• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राशीभविष्य

- भास्कर आचार्य (१३ ते १९ जुलै २०२४)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 12, 2024
in भविष्यवाणी
0

ग्रहस्थिती : मंगळ मेष राशीत, रवि, शुक्र मिथुन राशीत, बुध कर्क राशीत, केतू कन्या राशीमध्ये, गुरू, हर्षल वृषभ राशीमध्ये, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीमध्ये, शनि-कुंभ राशीत. विशेष दिवस : १४ जुलै दुर्गाष्टमी, १७ जुलै आषाढी एकादशी, मोहरम, १९ जुलै प्रदोष.

मेष : व्यवसायात विशेष काळजी घ्यावी. अचानक नुकसान होईल. नव्या संधींमधून उत्कर्ष होईल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरेल. नोकरीत कामात घाई महागात पडेल. युवा वर्गाला चांगले यश मिळेल. विवाहेच्छुकांसाठी आगामी काळ उत्तम राहील. पावसाळी सहलीत काळजी घ्या. घरात ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे खर्च वाढेल.

वृषभ : तरुणांना प्रेरणा व करियरला आकार देणार्‍या घटना घडल्याने उत्साह वाढेल. नव्या नोकरीच्या शोधात असणार्‍यांना मनासारखी संधी मिळेल. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील आनंदात भर घालणारी घटना घडेल. जवळच्या व्यक्तीच्या भाग्योदयाचा आनंद साजरा कराल. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईक, मित्रांच्या गाठीभेटी घडतील. व्यवसायात उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. संशोधक, कलाकार, संगीत क्षेत्राशी निगडित मंडळींचा भाग्योदय होईल.

मिथुन : कोणताही आर्थिक व्यवहार करताना योग्य काळजी घ्या. भागीदारीत संयमाने घ्या. वाद टाळा. जादाचा परतावा मिळवण्याच्या प्रयत्नांत फसगत होईल. मनासारख्या घटना घडल्याने हुरळून जाऊ नका. नोकरदारांना चांगला काळ. काही मंडळींना विदेशात नोकरीची संधी येईल. विद्यार्थ्यांना यशदायक काळ राहील. खेळाडूंना यश मिळेल. संततीच्या वागण्याकडे लक्ष ठेवा, डोकेदुखी वाढवणारा प्रकार घडू शकतो. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. सामाजिक कार्यात चांगला अनुभव येईल.

कर्क : कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. महागडी वस्तू खरेदी कराल. मित्रांशी वागताना बोलताना काळजी घ्या. त्यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. चेष्टामस्करीचे प्रसंग टाळा. काही मंडळींना अचानक धनलाभ होईल. शेअर, सट्टा, जुगारापासून दोन हात दूर राहा. मामा-मावशींची मदत होईल. दांपत्यजीवनात किरकोळ कुरबुरींकडे लक्ष देऊ नका. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. काहीजणांच्या कामावर खूष होऊन वरिष्ठ त्यांच्याकडे अधिकची जबाबदारी सोपवतील. व्यवसाय विस्ताराच्या संधी विचारपूर्वक साधा.

सिंह : विज्ञान, संशोधन, शिक्षण क्षेत्रात नव्या संधी चालून येतील. युवावर्गाला स्पर्धात्मक यश मिळेल. कुटुंबाबरोबर भटकंती होईल. नोकरीनिमित्ताने प्रवासात खिसापाकीट सांभाळा. अनोळखी व्यक्तीबरोबर माहिती शेअर करताना काळजी घ्या. व्यवसायात नवीन प्रयोगांसाठी नियोजन करताना गडबड करू नका. तरुणांचा भाग्योदय होईल. घरातील वातावरण आनंद वाढवेल. नोकरीत विचारपूर्वक पुढे चला. निर्णय घेताना घाई नको. थकीत येणे वसूल होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. संततीकडे लक्ष ठेवा. ज्येष्ठ नागरिकांशी बोलताना काळजी घ्या. समाजकार्य करताना तुमच्या कामाचे कौतुक होईल.

कन्या : नोकरी-व्यवसायात यशदायक काळ राहील. भागीदारीत व्यवसाय करण्याच्या विचाराला गती मिळेल. संततीकडे लक्ष द्या. माहिती-तंत्रज्ञान अभियंत्यांना यश देणारा काळ. अडकलेले काम भावाबहिणीच्या मदतीने पूर्ण होईल. नोकरीत नियोजन आणि वेळेला सर्वाधिक महत्व द्या. महिलांनी अतिविश्वास दाखवणे टाळावे. मन:स्ताप देणारा प्रसंग घडू शकतो. शेअर, लॉटरीच्या माध्यमातून काहीजणांना लाभ होईल. त्याच्या अति आहारी जाऊ नका. आध्यात्मिक कार्यातून समाधान मिळेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जुने दुखणे डोके वर काढू शकते.

