• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

केशवराव, माफ करा, माफ करा!

- योगेश त्रिवेदी

Nitin Phanse by Nitin Phanse
September 8, 2022
in भाष्य
0
केशवराव, माफ करा, माफ करा!

शेतकरी कामगार पक्षाचे झुंझार नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि थोर संसदपटू डॉ. भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाने तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने बुधवार, २४ ऑगस्ट २०२२ रोजी सत्कार केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात हा सत्कार होणे हे अत्यंत आनंददायी म्हणावे लागेल. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोर्‍हे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या सभागृहात डॉ. भाई केशवराव शंकरराव धोंडगे यांच्या संसदीय कारकीर्दीचा गौरव करणारा प्रस्ताव मांडला. ‘ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा गौरव करण्याबद्दलचा प्रस्ताव’ असा हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, छगन भुजबळ, अध्यक्ष राहुल नार्वेकर आदींनी आपापले विचार मांडताना केशवरावांच्या कारकीर्दीचा गौरव केला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभापतींच्या दालनात बसून दस्तुरखुद्द केशवरावांनी आपल्याबद्दलची सभागृहात झालेली भाषणे ‘याचि देहि याचि डोळा’ ऐकली आणि नयनांमधील आनंदाश्रू गालावरुन ओघळले. केशवरावांच्या सुविद्य पत्नी प्रभावतीदेवी, सुपुत्र पुरुषोत्तम, जावई प्राचार्य अशोकराव गवते, सहकारी व्ही. जी. चव्हाण आदी मंडळी खास कंधार या केशवरावांच्या गावाहून तसेच नांदेड येथून आली होती.

माजी शिक्षणमंत्री डॉ. कमलकिशोर कदम हेही यावेळी सपत्नीक उपस्थित होते. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करुन केशवरावांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे, असे जाहीर करण्यात आले. साधारणपणे अन्य कार्यक्रमांप्रमाणे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भव्य दिव्य प्रमाणात हा सत्कार करण्यात येईल, असे अनेकांना वाटले. परंतु त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले. विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सभापतींच्या दालनाशेजारच्या १४५ क्रमांकाच्या समिती कक्षात हा कार्यक्रम करण्यात आला. सुमारे पन्नास व्यक्ती जेमतेम मावू शकतील एवढ्या क्षमतेचा हा कक्ष आहे. थोर समाजवादी नेते संसदपटू दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ दत्ता ताम्हाणे यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली त्यानिमित्त त्यांचाही सत्कार विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते याच १४५ क्रमांकाच्या समिती कक्षात १३ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आला होता. याच प्रसंगाची आठवण आली. मध्यवर्ती सभागृहात यापूर्वी अनेक कार्यक्रम करण्यात आले आणि केशवरावांच्या सत्काराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्यावरील ‘भूमिपुत्र’ या ग्रंथाचे प्रकाशन शानदार समारंभात झाले. दिवंगतांच्या संदर्भात कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करा, परंतु जे हयात आहेत त्यांच्या कार्याचा गौरव त्यांच्या उपस्थितीत शानदार समारोहात करायला हवा. केशवराव धोंडगे यांच्या कार्याचा आवाका प्रचंड प्रमाणात असल्याने, त्यांनी लोकसभा आणि विधानसभा दणाणून सोडली असल्याने त्यांचा शतकपूर्ती सोहोळा हा दादरला शिवतीर्थावर विस्तीर्ण मैदानावरच होणे अनिवार्य आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि केशवरावांचे ऋणानुबंध इतके जबरदस्त होते की बाळासाहेबांसाठी केशवरावांनी विधानसभा सभागृह अक्षरशः गाजविले होते. कोण राजेश खन्ना? त्याच्याबद्दल एवढा पुळका कशासाठी? आणि ज्यांच्या एका आवाजावर अख्खी मुंबई क्षणात थांबते, त्यांचे काहीच नाही? असे सरकारला दरडावून विचारणारे केशवराव! त्यांच्या वाट्याला पण १४५ क्रमांकाची खोली? बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जमले नाही. ते बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही जमू नये?

