• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

- योगेंद्र ठाकूर

Nitin Phanse by Nitin Phanse
July 7, 2022
in विशेष लेख
0
शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

ठाण्यातील पहिल्या बंडखोरीनंतर मधली काही वर्षे सोडली तर शिवसेना गेली ४० वर्षे सत्तेवर आहे. २००५/६ साली नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर २००७ साली झालेल्या मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवीत भगवा फडकवला. जेव्हा जेव्हा शिवसेनेत बंड करून फूट पाडली गेली त्यानंतर तावून-सुलाखून शिवसेना बाहेर आली आणि अधिक भक्कम झाली. शिवसेना हा न वठणारा वटवृक्ष आहे हे बंडखोरांनी ध्यानात असू द्यावे.
– – –

शिवसेनेच्या विरोधात बंड करून अनेक आमदार, खासदार आदी पदाधिकारी शिवसेनेला सोडून गेले. त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके नंतरच्या निवडणुकीत निवडून आले. जनतेने त्यांना पराभवाची धूळ चाखवली. त्यांचे सामाजिक, राजकीय अस्तित्व संपुष्टात आले. शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी हा गद्दारांचा इतिहास आहे.
ठाण्याचे शिवसेना आमदार व मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेच्या ३९ आमदारांना गुवाहाटी येथे नेले. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. आता शिंदे त्यांच्या पाठिशी असलेल्या महाशक्तीच्या कृपेने (किती काळासाठी कोण जाणे) मुख्यमंत्रीही बनले आहेत. ही एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती आहे. पुन्हा एकदा ठाण्यातून शिवसेनेच्या बंडाला रसद मिळाली आहे. १९७०च्या दशकात शिवसेनेत सर्वप्रथम बंड मारोतराव शिंदेच्या रुपाने झाले ते ठाण्यातूनच आणि आजही एकनाथ शिदेंच्या रुपाने बंडाचा केंद्रबिंदू हा ठाणे आहे.
शिवसेनेने सर्वप्रथम भगवा झेंडा फडकवला तो ठाणे नगरपरिषदेवर! १९६७ साली झालेल्या या निवडणुकीत ४० जागांपैकी १५ जागांवर शिवसेनेचे तर शिवसेना पुरस्कृत ६ नगरसेवक निवडून आले. शिवसेनेचे वसंतराव मराठे हे नगराध्यक्षपदी निवडून आले. सत्ताधारी नगरसेवकांपैकी मारोतराव शिंदे हे एक होते. त्यावेळी राज्य सरकारकडून सूर्यवंशी हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सत्ताधार्‍यांना कामकाजात सहकार्य करीत नव्हते. तेव्हा शिवसेनेने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याचे ठरविले. त्यावेळी मारोतराव शिंदे यांनी विरोध केला. त्यांनी उघडपणे शिवसेनेला आव्हान देत `जय महाराष्ट्र’ केले आणि ठाण्यात सत्तांतर झाले. मारोतरावांच्या बंडामुळे शिवसेनेला सत्ता गमवावी लागली आणि विरोधी पक्षाच्या सहकार्याने मारोतराव ठाण्याचे नगराध्यक्ष झाले. बंडखोरीचा पहिला झटका शिवसेनेला ठाण्यातूनच मिळाला.
पण नंतर १९७४ साली झालेल्या ठाण्याच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने याचे उट्टे काढले. त्यावेळी प्रथमच नगराध्यक्षाची निवडणूक थेट सामान्य मतदारांकडून झाली होती. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे सतीश प्रधान, जनसंघातर्फे ना. गो. कोळी तर काँग्रेसतर्फे तत्कालीन नगराध्यक्ष मारोतराव शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे सतीश प्रधान यांना १९,१०९ मते मिळाली, जनसंघाचे ना.गो.कोळी यांना ७,३४३ मते तर काँग्रेसचे मारोतराव शिंदे यांना फक्त ६,९०४ मते मिळाली होती. सेनेचे सतीश प्रधान हे थेट निवडणुकीत ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले. मारोतराव शिंदे यांचा दारुण पराभव झाला. त्यावेळी `मार्मिक’ने `सतीश प्रधान यांचा दणदणीत विजय! सूर्याजी पिसाळ भुईसपाट’ अशी बातमी दिली होती. शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर जनता गद्दारांना राजकारणातून हद्दपार करते हे शिवसेनेच्या इतिहासातील पहिले मोठे उदाहरण होय.
