ग्रहस्थिती : शुक्र, हर्षल वृषभ राशीत, मंगळ, केतु सिंहेत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, गुरु मिथुनेत, रवि, बुध कर्केत, प्लुटो मकरेत. दिनविशेष : १६ ऑगस्ट गोपाळकाला, १९ ऑगस्ट अंजा एकादशी, २० ऑगस्ट प्रदोष, २१ ऑगस्ट शिवरात्री, गुरुपुष्यामृत योग, २२ ऑगस्ट पिठोरी अमावस्या, आरंभ सकाळी ११.५५ वा., पोळा.
– – –
मेष : कामात सामोपचार व संयम ठेवा. व्यवसायात घाई टाळा. काळजी घ्या. कामानिमित्ताने नव्या ओळखींतून विचारांची देवाणघेवाण होईल. घरात खर्चाचे प्रमाण वाढून मनस्वास्थ्य बिघडेल. नोकरीत अति विश्वास दाखवल्यास अडचणींत भर पडेल. कामात अधिक लक्ष द्या. चुका डोकेदुखी वाढवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांना शैक्षणिक यश मिळेल. मित्रांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा. व्यवसायाच्या नव्या कल्पना पुढे नेताना घाई नको. आर्थिक नुकसान होऊ शकते. श्रावणात घरात आनंददायी शुभकार्य घडेल. तरुणांनी अधिक प्रयत्न करावेत. मनाचे दडपण वाढेल.
वृषभ : आर्थिक बाजू भक्कम राहील. वेळेचे नियोजन करा. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत काळजीपूर्वक काम करा. चुका टाळा. लेखक, पत्रकार, कलाकार, संगीतकार, चित्रकारांचा सन्मान होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. शिक्षक, प्राध्यापकांना यश मिळेल. तरुणांनी मनावर ताबा ठेवावा. मालमत्तेच्या चर्चा पुढे ढकला. ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्या. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरा. संसर्गजन्य आजारापासून काळजी घ्या.
मिथुन : कुटुंबासोबत व्यतीत केलेल्या काळातून समाधान मिळेल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कामाशी काम ठेवा. घरात आनंददायी बातमी कळेल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात सबुरीने घ्या. बँकेच्या व्यवहारात काळजी घ्या. तरुणांच्या मनाविरुद्ध घटना घडेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासह सहलीला जाल. प्रवासात खिसा, पाकीट सांभाळा. शिक्षण व मेडिकल क्षेत्रात चांगले दिवस. नवीन ओळखींचा फायदा होईल. नातेवाईकांशी वाद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा.
कर्क : मित्रांकडून धोका होईल. नोकरीनिमित्ताने प्रवासात दगदग होऊन प्रकृतीवर परिणाम होईल. कामात घाई नको. तरुणांचा मौजमजेकडे कल राहील. सामाजिक क्षेत्रात लौकिक वाढेल. यशामुळे अहंकारी बनू नका. जुने आजार डोके वर काढतील. ध्यानधारणेतून सकारात्मकता वाढेल. जनसंपर्क क्षेत्रात चांगला काळ. नोकरीची संधी येईल. व्यवसायात अधिक काम केल्याने मनस्वास्थ्य बिघडेल. मुलांकडे विशेष लक्ष द्या. अनोळखी व्यक्तीशी जपून व्यवहार करा. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाल.
सिंह : आरोग्याचे प्रश्न आर्थिक ताण वाढवतील. नोकरीत कौतुक होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. तरुणांना यश मिळेल. नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. विदेशातील कामातून लाभ मिळेल. अतिविचार टाळा. संततीच्या वागण्याकडे लक्ष द्या. मार्वेâटिंगपटू, ब्रोकर यांना यशदायी काळ, आर्थिक आवक चांगली राहील. काहीजणांना अचानक धनलाभ होईल. पोटाचे विकार वाढवू नका. उधार-उसनवारी टाळा. वडीलधार्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : आपलेच म्हणणे रेटू नका. नोकरीत नव्या कामाची जबाबदारी येईल. व्यवसायात मोठे डील फायदा करून देईल. व्यवसायात आर्थिक नियोजनाचा फायदा होईल. मोठ्यांचे सल्ले माना. तरुणांनी मनाविरुद्ध घटना घडल्याने नाराज होऊ नका. श्रावणात देवदर्शन घडेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. जुन्या ओळखींमधून फायदा होईल. नोकरी व्यवसायात फायद्याच्या गोष्टी मनात ठेवा. कामात अति आत्मविश्वास नको. मुलांकडून चांगली बातमी येईल. वाहन चालवताना काळजी घ्या.