या दिवशी विधानभवनात एवढा ऐतिहासिक कार्यक्रम होत असताना अनेकजण या पासून अनभिज्ञ होते. अनेक दिग्गज नेत्यांनी पाठ फिरविली. अनेकांना तर कोण केशवराव? हेही ठाऊक नव्हते. १४५ क्रमांकाच्या कक्षाजवळून ये जा करणार्‍या अनेकांना तिथे काय चाललंय हेसुद्धा ज्ञात नव्हते. त्याच दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेली हाणामारी हीच ‘ब्रेकिंग न्यूज’ होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एका शतकवीर संसदपटूचा सत्कार दुय्यम ठरला होता. ज्यांचे सुवर्ण, हीरक आणि अमृतमहोत्सव यशवंतराव चव्हाण केंद्रात वा अन्यत्र थोरामोठ्यांच्या उपस्थितीत दणक्यात साजरे झाले, ज्यांच्या ज्यांच्या शताब्दी जोशात झाल्या, त्या मानाने आयुष्याचे शतक फटकावणार्‍या या थोर संसदपटूच्या वाट्याला १४५ क्रमांकाचा कक्ष येत असेल तर ती लोकशाहीची विटंबना म्हणावी लागेल, शोकांतिका म्हणावी लागेल. समाजवादी नेते दत्ता ताम्हाणे, शेतकरी कामगार पक्षाचे नेत्ो डॉ. भाई केशवराव धोंडगे, काँग्रेसचे झुंजार नेते भिकाजी जिजाबा खताळ, काँग्रेसचे माजीमंत्री हुसेन दलवाई (सीनियर) या शतकवीर लोकप्रतिनिधींना, ज्येष्ठ नेत्यांना लोकशाहीच्या मंदिरात योग्य स्थान मिळावे, ही सार्थ अपेक्षा अनाठायी निश्चितच नाही.

असो, सुरुवात तर झाली. अजूनही वर्षभर आहे. या संपूर्ण वर्षात अजूनही प्रशस्त, वैभवशाली सभागृहात, मोठ्या मैदानावर केशवरावांचा सन्मान होणे अत्यंत आवश्यक आहे. नव्हे, हा केशवरावांचा अधिकार आहे. हक्क आहे. तो आपण मान्य करणार की नाही? केवळ औपचारिकता उपयोगी नाही, जी १४५ क्रमांकाच्या कक्षामध्ये पार पाडली आहे.

दुसरे म्हणजे यंदाचे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे, हा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या या झुंजार संसदपटूने संसदीय कारकिर्दीत बळिराजाला सन्मान मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ‘जयक्रांति’ या मंत्राने ते घणाघाती भाषण पूर्ण करीत होते, याच मंत्राची त्यांनी मराठी पत्रकारितेला ‘जयक्रांति’ या नियतकालिकाची देणगी दिली आहे. म्हणूनच मराठी पत्रकारांच्या संघटनांचेही कर्तव्य ठरते की या शतकवीर झुंजार पत्रकाराचा शतकपूर्ती सोहोळा दणक्यात साजरा करुन केशवरावांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी. याचबरोबर केशवरावांनी संसदही गाजविली असल्याने एक थोर संसदपटू या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केशवरावांच्या कारकीर्द आणि कार्याची दखल घेणे आवश्यक ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत हा मुद्दा अर्थातच मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि शिंदे-फडणवीस सरकार यांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मी २०१९पासून यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे आणि असंख्य पत्रकारांनी मला साथ, सहकार्य केले आहे आणि करीत आहेत. मी या सर्वांचा शतशः ऋणी आहे.

केशवरावांसह हे तमाम हयात शतकवीरांनो, तसेच आयुष्याचे शतक पूर्ण करुन इहलोकीची यात्रा पूर्ण करणार्‍यांनो, माफ करा!

मो. ९८९२९३५३२१

Previous Post

‘आपले’ नव्हे, आप्पलपोटे सरकार!

Next Post

पीपीएफ : बहुगुणी आखूडशिंगी उत्तम योजना

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

पीपीएफ : बहुगुणी आखूडशिंगी उत्तम योजना

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.