ग्रहस्थिती : गुरू, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीनेत, केतू कन्येत, मंगळ मिथुन राशीत, प्लूटो मकरेत. दिनविशेष : १२ एप्रिल हनुमान जयंती, १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १६ एप्रिल संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९.४६ वा., १८ एप्रिल गुडफ्रायडे.
– – –
मेष : नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडणार नाहीत. नवीन कल्पना लगेच पुढे जाणार नाहीत. वायफळ खर्च टाळा. नोकरीत अधिक श्रम आणि धावपळ करावी लागेल. घरासाठी वेळ खर्च होईल. तरुणांना सुवार्ता कळेल. घरी एखाद्या कार्यक्रमात मित्र, नातेवाईक भेटतील. प्रवासात खबरदारी घ्या. नवीन कामाची संधी चालून येईल. जुनी कामे पूर्ण होतील. समाजकार्यात वेळ खर्च होईल. मालमत्तेचे व्यवहार सावधपणे पूर्ण करा. सट्टा, लॉटरीच्या आहारी जाऊ नका. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
वृषभ : व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील, आर्थिक बाजू उत्तम राहील. कामांचे योग्य नियोजन करा. नोकरीत तुमची बाजू वरचढ राहील. आर्थिक प्राप्ती चांगली राहील. मुलांकडे लक्ष ठेवा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कलाकारांना पुरस्कार मिळेल. घरात थोडे धीराने घ्या. बोलताना, वागताना काळजी घ्या. युवकांना यशदायी काळ येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. काहीजणांना मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. उन्हामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : व्यवसायात काळजीपूर्वक पावले टाका. नोकरीत गप्प राहून कामे पुढे न्या. कार्यक्रमात मित्र भेटतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. सरकारी कामांना गती मिळेल. तरुणांचे शैक्षणिक प्रश्न लांबणीवर पडतील. विदेशात जाण्याचे नियोजन रेंगाळेल. खर्च उभा राहील. नवीन गुंतवणुकीत मोहात अडकू नका. ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. उच्चशिक्षण घेणार्यांना चांगली बातमी कळेल. कुटुंबासह प्रवास घडतील. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. ध्यान, योगामुळे प्रसन्नता वाढेल. महागडी वस्तू खरेदी कराल.
कर्क : धार्मिक कार्यातून समाधान मिळेल. मित्रांच्या मदतीने कामे पुढे सरकतील. व्यवसायात प्रगती होईल. विस्ताराच्या योजना पुढे सरकतील. मार्केटिंग क्षेत्रात यशदायक काळ. दांपत्यजीवनात वाद टाळा. तरुणांनी चैन, मौजमजेपासून दूर राहावे. सामाजिक कार्यातून आनंद मिळेल. नोकरी बदलण्याआधी विचार करा. बँकेची कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. कामानिमित्त विदेशात जावे लागेल. महिलावर्गाचा कल समाजकार्यात वाढेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. ध्यानधारणेतून मन शांत होईल.
सिंह : सुरुवातीचे दोन दिवस कामात बेचैनी जाणवेल. अधिक कष्ट घ्यावे लागतील. वेळापत्रक बिनसून आरोग्यावर परिणाम होईल. कुणाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. आरोग्याचे किरकोळ प्रश्न निर्माण होतील. मित्रांशी बोलताना गैरसमज टाळा. इंजिनीअरना नवीन संधी मिळतील. ध्यानात प्रसन्नता जाणवेल. तरुणांचा मौजमजेकडे कल राहील. आर्थिक व्यवहार लांबणीवर टाका. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. संयमाची भूमिका ठेवा. व्यवसायात कष्ट पडतील. खर्च वाढेल. आवक बेताची राहील. मनस्वास्थ्य बिघडेल.
कन्या : कामानिमित्त प्रवासात पथ्ये पाळा. धार्मिक कार्यातून शांती मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूष होतील. पगारवाढ, बढती मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल. भागीदारीत वाद होतील. तरुणांना धनलाभ, अपेक्षित यश मिळेल. नोकरी चालून येईल. आर्थिक बाजू चांगली राहील. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. जुने आजार डोके वर काढतील. कुटुंबात किरकोळ कुरबुरी ताणू नका. सुटीनिमित्ताने प्रवासाला जाताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. सांभाळून व्यवहार करा.
