• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

जनमन की बात

सोशल मीडियावरचे जनमानस

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in गर्जा महाराष्ट्र
0

हल्ल्याने सहानुभूती गमावली…

एसटी कर्मचार्‍यांविषयी जनतेच्या मनात सुरुवातीला सहानुभूती होती. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, त्यांच्याशी संवाद साधावा, यासाठी अनेकांनी आग्रह धरला आणि त्यानुसार पगारवाढीचा निर्णय घेतला गेला. इतरही मागण्यांचा विचार केला गेला मात्र विलिनीकरणाची मागणी अव्यवहार्य असल्याचे आधीच सांगितले गेले होते.
मात्र त्यानंतर जाणीवपूर्वक कर्मचार्‍यांना भडकवलं गेलं. संप मिटू नये, अशी रणनीती आखली गेली. अनेक कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्या. ग्रामीण भागातील अनेकांचे अपुर्‍या बससेवेमुळे हाल झाले. सरकारला संप मिटवण्यात आलेलं अपयश आणि विरोधी पक्षाने लावलेली फूस या दोन्ही बाबीतून सामान्य माणूस पिळून निघाला.
उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आज शरद पवारांच्या घरावर जो हिंसक हल्ला झाला तो निंदनीय होता. यात खरोखरच एसटी कर्मचारी होते का, हा संशोधनाचा विषय आहे. यातले अनेक लोक मद्यधुंद अवस्थेत होते. हे तथाकथित आंदोलक सभ्यतेच्या सार्‍या मर्यादा सोडून बोलत होते. अनिल बोडे असोत किंवा उदयन भोसले, यांची भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे.
खा. सुप्रिया सुळे धीरोदात्तपणे या घटनेला सामोर्‍या गेल्या. त्यांनी शांततेचं आवाहन केलं. हे संयमी, शांत, सभ्य वर्तन ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.
या प्रकारे चिथावणीखोर, हिंसक हल्ले ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. हे आंदोलन नव्हे, विकृत कारस्थान आहे. मुद्दा सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांच्यापुरता मर्यादित नाही; मुद्दा एसटीचाही नाही; मुद्दा आहे तो व्यापक राजकीय संस्कृतीचा. राजकारण नावाची गोष्ट हिंसक गँगवारच्या दिशेने जाण्याचा मुद्दा आहे. नागरिक म्हणून लढण्यासाठीचा अवकाश आक्रसत जाण्याचा मुद्दा आहे. हे कळलं नाही तर ‘तटस्थतेच्या’ नावाखाली आपण कशाला आमंत्रण देतो आहोत, हे कळणार नाही.

– श्रीरंजन आवटे

अराजक माजवण्याचा डाव

आपल्या ज्या मागण्यांसाठी पाच महिन्यांपूर्वी एस.टी. कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरु केलं त्यातील शासनात विलीन करण्याच्या मागणी व्यतिरिक्त अन्य सगळ्याच मागण्या महामंडळाने आणि सरकारने काही दिवसातच मान्य केल्या होत्या. महामंडळ कर्मचार्‍यांना शासनात विलीन करण्याची मागणी मान्य होणार नव्हतीच. त्या मागणीला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने न्यायालयही तसा आदेश देणार नव्हतेच. मग उगाच भाजपच्या स्वार्थी राजकारणाच्या आणि त्या सदावर्तेच्या नादी लागून एस.टी.कर्मचार्‍यांनी अखेर काय मिळवले? आंदोलनाच्या पहिल्या महिन्यात जे मिळणार होते तेच आज पाच महिन्यानंतरही मिळणार आहे. मग यात कोणता शहाणपणा आणि कशाचा जल्लोष?
त्यांच्या स्वतःबरोबरच राज्यातील गोरगरीब जनतेचे, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल मात्र झाले.. त्याचबरोबर शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर घडलेला प्रकार म्हणजे केवळ एसटी कर्मचार्‍यांची निदर्शनं किंवा आंदोलन नव्हतं तर तो अतिशय नियोजनपूर्वक केला गेलेला हल्ला होता. तोंडातून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत चप्पलफेक आणि दगडफेक करत घरात घुसू पाहणारे लोक आंदोलक असू शकत नाहीत, हल्लेखोरच असू शकतात. पोलिसांनी तातडीने परिस्थिती ताब्यात घेतली नसती तर हे हल्लेखोर घरातही घुसले असते आणि कदाचित आज प्रचंड काहीतरी विचित्र, वाईट घडू शकलं असतं. केवळ सदावर्ते एकटा या कृत्यामागे असू शकत नाही. त्याने काल भाजपच्या ज्या ज्या नेत्यांचे आभार मानले तेही आजच्या या हल्ल्याला जबाबदार असू शकतील. देशातील ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही तिथे अराजक माजवणे हा भाजपचा प्रयत्न आहे. आजचा प्रकार त्यातलाच असू शकतो. या भीषण हल्ल्यानंतर भाजपच्या नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्यांवर बोलणं म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. दिल्लीत तब्बल साडेसातशे शेतकरी मृत्युमुखी पडले त्यावेळी थोबाड शिवून घेतलेल्याना आता एसटी कामगारांच्या आत्महत्यांनी पाझर फुटलाय!
मुळातच या कर्मचार्‍यांच्या विलिनीकरणाव्यतिरिक्त सगळ्या मागण्या आंदोलनाच्या पहिल्याच महिन्यात मान्य झालेल्या असताना भाजपच्या स्वार्थी राजकारणाच्या नादी लागून या राज्यातील जनतेचे त्यांनी जे हाल सुरु ठेवले त्यामुळे सर्वसामान्य जनतेची सहानुभूती त्यांनी गमावलीच होती, आता आजच्या हल्ल्याने तर सगळा विषयच संपलाय..

