• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चल उड जा रे पंछी…

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 16, 2023
in मनोरंजन
0

फार पूर्वीपासून मी ऐकत आलो आहे की इतिहास तेच लिहितात जे विजेते आहेत. त्यांच्या विजयात लाखोंचा सहभाग असतो हे त्यांनाही माहीत असतं, पण त्यांची नावं इतिहासाच्या पानात असतीलच असे नाही. असंच काहीसं चित्रपट संगीताच्या इतिहासातही होत आले आहे. विशेषत: संगीतकारांच्या बाबतीत… अशी अनेक नावं पार विस्मृतीत गेलेली आहेत… पण फक्तच नावंच विस्मृतीत…कारण त्यांनी निर्मिलेले संगीत मात्र आम्ही नाही विसरत. ते कानावर पडलं की आम्ही हरखून जातो. कानातून झिरपणारे सूर आजही मनातही उतरतात. असं का होत असेल बरे?
भारतीय चित्रपटाच्या संगीताचा सुवर्णकाळ म्हणजे ५० ते ७०पर्यंतचे दशक. या काळात संगीतकार, गायक, गीतकार यांचे अक्षरश: धुमशान होते. ते सर्वजण संगीत, गीत, गायन या शस्त्रांनी आपापसात युद्ध करायचे आणि आमची चंगळ व्हायची. आमच्या रोजच्या जगण्याचा ते एक भागच झाले. यातील अनेक नावे आम्हाला आजही तोंडपाठ आहेत. ज्यांची नावं तोंडपाठ नाहीत, पण ज्यांचं संगीत आजही कानाला तृप्त करतं, असेही काही संगीतकार आहेत… त्यांच्यातल्या एकाची आज ओळख करून घेऊ या.
पाटणा विश्वविद्यालयातून अर्थशास्त्र आणि पत्रकारितेची एम.ए. पदवी घेतल्यानंतर कुठलाही तरूण नोकरीच्या शोधात जाणार हे उघड आहे. पण आपल्या कथेचा नायक असलेल्या या सुविद्य तरुणाला मात्र नोकरीच्या मागे पळण्यात अजिबातच रस नव्हता. त्याऐवजी त्याची पावलं लखनौच्या पंडित शिवप्रसाद त्रिपाठी यांच्या घराकडे वळली. त्यांच्याकडून संगीताचे धडे घेत असतानाच पंडित भातखंडे संगीत विद्यालयातून संगीताच्या नोट्स मागवून त्याचा अभ्यास सुरू केला. अर्थशास्त्रातील ‘नोट’ आणि संगीतातील ‘नोट’ या किमान त्या काळात तरी परस्परविरोधी गोष्टी होत्या.
बिहारमधला एक जिल्हा गोपालगंज. २००५मधील नोंदीनुसार भारतातील २५० सर्वात मागास जिल्ह्यापैकी हा एक. १९१७मध्ये याचे नाव सरन जिल्हा होते. तेव्हा तो किती मागास असेल? या जिल्ह्यातील सव्रेजी या अगदीच छोट्या खेड्यात जन्मलेल्या या बाळाचे नाव आईवडिलांनी खूपच कल्पकतेने ठेवले ‘चित्रगुप्त’. भारतीय पुराणानुसार पापपुण्याचा हिशोब ठेवणारी देवता. मात्र या बाळाने मोठा झाल्यावर आयुष्यभर फक्त सूर, ताल, गीत, नोट्स, सरगम यांचाच हिशोब केला. ‘चित्रगुप्त श्रीवास्तव, एम.ए. अर्थशास्त्र’ घरावर अशी मस्त पाटी लावायची सोडून हा भला तरूण हार्मोनियमच्या पट्ट्यावर बोटे फिरवू लागला आणि सुंदर सुरावटी त्यांच्यासमोर हात जोडून उभ्या राहू लागल्या.
‘काली टोपी लाल रूमाल’, ‘बर्मा रोड’, ‘बरखा’, ‘गेस्ट हाऊस’, मैं चूप रहूँगी’, उंचे लोग’, ‘बेजुबान’, ‘जबक’, ‘वासना’, ‘भाभी’, ‘औलाद’, ‘सॅमसन’, ‘बारात’, ‘इन्साफ’, ‘बिरादरी’, ‘मैं भी लडकी हूँ’, ‘कंगन’, ‘नीलमणी’, ‘चंदा मेरे आजा’, ‘पतंग’, ‘ऑपेरा हाऊस’, ‘सुहाग सिंदूर’, ‘किंगकाँग’, ‘कल हमारा है’, ‘माँ बाप’, ‘शादी’, ‘मैं शादी करने चला’, ‘गंगा की लहरें’, ‘आकाशदीप’, ‘आधी रात के बाद’, ‘परदेसी’, ‘संसार’, ‘कभी धूप कभी छाँव’, ‘इंतेजार’, ‘एक राज’ वगैरे वगैरे… ही अशा चित्रपटांची यादी आहे, जी नावे बहुदा आपण कधी ऐकल्याची शक्यता कमीच.. कदाचित दोन तीन नावे परिचयाची असू शकतील. चित्रपटसृष्टीत अशा चित्रपटांना ‘बी ग्रेड’ चित्रपट म्हटले जाते. अशा चित्रपटांच्या निर्मात्यांचे बजेट जास्त नसते. अनेक तडजोडी करत चित्रपट बनविला जातो. यातील अभिनेते देखील फारसे प्रसिद्ध नसतात. नंतर प्रसिद्ध झालेल्या काही अभिनेत्यांचे सुरुवातीचे चित्रपट असे असतात.
