ग्रहस्थिती : हर्षल मेषेत, गुरु वृषभेत, राहू, नेपच्युन मीनेत, मंगळ मिथुन राशीत, रवी, शनि कुंभेत, केतू कन्या राशीत, बुध, शुक्र, राहू, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : १६ मार्च संत तुकाराम महाराज बीज, १७ मार्च संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.१५ वा., १९ मार्च रंगपंचमी, २० मार्च एकनाथ षष्ठी.
– – –
मेष : मनासारख्या घटना घडल्याने हुरळून जाऊ नका. अहंकार बाजूला ठेवा. व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम राहील. आर्थिक नियोजन करा. धनप्राप्तीचे योग आहेत. तरुणांचे पैसे मौजमजेवर खर्च होतील. चेष्टा मस्करी टाळा. नोकरीत शांत आणि संयमी भूमिका घ्या. एखादी घटना हिरमोड करेल. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. बोलताना सकारात्मकता दाखवा. नवीन गुंतवणूक करताना मोहात पडू नका. भावंडांशी बोलताना काळजी घ्या. धार्मिक सहलीतून समाधान मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
वृषभ : अति घाई ठोकर खाई. निर्णय विचारपूर्वक घ्या. खर्च कमी ठेवा. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळा. अडकलेले काम मार्गी लागेल. नवीन ओळखींमधून कामे हलकी होतील. व्यवसायात यश मिळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत कामाशी काम ठेवा. मुलाकडून शुभवार्ता कळेल. हातून दोन कामे अधिक होतील. उत्साह वाढेल. आपण योग्य आहोत, हे दाखवत बसू नका. घरात आर्थिक व्यवहारात घाई नको. हातात घ्याल, ते काम पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ध्यान, योगा करा.
मिथुन : नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढेल. आपले म्हणणे दुसर्यावर लादू नका. मनस्वास्थ्य खराब होईल. नोकरीत जमवून घ्या. क्रीडापटूंना यश मिळेल. कलाकार, संगीतकार, गायकांना संधी मिळतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. युवावर्गाला संधी मिळतील. कुटुंबाला वेळ द्याल. व्यवसायात आमदनी चांगली राहील. नियोजनात चुका करू नका. मित्र-नातेवाईकांच्या सहकार्याने, अडकलेली कामे मार्गी लागतील. बहीण-भावासंदर्भातील चिंता दूर होईल. धार्मिक कार्य होईल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल.
कर्क : धार्मिक कार्यामुळे आत्मिक सुख मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग आहेत. लॉटरी, सट्टा, शेअरमधून लाभ मिळतील. व्यवसायात कामगार त्रास देतील. नोकरीत प्रयत्न वाढवा, वरिष्ठांवर चांगला प्रभाव पडेल. नव्या गुंतवणुकीसाठी उत्तम काळ. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. मालमत्तेसंदर्भातील चर्चा पुढे ढकला. भागीदारीत कागदपत्रे नीट तपासा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. सरकारी कामे पूर्ण होतील. उच्चशिक्षणासाठी विदेशात प्रयत्न यशस्वी होतील. पती-पत्नीत किरकोळ वाद होतील. पर्यटनात काळजी घ्या. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. आर्थिक उन्नतीची संधी चालून येईल. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल. त्यात काळजी घ्या. जुना आजार डोके वर काढू शकतो. घरात खर्च वाढतील. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च होईल. चिडचिड टाळा. कामाच्या ठिकाणी भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात कामाची जबाबदारी वाढेल. धावपळ होईल. आरोग्य सांभाळा. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट एजंटांना भरभराटीचा काळ. सार्वजनिक ठिकाणी वाद टाळा. आश्वासन देणे टाळा. तरुणांना धनलाभ होईल. नातेवाईकांशी जपून बोला.
कन्या : नोकरीत हेकटपणा टाळा. बँक व्यवहारांत काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. व्यवसायात नव्या कल्पनांमधून आर्थिक उन्नती होईल. नियोजनपूर्वक पुढे जा. सकारात्मकता वाढवा. रोष ओढवून घेऊ नका. पती-पत्नीमध्ये छोट्या कारणामुळे मिठाचा खडा पडेल, काळजी घ्या. धार्मिक कार्य होईल. प्रेमप्रकरणात आनंदाचे दिवस येतील. नवीन नोकरी मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळतील. निर्णय बिनचूकपणे घ्या. मुलांकडे विशेष लक्ष द्या. गुंतवणूक विचारपूर्वक करा.
