इंदिरा गांधी यांनी कायद्यातील तरतुदीचा वापर करून आणीबाणी लादली तेव्हा ज्या घराण्यांमध्ये परंपरेने काँग्रेसला मतदान देणारे होते व जी घराणी, कुटुंब काँग्रेसचे म्हणून ओळखली जायची त्या घरांमधून सुद्धा इंदिरा गांधींच्या घटनाबाह्य ताकदीला आवाहन देण्यात आले. अशा अनेक काँग्रेसवादी असलेल्या घरांमधून अनेक जण आणीबाणीला विरोध करत रस्त्यावर आले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी कारागृहात गेले.
आज नरेंद्र मोदी यांनी तर त्यापेक्षा भयानक अशी अघोषित आणीबाणी लादली आहे. सरकारच्या असंवेदनशीलतेच्या, चुकीच्या धोरणांना विरोध करणार्यांना चिरडणे, मारून टाकणे, नेत्यांना बेकायदा अटक करून डांबणे याविरोधात कट्टर भाजप समर्थक असलेल्या, भाजपचे परंपरागत मतदार असलेल्या घरांमधील तरुण, युवक-युवती बाहेर येऊन नरेंद्र मोदी व अमित शाह या अराजक प्रवृतींविरोधात, भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील का? लोकशाही महत्वाची मानून भाजपविरुद्ध जाहीर मतप्रदर्शन करतील का? मोदींच्या समोर उभे राहून ‘मोदी हाय हाय’, मोदी मुर्दाबाद अशा घोषणा देतील का?
इंदिरा गांधींच्या विरोधात परंपरागत काँग्रेस मतदार असलेल्या कुटुंबांमधील अनेकांनी लोकशाहीरक्षणासाठी आंदोलने केली होती म्हणून वाटले कुणाला असे काही नवीन लोक आजच्या काळातील माहिती असतील तर सांगावे…