• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

वेळ चुकली, समन्वय चुकला! संघांना फटका बसला!

- प्रशांत केणी (आप कतार में हैं...)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 8, 2022
in भाष्य
0
वेळ चुकली, समन्वय चुकला! संघांना फटका बसला!

‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद अनपेक्षितपणे कतारला मिळालं, तेव्हापासूनच वादाशी त्याचं सख्य आहे. यजमानपदाचा निर्णय ते प्रत्यक्ष स्पर्धा या दरम्यानच्या १२ वर्षांच्या कालखंडात येनकेन कारणास्तव कतारमधून स्पर्धा हलवण्याचे अनेक प्रयत्न जागतिक स्तरावर झाले. पण ते ‘फिफा’ आणि कतारमधील विश्वचषक संयोजन समितीनं हाणून पाडले. स्पर्धेच्या काळात कतारमधील उष्णतामान या पहिल्या समस्येवर तारखा पुढे ढकलण्याचा पर्याय शोधण्यात आला. पण युरोपातील अनेक महत्त्वाच्या लीगमध्ये येणारा व्यत्यय ही दुसरी समस्या निर्माण झाली. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चालू असलेल्या या स्पर्धेच्या दृष्टीनं नामांकित खेळाडूंना सरावाला वेळ कमी मिळाला. कारण लीग-हंगाम अर्ध्यावर असताना विश्वचषकाच्या तारखा आल्या आहेत. परिणामी राष्ट्रीय संघांकडून खेळताना खेळाडूंचा समन्वय दिसून येत नाही. अनेक सामने बरोबरीत सुटले आहेत, तर बर्‍याच संघांची एखादा गोल करतानाही दमछाक होत आहे.
२०१०मध्ये २०२२च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचे अधिकार कतारनं मिळवले. तेव्हा जून-जुलैमध्येच स्पर्धा होईल, असं अपेक्षित होतं. पण त्यानंतर काही अभ्यासांतर्गत फिफा’च्या शिष्टमंडळाला ते कठीण असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे २०१८मध्ये ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झालं, तर जुलै २०२०मध्ये वेळापत्रक निश्चित करण्यात आलं. कतारमधील उन्हाळ्यातील तापमान हाच चिंतेचा विषय होता. या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांचे खेळाडू आणि प्रेक्षकांच्या दृष्टीनंच गांभीर्यानं विचार करण्यात आला. जून-जुलैमध्ये कतारमध्ये ४१.२ अंश सेल्सियसपर्यंत तापमान उंचावतं. त्यामुळे तेथील परंपरागत कतार स्टार्स लीगसुद्धा सप्टेंबर ते एप्रिल या कालखंडात खेळवली जाते. कतारमधील हिवाळ्यात सरासरी तापमान २१ ते २५ अंश सेल्सियसदरम्यान असतं. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर हे महिने निश्चित झाले, तरीही आशियातील हिवाळा आणि युरोपमधील थंड वातावरण ही तफावत दूर करण्यासाठी आठ स्टेडियमच्या प्रेक्षागृहात वातानुकूलन व्यवस्था करण्यात आली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये स्पर्धा घेण्याच्या निर्णयाचा मोठा फटका हा क्लब सामन्यांना विशेषत: युरोपमधील लीगना बसला आहे. कारण या परंपरागत लीग ऑगस्ट ते मे महिन्यात होत असतात. यापैकी वर्षातील अखेरच्या दोन महिन्यांत बरेचसे देशांतर्गत सामने, चॅम्पियन्स लीगचे गटसाखळी सामने आणि युरोपा लीग होत असते. २१ नोव्हेंबरला सुरुवात झालेली विश्वचषक स्पर्धा १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. याशिवाय विश्वचषकाच्या तयारीसाठी आधीचा एक आठवडा आणि विश्रांतीचा एक आठवडा असे आणखी दोन आठवडे म्हणजेच एकंदर दीड महिन्याचा कालावधी विश्वचषकामुळे खंडित झाला. त्यामुळे २०२२-२३च्या फुटबॉल हंगामाची पुनर्मांडणी करावी लागली. इतकंच नव्हे, तर आगामी २०२३-२४च्या हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
परंतु युरोपियन फुटबॉल महासंघानं चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पुढील वर्षी २७ मे रोजी म्युनिच येथे होणार असल्याचे जाहीर केलं आहे. चालू वर्षात चॅम्पियन्स लीगचा सामना एक दिवस अगोदर सेंट पीटर्सबर्गला झाला. म्हणजेच युरोपियन महासंघानं विश्वचषकामुळे कार्यक्रमपत्रिकेत मोठे बदल केले नसल्याचेच सिद्ध होते.
करोनाच्या आव्हानामुळे विश्वचषकाच्या अनेक खंडीय पात्रता सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करावे लागले होते. यात रशिया-युक्रेन युद्धाचीही भर पडली. करोनाच्या जागतिक साथीमुळे युरो, कोपा आणि ऑलिम्पिक स्पर्धांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे अनेक आघाडीच्या क्लब्जना आर्थिक तोटा सहन करावा लागला. करोना साथीतून सावरल्यानंतर स्थिरस्थावर होत असलेल्या फुटबॉल हंगामाला कतारच्या कार्यक्रमपत्रिकेचं आव्हान स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थात, आर्थिक नुकसान हे क्लब्जनाच झालं आहे.
यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक १३ संघ हे युरोप खंडातील आहेत. याशिवाय दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आप्रिâका आणि आशिया या खंडांमधील अनेक फुटबॉलपटू युरोपातील विविध क्लबशी करारबद्ध आहेत. यंदाच्या फुटबॉल हंगामात विश्वचषकाचे सामने वाढल्यामुळे फुटबॉलपटूंवरील खेळाचा ताण वाढला आहे. व्यावसायिक फुटबॉलपटू राष्ट्रीय संघाकडून खेळण्यापलीकडे नामांकित क्लब्जकडून मोठ्या आर्थिक रकमेसाठी खेळतात. दर्जेदार संघ वर्षाला सरासरी ५५ ते ६० सामने खेळतात. २०१९-२०च्या फुटबॉल हंगामात हॅरी मॅग्वायर हा इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी मिळून ६१ सामन्यांत ५,५०९ मिनिटे मैदानावर खेळला. त्या वर्षी मँचेस्टरनं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मँचेस्टर, बायर्न म्युनिच, चेल्सी, रेयाल माद्रिद, बार्सिलोना यांच्यासारख्या लोकप्रिय संघाचं प्रतिनिधित्व येणार्‍या काही खेळाडूंना वर्षाला एकूण शंभरहून अधिक सामनेही खेळावे लागतात. यात विश्वचषकाच्या सामन्यांची भर आणि हंगामाच्या मध्यावर येणार्‍या तारखा परिणामकारक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे दुखापतींची चिंता अनेक संघांना भेडसावते आहे.
गतविजेता फ्रान्सचा संघ पॉल पोग्बा, एन्गोलो काँटे आणि करिम बेन्झेमा यांच्याशिवाय विश्वचषकात सहभागी झाला आहे, तर स्पर्धेत लुकास हर्नांडीझच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. ब्राझीलचा तारांकित फुटबॉलपटू नेमारच्या पायाच्या घोट्याला सर्बियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात गंभीर दुखापत झाली. त्यामुळे स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकला नाही. या सामन्यात स्वित्झर्लंडनं बलाढ्य ब्राझिलला झुंजवलं. ८३व्या मिनिटाला कॅसेमिरोने नोंदवलेला एकमेव गोल ब्राझिलसाठी निर्णायक ठरला. यापुढेही नेमार खेळेल, याची शाश्वती नाही. माझ्या कारकीर्दीतील हा आव्हानात्मक काळ आहे, असं नेमारनं नमूद केलं आहे. २०१४च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावं लागलं होतं. डॅनिलो आणि अ‍ॅलेक्स सँड्रो या खेळाडूंनाही किरकोळ दुखापती झालेल्या आहेत.
आफ्रिकन नेशन्स कप विजेत्या सेनेगलनं नेदरलँड्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातील पराभवानंतर कतार आणि इक्वेडोर या दुबळ्या संघांना हरवून उपउपांत्यपूर्व फेरी गाठली असली तरी त्यांना सॅदिओ मानेची उणीव तीव्रतेनं भेडसावते आहे. विश्वचषकाच्या एक आठवडा अगोदर मानेला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. नेदरलँड्सचा मेम्फिस डेपे कतारविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात प्रारंभीपासून मैदानावर होता. मात्र मांडीच्या दुखापतीतून सावरलेला डेपे पहिल्या दोन साखळी सामन्यांत बदली खेळाडू म्हणूनच मैदानावर उतरला होता. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन आणि मग्वायर यांनी साखळी टप्प्यात आजारपणावर मात केली. त्यांचा बचावपटू कायल वॉकर (मँचेस्टर सिटी) शस्त्रक्रियेतून सावरत अखेरच्या साखळी सामन्यात वेल्सविरुद्ध मैदानावर अवतरला. स्पर्धेच्या दोन आठवडे आधी अमेरिकेचा बचावपटू ख्रिस रिचर्ड्सला पायाच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. अर्जेंटिनाला निकोलस गोन्झालीज आणि जॉर्ज कोरीआ या दोघांना दुखापतीमुळे मुकावं लागलं. मेक्सिकोचा कर्णधार आंद्रेस गार्डेडोच्या मांडीचा स्नायू दुखावला आहे. माजी विश्वविजेता कर्णधार लोथार मथायसनं थॉमस म्युलरच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याचप्रमाणे पराभव टाळण्यासाठी म्युलरला वगळावं, असा इशाराही मथायसनं दिला आहे. जपानविरुद्धच्या सामन्याच्या दुसर्‍या सत्राच्या मध्यावर म्युलरला बदली करण्यात आलं, तर स्पेनविरुद्ध तो ७० मिनिटंच मैदानावर होता. स्पेनचा जोस गाया विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वसंध्येला दुखापतग्रस्त झाला. दुखापतीतून सावरलेला बेल्जियमचा हुकमी खेळाडू रोमेलू लुकाकू मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरला.
उरुग्वेचा रोनाल्ड अराऊजो प्रशिक्षकांशी मतभेदामुळे पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकला नाही. पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या खात्यावरील एकमेव गोलसुद्धा पेनल्टीद्वारे साकारलेला आहे. संघसमन्वयाचा अभाव रोनाल्डो आणि उर्वरित पोर्तुगाल यांच्या खेळात प्रकर्षानं जाणवतो. स्नायू दुखावल्यानं न्युनो मेंडिस पोर्तुगालच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला आहे.
तूर्तास, विश्वचषकाचा गटसाखळीचा टप्पा संपला आहे. म्हणजेच बाद फेरीत संघांची संख्या निम्म्यावर आली आहे आणि विश्वचषकाचा थरार द्विगुणित झाला आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमधील या स्पर्धेचे काही परिणाम हे दिसून आले आहेत, परंतु आगामी स्पर्धेत आणि त्यानंतरही त्याचे परिणाम जाणवतील, याबाबत शंका नाही.

Previous Post

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

भाष्य

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023
भाष्य

कर्जबुडव्यांचे काय करायचे?

December 7, 2023
भाष्य

५०० डॉलरचे शूज!

December 7, 2023
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

October 6, 2023
Next Post

टपल्या आणि टिचक्या

केळीचे सुकले बाग...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023

कर्जबुडव्यांचे काय करायचे?

December 7, 2023

नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

December 7, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.