देवेंद्र फडणवीस
कोण म्हणाले मला फडतूस
मी तर आहे ओले काडतूस
बंदुक माझी काडतूसाविना
नुसती करते फुसफूस फुसफूस
राणे म्हणतात कशाला तुम्ही
करता एवढी धुसफूस धुसफूस
शिवीसंग्रह माझा मोठा
मालवणी शिव्या शिकवीन खरपूस
माझ्या मनात आहे म्हणूनच
मला त्यांनी म्हटलं फडतूस
राणे माझे आहेत गुरू
करतील माझे कडक काडतूस
—– —– —–
अमित शहा
आता अभ्यासक्रमातूनही
वगळू आम्ही महात्मा गांधी
ही तर आहे गोडशांनाही
मोठे करण्याचीच संधी
सगळा इतिहास बदलू आम्ही
मिटवू मोगल नामोनिशाण
भाजपमधल्या नावडत्यांना
करून टाकू निर्जीव पाषाण
सगळीकडेच पाहाल तुम्ही
नरेंद्र मोदी – अमित शहा
पुस्तकांतही आमचेच धडे
तुम्ही यापुढे बघतच रहा
—– —– —–
आरोग्यमंत्री तानाजी सावंत
सगळे उपाय संपल्यावरती
दाखवू कोरोनाची भीती
जनता विसरून जाईल सगळे
महागाईची होईल माती
आला कोरोना आपल्या दारी
वातावरणच करू तय्यार
खोटे आकडे दाखवून देतील
लोक म्हणतील राहू होशियार
चिंबोर्यांनी धरण कोसळते
कोरोनाही तसाच भयंकर
युद्धस्तरावर नाही करणार
त्याला रोखण्या उपाय लवकर
—– —– —–
चंद्रशेखर बावनकुळे
मी काय बोलतो माझे मलाच
बर्याच वेळा कळत नाही
हातात माईक मिळाल्यावर
माझी होते नस्ती घाई
काहीजण तर जाणूनबुजून
उद्धारतात माझी कुळे
त्यांना कसे समजावू मी
किती खोल गेलीत मुळे
मला वाटतं शिंद्यांचा गट
भाजपलाच पडणार भारी
आतापासून सुरू करतो
कापण्या नाडीचीच दोरी
—– —– —–
एकनाथ शिंदे
मी डॉक्टर झाल्यापासून
वर्षावर पेशंटची रांग
मी कुठला आहे डॉक्टर
पेशंटना मी मारतो टांग
दिमतीलाही असतात माझ्या
पाच खरेखुरे डॉक्टर
त्यांच्या हाती सोपवून पेशंट
मी होतो डॉक्टर अॅक्टर
आता माझ्या वर्षा निवासी
कुणीही यावे उपचार घ्यावे
आतमध्ये वार्डांची सोय
मिठाई घेऊन निघून जावे