आता ही गाणी बघा… ‘लागी टुटे ना अब तो सनम’, ‘दगाबाज हो बाँके पिया’, ‘एक रात में दो दो चाँद खिले’, ‘बलमा माने ना’, ‘देखो मौसम क्या बहार है’, ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो’, ‘कोई बता दे दिल है कहाँ’, ‘जाग दिले दिवाना रूत जागी वसले यार की’, ‘पायलवाली देख ना’, ‘दिवाने हम दिवाने तुम’, ‘तेरी दुनिया से दूर चले होके मजबूर’, ‘इतनी नाजुक ना बनो’, ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’, ‘चल उड जा रे पंछी की’, ‘अरमा मेरे दिलके’, ‘मुफ्त हुए बदनाम’, ‘मुस्कुराओ के जी नहीं लगता, सजना मैं तो हार गयी पुकार के’, ‘रंग दिल की धडकन तो लाती तो होगी’, ‘कजरा ना देखे गजरा ना देखे’, ‘ओ प्यार के देवता’, ‘गम की बदली में चमकता एक सितारा है’, ‘ले लो दुवाँए मां बाप की’, ‘जैसा किया है तुने वैसा ही तू भरेगा’, ‘अलबेली नार प्रितम द्वारे’, ‘छेडो ना मेरी जुल्फे’, ‘लोग क्या कहेंगे’, ‘मुझे दर्दे दिल का पता न था’, ‘गोरी तोरी बाँकी’, ‘परदेसी पिया’, ‘हाथों में किताब बालों में गुलाब’, ‘कभी धूप कभी छाँव’, ‘चंदा की किरणों से’, ‘आ के मिल जा’ वगैरे… ही सर्व सुंदर गाणी वर जी यादी दिली आहे त्या सिनेमांतील आहेत. म्हणजे चित्रपट बी ग्रेड आणि गाणी ए ग्रेड.
उच्चशिक्षण घेतलेल्या मोजक्याच काही सुविद्य संगीतकारांपैकी चित्रगुप्त हे एक होते. खरे तर शासकीय खात्यात नोकरी केली असती तर चांगला पैसा कमावता आला असता. काही काळ त्यांनी पाटणा येथे कॉलेजमध्ये प्राध्यापकी करून बघितली. पण संगीताच्या गारूडाने त्यांना मुंबईची वाट चालायला भाग पाडले. ते मुंबईत आले तरीही रियाजात कधी कसूर केला नाही. मुंबईत आल्यानंतर काही काळ त्यांनी एस. एन. त्रिपाठी या धार्मिक, पौराणिक सिनेमांत अडकून पडलेल्या दुर्लक्षित संगीतकाराकडे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांना स्वतंत्रपणे पहिला चित्रपट मिळाला ते साल होते १९४६ आणि त्या सिनेमाचे नाव होते ‘लेडी रॉबिनहुड’. भारतीय चित्रपटाचे सुरुवातीपासून एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाची कथा काहीही असो, त्यात गाणी हवीच. आता रॉबिनहुड बाई असो की पुरूष, तो गाणी कशी म्हणणार? मग डोके लावून प्रसंग तयार केले जात आणि त्यात गाणी टाकली जात. गाण्याशिवाय चित्रपट किमान ४० ते ७०च्या दशकापर्यंत तर केवळ अशक्यच होते. चित्रगुप्त अशा सर्व निर्मात्यांचे आधार होते. त्यांनी कुणालाच नाही म्हटले नाही. मग चित्रपट धार्मिक, पौराणिक, स्टंटपट, सामाजिक, कॉश्च्युम ड्रामा वा रहस्यमय असो. हे सर्व चित्रपट चालण्याचे मुख्य कारण त्यातील श्रवणीय गाणी हाच एक घटक होता.
