• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

काही लाज?

- मुकुंद परदेशी (ललित)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 9, 2023
in भाष्य
0

`काही लाज?’ वास्तविक फक्त दोनच शब्दांचा प्रश्न, पण किती जळजळीत!
हा प्रश्न कोणालाही पहिल्यांदा विचारला जातो, तेव्हा तो फारच झोंबतो, मग मात्र हळूहळू तो तितकासा झोंबत नाही. एकतर अतिवापरामुळे तो प्रश्न तरी गुळगुळीत होत जातो, एखाद्या चलनी नाण्यासारखा; नाहीतर तो माणूस तरी कोडगा होत जातो, एखाद्या राजकारण्यासारखा. आमची आणि या प्रश्नाची तर बालपणापासूनच वारंवार गाठ पडत आली आहे, जणू काही आमचं आणि त्याचं जन्मोजन्मीचं नातं असावं, एखाद्या प्रियकर-प्रेयसीसारखं. (आयला, नवरा-बायकोसारखं असं का नाही सुचलं?) त्याला करमतच नाही आमच्याशिवाय. आणि आयुष्याच्या शेवटल्या दिवसापर्यंत तो (बायकोसारखा) आमचा पिच्छा सोडेल असं काही वाटत नाही. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ हेच खरं. (आता ‘जित्याची’ म्हणजे कोणाची, आमची की त्या प्रश्नाची हे कोण ठरवणार?)
सर्वात आधी, आमच्या बालमनावर काय परिणाम होईल याचा काहीएक विचार न करता हा प्रश्न विचारून आमच्या बालमनावर आघात केला तो आमच्या कुळकर्णी बाईंनी. त्याचं असं झालं की, वयाच्या अवघ्या चवदाव्या वर्षी, आम्ही पाचवीच्या वर्गात लागोपाठ तिसर्‍या वर्षी शिकत असताना, एके दिवशी वर्गात आमच्या डोळ्यात कचरा जाण्याचा आणि शेजारच्या बाकावरच्या सुनीताने आमच्याकडे पाहण्याचा एकच घात झाला आणि नेमका आमचाही घात तिथेच झाला. कचरा गेल्यामुळे आमचा एक डोळा थोडा लवला आणि त्या बिनडोक सुनीताने जागेवरूनच आमच्याकडे बोट दाखवत, ‘बाई याने मला डोळा मारला’ असं ओरडत कुलकर्णी बाईंकडे आमची तक्रार केली. झालं. कुलकर्णी बाईंनी आमच्याजवळ येत आमच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ‘काही लाज?’ असा त्या कटाक्षाहूनही जास्त जळजळीत प्रश्न विचारत आमचा शेंदूर फासलेला बजरंग बनवून टाकला! आता मला सांगा, माणसाच्या स्नायूंच्या काही हालचाली या ऐच्छिक असतात तर काही अनैच्छिक असतात. स्नायूंच्या अशा अनैच्छिक हालचालींसाठी कोणाला जबाबदार धरू नये, त्यासाठी त्याला शिक्षा करू नये, इतकं साधं सामान्यज्ञान नसलेल्या कुळकर्णी बाईंना शिक्षिका कोणी केलं असावं? असू देत.
बरं, तरुणपणी तरी या प्रश्नाने आमचा पिच्छा सोडावा की नाही? नावच नको. त्याचं असं होत असे की, आम्ही आमच्या एखाद्या कॉलेजच्या मैत्रिणीला, वर्गमैत्रिणीला नाहीतर सोसायटीतल्या मैत्रिणीला, ‘आज कॉलेजला दांडी मारून आपण सिनेमाला जाऊ या का?’ संध्याकाळी गार्डनमध्ये येशील का?’ त्या गुलाबी ड्रेसमध्ये तू फारच छान दिसतेस. उद्या कॉलेजला घालून येशील का?’ असले साधे साधे, निरागस आणि निरुपद्रवी प्रश्न विचारत असू. बरं, जमत असेल तर हो म्हणावं, नसेल जमत तर नाही म्हणावं. कोणत्याही साध्या प्रश्नाचं उत्तर हे साध्या वाक्यानेच द्यायचं असतं. प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने द्यायचं नसतं. समोरच्याने आपल्याला एखादा प्रश्न हळू आवाजात विचारला असेल तर आपण त्याचं उत्तर तितक्याच हळू आवाजात द्यायचं असतं, त्यासाठी कुत्रं चावल्यासारखं ओरडण्याची गरज नसते, ते असंस्कृतपणाचं मानलं जातं, इतकी सुद्धा अक्कल त्या सुशिक्षित मुलींना नसावी? उत्तरादाखल प्रत्येकीनेच आम्हाला, ‘काही लाज?’ हा प्रश्न इतक्या तारस्वरात विचारला की लवकरच आम्ही गावात फेमस झालो. ‘बदनाम हुए तो क्या हुवा? नाम तो हुवा!’ हेही असू देत. बरं, लग्नानंतर प्रौढपणी (म्हणजे बायकोने आमचं पाणी जोखल्यानंतर) तरी या प्रश्नाची आणि आमची गाठभेट टळावी की नाही? नावच नका काढू! आता आम्ही ग्यालरीत उभे असतानाच समोरच्या ग्यालरीत रमा वहिनी आल्या. आम्ही आपली बायको यांच्यापेक्षा किती सुंदर आहे याची तुलना करण्यासाठी थोडा वेळ त्यांच्याकडे निरखून पाहत असताना बायको मागे येऊन केव्हा उभी राहिली ते कळलंच नाही. ते तेव्हाच कळलं जेव्हा कानात, ‘काही लाज?’ हा चिरपरिचित प्रश्न समोरच्या ग्यालरीत उभ्या असलेल्या रमा वहिनींनाही ऐकायला जाईल इतक्या मोठ्या आवाजात आमच्या कानात शिरला!
हळूहळू प्रसंग बदलत गेले, पण प्रश्न तोच राहिला. मागे एकदा आम्ही (आमच्याच) बायकोला, ‘अण्णा कधी डोक्यावर पडले होते का गं?’ असा प्रश्न अगदी प्रेमाने, सासर्‍याबद्दल वाटणार्‍या चिंतेपोटी आपुलकीने विचारला. आता आपला नवरा आपल्या वडिलांबद्दल इतक्या आपुलकीने विचारपूस करतोय म्हटल्यावर बायकोने, ‘काही लाज?’ हा प्रश्न का विचारावा हे आम्हाला अद्यापही समजलेलं नाही. जाऊ द्या. आता आपलं प्रारब्ध म्हणून आम्ही त्या प्रश्नाला स्वीकारलं आहे. आता हेही असूच देत.
जाता जाता- मागे पुण्याच्या एका खासदारांनी (आता ते दिवंगत झाल्यामुळे त्यांचं नाव घेणं योग्य नाही. कोणी कितीही सोडली असली तरी आपण मात्र जनाचीही आणि मनाचीही बाळगतो.) भर मंचावर शेजारी उभ्या असलेल्या पुरंध्रीच्या पार्श्वभागावर चिमटा काढला. सीसीटीव्हीच्या कॅमेर्‍याने तो क्षण टिपला आणि तो व्हायरल झाल्यावर एकच हलकल्लोळ माजला. शेवटी त्या पुरंध्रीने, ‘ते माझ्या काकांसारखे आहेत.’ असा खुलासा केला आणि प्रकरण मिटले. ती पुरंध्रीसुद्धा भर मंचावर त्या खासदारांना ‘काही लाज?’ असा प्रश्न विचारू शकली असती, पण ती समजूतदार असावी, सुसंस्कृत असावी. आमच्या मैत्रिणींसारखी नसावी, आमच्या बायकोसारखी नसावी. शेवटी काही गोष्टी नशीबातच असाव्या लागतात, नाही का?
परत एकदा जाता जाता- बायकोने हा लेख वाचला तर ती परत विचारेल, ‘काही लाज?’

Previous Post

मिनी हिंदुस्थान मॉरिशस

Next Post

बापलेकाची अनोखी कथा

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
भाष्य

देवांचा सोनार, नाना सोनार…

September 22, 2023
भाष्य

स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

September 22, 2023
भाष्य

अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

September 22, 2023
Next Post

बापलेकाची अनोखी कथा

टेरीटेरी वाघाची की माणसाची?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.