• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
December 16, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ सत्ताधार्‍यांवर निधीची खैरात; लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवत ५५ हजार कोटींची घोषणा.
■ आणि यांचे नेते लोकांवर टीका करतात रेवड्या वाटणारे म्हणून… ते मतांसाठी लोकांना तरी वाटतात, हे आपल्यातच वाटून खातायत…

□ गुन्हे नोंदवण्यात घाई, नंतर चालढकल का? – विशेष न्यायालयाने ईडीला फटकारले.
■ ईडीला फटकारून काय फायदा? मालक सांगेल त्याचं धोतर फाडायचं, पोटरी पकडायची हेच घरच्या श्वानाचं काम असतं…

□ दाऊदशी संबंध जोडलेले नवाब मलिक सत्ताधारी बाकावर.
■ काही दिवसांनी दाऊदही पवित्र बनून याच बाकांवर बसलेला पाहायला मिळेल… है तो मुमकिन है…

□ पीकविम्याचे ५२ रुपये नेण्यासाठी शेतकर्‍यांनी आणली तिजोरी; मिंधे सरकारचे थोबाड फुटले.
■ काही थोबाड फुटत नाही… त्यासाठी मुळात काही लाज असावी लागते.

□ धर्माच्या नावाने मते मागायची का? – उद्धव ठाकरेंच्या पत्रावर मौन बाळगणार्‍या निवडणूक आयोगाला शिवसेनेचा थेट सवाल.
■ धर्माच्या, जातीच्या, पोटजातीच्या, शहीद जवानांच्या- कोणाच्याही नावावर मतं मागण्याचा अधिकार फक्त एका पक्षाकडे राखीव आहे, हे निवडणूक आयोग अधिकृत उत्तरात कसं देणार लिहून? त्यांचीही अडचण समजून घ्या.

□ हायकोर्टाच्या नव्या संकुलाचे स्वप्न अजूनही लटकलेलेच!
■ झटपट वेगाने न्याय व्हायला लागला तर सत्ताधार्‍यांसाठी किती अडचणीचं ठरेल ते.

□ काम अपूर्ण असतानाच ‘आरे’मध्ये सिमेंटच्या रस्त्याला तडे; ‘सामना’मधील वृत्तानंतर लगेच दुरुस्तीला सुरुवात.
■ पूर्ण होण्याच्या आत दुरुस्तीला गेलेला रस्ता म्हणून गिनीज बुकात नोंद होते काय, पाहा.

□ बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा सांगता, मग शिवसेना का सोडली? – उलट तपासणीत आमदार दिलीप लांडे गडबडले.
■ का सोडली ते सगळ्यांना माहिती आहे… उगाच वारसा सांगणं बंद करा.

□ साक्षीदार हजर करण्याच्या कामी टाळाटाळ खपवून घेणार नाही – भाजप नेत्यांविरोधातील खटल्यात न्यायालयाने सरकारी पक्षाला झापले.
■ भाजपच्या नेत्यांविरोधात मुळात खटले दाखल करण्याची हिंमत कोणी केली, याचा तपास केला पाहिजे.

□ ललित पाटीलला संरक्षण देणार्‍या मंत्र्यावर कारवाई झालीच पाहिजे – आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक.
■ धंगेकरांनी रामराज्य, शिवरायांचं स्वराज्य वगैरे कल्पना फारच सिरियसली घेतलेल्या दिसतायत… ते फक्त लोकांना सांगण्यासाठी असतं हो!

□ ठाणे पालिकेची ‘मराठी पाट्या’ मोहीम केवळ फार्स.
■ मुळात त्या पाट्यांवर फक्त देवनागरी लिपीत नाव लिहिलं जाणार असताना त्यांना ‘मराठी पाट्या’ म्हणणं थांबवायला हवं… खरी फसवणूक तिथून सुरू होते.

□ शेतकर्‍यांच्या प्रश्नावर खोके सरकारचा पळ; आरोग्य खात्यातील बेफिकिरीवर हायकोर्टाकडून कडक ताशेरे.
■ सुरत-गुवाहाटीला फिरायला पाठवा महाशक्तीसकट सगळ्यांना. राज्याचा कारभार जरा बरा चालेल.

□ महुआ मोईत्रा यांना बाजू मांडण्याची संधीच दिली नाही; महिला मार्शल्सनी सभागृहाबाहेर फरफटत नेले.
■ सुप्रीम कोर्टात कान पिळले गेले की पुन्हा आणून प्रस्थापना करावी लागेल त्यांची सन्मानाने- तेव्हाही निलाजरेपणाने दात विचकतील सत्ताधारी.

□ किचनमध्ये महागाईचा भडका उडणार.
■ कितीही महाग गॅस घेऊ, हजार रुपये किलो भाजी झाली तरी मत यांनाच देऊ, ही खुमखुमी जिरेपर्यंत काही फरक नाही पडणार या भडक्याने.

□ हिंगोलीच्या शेतकर्‍यांचा अन्नत्याग; रस्त्यावर दूध ओतून मिंधे सरकारचा निषेध.
■ आपला जीव सांभाळा भावांनो, यांच्याकडून दयाबुद्धीची अपेक्षा ठेवाल तर फुकट जीव गमावून बसाल.

□ महामार्ग केला, सोयीसुविधांची ‘समृद्धी’ कधी येणार? शिवसेना आमदारांनी मिंधे सरकारला धारेवर धरले.
■ ते आणि काय असतं, हा प्रश्न सरकारने विचारला नाही का?

□ ड्रग्जमाफियांसोबत हातमिळवणी करणार्‍या पोलिसाला बडतर्फ करणार – गृहमंत्री फडणवीस.
■ आणि मंत्र्यांचं काय करणार?

□ मेडिकल कॉलेजसाठी जवानासह १००जणांच्या जमिनी हडपल्या – मंत्री अब्दुल सत्तार यांचा प्रताप.
■ प्रखर हिंदुत्वासाठी महाशक्तीला सामील झालेल्या आणि मुस्लिमांची अ‍ॅलर्जी असूनही तिने सामावून घेतलेल्या अशा सुपुत्रांवर असे आरोप का बरं करावे?

□ महाराष्ट्रात दररोज ४० नवजात बालकांचा मृत्यू – सत्ताधारी आमदारानेच काढले वाभाडे.
■ जो आला तो गेला, हा सृष्टीचा नियम आहे, कोणी आधी जातो, कोणी नंतर जातो, सगळी प्रभुची माया आहे… असं सांगणारा कोणी सोंगेश्वर बुवा अजून अवतरित नाही का झाला?

Previous Post

लढवय्या महिलांचे स्फूर्तिस्थान

Next Post

रोहितचं काय होणार?

Next Post

रोहितचं काय होणार?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.