• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चॉकलेट टेन्शन आणि च्युईंगम टेन्शन

- राजेश कोळंबकर (टेन्शन काय को लेने का?)

Nitin Phanse by Nitin Phanse
November 11, 2022
in भाष्य
0

टेन्शन कुणाला नसतं? सगळ्यांनाच असतं. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’च्या चालीवर ज्याला टेन्शन नाही असा जगी कोण आहे असं विचारता येईल. प्रत्येक माणसाला टेन्शन असतंच- कुणाला छोटं टेन्शन असेल कुणाला मोठं टेन्शन असेल.
माणसाला टेन्शन असावं की नसावं असं आपल्याला कुणी विचारलं तर आपण म्हणू कशाला हवं ते टेन्शन? टेन्शन आलं की खूप त्रास होतो. डोकं दुखतं, भीती वाटते, छाती धडधडते, हात पाय लटलटतात. दरदरून घाम फुटतो. श्वास कोंडतो. छोटं टेन्शन घेतलं तर छोटा त्रास होतो. जास्त टेन्शन घेतलं तर मोठा त्रास होतो. खूप टेन्शन घेऊन आपण आजारी पडू शकतो. टेन्शनने आजार बळावू शकतो. घाबरून माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. टेन्शन घेतल्यामुळे आपल्या मनावर, शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ब्लड प्रेशर, डायबिटीस, हृदयविकार या आजारात टेन्शन घेणं धोकादायक असतंच; पण आजार कोणताही असो, आपण टेन्शन घेतलं तर आजार बळावतो.
टेन्शन घेतल्याने आपल्या मनावर, शरीरावर वाईट परिणाम होतो. तर मग टेन्शन घ्यावं की घेऊ नये? आपण कसलीच भीती बाळगली नाही तर चालेल का? आपण भवितव्याबाबतही टेन्शन फ्री राहायचं का? टेन्शन घ्यायचं नाही म्हणत शिक्षण, करियर, जबाबदार्‍या, आजार, एखादं मोठं संकट याबाबतीत हाताची घडी घालून निवांत बसून चालेल का?
टेन्शन घेतलं तर आपल्याला मानसिक त्रास होतो, शारीरिक दुष्परिणाम होतात अन् नाही घेतलं तर त्यातही आपण धोका पत्करत आहोत. मग काय करायचं?
मंडळी, टेन्शन तर घ्यावंच लागेल. टेन्शन हीच आपल्या टेन्शनवरची मात्रा आहे. पण ही मात्रा योग्य प्रमाणात घ्यायला हवी. जेवणात जसं योग्य प्रमाणात मीठ हवं तसं जीवनात योग्य प्रमाणात टेन्शन हवं अन् आपण जे टेन्शन घेत आहोत ते कोणत्या प्रकारचं आहे हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. टेन्शनचे दोन प्रकार आहेत. एक पॉझिटिव्ह टेन्शन आणि दुसरं निगेटिव्ह टेन्शन (सकारात्मक चिंता अन नकारात्मक चिंता). आपण यांना अनुक्रमे चॉकलेट टेन्शन आणि च्युईंगम टेन्शन असंही म्हणू शकतो. चॉकलेट टेन्शन का, तर आपण चॉकलेट खाऊन संपवून टाकतो, ते उगीच चघळत बसत नाही. च्युईंगम मात्र आपण रवंथ करत रहातो. च्युईंगम टेन्शनने आपण अनावश्यक घाबरून जातो. या नकारात्मक टेन्शनने आपण मनस्ताप करून घेतो. आपल्यासमोरचा प्रश्न कसा सोडवता येईल याचा आपण विचार करत नाही. नेमकी समस्या लक्षात घेत नाही. समस्येला नेमकेपणाने भिडत नाही. आपण अर्थहीन गोष्टींची चर्चा करत राहतो. सद्यस्थितीत आपल्यासमोर कोणते उपाय आहेत, कोणते पर्याय आहेत हे न पाहता आपण चिडचिड करतो. इतरांना दोष देत राहतो. आपल्या भावनांचं अनावश्यक अन कधी कधी आक्रस्ताळे प्रदर्शन करतो. घटनेला किंवा व्यक्तीला अशी अयोग्य प्रकारची प्रतिक्रिया आपण अनेकदा कमी अधिक प्रमाणात देत असतो. यातून प्रश्न तर सुटत नाही, उलट मनस्ताप वाढत राहतो.
परंतु आपण पॉझिटिव्ह टेन्शन घेतो तेव्हा आपण प्रश्न सोडवण्याच्या दिशेने प्रवासाला लागतो. समोर नेमका प्रश्न काय आहे अन तो कसा सोडवता येईल याचा आपण विचार करतो. योग्य उपायांचा, पर्यायांचा शोध घेतो. त्यांची आखणी करतो. दुसर्‍यांना दोष देत बसण्याचा उद्योग करत नाही. त्यातून काही निष्पन्न होणार नसतं.
