अशी आहे ग्रहस्थिती
शुक्र-राहू मेष राशीत, रवि-बुध वृषभ राशीमध्ये, केतू तुळेत, शनि (वक्री) कुंभेत, गुरु-मंगळ-नेपच्युन मीनेत, १६ जूनपासून रवी मिथुनेत, चंद्र तुळेत त्यानंतर वृश्चिक, धनु आणि सप्ताहाच्या अखेरीस मकरेत. दिनविशेष – १४ जून रोजी वट पौर्णिमा, १७ जून रोजी संकष्टी चतुर्थी.
मेष – दाम्पत्यजीवनाची घडी विस्कटलेली राहील. किरकोळ कारणामुळे घरात कुरबुरीचे प्रसंग घडतील. चिडचिडेपणा वाढेल. मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काळजी घ्या. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी मनाविरुद्ध घटना घडतील. अस्वस्थता वाढेल. भावंडांबरोबर वाद घडेल. सांभाळून घ्या. १६ जूनपासून रवीच्या राश्यांतराचा काळ क्रीडापटू, कलाकार, संपादक, यांच्यासाठी अनुकूल राहील. प्रवासाच्या माध्यमातून नव्या ओळखी होतील. बुद्धीचा वापर करून पैसा कमावाल.
वृषभ – आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. राहू-केतू षष्ठ आणि व्यय भावात, मंगळाची दृष्टी अष्टम भावावर, १६ जून रोजी रवीचे राश्यांतर मिथुनेत होणार असल्याने काहींना कौटुंबिक लाभ होतील. फोटोग्राफी, संगीतक्षेत्रात काम करणार्यांना चांगले यश मिळेल. गुप्त शत्रूंपासून त्रास होईल. अडकलेले पैसे गोड बोलून काढून घ्या. परदेशगमनावर पैसे खर्च होतील. कामानिमित्ताने प्रवास घडतील. हात आखडता घ्या.
मिथुन – कार्यक्षेत्रात अधिकारप्राप्ती होईल. १६ जून रोजीचे रवीचे राश्यांतर काहींना फायदेशीर ठरेल. राजकीय, सरकारी क्षेत्रात मानाचे पद मिळू शकते. व्यवसायाची चांगली घडी बसेल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरदारांना दशमातील मंगळ अधिकारप्राप्तीची संधी देणार आहे. १३ आणि १४ जून रोजी होणार्या गुरु-मंगळ-नेपच्युन नवपंचम योगामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. मित्रमंडळींकडून आर्थिक लाभ होतील. शेअर दलालीतून धनलाभ होईल.
कर्क – उद्योग-व्यवसायात ब्रेक लागेल. काही काळ परिस्थिती बिघडेल. अपेक्षित कामे लांबणीवर पडतील. उत्पन्नाचे नियोजन चुकेल. खिशातून पैसे घालून कामे मार्गी लावावी लागतील. योगकारक मंगळ, भाग्यात गुरु-नेपच्युनसोबत असला तरी फारसा तारणहार राहणार नाही. त्यामुळे ईश्वरी चिंतनात वेळ घालवा, त्यातून मानसिक आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी चालून येतील.
सिंह – सद्सद्विवेकबुद्धीच्या जोरावर घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. उद्योग, व्यवसाय, ठेकेदारी करणार्यांना लाभदायक आठवडा आहे. नव्या कामाच्या ऑफर्स चालून येतील, त्यात बिनधास्त उडी मारा, यश दाराशी उभे आहे. बँक आणि आर्थिक क्षेत्रातील कामे मार्गी लागतील. अष्टमातील मंगळामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. ढोंगी माणसांचा सहवास टाळा.
कन्या – पतप्रतिष्ठा मिळेल. मानसन्मानाचे प्रसंग येतील. दशमेश बुध भाग्यात असल्याने तीर्थयात्रा घडतील. चांगला अनुभव येईल. अध्यात्माशी जवळीक वाढेल. कामानिमित्ताने परदेशभ्रमण होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. खेळाडूंना स्पर्धेत घवघवीत यश मिळेल. गुरुबळ चांगले असल्याने शुभकार्य लाभदायक राहील. भागीदारीत चांगले लाभ होतील. राजकीय मंडळींनी काळजी घ्यावा.
तूळ – कौटुंबिक जीवनात मतभेद होतील. शुक्र सप्तमात, पंचमातील वक्री शनी त्यामुळे प्रेमप्रकरणात अपयश येईल. महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. नवे धाडस टाळा. हातातील काम त्रुटी न ठेवता पूर्ण करा.वादाकडे दुर्लक्ष करा. काहींना पगारवाढीचा योग आहे. नोकरीत मोठी जबाबदारी पडू शकते. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल.
वृश्चिक – अंदाज चुकतील. त्यामुळे अति आत्मविश्वास टाळा. गुरु-मंगळ-नेपच्युनचा पौर्णिमेला होणारा नवपंचम योग सकारात्मक ऊर्जा देईल. अनुभवाच्या जोरावर आपली नय्या पार करू शकाल. विद्यार्थ्यांचे करियरचे निर्णय अचूक ठरतील. मौजमस्तीमध्ये पैसे खर्च कराल. रवीचे अष्टमातील राश्यंतर अनपेक्षित अधिकार मिळवून देईल.
धनु – नवी वास्तू, वाहन घेण्याचे योग आहेत. सौख्यप्राप्ती होईल. कुटुंबासाठी वेळ द्याल. महिलांची पतप्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्य पार पडेल. मंगळाची दशमस्थानावर दृष्टी असल्यामुळे नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी वजन वाढेल. जमीन-जुमल्याचे व्यवहार होतील. पंचमात राहू-शुक्र असल्याने अनपेक्षित लाभ होतील. प्रेमप्रकरणात मात्र अपयश येईल. बोलताना नियंत्रण ठेवा.
मकर – बोलताना काळजी घ्या. व्यावसायिक मंडळींनी जोखीम घेऊन गुंतवणूक केली तर त्यांना भविष्यात निश्चितपणे चांगले लाभ मिळतील. सुखस्थानातील शुक्र-राहूमुळे कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. वादात मौन बाळगलेले बरे. आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. पंचमातील रवि-बुधादित्य योगामुळे १४ जूनची पौर्णिमा आनंद वाढवेल. सासुरवाडीकडून अनपेक्षित लाभ होईल. द्रवपदार्थाचा व्यवसाय करणार्यांना चांगला फायदा होईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, घशाचे आजार होऊ शकतात.
कुंभ – कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम होईल. रवि पंचमात, शनि-रवी नवपंचम योग, त्यामुळे स्वभावाचा चांगला फायदा होईल. व्यावहारिक ज्ञानामुळे शुभ फळे मिळतील. घरात व्यवहार पारदर्शी ठेवा. धनस्थानातील मंगळ-गुरु आर्थिक स्थिरता देतील. साडेसातीत निर्णय घेताना घाई करू नका.
मीन – पैसे कसेही खर्च करू नका. व्ययातील वक्री शनी अव्यवहारी गोष्टाr करण्यास भाग पडू शकतो. काळजीपूर्वक निर्णय घ्या. घाई करू नका. संततिसुख लाभेल, दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल. १६ जूननंतर नोकरी व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी जावे लागेल. पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावाल. हातून दानधर्म घडेल. धार्मिक कार्यात रमाल. त्यामुळे मन आनंदी राहील.