ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ, बुध सिंह राशीत, रवि, शुक्र, कर्क राशीत, मंगळ बुध सिंहेत, प्लुटो मकर राशीमध्ये, केतू तूळ राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीमध्ये. विशेष दिवस : १० सप्टेंबर अजा एकादशी, १३ सप्टेंबर अमावस्या (आरंभ उत्तररात्री ४. ४८ वाजता, १४ सप्टेंबर दर्श पिठोरी अमावस्या आणि पोळा.
मेष : विद्यार्थ्यांनी शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करावे. स्पर्धेत अपयश आले तरी खचून न जाता अधिक वेगाने कामाला लागा. यश नक्की मिळेल. मोठा भाऊ, बहीण यांच्याबरोबर मतभेद घडतील. कुटुंबस्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्या. नोकरी-व्यवसायात सकारात्मक विचार करा. घरात शुभवार्ता कानावर पडतील. पेढे वाटून आनंद साजरा कराल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. तरुणांचा भाग्योदय होईल. कलाकार, लेखक, पत्रकारांसाठी चांगला काळ. काहीजण दानधर्मास प्राधान्य देतील.
वृषभ : जुने आजार डोके वर काढून त्रास देऊ शकतात. जपून राहा. नोकरीत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी चालून येईल. चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार यांच्या कलेचा सन्मान होईल. व्यवसायात कामाचा ताण वाढून चिडचिड होईल. खर्च वाढतील. काहीजणांना अचानक धनलाभ होईल. मौजमजेपासून दूर राहा, प्रकृती सांभाळा. सासू-सुनांमध्ये भांड्याला भांडे लागू शकते. प्रयत्नपूर्वक आपले मन आनंदी ठेवा.
मिथुन : नवी संधी शोधणार्यांना काळ उत्तम आहे. नोकरी-व्यवसायात अधिकची मेहनत घ्या. त्यामुळे वेळापत्रक बिघडेल. व्यवसायात मोठे लाभ मिळतील. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. स्पर्धेत घवघवीत यश मिळू शकते. सरकारी कामे विनाविलंब मार्गी लागतील. कुणालाही सल्ले देण्याचा भानगडीत पडू नका. त्यातून फक्त मन:स्ताप होईल. शेअर ब्रोकर, रियल इस्टेट व्यवसायात आमदनी वाढेल.
कर्क : अनेक दिवसांपासून प्रलंबित आर्थिक व्यवहार मार्गी लागेल. कलेच्या क्षेत्रात उत्कर्ष होईल. नोकरीच्या ठिकाणी ‘डोक्यावर बर्फ’ ठेवावा लागेल. तरुणांकडून मौजमजेवर पैसे खर्च होतील. व्यवसायात विश्वास ठेवून व्यवहार करू नये. खेळाडूंना चांगला काळ. स्पर्धेत यश मिळेल. सोशल मीडियातून फसवणूक घडू शकते, काळजी घ्या. संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी होईल.
सिंह : या आठवड्यात कोणत्याही कारणाने चिडू नका. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे चला. नोकरीत चिडचिड होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर होतील. बुद्धिकौशल्याबरोबर मानसिक बळ वाढवा. योगा, ध्यान यासाठी वेळ द्या. नव्या नोकरीचे काम झटपट होऊ शकते. सणासुदीच्या दिवसांत नातेवाईकांसाठी भरपूर वेळ खर्च कराल. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. व्यावसायिकांच्या विदेशात विस्तार करण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. पत्नीबरोबर जुळवून घ्यावे लागेल.
कन्या : मित्र, नातेवाईक यांना कोणतेही आश्वासन देऊ नका. नवीन ओळख झालेल्या व्यक्तींवर विश्वास टाकून आर्थिक व्यवहार नकोच. कलाकारांच्या मनासारखी घटना घडेल. व्यावसायिकांची कामे रेंगाळतील. नोकरदारांना संयमाने राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी व्यक्त होणे टाळा. मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी स्थिती निर्माण होईल. जपून राहा. तरुणांच्या बाबतीत मनासारख्या घटना घडतील. महिलांच्या बाबतीत उत्साह वाढवणार्या घटना घडतील.
तूळ : मनासारखी कामे होणार नाहीत, पण त्याचा फारसा विचार करू नका. गुरुकृपेमुळे वादळे थंड होतील. आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा कंटाळा केल्याने थोडे बहुत नुकसान सहन करावे लागेल. व्यावसायिकांनी नव्या संकल्पनांना आकार देताना विचार करूनच निर्णय घ्यावा. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी कानावर पडेल. संशोधक, प्राध्यापकांसाठी सर्वोत्तम काळ. सामाजिक क्षेत्रात सत्कार होईल. नोकरीत वरिष्ठांचे गैरसमज होऊन देऊ नका.
वृश्चिक : रेंगाळलेले प्रमोशन तुम्हाला मिळू शकते. व्यावसायिकांना सुखद घटनांचा अनुभव येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नव्या नियोजनासाठी चांगला काळ आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. सरकारी नियमांकडे दुर्लक्ष महागात पडेल. सामाजिक जीवनात अहंकार दाखवू नका. देवदर्शनासाठी जाल. सढळ हाताने दानधर्म कराल. इंजीनिअरिंगमध्ये नव्या संधी येतील. चांगले अर्थार्जन होईल. कमी बोला, काम करा.
धनु : सहनशक्ती वाढवणारे प्रसंग घडतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. नोकरीत प्रगतीचा आलेख उंचावेल. विदेशात जाणे लांबणीवर पडत असेल, तर तो प्रश्न मार्गी लागेल. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळतील. मालमत्तेच्या संदर्भात आपलेच म्हणणे रेटू नका, कौटुंबिक वातावरण बिघडेल. लेखक, संगीतकारांना मान सन्मान मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. पोटविकार टाळण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
मकर : नोकरी-व्यवसायात लहान वाटणार्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तो विषय तातडीने मार्गी लावा. सौंदर्य प्रसाधने, सजावटकार यांची आर्थिक चलती करून देणारा काळ आहे. आयटी क्षेत्रात उलाढाल वाढेल. पण, उधळपट्टी टाळा. घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. नोकरीत कामाच्या निमित्ताने अचानक बाहेरगावी जाल. घरासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागेल.
कुंभ : दिशाभूल करून काम पुढे नेण्याचा प्रयत्न अडचणीचा ठरेल. व्यवसायात चांगली फळे मिळतील. मुलांच्या उच्चशिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. संयम ठेवा. सगळे ठीक होईल. रस्त्यावरुन जाताना अरेरावी करू नका, पोलीस चौकीची पायरी चढावी लागेल. सहलीनिमित्ताने बाहेरगावी जाणे होईल, पण कोणतेही साहस करू नका. आपल्या छंदासाठी भरपूर वेळ खर्च कराल, त्यातून मानसिक आनंद मिळेल. सरकारी कामे पूर्ण करताना घाई करू नका.
मीन : यशासाठी भरपूर कष्ट करावे लागतील. त्यामुळे थोड्या प्रयत्नांत खचून जाऊ नका. घरात मंगलकार्य होईल. जुने मित्र भेटतील. विजेच्या उपकरणांपासून लांब राहा. नाटककार, अभिनेते यांच्यासाठी उत्तम काळ. घरातील वायफळ खर्च टाळण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिकांना दगदगीचा काळ. मानसिक शांती टिकवून ठेवण्यावर लक्ष द्या. मुलांसोबत अधिकच वेळ व्यतीत कराल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, त्यामुळे तुमच्या मनातली सकारात्मक ऊर्जा वाढेल.