• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

तांब्या पितळेला सोन्याची झळाळी

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 6, 2023
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0
तांब्या पितळेला सोन्याची झळाळी

दागिने म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येतात सोने-चांदी-हिरेमोती आणि प्लॅटिनम. पण यापलीकडे जाऊन वेगळ्या धातूचे दागिने बनवून प्रचलित करणे तसे धाडसच. नेहमीच्या इमिटेशन ज्वेलरीपेक्षा ही आभूषणे मला वेगळी दिसली. म्हणूनच प्रदर्शनाच्या समारोपानंतर ताम्र कांस्य या ज्वेलरी ब्रँडचे मालक राहुल संजय सावंत यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. या मराठी मुलाच्या ‘ताम्र कांस्य’ ब्रँडला आज सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे.
– – –

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथील २०२३च्या वार्षिक कला प्रदर्शनात ‘ताम्र कांस्य’ या स्टॉलने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. विक्रेता बोलका असावा हा समज खोटा ठरवत, इथला मितभाषी तरुण शब्दांपेक्षा अधिक मांडलेल्या दागिन्यांच्या डिझाईन्सने ग्राहकांशी संवाद साधत होता. रोमन लिपीतील संस्कृत नाव, ठसठशीत अक्षरांना असलेली नाजुक महिरप, रस्टी गोल्डन लुक असा सुरेख लोगो होता. स्टॉलवरील तरुण हसतमुखाने स्वागत करून दागिने दाखवत होता. ताम्र आणि कांस्य (तांबं आणि पितळ) या दोनच धातूंपासून बनवलेली ज्वेलरी हा ताम्र-कांस्यचा मुख्य आविष्कार. दागिने म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येतात सोने-चांदी-हिरेमोती आणि प्लॅटिनम. पण यापलीकडे जाऊन वेगळ्या धातूचे दागिने बनवून प्रचलित करणे तसे धाडसच. नेहमीच्या इमिटेशन ज्वेलरीपेक्षा ही आभूषणे मला वेगळी दिसली. म्हणूनच प्रदर्शनाच्या समारोपानंतर ताम्र कांस्य या ज्वेलरी ब्रँडचे मालक राहुल संजय सावंत यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली.
सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी असणारे राहुल सावंत चित्रकला शिल्पकलेशी संबंधित क्षेत्रात करियर न करता ज्वेलरी मेकिंग या आगळ्या वेगळ्या क्षेत्रात कसे आले? राहुल म्हणाले, जे.जे.मध्ये शिकत असताना चित्रकलेसोबतच शिल्पकला, धातूकाम याची ओळख झाली, यातूनच ज्वेलरी मेकिंग हे करीयर निवडलं. पण मुळात चित्रकलेची आवड मला कशी निर्माण झाली याचा एक किस्सा आहे. मी सातवीत असताना माझे पप्पा मला ठाण्यातील गडकरी रंगायतनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाला घेऊन गेले होते. त्या व्यंगचित्रांतली माणसं मला ओळखता येत नव्हती, पण त्यातील काहींचं नाक मोठं होतं, कोणाचं पोट, तर कुणाचे कान. ही चित्रं पाहून मला मोठी गम्मतच वाटली. हे काहीतरी भारी आहे, आपल्यालाही अशी चित्रं काढता यायला हवीत असं वाटलं. मग शाळेत मागच्या बाकावर बसून शिक्षकांची व्यंगचित्रं काढायला लागलो. पण ती पाहून कोणतेही शिक्षक चिडले नाहीत, उलट त्यांनी कौतुक केलं. चित्रकलेच्या इनामदार बाई आणि पवार बाईंनी माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं. मी दहावीत असताना शाळेने भरविलेल्या चित्रप्रदर्शनात त्यांनी माझ्या चित्रांसाठी वेगळं दालन ठेवलं. प्रदर्शनाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी आणि रसिकांनी माझ्या चित्रांची खूप तारीफ केली आणि कलेच्या क्षेत्रात तुला उज्ज्वल भविष्य आहे असं सांगितलं. मलाही कला शाखेत शिकायचं होतं, पण चित्र काढून नोकरी मिळत नाही, चित्रकला पोट भरू शकत नाही, असं पप्पांना वाटायचं. मला दहावीला ८९ टक्के पडले. मी इंजिनिअर बनावं, चांगली नोकरी करावी असा पप्पांचा आग्रह होता. मी