• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

गवर्नरचे गुरुजी

- सचिन परब (प्रबोधन-१००)

सचिन परब by सचिन परब
January 13, 2022
in प्रबोधन १००
0

पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या आधी नव्या संसारासाठी प्रबोधनकारांची धावपळ सुरू होती. त्यात त्यांनी गोर्‍या साहेबांना मराठी शिकवण्याचं काम केलं. त्याचबरोबर जर्मन पोस्टकार्डांसाठी फोटो विकण्यासाठी फोटोग्राफीचा छंदही जोपासला.
– – –

प्रबोधनकार नोकरी करत होते त्या राम एजन्सीचे मालक तात्यासाहेब परांजपे व्यवसाय वाढवण्यासाठी नवनव्या कल्पक योजना आखत असत. व्यापार्‍यांचे रेल्वेचे क्लेम मिळवून देणार्‍या एजन्सीतून त्यांनी जगभरातली यंत्रं विकणारी एजन्सी उभी केली. त्यानंतर त्यांनी एका वेगळ्याच संस्थेची उभारणी केली. ती होती `स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेजीस’. पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळात मुंबईचा जगाशी व्यापार सुरू होतो. त्यात जगभरातल्या भाषा बोलणार्‍या स्थानिकांची आणि इथे आलेल्या परदेशी लोकांना इथल्या भाषा शिकवण्याची गरज निर्माण झाली होती.
गो नावाचा एक फ्रेंच शिक्षक फोर्टमधल्या ताज बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर फ्रेंच भाषा शिकवणारं फ्रेंच स्कूल चालवायचा. ते प्रसिद्ध होतं आणि त्याच्याकडे ३०-४० विद्यार्थी असत. या फ्रेंच स्कूलच्या मालकाला फ्रान्सला परतायचं होतं. त्यामुळे त्याने स्कूल विकण्याची जाहिरात टाइम्स ऑफ इंडियात दिली होती. त्यानुसार तात्यासाहेबांनी ते स्कूल विकत घेतलं आणि त्याचा पसारा वाढवला. फ्रेंच शिकवण्यासाठी पतियाळाच्या महाराजांचा शिक्षक असणारा माँशियर डेरोश नावाचा शिक्षक ५०० रुपये पगारावर ठेवला. इंग्रजीसाठी मिस ब्लण्डेल यांना नेमण्यात आलं. जर्मन, इटालियन, रशियन, जपानी भाषा शिकवणारे शिक्षकही नेमले. त्याचबरोबर मराठी शिकवण्याची जबाबदारी तात्यासाहेबांनी प्रबोधनकारांवर सोपवली.
फ्रेंच शिक्षक माँशियर डेरोश हा नव्या `स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेजीस’चा प्रिन्सिपल होता. तो उत्तम चित्रकार होता. त्याने संपूर्ण स्कूलला आपल्या चित्रांनी आणि शिक्षणासाठी आवश्यक सुखसोयींनी सजवलं होतं. सजवलेल्या वर्गात एका वेळी एकच शिक्षक आणि एकच विद्यार्थी असायचा. त्यांच्यासाठी दोन खुर्च्या, एक टेबल, पायाखाली गालिचा आणि वर विजेचा पंखा अशी व्यवस्था असायची. कारण भाषा शिकण्यासाठी येणारे विद्यार्थीही तसेच मोठे आसामी असत. त्यात मोठमोठे परदेशी व्यापारी, बँकांचे वरिष्ठ अधिकारी असत. मराठी शिकायला सचिवालयातले आयसीएस अधिकारी येत. आयसीएस ही स्वातंत्र्याच्या आधीची आयएएस. त्यांना मराठी शिकणं सक्तीचं होतं. शिवाय पोलिस खात्यातले सार्जंट आणि जपानी व्यापारीही मराठी शिकत.
