ग्रहस्थिती : गुरू, हर्षल मेष राशीमध्ये, शनि कुंभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शुक्र धनु राशीत, रवि, मंगळ, बुध, धनु, प्लूटो मकर राशीमध्ये. विशेष दिवस : १३ फेब्रुवारी श्रीगणेश जयंती, विनायकी चतुर्थी (अंगारक योग), १४ फेब्रुवारी वसंत पंचमी, १६ फेब्रुवारी रथसप्तमी.
मेष : नोकरी-व्यवसायात निर्णय घेताना अतिविश्वास नको. वेळेचे नियोजन चुकल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. मित्रमंडळी, नातेवाईकांबरोबर वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. कलाकारांसाठी उत्तम काळ. मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदी वातावरण अनुभवयास मिळेल. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडल्याने घरातले वातावरण उत्साहवर्धक राहील. व्यावसायिकांना नव्या गाठीभेटी फायद्याच्या ठरतील. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ.
वृषभ : एखाद्या कारणामुळे मानसिक संतुलन बिघडेल. मनासारखी गोष्ट घडली नाही तरी नाराज होऊ नका. नोकरीत अति केले आणि पाण्यात गेले असा अनुभव येऊ शकतो. आपले काम आणि आपण एवढ्यापुरतेच मर्यादित राहा. कोणताही निर्णय घेताना डोळेझाक करू नका. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल, त्यामधून मानसिक समाधान मिळू शकते. घरात महत्वाचा निर्णय घेताना ज्येष्ठ मंडळींच्या म्हणण्याला महत्त्व द्या. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
मिथुन : नात्यात वितुष्ट निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मध्यस्थी करणे टाळा, गैरसमजातून मन:स्तापाचे प्रसंग ओढवतील. कुटुंबाबरोबर बोलताना भान ठेवा. नोकरीत विनाकारण संघर्ष टाळा. व्यावसायिकांना नव्या संधी मिळतील, निर्णयात घाई नको. युवावर्गाच्या मनासारख्या घटना होतील. उच्चशिक्षणासाठी विदेशातील प्रयत्नांना यश मिळेल. संशोधन, शिक्षण क्षेत्रात यश मिळवून देणारा काळ. क्रीडापटूंचा गौरव होईल. कलाकारांना नव्या संधी मिळतील.
कर्क : नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. व्यावसायिकांनी शब्दाने शब्द वाढवू नये. सामाजिक कार्यात भरपूर वेळ खर्च होईल, काळजी घ्या. सरकारी कामे पूर्ण न झाल्याने चिडचीड होईल. नवीन गुंतवणुकीच्या विचाराला गती मिळेल. कोणताही निर्णय झटपट घ्या. एखादी चूक महागात पडू शकते. आर्थिक आवक चांगली राहील. काहीजणांना विदेशात जाण्याचे योग येतील. कुटुंबात उत्साही वातावरण राहील, पण, वाद टाळा. खाण्याचा अतिरेक करू नका.
सिंह : वेळेचे नियोजन करा. युवावर्गाचा उत्साह वाढवणार्या घटना घडतील. प्रेमप्रकरणात भावना व्यक्त करताना काळजी घ्या. मुलांकडून उल्लेखनीय कामगिरी होईल, त्यामुळे घरातले वातावरण आनंदी राहील. त्यानिमित्ताने छोटेखानी कार्यक्रम होईल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अनपेक्षित बातमी कानावर पडेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायवृद्धीसाठी अधिकचे कष्ट घ्या. सहलीच्या निमित्ताने खवय्येगिरी होईल, त्यामुळे पोटाच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.
कन्या : आर्थिक बाजू भक्कम होईल. थकीत पैसे येतील, खिशात चांगले पैसे राहतील. एखादे काम पूर्ण न झाल्यास नकारात्मक विचार करू नका. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होणे टाळा. विद्यार्थीवर्गाला शैक्षणिक यश मिळेल. महागडी वस्तू काळजीपूर्वक खरेदी करा. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. सरकारी नोकरदारांसाठी चांगला काळ आहे. अनेक दिवसांपासून बदलीसाठी प्रयत्न सुरू असतील तर त्यांना आता यश मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. घरात बंधू-भगिनी यांच्याकडून चांगले सहकार्य मिळेल.
