• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

तू परत येशील!

- टोक्या टोचणकर (टोचन)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
July 7, 2021
in टोचन
0

माझा मानलेला परममित्र पोक्याने बारसंन्यास घेऊन हिमालयात जाण्याची घोषणा केल्यावर मला इतका मोठा धक्का बसला की मी त्यातून अजून सावरलेलो नाही. जोपर्यंत सरकार २४ तास बार खुले करण्यास परवानगी देत नाही, तोपर्यंत आपण संन्यासकृती मागे घेणार नाही, अशी पुरवणी मागणीही त्यांनी त्याबरोबर जोडली. पोक्याची ही बातमी सर्व चॅनलवरून वार्‍यासारखी व्हायरल झाल्यावर तर समर्थनासाठी त्याच्या बसण्याच्या अड्ड्यावर पियक्कडांच्या जमावाची तोबा गर्दी उडाली. सर्वांनी आपापला हवा तेवढा स्टॉक पिशव्या भरभरून विकत घेतला होता. त्याचं एक्स्चेंज नंतर सोयीने होणार होतं. मला राहवेना. मीही धावत धावत पोक्याच्या अड्ड्यावर आलो. पोक्या बाहेरच एका बाकावर मांडी घालून शून्यात नजर लावून तांबडे बाबांसारखा आसनस्थ बसला होता. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्याबरोबर समाधीतून तो जागा झाला. मी म्हटलं, पोक्या हे काय वेडेपण आहे. अरे, विचार पटले नाहीत म्हणून कोणी संन्यास घेऊन हिमालयात जात नाही. कितीतरी राजकीय नेत्यांनी संन्यास घेण्याच्या घोषणा केल्या, पण आलेच ना शेवटी राजकारणात. आपल्या विश्वामित्रांची तपश्चर्या मेनकेने भंग केलीच ना! अर्जुनाचा त्रिदंडी संन्यास तुला माहीत आहे ना! मग तू अशा नको त्या कारणांसाठी संन्यास घेण्याची भाषा का बरं करतोस?
पोक्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले नाहीत. त्याचे सुजलेले लाल लाल गाल काकोडकरांच्या कादंबरीतल्या नायिकेसारखे आरक्त झाल्यासारखे मला वाटले. पण ते त्याचा संतापाचा पारा चढल्याचे निदर्शक होते. मी म्हटले, पोक्या शांत हो. माझा तुला बाहेरून पाठिंबा आहे. मात्र तुझे डबल ढोलकीसारखे धोरण सोडून दे. कधी पाठिंबा, कधी छुपा विरोध, कधी पोलिसांशी तर कधी बारमालकांशी संगनमत असं चालणार नाही. बारबालांच्या मागे राहून काय मिळवलंस? बदनाम मात्र झालास. आपली अर्थव्यवस्था आज मोठ्या प्रमाणात पिणार्‍यांच्या लटपटत्या पायावर उभी आहे, हे त्रिवार सत्य आहे. पण याचा अर्थ बार चोवीस तास उघडे ठेवून ती भरभक्कम करण्याचा तुझा अर्थशास्त्रीय विचार आपल्या सामाजिक संस्कृतीला छेद देणारा आहे, असं नाही तुला वाटत? आपल्यासारख्यांचा या संकटांच्या काळात देशहिताला थोडाफार हातभार लागतो, इथपर्यंत ठीक आहे. पण संन्यास घेण्याचे आततायी विचार तू मनात आणू नकोस. तुझ्या समस्त पियक्कड बांधवांना आज इथे तुझी गरज आहे. तुझं काम त्या समाजसेवी सिनेनटाएवढंच महत्त्वाचं आहे. संन्यास घेऊन हिमालयात जाणं म्हणजे विक्रोळीच्या डोंगरावरील टपरीत टोळकं जमवून ढोसण्यासाठी जाण्याएवढं सोपं नाही. शिवाय हिमालयात थंडी केवढी असते माहीत आहे! तुला तिथे संन्यासवस्र अंगावर असताना गरम कपडेही घालता येणार नाहीत की पायात गरम मोजे आणि तोंडाला कानटोपीही गुंडाळता येणार नाही. कुडकुडून तुझ्या शरीराचे लाकूड होऊन गाडला गेलास तर गंगेतही वाहात येणार नाहीस. मला तर तुझी खूप भीती वाटते.
पण एवढे सारे बोलूनही पोक्याच्या तोंडून हुं की चूं निघत नव्हता. त्याने तोंडात बार तर भरला नसेल ना, हा माझा संशय अखेर खरा ठरला. तो बाजूला जाऊन तोंड धुवून आल्यावर थोडासा माणसात आला. तरीही त्याचा संन्यास घेण्याचा हट्ट सोडायला तयार नव्हता. तो म्हणाला, बरेच दिवस माझ्या मनात ही संन्यास घेण्याची कल्पना घोळत होती. त्यासाठी मी माझ्या मापाची भगवी पायघोळ कफनी शिवून घेतली. दहा कप्पे असलेली झोळी शिवून घेतली. या खडावा, ही छाटी, या रुद्राक्षांच्या माळा, हा कमंडलू या बाकाच्या खाली असलेल्या पिशवीत कशा खच्चून भरल्या आहेत, हे पाहिलंस तर तुला माझ्या पूर्वतयारीची कल्पना येईल. मी फक्त बाता मारत नाही. कपड्यांचेही तीन-तीन सेट आहेत. अंतर्वस्त्रं आहेत ती वेगळीच. पण आता मागे हटणे नाही. हा अन्याय मी उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही…
ते सगळं ठीक आहे, पण पोक्या तिथे इतकं गार वातावरण असतं की तुला अंगात धुगधुगी येण्यासाठी तुझ्या आवडीचा स्टॉक न्यावाच लागेल. त्यासाठी दोन-तीन झोळ्या तरी काखेला माराव्या लागतील. तिथे पाण्याचे बर्फच होत असल्यामुळे अर्थातच ‘ऑन द रॉक’च प्राशन करावी लागेल. एका वेगळ्याच नशेत तू जाशील. अनेक साधूंमध्ये गांजा, अफू पिण्याचे प्रमाण वाढल्याच्या बातम्या आपण वाचतो. तिथे हिमालयात तर तुझ्यासारख्या आणखी एकाची भर त्यात पडेल. आम्हाला कितीही दुःख झाले तरी तुझ्या रास्त मागणीचा विचार करता आम्ही तुला जड अंतःकरणाने निरोप देतो. तरी माझं अंतर्मन मला सांगतंय तू परत येशील, तू परत येशील, तू परत येशील!

– टोक्या टोचणकर

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

या थांब्यांवरून जादा गाड्या सोडा!

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

या थांब्यांवरून जादा गाड्या सोडा!

सोशल मिडियामुळे विधवा महिलांसाठीचे नेटवर्क

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.