– रवींद्र पोखरकर

या गुणी रत्नांचे काय करायचे?

अर्णब गोस्वामी, कंगना राणावत, विवेक अग्निहोत्री, हिंदुस्तानी भाऊ आणि आता महाराष्ट्रातले हे नवे, सतत किंचाळणारे गुणी रत्न! नवनवीन प्यादी उभी करून विरोधातील सरकारे, नेते व पक्षांविरोधात लोकांना चिथावून, आपण स्वत: मात्र दुरून गंमत बघायची आणि नामानिराळे राहायचे.. धर्मवादी मंडळींची ही चाल सामान्य जनता केव्हा ओळखणार आहे, कुणास ठाऊक!
दरम्यान, भाजपचे थोर नेते व माजी मंत्री अनिल बोंडे म्हणाले की, ‘शरद पवार यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. प्रâान्समध्ये शेवटी राजाला फासावर जावे लागले होते…!’ अरेरे! यांच्या डोक्यात द्वेष किती ठासून भरलाय… ‘गोली मारो सालों को’ असे म्हणणारे दिल्लीचे अनुरागी मंत्री महोदय आणि विदर्भातील हे महान नेते यांच्यात असा काय फरक आहे? यापूर्वी नाना पटोले यांची बोटे छाटली छाटण्याची भाषाही या ‘संस्कारी’ नेत्याने केली होती. देवेंद्रजी, तुम्हाला हे वक्तव्य मंजूर आहे का? अन्यथा, बोंडेंचा जाहीरपणे निषेध करा आणि त्यांना कडक समज द्या!

– हेमंत देसाई

होय, मेधा पाटकर यांची ईडी चौकशी झालीच पाहिजे…

मेधा पाटकर यांच्या अगणित संपत्तीची चौकशी व्हायलाच पाहिजे.
खादीच्या किती साड्या भांडारात आणि स्लीपर किती संग्रहात याची संख्या जाहीर झालीच पाहिजे. (जशा मोजल्या होत्या जयललिता आणि मार्कोसच्या पत्नीच्या !!!)
खांद्यावर अतिशय जड पिशव्या ती वाहते, त्या पिशव्यांत नेमके असते तरी काय? हे देशाला ईडीने सांगितलेच पाहिजे…
जीवनशाळा नावाच्या अनेक शाळा ती चालवते म्हणे, त्या शाळांमध्ये ती डोनेशन तर घेत नसेल ना… त्याचाही हिशोब आता मांडलाच पाहिजे.
मुंबईत झोपडपट्टीवासीयांचे लढे लढताना, त्या झोपड्यांखालचे प्लॉट तर तिचे नाहीत ना?
हेही ईडीने तपासायलाच हवे…
– – –
खरेच ईडी साहेब, तपासाच मेधाची संपत्ती…
पाड्या-पाड्यावर पसरलेले तिचे ‘सोन्या’सारखे (गोल्ड) कार्यकर्ते…
नर्मदेच्या बुडालेल्या गावांमध्ये खोल मातीच्या खाणीत तग धरून राहिलेले ‘हिरे’ (डायमंड)…
जल जंगल जमिनीसाठी लढणार्‍या माणसांच्या भावविश्वातील शेकडो हेक्टरचे प्लॉट… (लँड)
आणि दडपशाहीने तुटू न शकलेले एकमेकातील ‘बॉण्ड्स’ आणि जन्मभरासाठी आंदोलनात केलेल्या ‘गुंतवणुकी’ (इन्व्हेस्टमेंट)…
संपत्तीसाठीचे सगळे इंग्रजी शब्द अगदी अचूक जुळतात बघा…
म्हणून या बॉण्ड आणि गुंतवणुकीही तपासायला हव्यात…
इथे आम्हाला एक पक्ष चालवायला कित्येक कोटी लागतात, सलग ३० वर्षे ३ राज्यात इतके काम चालवायला अब्ज रुपये तर लागले असतील ना…?
पैशाशिवाय काम उभे राहू शकते हे मिस कॉलवर उभे राहिलेल्या आमच्या पक्षाकडूनच आता ‘मिस’ झाले आहे…
त्यामुळे भरवसाच बसत नाही या साध्या दिसणार्‍या बाईवर…
तिच्या या अमूर्त संपत्तीची मोजदाद झालीच पाहीजे…
हात लावेल तिथे सोन्यासारखी माणसे उभे करणार्‍या या ‘लेडी मिडास’ची सोनेरी संपत्ती आता खणून काढाच…
आम्ही सोबत आहोत तुमच्या…