१९४० ते ७० या दशकांत कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर दोन-तीन महिने गाणी रेडिओवर वाजत असत आणि प्रेक्षक गाणी ऐकूनच थिएटरकडे वळत. हे गणित मात्र चित्रगुप्त यांना व्यवस्थित जमले. त्यांच्या अर्थशास्त्राचा असाही उपयोग बहुदा त्यांनी केला असावा. चंद्रशेखर, शकिला, कुमकूम व आगा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘काली टोपी लाल रुमाल’ १९५९मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट कृष्णधवल, मग यातली टोपी लाल कशी दिसणार? पण नाव ठेवायला काय जाते… मात्र यातील ‘काली टोपीवाले तेरा नाम तो बता’, ‘दगा दगा वई वई वई’, ‘लागी छुटे ना अब तो सनम’, ‘दिवाना आदमी को बनाती है रोटियाँ’, ‘यारों का प्यार लिए¼ नखरे हजार लिए’ ही सर्वच गाणी तुफान गाजली. १९६२मधला ‘बर्मा रोड’ चालला तो अशोककुमार आणि ‘बाँके पिया दगाबाज हो’ या नृत्यगीतामुळे. दारासिंग व अमिता यांच्यावर चित्रीत केलेले ‘सॅमसन’मधील ‘एक बात है कहने की आँखों से कहने दो’ हे लता-रफी यांचे गाणे या चित्रपटाचा आकर्षणबिंदू होता. के. बालचंद्र यांच्या कथेवर आधारित फणी मुजुमदार या दिग्दर्शकाचा एक चित्रपट ‘उंचे लोग’ १९६५मध्ये आला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यात फक्त तीनच गाणी होती. फिरोज खानवर चित्रित केलेल्या ‘जाग दिले दिवाना रूत जागी वसले यार की…’ या रफीच्या अप्रतिम गाण्यासाठी परत परत हा चित्रपट बघितला जात असे. शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असल्यामुळे संगीत देताना शास्त्रीय संगीतापासून पाश्चिमात्य संगीतातील सर्वच बलस्थानांचा चित्रगुप्त यांनी वापर केला. भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येत असे. ठेक्याची गाणी हे त्यांंच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य. चित्रपट बघत असताना त्यांचे एकही गाणे पडेल वाटत नसे. रोमँटिक युगलगीते हा त्यांचा खास प्रांत होता. मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांचे ‘मैं चूप रहूंगी’मधील ‘कोई बता दे दिल है कहाँ क्यों होता है दर्द वहाँ’, मुकेश लता यांचे ‘चाँद जाने कहाँ खो गया’, तलत व आशाबाईचे ‘इन्साफ’मधील ‘दो दिल धडक रहे हे और आवाज एक है’, लता व महेंद्र कपूर यांनी गायलेले ‘घर बसा के देखे’मधील ‘तुमने हँसी ही हँसी में दिल को चुराया हिसाब दे’ हे अप्रतिम ठेका असलेले गाणे, ‘औलाद’ चित्रपटातील ‘अरमाँ था हमें जिनका वो प्यार के दिन आए’ किंवा ‘अबके बहार आयी है तुम्हारे नाम से’ हे जितेंद्र-बबिता यांच्यावर चित्रित झालेलं अत्यंत मधुर गाणं… या गाण्यांसाठी आम्ही परत परत चित्रपट बघत असू.
या गुणी संगीतकाराला मोठे नामवंत बॅनर्स कधीच मिळाले नाही. अपवाद फक्त एव्हीएम या दक्षिणेतल्या बॅनरचा. या बॅनरच्या अतंर्गत त्यांना फक्त तीन चित्रपट मिळाले. ‘शिवभक्त’, ‘मै चूप रहँगी’ आणि ‘भाभी’. १९५५मधील ‘शिवभक्त’ हा पूर्णत: पौराणिक चित्रपट. यात त्यांनी रफीच्या तीनही सप्तकात फिरणार्‍या आवाजाचा योग्य वापर करून घेतला. १९५७मधील बलराज सहानी आणि नंदा यांच्या अभिनयाने नटलेला ‘भाभी’ हा त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. यातील ‘चली चली रे पतंग मेरी चली रे’, लतादीदीचे ‘कारे कारे बादरा’, ‘जा रे जादूगर देखी तेरी जादुगरी’, ‘छुपाकर मेरी आंखों में’ आणि रफीचे मास्टरपीस ‘चल उड जारे पंछी की अब ये देस हुवा बेगाना’. रफीसाहेबांचे हे गाणे ऐकताना डोळ्यांच्या कडा आजही पाणावतात. अशीच दोन नितांत सुंदर गाणी १९६०च्या ‘पतंग’ या चित्रपटात आहेत. पैकी लताजीच्या उत्कृष्ट गाण्यापैकी एक असलेले ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ आणि दुसरे मुकेश-लताचे ‘तेरे शोख नजर का इशारा.’ अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत भरपूर लोकप्रिय झालं. मग ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार का नाही होऊ शकले? हा प्रश्न शिल्लक उरतोच.
