• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

वजनदार

- डॉ. सतीश नाईक (पुस्तकांच्या पानांतून)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 16, 2023
in पुस्तकाचं पान
0

अगदी हल्लीचीच गोष्ट आहे. म्हणजे साधारण तीनेक वर्ष लोटली असतील. या कोविडच्या काळात तीनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेलाही हल्ली म्हणावं लागतंय. पार्टीत अनेक लोकांमध्ये संवाद होतो तसा संवाद चालू होता. हातात प्लेट भरून अन्न घेतलेली एक स्त्री सांगत होती, ‘डाएटिंगचा काही म्हटल्या काही उपयोग नाही. ते जीन्सवर अवलंबून असतं. काहीही खाल्लं तरी वजन वाढतं. अगदी पाणी प्यायलं तरी!’ ती स्त्री स्वत: चांगलंच वजन राखून होती. त्यामुळं ती स्वत:विषयी बोलत असावी असा कयास मी बांधला.
वजन हा तसा स्त्रियांमधला कळीचा मुद्दा. डाएटिंग करून थकलेल्या आणि तरीही जराही वजन कमी न झालेल्या स्त्रिया मी अनेकदा अधूनमधून पाहिल्या आहेत. असं का होतं? खरंच वजनाचा आणि लठ्ठपणाचा जीन्सशी काही संबंध आहे का? ‘कमी खाऊनही माणसांचं वजन कमी होत नाही’ असं घडवणारे काही जीन्स आहेत का?
कमालीची गोष्ट म्हणजे माणसाच्या जीनोमचा अभ्यास पूर्ण झाला तरी या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं कुणालाही जमलेलं नाही. अनेकानेक जीन्सवर संशय आहे. परंतु नेमकेपणाने बोट ठेवावं असं अजून काही दृष्टीपथात नाही. त्यामुळं त्या बाईंच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे ते नक्की सांगता येत नाही.
मुळात वजन का वाढतं हे पाहिलं तरी वजन आणि जीन्सच्या संबंधावर अजून का प्रकाश पडला नाही याचा अंदाज येऊ शकतो. जगातला मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की ज्याला अन्न मिळवायला फारसं धडपडावं लागत नाही. इतर सर्व प्राण्यांना भूक लागली की पहिल्यांदा अन्न शोधावं लागतं. अन्न शोधायचं म्हणजे प्रयत्न आला, कष्ट आले. माणूस बुद्धिमान. त्याच्याकडे प्रिâज आहे, अन्न साठवण्याचे असंख्य प्रकार त्याला माहीत आहेत. अगदीच अडलं तर कुठल्याही क्षणी त्याला अन्नधान्य पुरवायला ‘वाणी’, ‘हॉटेलं’ आहेत. त्यामुळे त्याचे अन्न शोधायचे कष्ट वाचले, गरजेपेक्षा जास्त अन्न त्याला उपलब्ध झालं.
अर्थात त्याला प्रत्यक्ष अन्न मिळवायला त्रास होत नसला तरी ते अन्न विकत घ्यायला मेहनत करावी लागत होतीच. पण हळूहळू जसजसं यांत्रिकीकरण व्हायला लागलं तसतसे तेही कष्ट कमी व्हायला लागले. अंग मेहनत कमीत कमी झाली. वेगळ्या शब्दात मांडायचं म्हणजे कष्ट कमी, खाणं तितकंच किंवा बरंच अधिक हा मामला झाला. साहजिकच खाल्लेलं जाणार कुठं? ते शरीरातच कुठंतरी राहणार. त्यामुळं माणसाचं वजन वाढू लागलं. इतर प्राण्यांच्या मानानं माणसा-माणसांच्या आकारात प्रचंड तफावत दिसू लागली. एक अगदी कृश तर दुसरा खूप गलेलठ्ठ. आपण अनेकदा टीव्हीवर ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ पाहतो. त्यात प्राण्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. प्रत्येक प्रजातीचा एक विशिष्ट आकार, एक विशिष्ट वजन दिसतं. त्या प्रजातींमध्ये आपल्यासारखी वजनाची प्रचंड तफावत नक्कीच दिसत नाही. एखाद्याने त्यांच्या पाठीवरून जाईल असा बाण मारला तरी तो कोणाला न लागता पलीकडे जाईल इतका त्या प्राण्यांच्या वजन-उंचीमध्ये सारखेपणा असतो.
