मेष : अपेक्षेप्रमाणे फळ न मिळाल्याने नाराज व्हाल. पण, छोट्या गोष्टीतून आनंद मिळेल. कुटुंबातल्या कुरबुरी तुटेपर्यंत ताणू नका. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. आरोग्याचे प्रश्न लांबणीवर टाकू नका. घरातले वातावरण आनंदी राहील. भागीदारीत व्यवसाय सुरु करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. बँकेच्या कर्जाचा विषय मार्गी लागेल. खेळाडूंना यश मिळेल. संततीकडून शुभवार्ता कानी पडेल.
वृषभ : तरुणांना सुखद अनुभव येईल. प्रेम प्रकरणात वाद घडतील. नोकरी-व्यवसायात यश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी यश मिळेल. शिक्षक, संशोधक, कलाकार, संगीतकारांसाठी उत्तम काळ आहे. नव्या ओळखींचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन नोकरीची संधी चालून येईल. व्यवसायात नव्या ऑर्डर मिळतील. सासू-सुनांमध्ये किरकोळ वाद घडतील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण होईल. पण गुरुकृपेमुळे सहीसलामत बाहेर पडाल. व्यवसायात अचानक मोठी जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. कामानिमित्ताने विदेशात जाल. शेअर, जुगार, सट्ट्यापासून दोन हात दूर राहा. घरात पैशावरून वाद घडतील. काळजी घ्या. उधार-उसनवार टाळा. आई-वडिलांच्या, मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. अचानक मोठा खर्च येऊ शकतो. व्यवसायात आर्थिक बाजू कमकुवत होऊ शकते. धार्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल.
कर्क : शुभघटनांचा अनुभव येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. प्रेमप्रकरणात काळजी घ्या. सामाजिक कार्यात रमाल. मानसन्मान मिळेल. बहिणीबरोबर वाद घडतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. पत्रकार, संपादक, पोलीस, संरक्षणक्षेत्रातील मंडळींसाठी चांगला काळ आहे. मनोरंजन, धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील. कामासाठी बाहेरगावी जावे लागू शकते.
सिंह : नोकरीत वाद घडल्यास शब्दाने शब्द वाढवू नका. बदली मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. संततीकडून मन:स्ताप होईल. वाणीवर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक ठिकाणी भान ठेवा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक घ्या. कागदपत्रे तपासून सही करा. वाहन हळू चालवा. अन्यथा अपघाताला निमंत्रण मिळेल. धार्मिक कार्याला वेळ द्याल. घरातल्या मंडळींबरोबर सहलीला जाल.
कन्या : ‘सुख भरे दिन आयो’ याचा अनुभव येईल. संमिश्र घटनांचा काळ. तरुण मंडळींसाठी काळ चांगला आहे. अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना नवीन कामातून चांगला आर्थिक लाभ होईल. नोकरीत बदलाची शक्यता आहे. नवा व्यवसाय सुरु करण्याचे प्रयत्न मार्गी लागतील. नवे मित्र मिळतील. घरात आनंदी वातावरण उत्तम राहील. पैशाचे नियोजन काळजीपूर्वक करा. वाहन खरेदीचा योग आहे. घरच्यांसाठी महागडी वस्तू खरेदी होईल.
तूळ : आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी निर्माण होतील. नोकरी-व्यवसायात मनासारखे काम न झाल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. बेरोजगारांना नव्या संधी मिळतील. घरात चोरीच्या घटना घडू शकतात. प्रेमप्रकरणात मिठाचा खडा पडू शकतो. भागीदारीत कटकटीचे प्रसंग घडतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवा. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल.
वृश्चिक : सार्वजनिक जीवनात वादाचे प्रसंग टाळा. महिलांशी संवाद साधताना काळजी घ्या. कलाकारांना नव्या संधी चालून येतील. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. कामासाठी धावपळ होईल. व्यवसायात नोकरवर्ग त्रास देईल. हातातली कामे मार्गी लावा. त्यात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ कामावर खूष होतील. नवीन जबाबदारी खांद्यावर येईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. नवा व्यवसाय सुरु करताना घाई नको. मुलांचे आरोग्य सांभाळा.
धनु : जुन्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळतील, त्यामुळे मन आनंदी राहील. खिशात काही पैसे राहतील. त्यामुळे मनाला उभारीही मिळेल. पण वायफळ खर्च टाळा. व्यसनी मंडळींपासून दूरच राहा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. घरात कुरबुरीचे कितीही प्रसंग आले तरी प्रत्येक प्रसंगांत शांत राहा. अचानक आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊन खर्च वाढतील. खाणे-पिणे नियंत्रणात ठेवा. बाहेरचे खाणे जितके टाळता येईल तितके टाळा. शक्यतो कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा.
मकर : तरुण मंडळींना नव्या संधी मिळतील. शिक्षणक्षेत्रात अडकून राहिलेले काम पुढे सरकेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. प्रेमात वाद घडतील. सरकारी कामात मर्यादा पाळा. प्रवासात वस्तू सांभाळा. उच्चशिक्षणाचे प्रयत्न मार्गी लागतील. आरोग्याकडे लक्ष द्या. उन्हाळी लागू शकते. भरपूर पाणी प्या. काही प्रसंगी या आठवड्यात पती-पत्नीत कटुता निर्माण होईल. गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्या.
कुंभ : कामानिमित्ताने केलेल्या प्रवासाचा प्रकृतीवर परिणाम होईल. घरगुती वाद होतील. युवा वर्गासाठी आनंददायी घटनांचा काळ आहे. नोकरीच्या नव्या, चांगल्या संधी चालून येतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. संततीकडून उल्लेखनीय काम होईल, घरात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांबरोबर जेवढ्यास तेवढे बोला, उगाच वाद नकोत.
मीन : ध्यानधारणेसाठी वेळ खर्च कराल. मनासारख्या घटना घडतील. त्यामुळे आनंदी राहताल. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ राहील. शिक्षक, प्राध्यापकांना चांगली संधी मिळेल. बँकेचे कर्ज मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार लगेच करू नका, फसगत होऊ शकते. मनोरंजनावर पैसे खर्च होतील. कुणावर विश्वास न ठेवता कोणताही व्यवहार करू नका. महिलांनी मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. दांपत्य जीवनात सुखाचा अनुभव येईल.