आपण स्मिताचं उदाहरण घेऊ. स्मिताचं नवर्‍याशी अजिबात पटत नाही. त्या दोघातले संबंध बिघडले आहेत. ती सतत, तो असाच आहे, तो तसाच आहे अशी बडबड करत राहते. नवराही भडकतो. भांडणं होत राहतात. स्मिता किंवा तिचा नवरा एकमेकांशी जे वागतात त्याचा त्या दोघांनाही मानसिक त्रास होत असतो. रोजच्या या त्राग्याने समस्या सुटणार नसते. हे रोजचं असं च्युईंगम चर्वण करत राहण्यापेक्षा नेमके कशावरून खटके उडतायत, आपल्यात काय बदल करावे लागतील हे दोघांनी समजून घ्यायला हवं. त्यासाठी रीतसर कौन्सिलिंग घ्यायला हवं. त्याने त्यांचे संबंध सुधारू शकतील किंवा पटणारच नसेल, पटवून घेण्याची इच्छाच नसेल तर दोघं वेगळे होऊन शांतपणे जगू शकतात. असंच एक उदाहरण घेऊ मनोहर काकांचं. मनोहर काका अन कमलाकर काका दोघे सख्खे शेजारी. चांगले मित्र. एक दिवशी कमलाकर काकांच्या छातीत दुखू लागलं. खूप त्रास होऊ लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि काकांना हृदयविकाराचा अटॅक येऊन गेल्याचं सांगितलं. तीन ब्लॉकेज आहेत, ऑपरेट करावं लागणार हेही स्पष्ट झालं. कमलाकर काकांबाबतचं हे ऐकून मनोहर काकांच्याही छातीत दुखू लागलं. तेही घाबरेघुबरे झाले. कमलाकर काकांबद्दल कळेपर्यंत ते ठणठणीत होते. पण ते ऐकलं अन् त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागला.
स्मिता अन मनोहर काका हे नकारात्मक टेन्शनचे शिकार झाले अन त्यांनी त्रास वाढवून घेतला असं म्हणावं लागेल. मनोहर काकांना कदाचित भीतीनेच त्रास झाला असावा. पण समजा, खरंच काही प्रसंग आला तर त्याला तोंड तर द्यायलाच हवं ना?
आपण मिलिंदचं उदाहरण घेऊ. मिलिंदला फोन आला की त्याच्या भावाला अपघात झाला आहे. आता मिलिंदने काय करावं? भावाबद्दलची बातमी ऐकून मिलिंद गर्भगळीत झाला तर तो या प्रसंगाला सामोरं जाऊ शकेल का? मिलिंदला धक्का बसू शकतो, पण स्वतःला सावरायला लागेल. फोनवरून मिळालेली बातमी खरी की खोटी? बातमी खरी असेल तर अपघात कुठे झाला आहे? अपघात किरकोळ आहे की मोठा आहे? अपघातस्थळी लवकरात लवकर कसं पोहचता येईल? ते शक्य नसेल तर तिथे त्याला ताबडतोबीने कोण मदत करू शकेल? लवकरात लवकर काय हालचाली करता येतील याचा विचार केला, भावाच्या अपघाताचं पॉझिटिव्ह टेन्शन घेतलं तरच मिलिंद भावाला मदत करू शकेल, या प्रसंगाला सामोरा जाऊ शकेल. मात्र त्याने निगेटिव्ह टेन्शन घेतलं तर त्याची छाती धडधडू लागेल, हातपाय थरथरू लागतील अन् तो फार काही करू शकणार नाही.
तर मंडळी, नकारात्मक टेन्शन घेऊन काही फायदा नसतो. उलट नुकसानच होतं. नकारात्मक टेन्शन आपल्याला निष्क्रीय अन दुबळे बनवतं. सकारात्मक टेन्शन आपल्याला समस्येला भिडण्याचं बळ देतं. म्हणूनच नकारात्मक टेन्शनचं सकारात्मक टेन्शनमध्ये रूपांतर करायला हवं. च्युईंगम टेन्शनचं चॉकलेट टेन्शनमध्ये रूपांतर करायला हवं.
आपल्या मनाला नकारात्मक विचार करण्याची सवय आहे, त्याचा तसा सराव झाला आहे. आपल्याला सकारात्मक टेन्शनचा सराव करायला हवा. निगेटिव्ह टेन्शन त्रास देतं तेव्हा विचार बदलून स्वत:ला शांत करून प्रश्न सोडवण्याकडे जायला हवे.

Previous Post

वात्रटायन

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे

शुगर कोटेड गोळी

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.