प्रबोधनकार त्यांना बर्लिट्झ पद्धतीने मराठी शिकवत. १८७८पासून भाषा शिकवण्यासाठी वापरली जाणारी ही पद्धत संभाषण आणि प्रात्यक्षिकांवर आधारित आहे. मिस ब्लण्डेल या पद्धतीने इंग्रजी शिकवत असत. ती पद्धत प्रबोधनकारांना आवडली. त्यांनी त्यावर आधारित मराठीसाठी स्वतंत्र कोर्स तयार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की प्रबोधनकारांनी त्यांना व्याकरणाचा विचार न करता बिनधास्त इंग्रजी बोलायला सांगितलं होतं. त्यातून ते फर्ड इंग्रजी शिकले. हे बर्लिट्झ तंत्रच होतं.
प्रबोधनकार रोज सकाळी दहा ते अकरा आणि अकरा ते बारा असे दोन वर्ग घेत. त्यानंतर एजन्सीच्या दिवसभराच्या कामासाठी कचेरीत पोचत. स्कूलमध्ये त्यांनी पन्नासेक विद्यार्थ्यांना मराठी शिकवलं. सगळेच विद्यार्थी दोन महिन्यात कामचलाऊ बोलण्याइतकं शिकायचे. फक्त तेव्हा मुंबई प्रांताचे असिस्टंट सेक्रेटरी असणारे रॉबर्ट डंकन बेल यांनी सलग सहा वर्षं प्रबोधनकारांकडे मराठीचे धडे गिरवले. प्रबोधनकारांच्या मराठीच्या ज्ञानाचे ते चाहते बनले. युरोपियन आयसीएस अधिकार्‍यांना मराठीत प्राविण्य मिळवल्याचं सर्टिफिकेटवजा पत्र एखाद्या मराठीच्या पंडिताकडून मिळवावं लागत असे. रॉबर्ट डंकन बेल यांनी सरकारकडे शिफारस करून असं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार प्रबोधनकारांना मिळवून दिला होता. इतर आयसीएस अधिकारी पंधरा वीस दिवस वर्गात येऊन थातुरमातूर शिकत आणि सर्टिफिकेट घेऊन जात. मात्र रॉबर्ट डंकन बेल यांनी निश्चय केला होता, `मला केसरीचा लेख घडाघडा वाचता येऊन त्याचं भाषांतर करता येईपर्यंत आणि हवा तो मराठी ग्रंथ मराठी माणसासारखा वाचता येईपर्यंत मी तुमच्याकडे शिकत राहणार.’
प्रबोधनकार सांगतात त्यानुसार सर बेल हे लंडनमधले प्रसिद्ध ग्रंथप्रकाशक बेल अँड कंपनीच्या मालकाचा मुलगा. विकीपीडियातल्या माहितीनुसार त्यांचे वडील विलियम हे रॉबर्ट यांच्या जन्माच्या वेळेला एडिनबर्गच्या एका सायंदैनिकात टाइपसेटर म्हणून काम करत होते. १९०५ मध्ये ते रॉबर्ट ज्युनियर सिविल सर्वंट म्हणून भारतात आले. प्रबोधनकार सांगतात तसं ते सदा हसतमुख आणि मराठी बोलणारे असल्यामुळे महाराष्ट्रभर लोकप्रिय होते. कर्तृत्वाच्या जोरावर अधिकारी पदाच्या पायर्‍या चढत ते मुंबई प्रांताचे चीफ सेक्रेटरी बनले. १९३५च्या दरम्यान त्यांनी काही महिने प्रभारी गवर्नरपदही सांभाळलं. त्यांना मराठी शिकवतानाच्या गमतीजमती प्रबोधनकारांनी सांगितल्या आहेत. त्यातून रॉबर्ट बेल यांचा मनमोकळा स्वभाव दिसून येतो. ते गवर्नर असतानाच प्रबोधनकार अतिशय गंभीर आजारी पडून मुंबईच्या केईएम हॉस्पिटलात भर्ती झाले होते. त्याची बातमी मराठी पेपरात तर आलीच पण टाइम्स ऑफ इंडियातही आली. ते वाचून हॉस्पिटलचे डीन असणार्‍या डॉ. जीवराज शहांना पहिला फोन आला तो गवर्नर सर रॉबर्ट डंकन बेलचा. मराठी शिकवणी झाल्यानंतरही निवृत्त होऊन स्कॉटलंडला परत जाईपर्यंत ते प्रबोधनकारांच्या संपर्कात होते. ते प्रबोधनकारांना नेहमी विचारायचे, `तुमच्यासाठी मी काय करू?’ त्यावर प्रबोधनकारांचं उत्तर होतं, `तुम्ही फक्त नाताळाच्या दिवशी ख्रिसमस कार्ड पाठवून माझी आठवण करत जा. आणखी काही नको.’
