे हे लक्षात ठेवलं आहे. त्याची अभिनयातील बलस्थाने ओळखूनच ही पटकथा बांधली आहे. वेगवेगळ्या अवतारातील शाहरुख पडद्यावर भेटत राहतो. यातील प्रत्येकाची वेशभूषा, रंगभूषा वेगळी आणि ढंगबाज दिसेल याची काळजी घेण्यात आली आहे. या सिनेमाचा पट खूप मोठा असल्याने पावणे तीन तासात हा विषय बसण्यासारखा नाही, त्यामुळे काही प्रसंगांना कात्री लावण्यात आली आहे हे दिसतं. परंतु अ‍ॅटलीने दिग्दर्शकीय कसब पणाला लावून आपलं हिंदीतलं पदार्पण साजरं केलं आहे. या चित्रपटातील प्रसंग काही चित्रपटातील, वेबसिरीजमधील प्रसंगांची आठवण करून देतात, पण यामुळे सिनेमाची रंजकता कुठंही कमी होत नाही. मागील काही चित्रपटांच्या सलग अपयशाने शाहरुखचा करिष्मा संपल्याचे जाणवत होते, पण ‘पठाण’च्या यशाने शाहरुखला नवसंजीवनी प्राप्त झाल्यासारखं वाटतंय. रोमान्स, अ‍ॅक्शन, कॉमेडीत बादशाह असलेल्या शाहरुखचा स्वाग त्याच्या चाहत्यांना पदोपदी जाणवतो.
सामाजिक विषयांवर तो आपलं म्हणणं मांडतो तेव्हा ते मनाचा ठाव घेतं. बहुतांश सिनेमात लोकशाहीत मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे हे सांगितलं जातं, पण या सिनेमात मत मागायला येणार्‍या उमेदवाराला नोकरी, महागाई असे आपल्या जीवनाशी निगडित असलेले प्रश्न विचारा, असा संदेश देण्यात आला आहे. आझादच्या टीममधील सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी आदी सहकालाकारांनी चांगली साथ दिली आहे. गिरिजा ओक आणि ‘वेड’ सिनेमातील खलनायक रविराज कांदे या मराठी कलाकारांचा चित्रपटातील वावर लक्षणीय आहे. विजय सेतुपती यांचा खलनायक खमका आहे. दक्षिणेतील तारका नयनताराची नर्मदा डॅशिंग आहे. दीपिका पदुकोण, संजय दत्त यांची उपस्थिती रंजकतेत भर टाकते. रंजकतेत कुठलीही कसूर न ठेवता सामाजिक विषयांवर भाष्य करता येतं, हे या सिनेमाने दाखवून दिलं आहे. ‘शाहरुख इज बॅक’ हे अनुभवण्यासाठी आणि निखळ मनोरंजन करून घेण्यासाठी एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

Previous Post

‘तिसरे बादशहा हम हैं…’

Next Post

अभिमानाची बाधा

Related Posts

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच
मनोरंजन

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023
मनोरंजन

दोन नवरे, फजिती ऐका!

September 22, 2023
‘तिसरे बादशहा हम हैं…’
मनोरंजन

‘तिसरे बादशहा हम हैं…’

September 15, 2023
मनोरंजन

‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

September 14, 2023
Next Post

अभिमानाची बाधा

कोल्ड ब्लड

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.