अशी आहे ग्रहस्थिती : राहू-हर्षल (वक्री) मेषेत, मंगळ वृषभ राशीत, केतू तुळेत, रवि-बुध (वक्री) धनु राशीत, शुक्र-शनि मकर राशीत, नेपच्युन कुंभ राशीत, गुरू मीन राशीत, १५ जानेवारीपासून मकर राशीत, १८ जानेवारी रोजी शनि कुंभेत, चंद्र कन्येत, त्यानंतर तूळ आणि सप्ताहाच्या शेवटी वृश्चिकेत. दिनविशेष – १५ जानेवारी रोजी मकर संक्रांत, १८ जानेवारी रोजी षटतिला एकादशी.
मेष : मंगळाची मार्गी स्थिती, रवि आणि शनीचे राश्यांतर त्यामुळे आगामी काळात शुभ फळे मिळतील. नोकरीच्या ठिकाणी चांगली स्थिती राहणार आहे. बढतीची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. काहींना मान-सन्मान मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात चांगले यश मिळेल. अडकून राहिलेली कामे मार्गी लागताना दिसतील. व्यवसायात एखादे काम सहजपणे हातात पडेल. संततीला नोकरीची संधी चालून आल्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण राहील.
वृषभ : नोकरी, व्यवसायात उत्तम रिझल्ट मिळतील. शुक्र-मंगळ-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आकस्मिक धनलाभ मिळेल. नोकरीनिमित्ताने परदेश प्रवास घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नातेवाईकांच्या, जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. लाभातील गुरूमुळे शुभकार्ये होतील. शनीचे राश्यांतर कर्मस्थानातून होईल. १५ जानेवारीनंतर रवीचे मकरेतील राश्यांतर, मार्गी मंगळ यामुळे चांगले दिवस येतील. संततीसाठी, भगिनींसाठी उत्तम काळ आहे.
मिथुन : आठव्या शनीचे राश्यांतर भाग्यस्थानातून होणार असल्याने उद्योग-व्यवसायाची गाडी सुसाट सुटेल. अडचणीतून पुढे जाण्याचा मार्ग सापडेल. रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळू शकते. कर्मस्थानात असणार्या हंसयोगातल्या गुरूमुळे आर्थिक, कौटुंबिक, कामकाजात्मक ठिकाणी शुभ परिणाम दिसून येतील. नवीन जोडधंद्यात बेधडकपणे पुढे जा. १३ ते १५ जानेवारीच्या दरम्यान होणार्या गुरू-चंद्र दृष्टियोगामुळे कुटुंबात शुभकार्ये, समारंभ होतील. मार्गी मंगळामुळे चालू व्यवसायात गुंतवणूक वाढेल.
कर्क : अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. १८ जानेवारी रोजी होणारे शनिचे राश्यांतर अष्टम भावातून होईल. राहू कर्मस्थानात असल्यामुळे व्यवसायाची घडी विस्कटलेली राहील. पण मन अशांत होऊ देऊ नका. नोकरीत सबुरीने राहा. आर्थिक अडचणी निर्माण होतील. जपून राहा. संततीला क्रीडास्पर्धांमध्ये चांगले यश मिळेल. पत्नी, जोडीदारांकडून चांगली साथ मिळेल.
सिंह : रवीचे १५ जानेवारीला होणारे मकर राशीतले राश्यांतर आणि शनीचे सप्तम भावातील राश्यांतर यांच्यामुळे आगामी काळात एका नव्या पर्वाची सुरुवात होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. शनी शष्ठयोगात असल्याने सरकारी नोकर, राजकारणी यांना मोठे बदल अनुभवावे लागू शकतात. काहींना शुभ फळे मिळतील. समाजात मानसन्मान वाढेल. दशम भावात मार्गी झालेल्या मंगळामुळे पत्रकार, वकील, इस्टेट एजेंट यांच्यासाठी सर्वोत्तम काळ आहे.