– हेरंब कुलकर्णी

भिकेला लागण्याची पाळी

तुमच्या मायबाप सरकारने तुम्हाला भोंगळ करायचं ठरवलं की प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही.
वेगवेगळ्या बातम्यांचा एकत्रित परिणाम समजून घ्या. विजेवर चालणारी वाहने वापरावीत म्हणून गल्ली ते दिल्ली सगळे कारभारी कोकलून राहिलेले आहेत. दरम्यान विजेवर चालणार्‍या वाहनांच्या निर्मितीक्षेत्रात अंबानी आणि अदानी प्रवेश करणार आहेत.
इंधनाचे भाव आणि क्रुड ऑइलच्या भावाचा सरकारने काहीही संबंध ठेवलेला नाही, क्रुड ऑइलच्या भावात घसरण झाली की सरकार कर वाढवून किंमत तेवढीच ठेवतं किंवा क्रुड ऑइलच्या किमतीत वाढ झाली की दणकून किमती वाढवतं. या किमतीचा असलाच तर फक्त संबंध निवडणुका कधी आहेत एवढ्याच गोष्टीशी असतो.
इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने लोक विजेवर चालणारी वाहने विकत घेऊ लागलेत. आता विजेची टंचाई, उन्हाळा, कोळश्याची टंचाई या बातम्या यायला लागल्यात. राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाने (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन) आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने अदानीसोबत कोळशाच्या खरेदीचा करार केलाय, मग सगळ्या राज्यांना अदानीच्या कोळश्याने वीज मिळेल.
गंमत म्हणजे कोळशाचा धूर करून प्रदूषण करून वीजनिर्मिती करून विजेवर चालणारी वाहने चालवून आपण नेमके कसे पर्यावरण वाचवणार आहोत? मग अपारंपरिक उर्जेची निर्मिती गरजेची ना? ती कुठून होते? सोलर आणि विंड. पैकी विंडमिल उभारणे सामान्य माणसाच्या आवाक्यात नसणारा विषय. तिथे असणार्‍या महाबलाढ्य कंपन्या कुणाच्या हे विचारू नये.
सामान्य लोकांना सोलर वीजनिर्मिती प्रकल्प लावून त्याची वीज साठवणे किंवा थेट ग्रीडमध्ये सोडणे हा पर्याय आहे. त्यामुळे वीजबिलात बचत होते. मोठमोठ्या कंपन्या सुद्धा छतावर प्लांट लावून बचत करतात. या सोलर वीजनिर्मितीच्या पॅनलचा जीएसटी पूर्वी पाच टक्के होता, तो बारा टक्के झालाय. पाच वरून बारा टक्के. शिवाय सोलर पॅनलच्या आयातीवर असणारी कस्टम ड्युटी (सीमा शुल्क) थेट पाच टक्क्यावरून चाळीस टक्के केलेलं आहे. पाचवरून ४० टक्के सीमाशुल्क म्हणजे आठपट वाढ.
म्हणजे सामान्य माणसांना सोलर वीजनिर्मिती परवडणार नाहीच. विजेची वाहने वापरायची कारण इंधन महाग, पण वीजनिर्मिती करायची ती कोळश्याने.
कोळसा कुणाचा? विजेची वाहने कुणाची?
तुमच्या कमरेची लंगोटीसुद्धा काढून ती अदानी अंबानीला द्यायची ठरवल्यावर परमेश्वर सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही ते कसं कळले का? आपली वाटचाल जळणारी लंका होण्याकडे सुरु नाहीये तर आपली घोडदौड सुरु आहे भिकेला लागायची ती अशी.

– आनंद शितोळे

Previous Post

महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला जगवा!

Next Post

महिलांना फ्रंटसीटवर आणणारी WOW अमृता!

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

May 8, 2025
गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

May 5, 2025
गर्जा महाराष्ट्र

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

April 25, 2025
गर्जा महाराष्ट्र

‘फुले’ आणि काटे!

April 17, 2025
Next Post
महिलांना फ्रंटसीटवर आणणारी WOW अमृता!

महिलांना फ्रंटसीटवर आणणारी WOW अमृता!

निर्भीड आणि निःस्पृह!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.