ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, रवि, बुध सिंह राशीत, शुक्र कर्क राशीत, मंगळ बुध सिंहेत, प्लुटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ कन्या राशीत. विशेष दिवस : १८ सप्टेंबर हरितालिका, १९ सप्टेंबर गणेश चतुर्थी, २० सप्टेंबर ऋषीपंचमी, २१ सप्टेंबर ज्येष्ठा गौरी आवाहन.
मेष : नोकरी-व्यवसायातील अडचणीचे प्रसंग सोडवताना तारतम्य ठेवा, वरिष्ठांचा सल्ला घ्या. शांततेने घ्या. तरुण मंडळी रोमँटिक राहतील. अडलेली कामे पुढे सरकतील. गणेशकृपेमुळे शुभवार्ता कानावर पडेल. गुरुबळामुळे मनासारखी कामे होतील. घरातील मंडळींसोबत तीर्थयात्रा कराल. घरी छोटेखानी समारंभात नातेवाईक मित्रमंडळी यांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक व्यवहारात पुरेपूर सावधानता ठेवा.
वृषभ : आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन नोकरी शोधणार्यांना यश मिळेल. व्यवसायात समोरची स्थिती पाहून निर्णय घ्या. कामात घाई नकोच. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. शिक्षणक्षेत्रात भाग्योदय होईल. कलाकारांसाठी उत्तम काळ. नोकरीत सुखद बातमी कानावर पडेल. नवे घर घेण्याचा विचार पुढे सरकेल. मुलांकडे लक्ष द्या, त्यांची चूक तुमची डोकेदुखी वाढवेल. आधीच सावध राहा.
मिथुन : आठवड्याची सुरुवात चांगली होईल. अनपेक्षित सुखद घटनेमुळे कामातील उत्साह वाढेल. व्यावसायिकांची आर्थिक बाजू तगडी होईल. एखादे मोठे कंत्राट मिळवाल. सरकारी पातळीवरची प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात मात्र डोकेदुखी वाढेल. घरापर्यंत काही येऊ देऊ नका, म्हणजे झाले. शैक्षणिक कामे मार्गी लागतील. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान होईल.
कर्क : नोकरीत काम करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका, लहान चूक त्रासदायक ठरू शकते. काहींना अचानक धनलाभ होतील. कुटुंबासाठी वेळ खर्च होणार असला तरी कामाचा ताण वाढेल. मन विचलित होऊ न देता शांतपणे काम करा. कोर्टकचेरीत प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होईल. महागड्या वस्तूची खरेदी होईल. महिला वर्गाशी वागताना, बोलताना विशेष खबरदारी घ्या. पैशाचा वापर जरा जपूनच करा.
सिंह : युवा वर्गाला स्पर्धात्मक यश मिळेल. नव्या व्यवसायाच्या संकल्पना सुचतील. त्या नियोजनपूर्वक पुढे न्या, फायदा होईल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, फसवणूक टाळा. घरातील ज्येष्ठांबरोबर वाद घडून मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. ध्यान, योगासाठी वेळ खर्च होईल. अचानक खर्च वाढू शकतील. जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी येतील, त्यातून उत्कर्ष घडेल. नोकरीत वादाचे प्रसंग नकोत. दाम्पत्यजीवनात चांगल्या घटना घडतील, आठवडाअखेर आनंदात जाईल.
कन्या : मनाचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर, सट्टा, लॉटरी, यांसारख्या जुगारापासून दूर राहा. पत्रकार, संपादक, लेखकांचा मानसन्मान करणारे योग आहेत. घसादुखी, ताप यांसारखे आजार त्रासदायक ठरतील. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात काळजी घ्या, नाहीतर एखाद्या घटनेमुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो. मुलांकडे लक्ष द्या. वाहनाचे नुकसान होऊ शकते.
तूळ : नोकरीत कर्तृत्व उजळेल. एखादा पुरस्कार मिळेल, नावलौकिकात भर पडेल. धार्मिक कार्याला वेळ द्याल, दानधर्म कराल. सामाजिक क्षेत्रात उत्साह वाढवणारी घटना घडल्यामुळे कामाचा वेग वाढेल. घरात समारंभ होतील, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जमीनजुमल्याची कामे लांबणीवर पडतील. शेअर ब्रोकर, इस्टेट एजन्ट, शेतीविषयक उपकरणाचा व्यापार करणार्यांसाठी लाभदायक काळ आहे. व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी.
वृश्चिक : नोकरीत वातावरण चांगले राहील. कामाचे कौतुक होईल. हुरूप वाढेल. वेळेचे नियोजन चुकवू नका. व्यावसायिकांची कामे अडकून राहतील. चिडचिड होईल. सरकारी कामे पुरी होतील. भागीदारीत काही सुरु करण्याचे नियोजन पुढे ढकला. खर्च वाढतील. नव्या ओळखी फायदा करून देतील. नातेवाईकांकडून मदतीचा हात पुढे येईल. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. तरुण मंडळी पेचात पडतील.
धनु : घरात आनंद वाढवणार्या घटना घडतील. विदेशात व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नांना जोरदार यश मिळेल. नोकरीत पगारवाढीचे पत्र हातात पडेल. नव्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतील. नव्या गुंतवणुकीच्या प्रलोभनाला फसू नका. सार्वजनिक जीवनात ‘डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर’ हे तत्व विसरू नका. नवे वाहन घेण्याचा विचार मार्गी लागेल. कोणाला सल्ले दिल्यास नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते.
मकर : भरपूर काम करावे लागेल. भरपूर धावपळ होईल. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. महिलांच्या बाबतीत जुने आजार पुन्हा डोके वर काढतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित काम मध्यस्थाच्या माध्यमातून मार्गी लागेल. कागदपत्रावर सही करताना काळजी घ्या, वास्तूचे व्यवहार पुढे ढकला. भावनेत गुंतून चुकीचा निर्णय घेतला तर तो महागात पडेल. वाणीवर नियंत्रण ठेवा, कामापुरते बोला. मुलांच्या बाबतीत शुभघटना कानावर पडेल.
कुंभ : नोकरी, व्यवसाय, घर याबरोबरच कुठेही नियोजनपूर्वक काम करा. वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होईल. व्यवसायात थकीत येणे मिळेल. नव्या नोकरीसाठीची मुलाखत यशस्वी ठरेल. मानसिक चलबिचल वाढू देऊ नका. ध्यानधारणा, मन:शांती शिबीर यांत मन रमवाल. बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगला काळ. कवी, संगीतकार, चित्रकारांचा मानसन्मान वाढेल. सरकारी कामात नियमांचे उल्लंघन करू नका, कायदेशीर कटकटी मागे लागतील.
मीन : व्यावसायिकांना चांगले यश मिळवून देणारा काळ. काहींना अचानक धनलाभ मिळवून देणार्या घटना घडतील. नोकरीत आपलेच म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न करू नका, गैरसमजाचे प्रकार घडतील. तरुणांनी वागताना काळजी घेणे आवश्यक, मोठे वादाचे प्रसंग त्रासदायक ठरतील. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल, त्यामधून मानसिक समाधान मिळेल. घरात शुभकार्ये घडतील.