तूळ : नोकरीत वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष महागात पडू शकते. मित्रमंडळींना काळजीपूर्वक आर्थिक मदत करा. व्यावसायिकांच्या नव्या ओळखी होतील, पण व्यवहारात डोळेझाक नको. काहीजणांना थोडी ख़ुशी थोडी गम देणारे अनुभव येतील. एखादे हट्टाने पुरे करण्याचा अट्टाहास सोडा. व्यवसायात प्रगती होईल. धार्मिक पुस्तकाचे वाचन करा. मन शांत ठेवा. घरातील कामासाठी धावपळ करताना आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : नोकरीत लाभदायक काळ. घरात बोलण्यातून गैरसमज व वाद निर्माण होतील. नातेवाईकांकडून भ्रमनिरास होईल. अपेक्षा बाळगू नका. नव्या वास्तूचा विषय मार्गी लागेल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. नवीन कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करताना सावधपणे पुढे जा. विदेशात व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नांना चांगल्या प्रकारे गती मिळेल. सरकारी कामे सहजपणे पूर्ण होतील.
धनु : संमिश्र घटनांचा अनुभव येईल. काम करताना काळजी घ्या, चूक महागात पडेल. तरूणांच्या मनासारख्या घटना घडतील. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. मन:स्वास्थ्य चांगले ठेवा, ध्यानधारणा, योगाला प्राधान्य द्या. व्यावसायिकांना चढउताराचा काळ अनुभवयास मिळेल. त्यामुळे आर्थिक नियोजन योग्य करा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ राहील. व्यवसायात कल्पकतेला वाव मिळेल. विदेशात विस्ताराच्या प्रयत्नांना यश मिळेल. कोणताही मोठा निर्णय घेताना कागदपत्रांची तपासणी कराच. सोशल मीडियावर वावरताना काळजी घ्या.
मकर : नोकरी, व्यवसायात कामाचा आढावा घ्या. त्यातील त्रुटी वेळीच दुरूस्त करा. अचानक धनलाभाचे योग येतील. मौजमजेवर लक्ष देऊ नका. व्यवसायात उत्कर्ष अनुभवायला मिळेल. तरूणांना यशदायक काळ. खेळाडूंसाठी उत्तम काळ. बांधकामक्षेत्रात उत्तम अनुभव येतील. थकीत येणी वसूल होतील. समाजसेवेसाठी वेळ खर्च होईल. घरात ज्येष्ठांची काळजी घ्या. आरोग्याच्या छोट्या तक्रारीकडेही दुर्लक्ष करू नका. दानधर्म कराल. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना काळजी घ्या. पश्चात्ताप करायची वेळ येईल.
कुंभ : हेकेखोर स्वभाव दूर ठेवा, मनासारखी गोष्ट घडली नाही तर त्यात अडकून पडू नका. नोकरी-व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. पत्रकार, कवी, लेखक, खेळाडू, राजकारणी यांना चांगला काळ. एखादी शुभघटना कानावर पडेल. घरातले वातावरण छान राहील. पती-पत्नींनी सामंजस्य दाखवावे. गुंतवणूक काळजीपूर्वक करा, अन्यथा झटपट पैसे मिळवण्याच्या नादात फसगत होईल. धार्मिक कार्याला वेळ द्याल. तरूणांसाठी चांगला काळ. खाण्याचा अतिरेक टाळा.
मीन : कल्पनाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्राध्यापकांना एखादी नवीन संधी मिळू शकते. काहीजणांना मिष्टान्न भोजनाचा योग आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांसाठी उत्तम यश मिळवून देणारा आहे. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल. सामाजिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. मित्रमंडळी नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. चेष्टा, मस्करीचे प्रसंग टाळा.