ग्रहस्थिती : रवि, बुध, हर्षल वृषभ राशीमध्ये, गुरु मिथुन राशीमध्ये, प्लुटो मकर राशीत, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ कर्क राशीमध्ये, केतू कन्या राशीत. दिनविशेष : १४ जून संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.५७ वा., १८ जून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू, १९ जून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान, आळंदी.
मेष : घरात वेळ जाईल. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत सामोपचाराने घ्या. तरुणांना नोकरी मिळेल. भागीदारीत त्रास संभवतो. नवीन घर घेण्याचा प्रयत्न मार्गी लागेल. हातातल्या कामात यश मिळेल. निर्णय घेताना घाई करू नका. संततीकडे लक्ष ठेवा. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. आर्थिक नियोजन बिघडू देऊ नका. लेखक, पत्रकारांसाठी चांगला काळ. अरेला कारे करू नका. तरुणांना तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल. थकीत येणे वसूल होईल. पण खर्च टाळा. मित्रमंडळींबरोबर जमवून घ्या.
वृषभ : आर्थिक उन्नती होईल, नियोजनपूर्वक खर्च करा. तरुणांना संधी मिळतील. नोकरीत जमवून घ्या. समारंभातून आनंद मिळेल. मुलांना यश मिळेल. मनस्थिती उत्तम ठेवा. ध्यानधारणा, योगा करा. मालमत्तेचे प्रश्न पुढे ढकला. सहल, मौजमजा कराल. नव्या कल्पना विचारपूर्वक पुढे न्या, फायदा होईल. व्यवसायात दूरचे प्रवास करावे लागतील. आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. चांगली नोकरी चालून येईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. अचानक मित्र, पाहुणे भेटतील. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
मिथुन : उत्साह वाढेल. नोकरीत जास्त कष्ट पडतील. चांगली नोकरी मिळेल. मुलांकडे लक्ष द्या. उच्चशिक्षणात अडथळे येतील. व्यवसायात स्पर्धा वाढेल. कोर्टकचेरीची कामे लांबतील. मन अस्थिर होईल. तरुणांनी संयमाने काम करावे. नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. नव्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. महिलांची सकारात्मकता वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. जपून बोला. नातेवाईकांकडून मदत मिळणार नाही. आर्थिक नुकसान टाळा. आरोग्याच्या जुनाट तक्रारी डोके वर काढतील.
कर्क : व्यवसायात मनासारखी कामे होणार नाहीत. नियोजनात चुका होतील. सल्ले देणे महागात पडेल. नोकरीत कौतुक झाले तरी हुरळून जाऊ नका. संततीकडून शुभवार्ता कळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरातील ज्येष्ठांचा सल्ला माना. इच्छा पूर्ण होतील. उतावळेपणा टाळा. अहंकारी वृत्तीचे तोटे होतील. कलाकारांचा सन्मान होईल. तरुणांकडून खर्च होतील. कामे पुढे नेताना त्रास होईल. नियोजनपूर्वक कामे करा. मित्रांशी चेष्टामस्करी टाळा. प्रवासात काळजी घ्या. विदेशात जाण्याची संधी मिळेल.
सिंह : संसर्गजन्य आजाराचा त्रास होईल. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती वाढेल. नव्या व्यवसायात जपून पावले टाका. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. समाजकार्यातून सन्मान वाढेल. तरुणांना यश मिळेल. प्रवासात आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. नव्या ओळखीचा फायदा होईल. मनासारख्या गोष्टी घडतील. आर्थिक बाजू चांगली राहील, पण, वायफळ खर्च टाळा. समाधान वाढेल. भावांची चांगली मदत मिळेल. आध्यात्मिक कार्य कराल. शेअर बाजारातून लाभ मिळेल. कार्याचा सन्मान होईल.
कन्या : सामाजिक, धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. व्यवसायात नुकसान टाळा. अवास्तव खर्च वाढतील. नवीन वाहन घ्याल. कलाकार, संगीतकारांना संधी मिळतील. दांपत्यजीवनात वाद टाळा. नवी संकल्पना जपून पुढे न्या. सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी कष्ट पडतील. नोकरीत उत्साह वाढेल. घवघवीत यश मिळेल. प्रवासात काळजी घ्या. तरुणांचे मनस्वास्थ्य बिघडेल. मार्वेâटिंग क्षेत्रात चांगला काळ. नवीन व्यवसायाची कल्पना आकाराला येईल. सार्वजनिक जीवनात एखादे प्रकरण अंगलट येऊ शकते. घरात बेचैनी वाढेल. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या.