२६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला. शिवसेनेतील काही पदाधिकार्‍यांना हा निर्णय आवडला नाही. तेव्हाही काही जण शिवसेना सोडून गेले. लालबागचे बंडू शिंगरे यांनी शिवसेनेला आव्हान देत `प्रति-शिवसेना’ काढली. पक्ष कार्यालयही उघडले, स्वत:ला शिवसेनाप्रमुख म्हणू लागला आणि शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु बंडू शिंगरे यांच्या `प्रति-शिवसेने’ला अल्प प्रतिसाद मिळाला आणि अल्पावधीतच बंडखोर बंडू शिंगरे राजकीय पटलावरून दिसेनासे झाले. राजकारणातून हद्दपार झाले.
त्याच दरम्यान जनता पक्षाला पाठिंबा दिला नाही म्हणून पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक काका वडके, गजानन दानवे आणि सुभाष सर्वगौड यांनी शिवसेनेच्या विरोधात जाऊन जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार मोहन धारिया यांना पाठिंबा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे येथील सभेत `निवडणुकीची लाट येईल आणि जाईल’ पण त्यात वाहून न जाता शिवसेना अभंग ठेवा, असे आवाहन केले. परंतु या बंडखोरांनी मानले नाही. ज्यांनी बंड केले ते नंतर राजकीय वनवासात गेले. काका वडके हे १९८३ साली पुन्हा शिवसेनेत आले.
शिवसेनाप्रमुखांनी १९७७च्या महापौर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मुरली देवरा यांना अचानक पाठिंबा दिल्यामुळे डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनी शिवसेना सोडली. जनता पक्षाला पाठिंबा देण्यासाठी डॉ.गुप्ते यांच्याबरोबर शिवसेना संघटक दत्ता प्रधान, अ‍ॅड. अरुण दाभोळकर आदींनी शिवसेना सोडली. त्याचवेळी मुंबई, पुणे, डोंबिवली आणि सावंतवाडीच्या शिवसेनेतही फूट पडली. जे फुटले त्यापैकी डॉ. हेमचंद्र गुप्ते हे जनता पक्षाच्या तिकिटावर एकदाच आमदार झाले. बाकीच्या सगळ्यांना राजकीय विजनवासात जावे लागले.
शिवसेनेला हादरा देणारे छगन भुजबळ यांचे १९९०च्या दशकातील बंड गाजले. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते. काँग्रेसचे सरकार होते. विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे प्रि. मनोहर जोशी यांची नेमणूक शिवसेनाप्रमुखांनी केली. तेव्हा छगन भुजबळ लोकप्रिय नेते होते. त्यांना विरोधी पक्षनेतेपद हवे होते. शिवसेनाप्रमुखांनी भुजबळांना पुन्हा मुंबईचे महापौरपदी बसवून शांत केले, पण ही शांतता तात्पुरती ठरली. नाराज भुजबळांनी १९९१च्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात बंड पुकारले आणि १८ बंडखोर शिवसेना आमदारांचा वेगळा गट स्थापन केला. छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री तर त्यांच्याबरोबर गेलेले डॉ. राजेंद्र गोडे यांना राज्यमंत्री केले. भुजबळांचे बंड गाजले, ते हिरो झाले, परंतु १९९५च्या विधानसभा निवडणुकीत माझगावमधून सामान्य शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी त्यांचा पराभव केला. बंडखोरांपैकी इतर कुणीही निवडून आले नाहीत. छगन भुजबळ राजकारणात टिकून राहिले. त्यांच्याबरोबर गेलेल्या १५-१६ आमदारांची राजकीय कारकीर्द कायमची संपली. निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि मतदारांनी या गद्दारांना धडा शिकविला.
नवी मुंबईतील शिवसेना नेते गणेश नाईक यांनी शिवसेनेला आव्हान देत एक स्वतंत्र संघटना काढली. परंतु १९९९च्या विधानसभेच्या निवडणुकीत सीताराम भोईर या सामान्य शिवसैनिकाने गणेश नाईकांचा पराभव केला. त्यांच्या बालेकिल्ल्यातच पराभवाची नामुष्की नाईकांवर ओढवली. मराठवाड्यातील निवडून आलेल्या मोरेश्वर सावे यांच्यासह तीन खासदारांनी बंड केले. त्यानंतर राजकीय पटलावर त्याचा अस्त झाला.
