शिवसैनिक
मशालींचा उजेड पाहून
डोळे त्यांनी झाकले
चटके बसताच पार्श्वभागी
रणांगणातून भागले
दाही दिशांना घुमला आता
शिवसेनेचा बुलंद नारा
महाआघाडीची सरशी पाहून
गद्दारांचा चढला पारा
शिवसेनेची विजयपताका
पाहून त्यांचे दिपले डोळे
पुढे पुढे बघत राहा
पोटात कसे येतील गोळे
—– —– —–
बाळासाहेब ठाकरे
मर्द मराठा माझा मावळा
फितुरी त्याच्या रक्तात नाही
सत्तांतुरांना भय ना लज्जा
त्यांना तर खुर्चीची घाई
जात-पात अन् धर्म विरहित
शिवसेनेचे झळकेल तोरण
ढोंगी स्वार्थी राजकारण्यांचे
उघडे पडेल बेगडी धोरण
शिवसेना हे माझे अपत्य
गळा घोटण्या धजावला कसे
थूत तुमच्या त्या जिनगानीवर
जगात झाले तुमचे हसे
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
एकदा सारे आले कब्जात
भाजपालाच देऊ शक्ती
दाढीवाले बघतच राहतील
कशी स्वप्नांची होईल माती
आपल्या नेत्यांशी बेईमान जो
कोण ठेवील त्यावर विश्वास
आम्हालाही देईल दगा
भाजपाचाही कोंडेल श्वास
चार दिवस मजा मारूंदे
कधी नव्हे ती पाहू दे गादी
नंतर आणू जमिनीवरती
पश्चात्तापाची झोपण्या लादी
—– —– —–
दीपक केसरकर
आम्ही लांबवला दिवाळी सण
फराळाची नको घाई
तुलसीविवाहापर्यंत येतील
सरकारी शिध्याच्या सोयी
फक्त शंभर रुपयांत सामान
का देता तुम्ही तीनशे रक्कम
आमची दिवाळी केव्हाच झाली
आमचे खिसे अगदी भक्कम
आनंदाचा शिधा तुम्हाला
तरीही तुमचे वाजले दिवाळे
थंडीमध्ये करा दिवाळी
पावसापेक्षा बरे हिवाळे
—– —– —–
नरेंद्र मोदी
रोज रोज मीडियामध्ये
माझी नवी अॅक्टिंग पहा
हिरोलाही लाजवेल अशा
भूमिकांचा साज नवा
जाहिरातबाजी करूनच मी
लोकांसमोर शायनिंग मारतो
लोक म्हणतात केवढा महान
हाच माणूस भारत तारतो
काश्मिरी ब्राह्मण जातात बळी
अतिरेक्यांचे होते रंजन
युद्ध हा शेवटचा पर्याय
तोपर्यंत तर राम-भजन