प्राणी आणि आपण यांच्यातल्या या तुलनेतून एक बाब स्पष्ट समोर येते. वजनाचा आणि जीन्सचा संबंध असला तरी तो नक्कीच खूप मोठा नाही. कारण प्राण्यांमध्येही जीन्स असतात. त्यांच्यातदेखील जीन्सशी संबंधित बदल होतात. वजनाचा आणि जीन्सचा पुरेसा नातेसंबंध असता तर त्याच प्रजातीतले निदान थोडेतरी प्राणी लठ्ठ दिसले असते.
तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाळीव प्राण्यांमध्ये मात्र लठ्ठपणा दिसतोय. रस्त्यावर मोकाट फिरणारे आणि घरी पाळलेले कुत्रे यांच्यात तुलना केली की घरचे, पाळलेले कुत्रे वजनदार दिसतात. एकप्रकारे माणसांचे गुणधर्म त्यांच्यात उतरलेले असतात.
याचा अर्थ सहज समजण्यासारखा आहे. जीन्सपेक्षा एकंदर परिस्थिती, आपली वागणूक, आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी, आळशीपणा याचा आपल्या गब्दुलपणाशी जास्त संबंध आहे. म्हणूनच लठ्ठपणाशी जोडलं गेलेलं जीन आपल्याला सापडेनासं झालंय.
तरीही आपल्या संपूर्ण जिनोमवरच्या मिळून एकूण ४१ जीन्समध्ये झालेले बदल वजन वाढायला कारणीभूत असावेत असा कयास आहे. ही सगळी जीन्स भूक लागण्याच्या, पोट भरलंय हे मेंदू ज्या रसायनांनी ठरवतो त्यांच्या, अन्न पचनाच्या आणि अन्नाचं चरबीत रूपांतर करून ते साठवण्याच्या एकंदर प्रक्रियेशी जोडली गेलेली आहेत. यातली बहुसंख्य जीन्स प्रकर्षाने मेंदूमध्ये अवतरलेली आहेत.
नेमक्या जीन्सचा उलगडा झालेला नसला तरी जीन्समध्ये काहीतरी पाणी मुरतंय असा संशय शास्त्रज्ञांना येण्याचं कारण म्हणजे दोन्ही पालक लठ्ठ असल्यावर ८० टक्के वेळेला त्यांच्या मुलांमध्ये तो लठ्ठपणा उतरलेला दिसतो, याउलट कृश पालकांची केवळ १० टक्के मुलं जाडी दिसतात. यावरून शास्त्रज्ञांचा तर्क आहे की जीन्समध्ये काहीतरी असावं आणि त्याला योग्य परिस्थितीची साथ मिळाल्यावर वजन वाढत असावं. जर जीन्स कुठली हे कळलं असतं तर आहारावर नियंत्रण करून कोणाला फायदा होणार आहे आणि कोणाला नाही हे ठरवणं सोपं गेलं असतं.
अर्थात याबाबतीत जीन्सपेक्षा वातावरणाचा संबंध जास्त अधोरेखित होतो. कारण सध्या प्रचलित होत असलेली वजन कमी करण्याची ऑपरेशन्स. ही ऑपरेशन्स करून लठ्ठ माणसांची वजनं खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. पूर्वीदेखील शरीरातली चरबी काढून टाकायची ऑपरेशन्स व्हायची. त्यात शरीरातली चरबी काढून टाकली जायची. पण त्या ऑपरेशन्समध्ये मिळणारं यश तितकंसं मोठं नव्हतं. आताची ऑपरेशन्स वेगळा मार्ग अवलंबतात. जठराचा आकार कमी करणं, ज्या भागात अन्न पचलं आणि शोषलं जातं त्या भागाला बायपास करून अन्न लवकर आणि थेट मोठ्या आतड्यात पोचेल अशी व्यवस्था करणं यावर ही ऑपरेशन्स केंद्रित आहेत. त्यामध्ये मोठं यश मिळताना दिसतंय. यावरून कळतं की आपण किती खातो, किती पचवतो, याने फरक पडतो. खाण्याचं प्रमाण कमी असलं की वजन कमी होणारच. मग तुमची जीन्स कशीही असेनात!