तूळ : आरोग्य सांभाळा. घराला वेळ द्या. व्यवसायात यश मिळेल. मित्रांची साथ लाभेल. नोकरीत त्रास वाढेल. धनलाभाचे नियोजन करा. सामाजिक कार्यातून समाधान मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंबात मतभेद टाळा. संततीकडून सुवार्ता कळेल. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. व्यायामाला दिलेला वेळ फायदेशीर ठरेल. नोकरीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बोलताना काळजी घ्या. बंधू-भगिनींशी वाद होईल. व्यवसायवृद्धीच्या योजना आखाल. ज्येष्ठांशी जपून बोला. आपलेच म्हणणे रेटू नका.
वृश्चिक : नोकरीत प्रश्न सामोपचाराने सोडवा. व्यवसायात काळजी वाढेल. घरात धाडसी निर्णय घेऊ नका. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. भावंडांशी जमवून घ्या. नोकरी व्यवसायात वेळेचे नियोजन फिस्कटेल. मन:स्थिती द्विधा राहील. संततीला शिक्षणात यश मिळेल. सर्वत्र परिस्थितीचा स्वीकार करा. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात एखादी तक्रार डोकेदुखी वाढवेल. जनसंपर्क, पत्रकार, लेखकांना नव्या संधी मिळतील. व्यवसायाचा विदेशात विस्तार होईल. उच्च रक्तदाब असल्यास काळजी घ्या.
धनु : धार्मिक कार्यातून सकारात्मकता वाढेल. नोकरीत बदल होतील. खर्चाला आळा घाला. कोर्टाची कामे लांबतील. तरुणांची शिक्षणात प्रगती होईल. घरात वेळ जाईल. व्यवसायात प्राप्ती वाढेल. सरकारी काम पूर्ण होईल. कलाकार, संगीतकार, क्रीडापटूंना सन्मानाचे योग. खानपानावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होईल. मित्रांशी वाद टाळा. महिल्ाांनी आरोग्याची काळजी घ्यावी. भागीदारीत नमते घ्या. शुभघटना अनुभवाल. निर्णय घेताना सल्ला घ्या. प्रलोभनांपासून दूरच राहा.
मकर : नोकरीत सन्मान होईल. ध्यानधारणा, योगामधून लाभ होईल. तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात लाभ मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. ज्येष्ठांशी वाद टाळा. मित्रांच्या साथीने कामे मार्गी लागतील. मन विचलित करणार्या घटना घडतील. पण आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. निर्णय घेताना घाई टाळा. भानगडीत पडू नका. व्यवसायात ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धावपळीचा आरोग्यावर परिणाम होईल. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी येईल. मध्यस्थी टाळा.
कुंभ : घराचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीत आत्मविश्वास वाढेल. भागीदारीत काळजी घ्या, व्यवहारात गडबड टाळा. मन अशांत होईल. घरात गैरसमज टाळा. तरुणांच्या मनावर दडपण वाढेल. नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार व सोशल मीडियाचा वापर जपूनच करा. सकारात्मक विचार करा. व्यवसायात अति आत्मविश्वास नको. चित्रकार, कलाकारांना यशदायी काळ. येणे वसूल होईल. कामात वेळेचे नियोजन करा. वाहन चालवताना काळजी घ्या.
मीन : ज्येष्ठांच्या सल्ल्याने पुढे जा. नोकरीत अधिक काम करावे लागेल. त्याचे कौतुक होईल. व्यवसायात मोठ्या उलाढालींचे धाडस नको. नवी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घराला वेळ द्यावा लागेल. उधार-उसनवारी टाळा. नातेवाईक, मित्रमंडळींची भेट होईल. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. रागाचा पारा वाढू देऊ नका. कसोटीचे प्रसंग ओढवतील. बुद्धीकौशल्य वापरा. व्यवसायात मतभेद टाळा. नोकरीत कमी बोला आणि काम करा. युवा वर्गाला नव्या क्षेत्रात संधी मिळू शकतात. नवीन वास्तू घेण्याचा विचार असेल तर त्याला गती मिळेल.