मातृभूमी व मातृभाषेला चित्रगुप्त कधीही विसरले नाही. त्यांनी भोजपुरी चित्रपटासाठीही काम केले. यातील ‘गंगा मइया तोहे पियरी चढ़इबो’, ‘लागी नाहीं छूटे राम’, ‘भौजी’ और ‘गंगा’ हे चित्रपटही त्यांच्या संगीतामुळे तुफान चालले. ते ज्या मातीत जन्मले त्याचा गंधही त्यांच्या गाण्यात बेमालून मिसळून जाई. १९६४चा ‘गंगा की लहरे’ या चित्रपटातील किशोर-लताचे ‘मचलती हुयी हवा में छमछम चले गंगा की लहरे’, ‘छेडो ना मेरी जुल्फे सब लोग क्या कहेंगे’ आणि लतादीदीचे भक्तीगीत ‘जय ज्ाय हे जगदंबे माता’ ही सर्वच गाणी त्यांच्या जन्मभूमीचा गंध घेऊनच आली होती. अशीच एक सुंदर प्रार्थना १९६२मधील ‘मै चूप रहूंगी’ या चित्रपटात आहे. ‘तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो’ अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने ‘अर्था’शी बांधून न घेता संगीताचं ‘शास्त्र’ समजून घेतलं. चित्रपटसृष्टीतल्या अपवादात्मक उदाहरणापैकी एक म्हणजे चित्रगुप्त.
चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेली अधिकांश गीते प्रेम धवन यांनी लिहिली आहेत. तेही चित्रगुप्त यांच्याप्रमाणेच उच्चशिक्षित होते. चित्रगुप्त एक उत्कट भावुक व्यक्तीही होते. सर्वांशी त्यांची वागणूक अत्यंत प्रेमळ आणि आस्थापूर्वक असे. शिवाय ते बरेचसे लाजाळू असल्यामुळे प्रसिद्धीपासून चार पावले लांब राहात. १९८८नंतर ते या मायावी नगरीपासून हळूहळू लांब होत गेले. क्षमता असूनही त्यांना न्याय मिळू शकला नाही. प्रसिद्धी मिळाली, मात्र प्रतिष्ठा लांब राहिली. पुरस्कारांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांना मोठे निर्माते-दिग्दर्शक मिळाले असते किंवा मोठ्या आणि नामवंत अभिनेत्याचे चित्रपट मिळाले असते तर कदाचित त्यांची प्रतिभा अधिक बहरून आली असती. आयुष्याच्या शेवटी मात्र त्यांना या गोष्टीचा आनंद मिळाला की त्यांची दोन्ही मुलं आनंद-मिलिंद हे प्रसिद्ध संगीतकार म्हणून स्थिरावले. १९८८मध्येच ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट आनंद मिलिंद यांच्या संगीताने तुफान गाजला व मुलांचे हे यश त्यांना बघता आले. जवळपास १५० ‘बी ग्रेड’ चित्रपटांना संगीत देणारा हा ‘ए ग्रेड’ संगीतकार मुंबईच्या खार येथील निवासस्थानी १४ जानेवारी १९९१ रोजी मृत्यू पावला. ते गेल्यानंतर चाहत्यांना सर्वप्रथम आठवल्या त्या त्यांच्याच संगीताने सजलेल्या ओळी… ‘चल उड जा रे पंछी की अब ये देस हुवा बेगाना.’

Previous Post

सामान्य माणसांचे थरारक साहस

Next Post

एकदा मनमुराद हसून तर पाहा!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

एकदा मनमुराद हसून तर पाहा!

प्रासंगिक फार्सिकल धम्माल कॉमेडी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.