• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

‘बॉम्बे टू गोवा’ : करमणुकीसाठी जरूर सफर करा

- शुद्ध निषाद

Nitin Phanse by Nitin Phanse
June 9, 2022
in सिने प्रिक्षान
0

एक पोरगी अरुणा इराणी फिल्मी इंडस्ट्रीतल्या चारसो बीस लोकांच्या जाळ्यात सापडते ती ‘ग्लॅमर’ला भुलून. धर्मा नि शर्मा तिला इतके ‘गोलमाल’ बनवतात की ‘अरुणा’ घरच्या लोकांचं ‘इराणी’ हॉटेल बनवते. ‘कोई भी माल उठाव’ याप्रमाणे तिजोरीतली हाती येईल ती रक्कम नि जडजवाहीर घेऊन ती शर्मा-वर्मा कंपनीला भेटते ती आपल्या भविष्यकाळाचा विचार करून. पण तिला कुठं माहीत असतं की शर्मा-वर्मा आपल्या भविष्यकाळाच्या तरतुदीचा विचार करताहेत ते? त्यात अरुणाने घरून लंपास केलेल्या डबोल्यावर शर्मा-वर्मामध्ये मोठी फाईट होते नि एक कर्मा मरतो नि एक नायिकेच्या ‘वर्मा’वर घाव घालण्यासाठी तिचा पाठलाग करतो. कारण खून झालेला तिने पाहिलेला असतो. खून होऊनही पोलिसांचा संबंध येत नाही. डाकू कंपनी अरुणाचा पाठलाग करतात नि ती तर ‘बॉम्बे टू गोवा’ या बसमध्ये बसलेली असते. पण तिचा होणारा पतिराज मोटारबाईकवरून तिचा पाठलाग करतो नि बसमध्ये बसतो. शर्मा कंपनीही मागे असतेच नि या बसच्या प्रवासात त्यांचा निकाल लागतो. हा आराखडा. ष्टोरी अशी खास नाहीच. कशाला पाहिजे? कारण मन रमेल त्याप्रमाणे भरकतट नेलेली. यात जास्त जोर दिलाय तो बसमध्ये बसणार्‍या व्यक्ती नि त्यांच्या व्यक्तिरेखा यावर नि त्यातून जो जो विनोद निर्माण करता येईल तो केलाय नि लोकांना हसायला लावलंय. हाच फक्त उद्देश!
‘गुड्डी’, ‘आनंद’, ‘आशीर्वाद’, ‘मेरे अपने’सारखी वेगळी चित्र निर्माण करणार्‍या एन. सी. सिप्पी यांनी हे चित्र प्रोड्युस केलंय. हे चित्रही त्यांना कमाई करून देईल यात शंका नाही. कारण यात करमणूक झकास आहे. दिग्दर्शक जरी रामनाथन आहेत नि ‘जॅकपॉट’ फेमस राजेंद्रकृष्ण यांनी ष्टोरी डॉयलॉग लिहिलेले असले तरी त्यात मेहमूदचा ‘ब्रेन’ बराच वापरला गेलाय. एकच गोष्ट. शेवटची धमाल चालू असताना पोलिसांना मेहमूद बोलावून आणतो, एका उंच कड्यावर ते उभे आहेत. हा म्हणतो ‘वो देखो हमारे पॅसेंजर को गुंडा लोक सताते हैं’ इन्स्पेक्टर आपल्या तुकडीला ऑर्डर देतो. ‘तुम इधरसे जाव, तुम इधरसे जाव’ त्यावर मेहमूद कड्याच्या खाली बोट दाखवून इन्स्पेक्टरला म्हणतो, ‘तुम इधरसे जाव’ अशी अनेक चटकदार पोट दुखवणारे विनोद यात आहेत.
लंबूस अमिताभ बच्चन यातला हिरो आहे. ‘आनंद’मध्ये आपल्या संवादाच्या उच्चाराने एक ‘अ‍ॅटमॉसफिअर’ निर्माण करणार्‍याला यात तोंडाने ‘शूऽऽऽ’ शिट्टी वाजवून फायटिंग करायला लावलीय. जितेंद्र टाईप नाचायला लावलंय. खुदा उसका भला करे! बाकीच्या प्रत्येक आर्टिस्टने आपली जबाबदारी ओळखलीय. कारण बंधन कसलंच नाही. त्यातही शत्रूघ्न सिन्हा झकास. जसे ‘ट्रीप’ला जाताना लोक झाडाझुडपाची पर्वा न करता वाटेल तेथे पाणी सोडतात. नव्हे… काय सांगणार? ओळखा तुम्हीच! — करतात. हाच प्रकार येथे घडलाय. पण तीही करमणूक मानली जाते. त्यातलाच हा प्रकार!
चित्रपटातली डोळ्याला आनंद देणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाल मिस्त्री यांची आर्टिस्टीक फोटोग्राफी. बसमधले ‘शॉट्स’ चांगले घेतलेत. फक्त उतारूंच्या बसण्याच्या जागेतली ‘कंटीन्युटी’मध्ये गफलत आहे. पण ‘गफलती’वर बोलायचं कशाला? एवढंच पाहायचं की दिसेल ते गोड मानलं तर अडीच तास कसे गेले ते समजणार नाही हे मात्र खरं.
थोडक्यात, इलेक्शनच्या धामधुमीत तकलीफ न देणारं नि मनाची करमणूक करणारं झकास चित्र. हे आपलं मत!

Previous Post

सच्चे मन‘के’ सच्चे सुर‘के’ ‘केके’

Next Post

उठाओ सायकल, चलो, चल पडो!

Related Posts

सिने प्रिक्षान

‘यादों की बारात’ या अकल की बारात

May 12, 2022
पाकिजापेक्षा बेहतर ‘लाल पत्थर’
सिने प्रिक्षान

पाकिजापेक्षा बेहतर ‘लाल पत्थर’

April 14, 2022
सिने प्रिक्षान

प्रेमाच्या ताकावरचं लोणी ‘बॉबी’

April 7, 2022
सिने प्रिक्षान

एक सुंदर, नवा, वेगळा ‘अनुभव’

March 31, 2022
Next Post

उठाओ सायकल, चलो, चल पडो!

कातळशिल्पे

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.