□ नायब तहसीलदार संपावर; मिंधे सरकारवर रोष
■ अरेच्चा, लोक म्हणतील, नायब तहसीलदार गायब!
□ जाहिरातबाजी करून सरकारला माल विकावा लागतोय – अजित पवार
■ माल आहे कुठे दादा, नुसतीच पोकळ जाहिरातबाजी!
□ दोन्ही डोस घेऊनही कोरोना होतोय…
■ दोनशे डोस घेतले तरी कोरोना होणारच… फक्त तो घातक ठरू नये, यासाठी लस घेणं आवश्यक!
□ बुस्टर डोस लोकांपर्यंत पोहोचत कसा नाही – उच्च न्यायालयाने खडसावले
■ भले तर जाहिरात करा, स्वत:चे, दिल्लीतल्या मालकांचे फोटो छापा डोसवर, पण लोकांपर्यंत पोहोचवा ते.
□ ठाण्यात युवासेना कार्यकर्तीवर मिंधे गटाच्या महिलांचा प्राणघातक हल्ला
■ सुशिक्षित ठाण्याचे वासेपूर करून टाकले मिंध्यांच्या गुंडांनी!
□ फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा – आमदार सुभाष देशमुख
■ अहो, काय बोलताय काय! जिभेला काही हाड? मामी रागावल्या तर मामुंचं दाणापाणी बंद होईल हो घरातून.
□ अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यात ‘ईडी’ सरकार फेल
■ स्वकौतुकाच्या जाहिरातींवर एवढा खर्च करण्याऐवजी खातेनिहाय खर्च केला असता, तर लोकांचं भलं झालं असतं!
□ मंदिरे ब्राह्मणमुक्त करून बहुजनांना पुजारी नियुक्त करा – मराठा सेवा संघाची मागणी
■ पण, मुळात देवाच्या दारात कोणत्याही जातीचा मध्यस्थ हवा कशाला?
□ भाईंदरमध्ये कांदळवनांची बेसुमार कत्तल
■ कौनसा भाई है इसके पीछे, उसको अंदर करो, कत्तल बंद हो जायेगी!
□ कोकणवासीयांची वज्रमूठ ४० गद्दारांच्या माथ्यावर हाणा – अनंत गीते
■ कोकणवासीयांचीच का, सगळ्या महाराष्ट्राने हाणली पाहिजे वज्रमूठ यांच्या टाळक्यात आणि यांच्या मागे उभ्या महाशक्तीला नेऊन अरबी समुद्रात बुडवलं पाहिजे…
□ सीबीआयची मुख्य जबाबदारी देश भ्रष्टाचारमुक्त करण्याची – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ अदानीच्या खात्यात ते २० हजार कोटी कुणाचे आहेत ते शोधायला सांगता येईल का मोदीजी सीबीआयला? अर्थात तुमच्या राजकीय विरोधकांवर नाहक बालंटं आणण्याच्या मुख्य कामातून त्यांना वेळ कसा मिळणार म्हणा?
□ सरकारी धोरणांवर टीका म्हणजे देशविरोधी कृत्य नव्हे! – सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारले
■ आता हे देशद्रोही सर्वोच्च न्यायालयच इस्लामाबादमध्ये नेऊन ठेवलं पाहिजे, असं मोदीभक्त मनोमन म्हणत असतील.
□ बारावीच्या पुस्तकातून केंद्राने ‘गांधीं’ना वगळले
■ एकदा खून करूनही धडा शिकले नाहीत, माराल, वगळाल, तेवढे गांधी मोठेच होणार आहेत आणि तुम्ही बैलबुद्धी, बालबुद्धीच राहणार आहात.
□ ‘स्पेशल’ प्राध्यापकांची वानवा, तरीही मिंधे सरकारला विद्यार्थी वाढविण्याची ‘सुपर’ घाई
■ जेवढे विद्यार्थी, तेवढी कमाई, घाई तो होंगीच ना भाई?
□ एसएससी पेपर लीक प्रकरणी तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्षाला अटक
■ अरे, हवी ती पदवी हवी तिथून छापून घेण्याचा मार्ग असताना कशाला करायचे असे येडे चाळे?
□ घोटाळेबाज खोके सरकारला टाळे ठोकणारच – आदित्य ठाकरे
■ आणि धनुष्यबाणासह नावही परत मिळवल्याशिवाय सच्चा शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.
□ सोन्याने साठी ओलांडली; १० ग्रॅम सोन्यासाठी ६०,९७७ रुपये
■ सोन्याने ओलांडली साठी, तरी खरेदी होणारच सुरक्षित गुंतवणुकीसाठी.
□ ठाण्यात गुंडाराज सुरूच; मिंधेंच्या लेडीज गँगची युवतीसेनेच्या स्मिता आंग्रेला धमकी
■ पुढे काय होणार आहे, याची कल्पना असल्याने भयभीतांचा नंगानाच चालू आहे… जशास तसा धडा शिकवला जाईलच.
□ २०२४मध्ये भाजपला कुणीच हरवू शकत नाही – पंतप्रधान मोदी
■ आधी २०२३ पार करून २०२४पर्यंत टिका पदावर, मग पाहू.
□ मिंध्यांच्या गद्दारीची लक्तरे टांगणार्या रॅपर राज मुंगासेच्या विरोधात गुन्हा
■ त्याच्या गाण्यात कोणाचाही उल्लेख नाही, तरी ते आपल्याबद्दलच आहे, हे कसं काय कळलं बरं यांना?… खाई त्याला खवखवे म्हणतात ते उगाच नाही.