तूळ : आर्थिक बाजू चांगली राहील. तरुणांना यश मिळेल. नवी नोकरी गवसेल. नोकरीत काम वाढेल. जागरणामुळे पित्त, पोटाचे विकार उद्भवतील. व्यवसायात यशप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करा. बुद्धिकौशल्याच्या जोरावर यश मिळेल. घरात स्पष्ट मत मांडू नका. अचानक खर्च होईल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल. कुणाचे मन दुखावू नका. कामात मन स्थिर ठेवा. नोकरीत बढती वा बदलीचे योग आहेत. ध्यानधारणेत मन रमवा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : भागीदारीत काळजीपूर्वक पुढे जा. बँक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा रोष ओढवून घेणे टाळा. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वासाची सांगड घालून बोला. नोकरीत सल्ले देऊ नका. सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. उसनवारी देणे टाळा. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. मित्रमंडळींशी चेष्टामस्करी नको. प्रवासात खिसा पाकीट सांभाळा. तेलकट खाणे नकोच. हातातली नव्या व्यवसायाची संधी निसटून जाईल. काही ठिकाणी न पटणार्या घटना घडतील. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरू शकतात.
धनु : आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. नातेवाईक, मित्रमंडळींशी जमवून घ्या. ब्रोकरांना चांगला काळ. कलागुणांना वाव मिळेल. तरुणांना व्यवसायाची कल्पना सुचेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. यशामुळे हुरळून जाऊ नका. पत्नीची मदत मिळून कामाचा भार हलका होईल. काहींना नोकरीनिमित्ताने विदेशात जावे लागेल. कामाच्या ठिकाणी संयमाने वागा. व्यवसायात कामांना विलंब झाल्याने चिडाल. युवा वर्गाला समाधान मिळेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामाचा कंटाळा येईल. मौजमजेवर पैसे खर्च होतील. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.
मकर : आर्थिक बाजू चांगली राहील. नवे घर घेण्याचा विचार पुढे सरकेल. घरासाठी महागड्या वस्तूची खरेदी होईल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. विदेशात कामासाठी जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत सबुरीने घ्या. आर्थिक गणित उत्तम राखा. अडलेली कामे मार्गी लागतील. बोलताना काळजी घ्या. मुलांकडे विशेष लक्ष ठेवा. सामाजिक कामासाठी भरपूर वेळ खर्च होईल. मित्रांशी वागताना, बोलताना काळजी घ्या. व्यावसायिकांचा उत्कर्ष होऊ शकतो.
कुंभ : कामाचा कंटाळा येईल, मौजमजेवर पैसे खर्च होतील. घरातील वातावरण उत्साह वाढवेल. मित्र भेटतील. खानपानाची पथ्ये पाळा. बोलताना खबरदारी घ्या. मालमत्तेचे प्रश्न रेंगाळतील. आपले श्रेष्ठत्त्व दाखवायला जाऊ नका. नोकरदारांचा उत्कर्ष घडेल. वरिष्ठ कामावर खूष होतील. रियल इस्टेट, शेती, मेडिकल क्षेत्रात चांगला काळ. कोणाला पैसे उधार देणे टाळा. नातेवाईकांशी गोडीगुलाबीने घ्या. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. शेअर, लॉटरीमधून लाभ मिळेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मीन : नोकरी व्यवसायात प्रवासामुळे दगदग होईल. आर्थिक बाजू चांगली राहील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. नोकरदारांची ऊर्जा वाढेल. वाढीव काम होईल, वरिष्ठ खूष होतील. नवीन वाहन घेण्याचा विचार बळावेल. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. कोणत्याही निर्णयात घाई नको. तरुण मौजमजेवर पैसे खर्च करतील. दांपत्यजीवनात आनंदाचे दिवस. व्यवसायात प्रश्न कौशल्याने सोडवा. तेलकट पदार्थ त्रासदायक ठरू शकतात. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. देवदर्शनातून समाधान मिळेल.