नीट विचार केला की वजन काबूत राखण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. अन्न कमी जाणं हे महत्त्वाचं आहे. पण मनुष्यप्राणी जेवतो ते केवळ पोट भरण्यासाठी अथवा जिवंत राहण्यासाठी नव्हे. त्याला जेवणाचा आनंददेखील हवा असतो. पोट भरलंय असं समाधान पाहिजे असतं. एकदा पोट भरलं की समोरचं अन्न कितीही उत्तम दर्जाचं, उत्तम चवीचं असू दे. तो खाऊ शकणार नाही. मेंदू त्याला ‘आणखी नको’ असाच संदेश देत राहणार. म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हे तिहेरी समीकरण साधलं गेलं पाहिजे. पोट भरलं पाहिजे, जेवणाचं समाधान मिळालं पाहिजे आणि कमी खाल्लं गेलं पाहिजे.
प्रश्न आहे की हे साधायचं कसं? त्यावरचं उत्तरसुद्धा सोपं आहे. सावकाश जेवायचं. शरीराच्याच गुणधर्माचा उपयोग करून घ्यायचा. शरीराचा गुणधर्म काय सांगतो? तो सांगतो की जेवण आणि वेळ यांचं गणित जुळवा. हे गणित म्हणजे काय? तेही कळायला सोपं.
खूप भूक लागल्यावर तुम्ही आम्ही जेवायला सुरुवात करतो. पहिल्यांदा गपागपा खातो. मग जसजसं पोट भरायला लागतं तसतसा आपला वेग मंदावत जातो. शेवटी शेवटी तर वेग इतका मंदावतो की आपण घास बराच वेळ ताटातच धरून बसतो. यामागे शरीराची एक यंत्रणा कार्यरत असते. आतड्यातून निघणारे काही हार्मोन्स मेंदूपर्यंत पोचून आता पुरेसं अन्न मिळालं आहे याची जाणीव करून देत असतात. फक्त इतकंच की ही संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित व्हायला पुरेसा वेळ देण्याची गरज असते. तुम्ही-आम्ही अन्न शिजवून, चविष्ट करून खातो. साहजिकच चांगलं लागतंय म्हटल्यावर पटापट खाणं होतं. मेंदू थांब म्हणायचे संदेश धाडेपर्यंत खूप अधिक अन्न पोटात गेलेलं असतं. आपली वजनं वाढतात. म्हणूनच पटापट पोटात जाणारं फास्ट फूड आपलं नुकसान करतं. अशा फास्ट फूड्समध्ये असलेल्या जास्त ‘कॅलरीज’ आपलं वजन वाढवत असतात.
म्हणूनच जोपर्यंत लठ्ठपणाचे जीन्स आपल्याला नेमके सापडत नाहीत तोपर्यंत आपले माझे जीन्स असे आहेत म्हणून माझं वजन वाढतं हा समज बाजूला ठेवू या. सिद्ध होईपर्यंत त्याला गैरसमजाचाच दर्जा द्यावा. पण मग आपण वजन कमी कसं करायचं? आपण एकच करायचं. सावकाश खायचं. मेंदूला ‘पुरे’ म्हणायला ‘पुरेसा’ अवधी द्यायचा. खाणं बंद करा असा संदेश देणार्‍या जीन्सच्या कामाला योग्य तितका वेळ द्यायचा. शिजवलेलं अन्न मर्यादित प्रमाणात खावं. नाहीतरी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंच आहे. ‘एक घास बत्तीस वेळा चावून खावा’ हा मस्त मंत्र आहे. खूप फायदा होतो. आपल्या खाण्यात काहीही बदल केला नाही, कुठलंही ‘डाएटिंग’ केलं नाही तरी वजनात फरक पडतो. फक्त खरंच प्रत्येक घास मोजून बत्तीस वेळेला चावून खायला हवा. आणि शीतपेयांसारखे जे पदार्थ चावता येत नाहीत ते खाऊ नयेत.
त्या बाईंना मी हाच मंत्र सांगितला होता. नंतर काही काळानं त्यांनी फोनवरून माझे आभार मानले. म्हणजे त्यांनाही यश मिळालंय. तुम्हीही करून बघा खरंच फरक पडतो की नाही ते!

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

सामान्य माणसांचे थरारक साहस

Related Posts

पुस्तकाचं पान

अस्वस्थतेतून सकारात्मकता!

April 17, 2025
पुस्तकाचं पान

श्यामबाबूंचा सखोल, सहृदय ‘मंडी’

January 31, 2025
पुस्तकाचं पान

व्यंगचित्रांना वाहिलेले मार्मिक

January 9, 2025
पुस्तकाचं पान

मटकासुर

December 14, 2024
Next Post

सामान्य माणसांचे थरारक साहस

चल उड जा रे पंछी...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.