फक्त सर बेलच नाही, इतर अनेक थोरामोठ्यांच्या ओळखी असताना प्रबोधनकारांनी कुणाचेही उपकार घेतले नाहीत. त्यांचा भरवसा हा उद्योगीपणावर होता. त्यांना नवनवीन उद्योगाच्या कल्पना नेहमी आकर्षून घेत. त्यातली एक फोटोग्राफीची होती. त्यांच्या रोजच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर फोर्टमधल्या एम्पायर बिल्डिंगजवळच्या फुटपाथवर एक मुसलमान चित्रकार दर शुक्रवारी सकाळी त्यांना दिसायचा. तो मांडीवरच्या स्केचबुकावर चित्र रंगवत गोणपाटावर बसलेला असायचा. येणार्‍या जाणार्‍या गर्दीचं त्याला काहीच पडलेलं नसायचं. कुतूहलापोटी प्रबोधनकारांनी त्याला विचारलं. त्यावर त्याने सांगितलं, जर्मनमध्ये धारवाडी लुगडी आणि खण तयार करण्याच्या कारखाना आहे. त्यांना साडीच्या काठाचे रंग भरण्यासाठी उभ्या-आडव्या धाग्यांचे स्केच लागतात. समोरच्याच एका जर्मन दुकानदाराकडून त्याला एका स्केचचे ७५ रुपये मिळतात.
ही माहिती मिळताच प्रबोधनकारांनी जर्मन दुकानदाराकडे चौकशी केली. त्याच्याकडे जर्मनीत छापलेली फोटोंची रंगीत पोस्टकार्डं विकायला होती. त्यांच्यासाठी तो फोटोंच्या शोधात होता आणि त्याला आवडलेल्या एका फोटोसाठी पंधरा रुपये द्यायला तयार होता. प्रबोधनकारांना त्यात जोडधंदा दिसला. त्यांचे शेजारी बाळकृष्ण कोपर्डे उर्फ कोपर्डेबुवा यांनी त्यांना पोस्टकार्ड कॅमेरा वापरायला दिला. कोपर्डेबुवा गायक होते आणि रोज प्रबोधनकारांच्या घरी संध्याकाळी भरणार्‍या संगीत मैफिलीत गात. याच मैफिलीतले आणखी एक मेंबर कुरतडकर यांनी त्यांना फोटो डेवलपिंग, टोनिंग, प्रिंटिंग शिकवलं. घरातलं साहित्यही आणून दिलं. या प्रोत्साहनामुळे प्रबोधनकारांच्या फोटोग्राफीच्या छंदाला उठाव मिळाला. पनवेलमध्ये असताना केरळकोकीळकार कृष्णाजी नारायण आठल्ये यांच्याकडे ते फोटोग्राफी शिकले होते. आता त्या कलेला त्यांनी उत्पन्नाचं साधन बनवलं. शंकर सीताराम उर्फ बाबुराव बेंद्रे हे प्रबोधनकारांचे दादरमधले जानी दोस्त. प्रबोधनकार कुठेही गेले तरी ते सावलीसारखे सोबत असायचे. दर शनिवारी ऑफिसं सुटली की हे दोघे मुंबईभर भटकत. शनिवारी चार वाजताच घरी येणार्‍या शेजार्‍यांनी त्यांच्या या भटकंतीला `च्युतिया चक्कर’ असं नाव ठेवलं होतं. पहिल्याच आठवड्यात प्रबोधनकारांनी आठ फोटो घेतले. त्याच्या प्रिंट घेऊन ते फोर्टमधल्या जर्मन दुकानदाराकडे गेले. त्यातले पाच फोटो त्याने पसंत केले. त्यांच्या निगेटिव घेतल्या आणि फोटोंमागे ऑल राइट्स रिझर्व्डचे शिक्के मारले. त्यानंतर लगेचच प्रत्येक फोटोचे पंधरा याप्रमाणे पंच्याहत्तर रुपये हातात ठेवले. अनपेक्षितपणे ही नवी आवक सुरू झाल्यामुळे त्यांनी हळूहळू हा व्यवसाय वाढवला. विशेषतः नोकर्‍या सुटल्यावरच्या काळात त्यांना फोटोग्राफीने चांगला हात दिला. प्रबोधनकारांचा फोटोग्राफीचा हा छंद पुढच्या पिढीत श्रीकांतजी ठाकरे यांनी चालवला. त्याला तिसर्‍या पिढीतल्या उद्धव ठाकरे यांनी नव्या उंचीवर नेलं.

Previous Post

स. न. वि. वि.

Next Post

प्रसंग दुर्दैवी… पण ते विधानदेखील दुर्दैवी!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post

प्रसंग दुर्दैवी... पण ते विधानदेखील दुर्दैवी!

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.