तूळ : युवा पिढीच्या योजनांना गती मिळेल. आत्मविश्वास दुणावेल. योगा, ध्यानधारणेतून आत्मिक समाधान मिळेल. विवाहेछुकांसाठी चांगला काळ. नोकरीनिमित्ताने विदेशात असणार्‍या मंडळींना लॉटरी लागू शकते. धारदार वस्तूंपासून काळजी घ्या. कुटुंबात किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. घरात खर्चाचे प्रमाण वाढू शकते. खाणपिण्याच्या नियमांचा अतिरेक करू नका. मोह टाळा, पथ्य पाळा. नव्या संकल्पनेतून नवा व्यवसाय आकाराला येईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. पावसाळी सहलीत काळजी घ्या.

वृश्चिक : एखादा त्रासदायक प्रसंग निर्माण होऊ शकतो, सतर्क राहा. धार्मिक स्थळांना भेट द्याल. दानधर्म कराल. नोकरीत अच्छे दिन अनुभवाल. वरिष्ठ कामावर खूष होतील. प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत. घरात आनंद वाढवणारी घटना घडेल. व्यवसायविस्ताराची योजना पुढे ढकला. उधार-उसनवारी नकोच. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. क्रीडापटूंना यशदायी काळ. मालमत्तेबाबतचा प्रलंबित विषय पुढे सरकेल. मार्वेâटिंग, रियल इस्टेट क्षेत्रात यशदायी काळ. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

धनु : नोकरी-व्यवसायात काम पूर्ण करण्यासाठी धावपळ घडेल. त्यात आर्थिक फटका बसू शकतो. सरकारी कामात अडथळे निर्माण होतील. छोट्या कारणामुळे घरात वाद होतील. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. मोहात पडू नका. विज्ञान, कृषी क्षेत्रात व विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. बंधूवर्गाची तब्येतीची तक्रार निर्माण होऊ शकते. जुने दुखणे डोके वर काढेल. मुलांकडे विशेष लक्ष द्या. नोकरीत चांगली स्थिती राहील. तरुणांच्या नव्या संकल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. मानसिक समाधान मिळेल. मन स्थिर ठेवा. घाई टाळा.

मकर : वाद टाळा. महिलांप्रति आदरभाव ठेवा. सार्वजनिक जीवनात अरे ला कारे करू नका, नसते दुखणे अंगलट येईल. करियरच्या बाबतीत तरुणांच्या मनासारख्या संधी चालून येतील, नव्या शैक्षणिक संधीही उपलब्ध होतील. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना नव्या संधी मिळतील. जमीनजुमल्याच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. नवे घर घेण्याचा विचार पुढे जाईल. कुटुंबासाठी वेळ द्या. नोकरीत कामाचे वेळापत्रक पाळा. मित्रांशी वागताना काळजी घ्या. व्यवसायात जुने येणे वसूल होईल. सरकारी कामे पूर्ण न झाल्याने हिरमोड होऊ शकतो.

कुंभ : घरातील वातावरण बिघडेल असे काही करू नका. ज्येष्ठांशी संवाद ठेवा. तरुणांना नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. कला क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात याल. सामाजिक कार्यात मोठे काम पूर्ण होईल. काहीजणांचा भाग्योदय करणार्‍या घटना घडतील. व्यवसायात अच्छे दिन अनुभवाल. अचानक धनलाभाचे योग आहेत. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. हाडाचे दुखणे त्रास देऊ शकते. डायबिटीस, हृदयरोग असणार्‍यांनी काळजी घ्यावी.

मीन : व्यवसायात यश देणारा काळ आहे. नोकरदारांनी आर्थिक नियोजन करावे. कोणताही निर्णय घेताना अति आत्मविश्वास टाळा. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. कुटुंबाबरोबर प्रवासाला जायचे नियोजन कराल. नोकरदारांनी डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे. नातेवाईकांशी चेष्टा मस्करी नकोच. तरुणांना यश मिळेल. खानपान सांभाळा. पावसाळ्यात पोटाच्या विकारांना निमंत्रण देऊ नका. नवीन वास्तू घेण्याच्या योजनेला गती मिळू शकते. फक्त काळजीपूर्वक पावले टाका.

Previous Post

खेळ

Next Post

मिशा सांभाळा!

Next Post

मिशा सांभाळा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.