• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

निद्रानाशापासून मुक्तीसाठी भाजपा

- टोक्या टोचणकर (टोचन)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 7, 2022
in टोचन
0

माझा मानलेला परममित्र पोक्या आपल्या वाग्दत्त वधूसह भटकण्यासाठी विदेशी गेल्यापासून त्याचं एकही पत्र आलं नव्हतं. मला तर त्या दोघांची इतकी काळजी वाटत होती की हा चुकून चीनच्या हद्दीत गेला की काय! कारण सध्या चीनमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातलंय. कडक लॉकडाऊनसुद्धा आहे तिथे म्हणतात. रस्ते निर्मनुष्य आहेत. त्या मानाने आपण इथे लौकर बाहेर पडलो या कोरोनाच्या झंझटातून. आपले महाआघाडीचे सरकारच कोरोनाला तोंड देण्यासाठी मजबूत होते ना. अनेक डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांनी जिवाची बाजी लावून या कोरोनारूपी काळाला धैर्याने तोंड दिले. या लढाईत कितीजणांना वीरमरण आले याचा पत्ताच नाही… हो. वीरमरणच म्हणायला हवे. स्वत:चा श्वास टिकवण्याची ही झुंज होती. आज दोन वर्षांनी पुन्हा सारं स्थिरस्थावर होत असल्याचं पाहताच पुन्हा विरोधकांच्या मनात सुडाचे पेटके येतील. पुन्हा गर्दी जमवली जाईल, पुन्हा जनतेला नको ती आवाहनं करुन कोरोना भारतातून पूर्ण गेला असून आता कसलीच बंधनं बाळगू नका, असे चेतवलेही जाईल. पण जनतेने सावध राहिले पाहिजे. दोन वर्षांच्या अनुभवातून आपण काही शिकलो नसलो तर आपल्यासारखे कृतघ्न आपणच. प्रत्येकाने जीव जपण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली तर या संकटापासून आपण दूर राहू शकू.
हे मी सगळं माझा शाळूसोबती आणि आता ईडीचा धाडमारू अधिकारी कावळ्या याला अगदी जीव तोडून सांगत होतो. कावळ्या गुढीपाडवा झाल्यापासून त्या धाडमारू पथकातून हळूच गायब होऊन माझ्या घरी येतो आणि आमचा साग्रसंगीत प्रोग्राम सुरू होतो. ड्युटी संपण्याच्या आधी तो ईडी कार्यालयात हजरही होतो. कोणी वरिष्ठाने विचारल्यास सोमय्या साहेबांचे अर्जंट काम गडचिरोलीला होते, त्यामुळे तिथे हेलिकॉप्टरने जाऊन आलो, अशी थाप ठोकून देतो. थापा मारण्यात त्याचा किंवा माझा हात ब्रह्मदेवाचा बापही धरू शकणार नाही. शाळेत तर आम्ही अशा लोणकढी थापा मारून गायब व्हायचो आणि सेनेच्या मोर्चाला, आंदोलनाला जायचो की एकाही शिक्षकाला पत्ता लागायचा नाही. कावळ्याही आमच्या गल्लीतच राहायचा. टपोरेगिरीत, पोरीबाळीत दोघांनाही रस नव्हता. तेव्हा टोळीयुद्ध जोरात होतं. शेंबडी पोरंही त्यात सामील होती. आमचे म्हणजे कावळ्याचे आणि माझे सर्व टोळ्यांशी सलोख्याचे संबंध होते. आम्ही पोलिसांचे खबरे असल्याची कुणकुण त्यांना लागल्यामुळे आमच्या वाटेला कोणी जात नसे. पण त्यांनी प्रेमाने खंडणी दिली तर ती मात्र आम्ही स्वीकारीत असू.
त्यातून अखेर कावळ्याने कलटी मारली. तो म्हणाला, मला शिक्षण पूर्ण करून आयपीएस ऑफिसर व्हायचंय. तू आणि तुझा मित्र पोक्या, दोघांनीही शिक्षणाची आयझेड केल्यामुळे तुम्ही हातभट्टीचा धंदा सुरू करा, मी तुम्हाला बाहेरून मदत करतो. पुढे आयपीएस अधिकारी झाल्यावर तुम्हाला कसल्याही बेकायदा धंद्यात मरण नाही. ती जबाबदारी माझी, असे वचन देऊन कावळ्या गायब झाला. पुढे परीक्षा देऊन खरोखरच आयपीएस ऑफिसर झाला. सीआयडी झाला. सरकारी गुप्तचर खात्यात अधिकारी झाला. मात्र आमच्या पाठीशी नेहमीच ढालीसारखा उभा राहिला. आता तर ‘ईडी’चा अधिकारी झाल्यामुळे त्या किरीटचे सगळे धंदे तो आम्हाला अ‍ॅडव्हान्समध्ये सांगतो.