जुलै २००५मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केले. सुरुवातीस आपल्याबरोबर २५ आमदार असल्याचे सांगणार्‍या नारायण राणेंबरोबर फक्त १० आमदार फुटले. नारायण राणे यांच्या बंडाला शिवसेनेतून मोठी साथ मिळेल अशी आशा त्यांना होती पण ती फोल ठरली. त्यामुळे राणे यांच्यासह त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेना आमदारांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागले. या पोटनिवडणुकीत राणे यांच्यासह गणपत कदम, शंकर कांबळी आणि सुभाष बने निवडून आले. पण श्रीवर्धनमध्ये सामान्य शेतकरी कुटुंबातले शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांनी शाम सावंत यांचा पराभव केला. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी राणे समर्थक सुबोध मोहिते यांचा पराभव केला. राणे यांच्याबरोबर त्यावेळेस पोटनिवडणुकीत विजयी झालेले गणपत कदम, शंकर कांबळी, सुभाष बने हे पुन्हा कधी निवडून आले नाहीत, तर गणपत कदम, शिवराम दळवी, सदा सरवणकर हे आमदार पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. २०१४च्या कणकवली विधानसभा निवडणुकीत आणि २०१५च्या वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राणे यांना शिवसेनेकडून पराभव चाखावा लागला. राणेंनी तर काँग्रेसही सोडली आणि राजकीय अस्तित्वासाठी भाजपाची वाट धरली.
शिवाजी महाराजांच्या काळातही अनेक मराठा सरदार हिंदवी स्वराज्याचे मीठ खाऊन चतकोराच्या बदल्यात मोगलांना जाऊन मिळाले. आजच्या या गद्दारांना, आमदारांना सूर्याजी पिसाळ म्हणावे, खंडोबा खोपडे म्हणावे की आणखी काय म्हणावे याचे उत्तर काळ देईल. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता, निष्ठावंत शिवसैनिक आणि सूज्ञ मतदार त्यांना योग्य जागा दाखवतील एवढे मात्र निश्चित!
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडीवर आणि बंडखोरीवर सूचक विधान केले आहे. `राजकारणात `शॉर्टकट’ चालत नाही. लोकांना जास्त दिवस मूर्ख बनवले जावू शकत नाही. नंतर लोक अशांना दारातही उभे करत नाहीत.’ भाजपच्या वाटेवर असणार्‍या बंडखोरांनी हे ध्यानात ठेवावे.
झाडाची फुलं, फांदी पडल्यामुळे झाड कोसळत नाही. कारण त्याची पाळेमुळे खोलवर रुजलेले असतात, असे आश्वासक उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदार, खासदार, पदाधिकार्‍यांसमोर बोलताना काढले. ठाण्यातील पहिल्या बंडखोरीनंतर मधली काही वर्षे सोडली तर शिवसेना गेली ४० वर्षे सत्तेवर आहे. १९९१मध्ये छगन भुजबळ यांच्या बंडानंतर १९९५ साली शिवसेना राज्यात सत्तेवर आली आणि शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री विराजमान झाला. २००५/६ साली नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर २००७ साली झालेल्या मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवीत भगवा फडकवला. जेव्हा जेव्हा शिवसेनेत बंड करून फूट पाडली गेली त्यानंतर तावून-सुलाखून शिवसेना बाहेर आली आणि अधिक भक्कम झाली. शिवसेना हा न वठणारा वटवृक्ष आहे हे बंडखोरांनी ध्यानात असू द्यावे.

Previous Post

महाराष्ट्र हळहळला

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

विशेष लेख

आमच्या बाई

May 8, 2025
विशेष लेख

व्यंगचित्रांमधून तेवली विवेकाची ज्योत!

April 17, 2025
विशेष लेख

पिंजर्‍यातल्या पोपटांचे चावे आणि बोचकारे

April 17, 2025
विशेष लेख

आजारी आरोग्यव्यवस्थेवर उपचार कधी होणार?

April 17, 2025
Next Post

टपल्या आणि टिचक्या

शिक्षण आयटीआय; कर्तबगारी आयआयटीच्या तोडीची!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.