तूळ : नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. आपलेच खरे करू नका. सरकारी कामे मार्गी लागतील. शिक्षणात मनासारख्या घटना घडतील. भावंडांशी जमवून घ्या. व्यवसायात कामे रेंगाळतील. नवीन नोकरी मिळेल. भागीदारीत सबुरी बरी. आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. घरात शुभकार्य घडेल. व्यावसायिकांना यशदायक काळ. संस्मरणीय घटना घडतील. सामाजिक जीवनात मानसन्मान मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ.
वृश्चिक : संमिश्र घटनांचा अनुभव येईल. अचानक खर्च होईल. नोकरीत नियोजन करा. व्यवसायात बरकत होईल. मुलांकडून सुवार्ता मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल. संशोधकांना यश मिळेल. मालमत्तेसंदर्भातील प्रश्न मार्गी लागतील. सार्वजनिक जीवनात अतिविश्वास आणि अहंकार बाजूला ठेवा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. कोणत्याही निर्णयात भावनिक गुंतवणूक नको. रागावर नियंत्रण ठेवा. कामाचा ताण वाढेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. विदेशात व्यवसायवृद्धीत यश मिळेल. विचारपूर्वक आर्थिक निर्णय घ्या. उच्चशिक्षणाची संधी येईल.
धनु : वाणीवर नियंत्रण, डोक्यावर बर्फ ठेवा. कुणाला आर्थिक मदत करू नका. व्यवसायात रोखीचे तत्व पाळा. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय टाळा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. नोकरीत चांगला काळ. कुटुंबात आनंद वाढेल. व्यावसायिकांचा खिसा भरलेला राहील. लांबच्या सहलीला जाल. नव्या ओळखी होतील. चांगला फायदा होईल. सामाजिक कामातून आनंद मिळेल. कलाकारांना मानसन्मान मिळेल. शिक्षक, संशोधकांचे कौतुक होईल. अडचणींतून मार्ग निघेल.
मकर : नव्या कल्पना पुढे सरकतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. सहल घडेल. आरोग्याचे प्रश्न डोके वर काढतील. सार्वजनिक ठिकाणी जपून वागा. आपले म्हणणे लादू नका. नोकरीत वरिष्ठ खूष राहतील. प्रसिद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन कामी येईल. व्यवसायात उलाढाल करताना काळजी घ्या. मित्रांशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा. थकीत येणे वसूल होईल. पर्यटनासाठी बाहेरगावी जाल. मुलांकडून आनंद वाढेल. खेळाडूंना चांगले यश मिळू शकते. आश्वासनांना बळी पडू नका. शेअर, सट्टा, जुगार, लॉटरीच्या भानगडीत पडू नका. आर्थिक नियोजनात चूक करू नका.
कुंभ : मनासारखी कामे न झाल्याने मनस्वास्थ्य खराब होईल. व्यवसायात खबरदारी घ्याल. आरेला कारे महागात पडू शकते. उकाड्यामुळे आजारपण येईल. नोकरीत वाद टाळा. ब्रोकरना लाभ मिळेल. मन:स्ताप टाळा. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. शिक्षणक्षेत्रात चांगला अनुभव येईल. विदेशात व्यवसायाच्या प्रयत्नात यश मिळेल. उधार देणे टाळा. आर्थिक लाभाबरोबर खर्चही वाढेल. चैनीची वस्तू खरेदी कराल. नियमात राहून काम करा. मुलांना शिक्षणात यश मिळेल. तरुणांना अपेक्षित कामे होतील.
मीन : मनाची चंचलता वाढेल. मन प्रसन्न ठेवा. ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढतील. नवीन भागीदारी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घाईत घेऊ नका. आंधळा विश्वास ठेवून माहिती देऊ नका. उन्हाळ्यात मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरीत अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. आपल्या भूमिकेशी ठाम राहा. सर्वच बाबतीत संयमाने घ्या. घरात शुभकार्ये घडतील. नवीन घर, जमीन घेण्यात यश मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल.