• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

फ्रिज, फ्रिजर आणि मिक्सरचे ताप!

- शुभा प्रभू साटम (डोक्याला शॉट)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 9, 2023
in भाष्य
0

गोदरेजचे पांढरे फ्रिज आठवताहेत? १९७५/८०मधे मिळणारे? तो फ्रिज बुक करून नंबर लावावा लागत असे. साधारण १५ दिवस उत्कंठेने वाट बघून ‘जीव शिणला’ असे झाल्यावर तो फ्रिज यायचा. आणणार्‍या लोकांना भक्कम टिप द्यावी लागायची. मग इलेक्ट्रिशियन शोधून नवा बोर्ड, बटण लावणे व्हायचे. मग तो फ्रिज एकदाचा सुरू व्हायचा. हॉलमध्ये त्याची प्रतिष्ठापना व्हायची. हॉलमध्ये फ्रिज ठेवला हे सांगितल्यावर यीएएक म्हणून नाकं मुरडलीत तर आठवण करून देते की मुंबईतल्या नाकपुडीइतकेच स्वयंपाकघर असणार्‍या जागेत फ्रिज ठेवला की त्यावर चढून स्वयंपाक करावा लागायचा. हसतात लेकाचे!!
तर मुद्दा असा की तेव्हाचा तो फ्रिज आणि आजचे फ्रिज यांच्या अंतर्गत रचनेत काहीही फरक पडलेला नाही. एक दरवाजा असायचा तिथे दोन तीन, किंवा डबल दरवाजा आला पणं आजही भारतीय स्वयंपाकघरात सोयीचा पडेल असा फ्रिज आलेला नाही. उदाहरण देते. फ्रिजर आपण सगळ्यात कमी वापरतो बरोबर? पण तो सर्वात वर आणि सतत हाताशी लागणारी भाजी बीजी असणारा कप्पा सर्वात तळाला.
आजही आपल्याकडे मागणी तसा पुरवठा असे खाणे पिणे होते. सकाळी पोहे, दुपारी चटणी (यावरून मिक्सरबद्दल काहीतरी आठवलं… पुढे सांगते), कोशिंबीर, भाजी बीजी असा स्वयंपाक. आणि त्यात बदल पण होतो. आणि तितक्या वेळेला भाजीचा कप्पा उघडला जातो. आता इथे बायकांना व्यायाम होतो, असले सनातन काही सांगितलेत तर मग, तुम्ही ऑफिसला चालत जा, सोसायटीच्या बागेत नांगर चालवा, तुम्हाला पण व्यायाम होईल, हे ऐकावे लागेल माझ्याकडून… सांगायचा मुद्दा काय की फ्रिजमधून भाज्या काढण्यासाठी सारखे वाकून वाकून वैताग येतो.
आता हा कप्पा सर्वात वर ठेवला तर कोणाचे घोडे मरेल?
पण आपल्याकडे ग्राहकोपयोगी उपकरणे ती अतिशय कमी वापरणार्‍या लोकांना समोर ठेवून निर्माण होतात, असं मला तरी वाटतं… तुम्ही कोणत्याही अस्सल भारतीय बाईला विचारा की तुमचे काय मत?
हे झाले फ्रिजरचे. मग फ्रिजच्या दरवाजाचे कप्पे. नाजूक साजूक बाटल्या आपण रोज वापरतो का? खोटे बोलू नका. तुमची नेहमीची बाटली त्यात ठेवून बघा, बसते का? अथवा ती पेप्सी, कोलाचा अगडबंब बाटला येतो तो ठेवा, कप्पा मोडेल. आपला स्टीलचा कावळा जार इथे बसतच नाही.
तेच अन्य कप्प्याबद्दल. सर्वसामान्य भारतीय घरात स्वयंपाक दणदणीत होतो. मोठे टोप असतात, भांडी पण असतात, ती या कप्प्यात मावत नाहीत.
फ्रिजरखाली एक बंद-उघड करणारा कप्पा असतो. त्यात काय ठेवायचे हे मला आजही उमगले नाही, पुन्हा त्याला झाकण असते आणि ते बंद न करता फ्रिजचा दरवाजा बंद केला तर कडकड असा भीषण आवाज होऊन झाकण आहुती देते. आता हा असा अडचणीचा ढकलकप्पा देण्याऐवजी साधा सरळ कप्पा द्यायला काय झाले होते? बहुतेक घरांत अशा कप्प्याचे झाकण तुटलेले दिसेल. माझे घर पण त्यातलेच.
दुधाचा मोठा टोप, तुपाचे डबे, सायीचे भांडे अशा फ्रिजमध्ये एकत्र सुखनैव नांदू शकत नाहीत. मग त्यांना फोडा आणि वापरा (डिव्हाइड अ‍ॅण्ड रूल) करत सामावून घ्यावे लागते. याला श्रीमंती दु:ख म्हणू नका, कारण आज फ्रिज ही सगळ्या आर्थिक वर्गांमध्ये नितांत गरजेची गोष्ट झालेली आहे, प्रत्येकाच्या घरात तोअसतोच. कोणाच्या घरी दीडशे लिटरचा असतो, कोणाच्या घरी पाच हजार लिटरचा असतो, एवढाच काय तो फरक.