तूळ : नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. देवदर्शनातून समाधान मिळेल. व्यवसायात यश मिळेल. भरभराट होईल. घरात आनंददायी बातमी येईल. आत्मविश्वास वाढेल. उधळपट्टी टाळा. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. भागीदारीत ताणतणाव वाढू देऊ नका. सबुरीने घ्या. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. नवीन घर घेण्याचा प्रश्न मार्गी लागेल. सरकारी कामे पूर्ण होतील. मित्रांना आर्थिक मदत करताना विचार करा. आरोग्याकडे लक्ष द्या. थकीत येणे वसूल झाल्याने खिशात पैसे राहतील. विमा, वित्त क्षेत्रात चांगला काळ. नातेवाईक, मित्रांना सल्ले देण्याचे टाळा, त्यामुळे वितुष्ट येऊ शकते.
वृश्चिक : व्यापारात यश व पैसा मिळेल. नोकरीनिमित्ताने दूरचे प्रवास कराल. लॉटरी, सट्टा यातून लाभ होईल. नोकरीत गोड बोलून कामे करून घ्या. घरात जबाबदारी वाढेल. वाढलेल्या खर्चामुळे आर्थिक नियोजन विस्कळीत होईल. घरात आपलेच म्हणणे योग्य ठरवू नका. ज्येष्ठांचे ऐका. मनोकामना पूर्ण होतील. मामा-मावशींची मदत मिळेल. बंधूवर्गाचे सहकार्य मिळेल. लेखकांचा सन्मान होईल. सामाजिक कार्यात मान वाढेल. नोकरीत दूरचे प्रवास कराल. आयटीमध्ये विदेशात जाण्याची संधी मिळेल.
धनु : मालमत्तेच्या व्यवहारात काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीवर अवलंबून राहू नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. काही गोष्टी मनातच ठेवा. नको तिथे धाडस दाखवू नका. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. कलाकारांचा सन्मान होईल. संगीतकार, पत्रकार, संपादकांसाठी चांगला काळ. स्पर्धात्मक यश मिळेल. नव्या ओळखीतून कामाच्या संधी येतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील, कामचुकारपणा टाळा. दानधर्म होईल. मित्रांना मदत करावी लागेल. मौजमजेपासून दूर रहा. आरोग्य जपा.
मकर : कामकाज पुढे सरकेल, चांगली आमदनी मिळेल. ध्यानातून मन शांत राहील. प्रवासात चुका महागात पडतील. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल, समाधान मिळेल. नोकरीत आडमुठेपणा टाळा. व्यवसायात कसरत होईल. बँकेत कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी साधताना जपून. कलाकार, अभियंत्यांना चांगले अनुभव येतील. कोर्टकचेरीची कामे लांबतील. खेळाडूंची चमकदार कामगिरी होईल. आरोग्याची काळजी घ्या. चित्रकार, शिल्पकारांना नव्या संधी मिळतील.
कुंभ : नोकरी-व्यवसायात मनासारखी स्थिती राहील. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. तरुणांनी कामात अधिक मेहनत घ्यावी. स्पर्धेत यश मिळेल. घरात सुसंवाद ठेवा. ज्येष्ठांचा
सल्ला ऐका. दूरचे प्रवास कराल. नियमबाह्य काम टाळा. भागीदारीत सबुरीने घ्या. जवळच्या मित्रांशी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. सुगंधी द्रव्य, अत्तरे तयार करणार्यांना चांगला काळ. सामाजिक क्षेत्रात काळजी घ्या. कलाकार, संगीतकारांसाठी सन्मानदायक काळ. ज्येष्ठांची प्रकृती जपा.
मीन : घरातील मतभेद वाढवू नका. महागडी वस्तू घेताना खिसा पाहून खर्च करा. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. व्यवसायात अडचणी येतील. आर्थिक बाजू चांगली राहील. नोकरदारांवर वरिष्ठ खूष राहतील. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक भेटतील. मित्रांशी मतभेद होतील. सहकुटुंब देवदर्शनाला जाल. धार्मिक कार्य कराल. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. नवीन वास्तू घेण्याचा विचार असेल तर थोडे थांबा. नवीन गुंतवणूक काळजीपूर्वक करा. नातेवाईकांना मदत करावी लागू शकते.