• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पाकिजापेक्षा बेहतर ‘लाल पत्थर’

- शुद्ध निषाद

टीम मार्मिक by टीम मार्मिक
April 14, 2022
in सिने प्रिक्षान
0
पाकिजापेक्षा बेहतर ‘लाल पत्थर’

टायटल वाचून तुम्ही जरासे का होईना पण एकदोन सेकंद संभ्रमात पडला असाल. पण हे शॉर्टकटने सांगितलं. कसं ते पहा. ‘पाकिजा’त या चित्रासारखाच एक राजकुमार, एक गाणारीण आहे. प्रेमाचा त्रिकोण आहे. पण त्या त्रिकोणालाही थोडासा वेगळ्या पद्धतीनं काटशह दिलाय. ‘पाकिजा’तले ते नाचणारणींचे सेटींग्सचे महल नि यातले खरेखुरे महल म्हणजे आग्य्राचा ताजमहाल, फत्तेपूर सिकरी वगैरे नि त्याच्या आधाराचा टेकू घेतलेली एक प्रेमकहाणी म्हणजे ‘लाल पत्थर’ची ष्टोरी. ही एक व्यक्तिरेखा म्हणा किंवा एका राजकुमाराच्या मनोभावनांचं दिलचस्प आत्मचरित्र म्हणा, पण त्यात प्रेमाचा त्रिकोण असूनही नेहमीच्या फिल्मी चौकटीपेक्षा निराळा वाटतो, इंटरेस्टींग वाटतो. मधून मधून अनावश्यक थोडेफार सीन्स दिसतात. तरीही सबंध चित्र पहावं अशी आतुरता निर्माण करण्यात कलाकारांची अदाकारी, दिग्दर्शकाची मेहनत, कलादिग्दर्शकाची कलाकुसर नि संगीताची नजाकत कामी आलीय.
ष्टोरीला सुरवात केलीय फ्लॅशबॅकने. तीही नेहमीच्या पद्धतीने. त्यातही वेगळेपणा दाखवता आला असता. पण फत्तेपूर सिकरी येथे पूर्णिमेच्या रात्री पिकनिकसाठी आलेल्या कुटुंबाला थरथरणार्‍या हातात काठी घेऊन येणारा एक वेडसर म्हातारा ‘हाथ मत लगाव उस पत्थर को वरना खून हो जाएगा’ असं सुनावतो नि नंतर आत्मियतेने कहानी सुनावतो. पण पुन: शेवट फ्लॅशबॅकने दाखवण्यासाठी हा सारा प्रकार. अशी ही कहाणी-
अगदी लहानपणापासून शराब, औरत आणि व्यभिचार हे आपल्या बापजाद्यांचं वैभव पहात आलेला राजकुमार. याला या तिन्ही गोष्टींचा तिटकारा म्हणून तो ‘बॅचलर’. पण या तीन सवयीची शिकार करण्याची आदत नसली तरी त्याला शिकारीचा शोक होता. जनावरांची शिकार करताना दरोडेखोरांनी पळवलेल्या एका विधवा तरुण स्त्रीचीही सुटका करतो नि तिला ‘बाइज्जत’ घरी सोडतो. पण तिच्यावर अत्याचार झाल्यामुळे तो पुन: राजवाड्यात घेऊन येतो. तिच्यावर प्रेम करतो. तिला मालकीण बनवतो. शिकवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ती ‘अकल की दुष्मन’ असं समजल्यावर ‘इंटेलेक्च्युअल सॅटिसफॅक्शन’साठी एक गरीब कुटुंबातील मुलीशी शादी करतो. पहिली वैतागते. दुसरीचा मित्र शेखरविषयी ती राजकुमारच्या मनात गैरसमज भरवून देते. त्यामुळे तो बायकोचा खून शेखरकडून करवतो. झटापटीत शेखर मरतो. असे हे खुनांच्या रक्ताने झालेले ‘लाल पत्थर’ नि त्याची कहाणी.
लेखकाने फ्लॅशबॅक न दाखवता ही कहाणी दाखवायचा प्रयत्न केला असता तर चित्र आहे त्यापेक्षा खूप वरचढ झाले असते. चित्रातल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वभावदर्शन चांगले रंगवलंय. पटण्यासारखे आहे. चित्रपटातला हा गुण फार मोठा आहे. चित्राला दिली गेलेली सायकॉलॉजिकल ट्रीटमेंटही महत्त्वाची. चित्राला रसिकांची गर्दी का होते? या प्रश्नाचे उत्तर हे आहे.
दिग्दर्शक हा उत्तम ‘अ‍ॅक्टर’ असला पाहिजे हे सुशील मुजुमदार यांनी राखीच्या दारुड्या बापाच्या बेहतरीन अदाकारीने दाखवून दिलंय. हेमा मालिनीने तोंड न उघडता अन्यायाने पेटलेल्या ‘स्त्री’चं दर्शन दाखवलंय ते मानलं पाहिजे. हिरोचं सौंदर्य दिसण्यात नसून त्याच्या वाक्याच्या फेकीत असतं हे राजकुमारनं पुन: एकदा दाखवलंय. राखीने जे काम मिळालंय त्यात अभिनयाची चमक दाखवलीय. मात्र विनोद मेहराचं काम म्हणजे एक ‘विनोद’ आहे. शंकर-जयकिशन (हो जयकिशन यांनीही दोन तीन तर्जा दिल्यात. कारण हे दोन तीन वर्षे रखडलेलं चित्र आहे. आणि गाण्याचं रेकॉर्डिंग प्रथम केलं जातं. न समजणार्‍यांनी याची नोंद घ्यावी.) जास्त काही सांगत नाही.
थोडक्यात, अलिकडे पाहिलेल्या चित्रांत हे चित्र बरं वाटलं. लोकांनाही ते आवडलेलं आहे. तेव्हा तुम्हीही लोकांमधलेच, तेव्हा पाहायला हरकत नाही असा ‘ग्रीन सिग्नल’ मी देतो.

– शुद्ध निषाद

Previous Post

मेरे अपने… सिप्पीसाहेब!

Next Post

नाचणी : गरीबांचं `श्रीमंत’ धान्य

Next Post

नाचणी : गरीबांचं `श्रीमंत' धान्य

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.