राकेश टिकैतच्या यांच्या ५ लाखांच्या शेतकरी मेळाव्यात आज ‘हर हर महादेव’ आणि ‘अल्ला हो अकबर’ अशा घोषणा एकत्रित दिल्या गेल्या…!
यामुळे आता कुणाच्या भावना दुखाव्यात…?
२०१३ सालची मुझफ्फरनगरची धार्मिक दंगल म्हणजे माणुसकीला निव्वळ कलंक लावणारी होती. उत्तर भारतातील गंगा-जमनी सौहार्दसंस्कृतीला छेद देऊन आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच ती घडवून आणली होती.
शेकडो मेले, हजारो विस्थापीत झाले. करोडोंचं नुकसान झालं.
त्यानंतर, अल्पावधीतच दंगलीचा फायदा घेणारे सत्ताधीश बनले.
आज दोन्ही धर्मीयांना त्यांना खेळवणारा खलनायक सापडलाय. राजकारणातील त्याचं सूत्रदेखील त्यांना समजलंय…
‘तुम्ही हिंदू-मुसलमान खेळत बसा, तोवर मी देशात आहे त्याची विल्हेवाट लावतो, नंतर तुमचीही वाट लावतो!’
त्याला उत्तर म्हणूनच यावेळी दोन्ही धर्मीयांनी एकत्र येत एकत्र गजर केलाय : हर हर महादेव… अल्ला हो अकबर!
याचीच आज गरज आहे!