परदेशात गेले की तिथल्या दुकानांत अगडबंब फ्रिज नीट बघणे हे माझे स्थळदर्शन असते. अर्थात ते आपल्याला कधीच परवडणार नाहीत म्हणा. पण खूप वेगळी अंतर्गत रचना असते आणि वापरायला सोप्पी अशी.
हे फ्रिजचे. मिक्सरची वेगळी दु:खे. चटणी वाटायचे भांडे असते, त्यात चटणी सोडून सर्व वाटले जाते. चटणी आपल्याकडे छोट्या चमच्याच्या मापाने खातात. या मिक्सरमध्ये त्या बेताने ओले खोबरे घालून बघा, फक्त मिक्सर फिरतो म्हणजे त्याची पाती, खोबरे ‘आम्ही नई ज्जा’ करत भांड्याच्या कडेला बिलगून बसते, मग त्यात खोबरे वाढवून ढीगभर चटणी वाटावी लागते, जी उरते आणि मग फेकावी लागते. माझे टिपिकल मध्यमवर्गीय मन अशावेळी हळहळते. एकवेळ भात भाजी आमटी उरली तर खाता येते, पण चटणी नाही. पण तुम्हाला यावर काही उपाय माहित असेल तर प्लीज सांगा.
दुसरं म्हणजे भारतीय मिक्सरमध्ये वाटण्याचे प्रमाण खूप आणि घटक पण कठीण. सूपसाठीचे टोमॅटो इथे कमी वाटले जातात. डोसा, इडली, खोबरे, शेंगदाणे असले खमके पदार्थ वाटणार्‍या घरात ब्लेड लवकर बोथट होते आणि आत्ताचे एकूण वातावरण, वापरा आणि फेका मनोवृत्तीचे असल्याने नवे भांडे घेणे भाग पडते. काय यातना होतात ते आम्हीच जाणू राव. कारण फाटक्या चपलेला, छत्रीला दुरुस्त करून वापरत आम्ही वाढलो, म्हातारे झालो. असले काही पचत नाही.
आता माणूस म्हटले की आजारपण, बारीक सारीक तक्रारी असणारच आणि ज्येष्ठ नागरिकांना तर अधिक. जितके वय आणि व्याधी तितक्या गोळ्या अधिक. आता आपल्याकडे ज्या गोळ्या मिळतात त्या बघितल्यावर कळते की युजर अनफ्रेंडली म्हणजे काय? त्या गोळ्या त्यांच्या पॅकमधून काढताना हाताला जखमा होतात. पुन्हा त्यावरील नावे इतक्या बारीक टायपात असतात की भिंग घेऊन बसावे लागते.
वृद्ध आणि इंग्रजी न वाचता येणार्‍या लोकांनी काय करावे बरे? इतकी संशोधने होतात, पण या गोळ्या कॅप्सूलचे पॅक आजही बदलले नाहीत. सर्व लोकांकडे मदत असते असे नाही. बाहेर देशात प्लास्टिक बाटल्या मिळतात. त्यावर औषध प्लस त्या रुग्णाचे नाव आणि डोस स्वच्छ लिहिलेलं असते. वापरायला सोप्पे. एक वेळ हे पॅक परडवले पण ते ब्लिस्टर पॅक नकोत. फोड आल्यागत पॅक असतो. आणि तो नीट उघडला नाही तर बोटे कापली गेलीच म्हणून समजा.
शाम्पूचे एक वेळ वापरायचे पाकीट तुम्ही एका फटक्यात खोलू शकलात तर तुम्हाला दंडवत. मला तर ते उघडत नाही, मग दातात धरून फाडावे लागते आणि केसाला लावायचा शाम्पू तोंडात जाऊन शब्दश: तोंडाला फेस येतो. क्रीम बिम असणार्‍या बाटल्यांचे ओपन क्लोज दांडके कोणत्या नेमक्या जागी उघडते आणि बंद होते हे पहिल्या फटक्यात कळणार्‍या माणसाला ५१ तोफांची सलामी.
आणि आता बिलकुल म्हणू नका की ह्याऽत काय? वर इतकी उदाहरणे दिलीत, त्यातील एक जरी तुम्हाला लागू पडत असेल तरी तुम्ही आमच्या माठ वर्गात आहात. उगा शिष्ट होऊ नका राव. त्याचा पण शॉट होतो. डोक्याला शॉट होतो भावा!!!

Previous Post

सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

Next Post

गेम खेळताना भलताच गेम झाला…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
भाष्य

देवांचा सोनार, नाना सोनार…

September 22, 2023
भाष्य

स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

September 22, 2023
भाष्य

अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

September 22, 2023
Next Post

गेम खेळताना भलताच गेम झाला...

राशीभविष्य

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.