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे किरीट ही भाजपामधली एक सायकिक केस आहे. अशा बर्‍याच केसेस भाजपामध्ये आहेत. पण किरीट त्यात उजवा असल्यामुळे त्याच्या आजपर्यंतच्या तर्‍हेवाईक वागण्याच्या आलेखावरून त्याची मोदी आणि शहांनी एकमताने ‘ईडी’तर्फे हुंगेगिरी करण्यासाठी निवड केली. पोलिसी कुत्रेही शिताफीने वासावरून गुन्हेगार हुडकत नाहीत त्यापेक्षा याची घाणेंद्रिये अतिशय तीव्र आणि पॉवरफुल असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. शिवाय हा माणूस भविष्यवेत्ताही आहे. त्याच्याकडे ज्यांच्यावर ‘ईडी’ची धाड पडणार आहे त्यांच्या कुंडल्या इष्ट आणि अनिष्ट ग्रहांसह आहेत. पोपट न बाळगता तो चार दिवसांनंतर कुणावर धाड पडणार आहे हे ते सांगू शकतात. पूर्वी रस्त्यावरचे वेडे जसे आज मटक्याचा कोणता आकडा येणार, ते वेगवेगळ्या हावभावावरून सांगायचे तसे ते आता धाडीसाठी कुणाचा नंबर हे अचूक सांगतात. मात्र इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले धनाढ्य, तसेच पक्षातील पैशाने गब्बर असणारे श्रीमंत, त्यांच्या अब्जावधीच्या प्रॉपर्टी याबद्दल मात्र ते काहीच सांगू शकत नाहीत. म्हणून तर ते आज सुखाने झोपू शकतात.
निद्रानाश थोपवण्यावर भाजपात सोमय्यांना शरण जाणे हा एकच उपाय आहे. एकदा का कोणत्याही इतर पक्षातील आमदाराने, खासदाराने, मंत्र्याने सोमय्यांचा आशीर्वाद घेऊन भाजपात एन्ट्री केली की त्याचा निद्रानाशाचा विकार आयुष्यभरासाठी दूर झालाच असे समजा. त्यामुळे ‘भाजपात प्रवेश करा आणि निद्रानाशापासून कायमची मुक्ती मिळवा’ ही पुढच्या निवडणुकीत भाजपाची मुख्य ‘स्लोगन’ म्हणजे प्रचारघोषणा आहे. सध्या एकट्याने करत असलेल्या शोधकार्यामुळे सोमय्या यांच्यावर भयंकर ताण आला आहे. पुण्यात खावे लागलेले धपाटे, त्यामुळे निर्माण झालेली नवी अंगदुखी, कोकणात जाताना कशेडी घाटात पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालताना झालेला मनस्ताप यामुळे त्यांना आता भयंकर मानसिक आणि शारीरिक थकवा आला आहे. तेव्हा त्यांना बळ देण्यासाठी भाजपामधील शुचिर्भूत आणि भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेले ताज्या दमाचे नेते नारायणराव राणे, त्यांचे दोन सुपुत्र, मंगलप्रभात लोढा, कीर्तनकार राम कदम, पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले हर्षवर्धन पाटील इत्यादी मंडळी दिमतीला देण्याचे ठरले आहे. चोरालाच चोराच्या वाटा ठाऊक असतात, असं दानवेंनी सांगितल्यापासून दिल्लीच्या वरिष्ठांनी ते मनावर घेतले आहे आणि त्याप्रमाणे ते पावलं उचलत आहेत. सोमय्यांचा लवकरच जाहीर नागरी सत्कार त्यांना ‘ईडीचक्र’ हा किताब मोदींच्या हस्ते देऊन करण्यात येणार आहे. त्यांचा पक्षातीलच एक विरोधक त्या बैठकीत त्याऐवजी त्यांना ‘ईडीचक्रम’ द्या, असं बोलल्याचं म्हटलं जातं. ते काहीही असलं तरी पाडव्यानंतर नव्या वर्षात भ्रष्टाचारमुक्त भारत ही मोहीम जोर धरणार असं दिसतं. लवकरच त्यानिमित्त थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम मोदी जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

Previous Post

९ एप्रिल भविष्यवाणी

Next Post

नया है वह…

Related Posts

टोचन

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
टोचन

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
टोचन

माननीय भुसे यांचे आत्मवृत्त

May 5, 2025
टोचन

अपमान! अपमान!! अपमान!!!

April 25, 2025
Next Post

नया है वह...

हसू नका, आपण जात्यात आहोत!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.