नरेंद्र मोदी
संक्रांत असो किंवा नसो
नेहमीच देतो गोड गोड लाडू
फक्त असतात आश्वासनांचे
नेहमीच तोंड करतो कडू
आठ वर्षात मारल्या थापा
एकही प्रश्न नाही सुटला
माइक हातात मिळाल्यावर
मला मात्र कंठ फुटला
चिनी माकडे घुसत गेली
त्यांचे सुरूच आहेत चाळे
आमच्या दुर्बिणीवर धुके
सारखे पाहून दुखावतात डोळे
अमित शहा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
पक्ष सुजवण्याचा मंत्र
एक-दोन तीळ त्यांना देऊन
गूळ खाण्याचे आमचे तंत्र
बाहेरचे खाणे खाऊन खाऊन
पक्ष होईल गोलमटोल
भीती एवढीच वाटते मला
फुटणार नाही ना त्याचा ढोल
आता येतील निवडणुका
तेव्हा काळजी घ्यायला हवी
मास्कपेक्षा `मास’ मोठा
एकदाच क्रांती होईल नवी
देवेंद्र फडणवीस
नवी सोयरीक करण्या गेलो
आमच्यावरीच आली संक्रांत
आदळ आपट करून थकलो
आता तिची झाली किंक्रांत
संक्रांतीचे हळदीकुंकू
आधीच वाटून मोकळे झालो
पांढरी-फटक कपाळे पाहून
नंतर भानावरती आलो
इथे डाळ शिजली नाही
तर मात्र दिल्लीत जाईन
फाडफाड इंग्लिश बोलणेसुद्धा
दादांकडून शिकून घेईन
सुधीर मुनगंटीवर
मी काय बोलतो त्याचा
अर्थच मला कळत नाही
माईक समोर आल्यावरती
मग मात्र होते घाई
चॅनलवाले टाइमपाससाठी
कशावरही मुलाखत घेतात
मनात येईल ते देतो ठोकून
फुकटात प्रसिद्धी आयतीच करतात
मोदींनाही ठाऊक असते
कोण किती बाईट देतात
दिल्लीत नोंद ठेवली जाते
म्हणूनच दरेकर आकडे मोजतात
नितेश राणे
गिर गया तो भी टांग उपर
हा तर वडिलोपार्जित बाणा
आमचा आवाज ऐकताच
पळतात मांजरेसुद्धा दणादणा
आवाज देण्याची आमची एक
खास स्वत:ची आहे स्टाइल
ऐकून कान बंद कराल
सडा शिव्यांचा बरसत राहील
आमी नाय घाबरत कुणाला
आता पोटात आले आवाळे
आवाज काढला मांजराचा अन्
प्रतिसाद देत होते कावळे