कन्या : साधारण स्थिती राहील. थोडा त्रासदायक काळ असला तरी चिंता करू नका. शुक्र आणि रवीचे पंचम भावातील मकरेतले भ्रमण कलाकार मंडळी, शिक्षक, क्लासशी संबंधितांना चांगले जाईल. मंगळाची सुख स्थानावर दृष्टी असल्याने क्षुल्लक गोष्टींमुळे घरात वादाचे प्रसंग घडतील. हे चहाच्या कपातले वादळ समजून दुर्लक्ष करा. जोडीदार, भागीदार यांचे निर्णय समाधानकारक राहतील.
तूळ : १८ जानेवारीला होणारे शनीचे राश्यांतर पंचम भावातून होत आहे. रवीचे भ्रमण शुक्राच्या सुखस्थानात होणार आहे. त्यामुळे नोकरीत अधिकारप्राप्तीचा योग चालून येईल. मोठी जबाबदारी येईल. उत्तम काळ आहे. ऐषोआरामाला वेळ द्याल. अनेक दिवसांपासूनची योजना दृष्टिपथात येईल. अचानक कामासाठी विदेशात जावे लागू शकते. काही मंडळींना आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. काळजी घ्या.
वृश्चिक : व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर नवे काम पदरात पडेल. नवीन कामाच्या संधी मिळतील. संततीसाठी काळ उत्तम आहे. पंचम भावातील गुरूमुळे अनपेक्षित लाभ होतील. व्यवसायाची गाडी सुसाट धावेल. पराक्रम भावातील रवीच्या भ्रमणामुळे वडील-भाऊ यांचे सहकार्य मिळेल. संपादक, प्रकाशकांसाठी उत्तम काळ आहे.
धनु : सुखद अनुभव देणारा काळ आहे. पराक्रम भावात राश्यांतर करणार्या शनीमुळे नवीन संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थीवर्गाची गाडी थोडी संथगतीने धावेल. काही नशीब बदलणार्या घटना घडतील. सुखसस्थानातील गुरूमुळे गृहसौख्य लाभेल. लाभ आणि पंचमात असणार्या राहू केतूमुळे अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल.
मकर : आर्थिक व्यवहार सांभाळून करा. उधार-उसनवारी टाळा. सुखस्थानात राहू आणि त्यावर शनीची दृष्टी, त्यामुळे घरात क्लेशदायक स्थिती राहील. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. शुक्राचे लग्नातील भ्रमण, पंचमातील मंगळाबरोबर नवपंचम योग त्यामुळे भावनिक ओढ निर्माण होईल. जुनी प्रेम प्रकरणे डोके वर काढतील. शेअर, सट्टा, जुगारामधून लाभ मिळेल. संततीला क्रीडास्पर्धेत यश मिळेल. सुरक्षा व्यवस्थेत काम करणार्यांची कार्यसिद्धी होईल.
कुंभ : नातेवाईकांच्या बाबतीत सावध राहा. १३ मार्चपर्यंत सुखस्थानात मंगळाचे भ्रमण होणार असल्याने नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नोकरीत दूर बदली होऊ शकते. कुटुंबासाठी खर्च वाढेल. मानसिक स्वास्थ बिघडू देऊ नका. शुक्राच्या व्ययातील भ्रमणामुळे परदेश प्रवास, भटकंती करावी लागेल. बँकेतून कर्ज मिळायला वेळ लागेल. महागडी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळा.
मीन : बदलणारे ग्रहमान चांगले रिझल्ट देईल. पगारवाढ होईल. संततीला चांगले यश मिळेल. धन भावात राहू-हर्षल, त्यावर शनीची दृष्टी त्यामुळे अनपेक्षित खर्च आ वासून उभे राहतील. १४ आणि १५ जानेवारी रोजी होणारा गुरु-चंद्र दृष्टी योग दाम्पत्य जीवनात चांगला काळ आणेल. व्ययस्थानातील शनीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. नोकरवर्गाकडून त्रास होईल. संघर्ष करावा लागू शकतो. गुरूमुळे मदतीचा हात मिळेल.