घरातला एकुलता एक मुलगा. पप्पांची कुरिअर कंपनीतील टेंपररी नोकरी आणि त्यांना स्क्रीन प्रिंटिंग व्यवसायात आलेलं अपयश यामुळे मुलाने पक्की नोकरी मिळेल असं शिक्षण घ्यावं हा त्यांचा आग्रह बरोबर होता, पण मला मात्र विज्ञान शाखेत जराही रस नव्हता. कशीबशी बारावीची परीक्षा दिली. पास झाल्यावर घरी सांगितलं, मी इंजिनीअरिंग करणार नाही, पुढे काय करायचं याचा विचार करायला मी एक वर्षाचा गॅप घेणार आहे. पप्पांच्या मनाविरुद्ध वागल्यावर यापुढे शिक्षणासाठी घरून पैसे मिळणार नाहीत हे स्पष्टच होतं. इतकं धाडस मी त्यावेळी दाखवू शकलो कारण, लहानपणी दहीहंडी उत्सवात नाचणार्‍या सोंगांना मेकअप करून दे, व्यक्तिचित्रं काढून दे अशी छोटी मोठी कामं करून थोडेफार पैसे कमावायला मी शिकलो होतो. त्यामुळे हातातील कलेच्या जिवावर मी शिक्षण पूर्ण करेन हा आत्मविश्वास होता. शिक्षण घेताना गाठीशी पैसे हवेत या उद्देशाने या मॅमोग्राफी मशीनचे सर्किट बनवणार्‍या कंपनीत नोकरी धरली. माझी हुशारी पाहून पहिल्याच महिन्यात माझी बदली कारखान्यातून हेड ऑफिसमधे करण्यात आली. तिथे काम करताना मला व्यवसाय कसा चालतो हे शिकता आलं. काम चांगलं होतं, पण माझं ध्येय कला क्षेत्रात काम करण्याचं असल्यामुळे पगाराचे वीस हजार रुपये जमा झाल्यावर चार महिन्यांत ही कंपनी सोडली. आणि जे. जे. स्कूलच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागलो. जे. जे.चा प्रवेश माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. जागतिक स्तरावरील कलेचे शिक्षण देणारी संस्था म्हणून जे. जे. प्रसिद्ध आहे. तसेच खाजगी कला महाविद्यालयांची लाखो रुपये फी मला परवडणारी नव्हती, त्या तुलनेत जे.जे.मध्ये शिकण्याचा खर्च अगदी नगण्य होता. पण इथे प्रवेश मिळवणं खूप कठीण असतं. अनेक विद्यार्थी तर चार पाच वर्षे या परीक्षेची वारी करतात. या प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणारे अनेक नामवंत क्लासेस आहेत. त्यापैकीच एक उन्मेष इनामदार कला अकादमी. आमच्या शाळेतील इनामदार मॅडमचे पती या क्लासचे संचालक आहेत, त्यांची फी जास्त होती, पण त्यांनी मला एकही रुपया न घेता क्लासमध्ये प्रवेश दिला. इनामदार सर आणि मॅडम यांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. माझ्याकडून थोडी मदत व्हावी या उद्देशाने मी सकाळच्या लहान मुलांच्या बॅचेसला शिकवायचो आणि संध्याकाळी माझ्या प्रवेश परीक्षेची तयारी करायचो.’
२०१४ साली जेजेला प्रवेश मिळाला. ब्रांच होती मेटल वर्क्स. जे.जे.मध्ये पेंटिंग या विषयाला सर्वात जास्त डिमांड आहे. कारण ग्लॅमर असलेल्या आणि चांगले पैसे मिळवून देणार्‍या जाहिरातक्षेत्राचे दरवाजे मुलांसाठी खुले होतात. याच्या तुलनेत मेटल वर्क्स विषयात नोकरीच्या संधी कमी उपलब्ध आहेत. म्हणूनच या कोर्सला प्रवेश मिळालेल्या मुलांचे हा कोर्स अर्धवट सोडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. या बाह्य गोष्टींचा राहुलवर परिणाम झाला नाही. कोणत्याही स्वरूपात का असेना, कला शिकायला मिळणार आहे यातच राहुल खुश होते. राहुल सांगतात, ‘पहिल्या वर्षी सर्व शाखांचा अभ्यासक्रम सारखा असतो. त्यामुळे सर्व शाखांची मुलं एकाच वर्गात शिकतात. वर्ग सुटल्यावर मित्रांसोबत टाईमपास न करता मी मेटल वर्क्स डिपार्टमेंटला जाऊन बसत असे. ही माणसं काय काम करतात, इथं नक्की काय बनतं, असे प्रश्न मला पडायचे. प्रथम वर्षाच्या मुलांना मेटल वर्क्सला प्रवेश नव्हता. शिक्षक म्हणायचे, ‘या गोष्टी शिकायला तुला अजूना वेळ आहे.’ कुणी काहीही बोललं तरी मी रोज चिकाटीने डिपार्टमेंटला जात राहिलो. हळूहळू एंबॉसिंग (धातूवरील उठावदार नक्षी), एनग्रेविंग (धातूवर कोरीव काम), मीनाकरी (धातूवर रंगीत कलाकुसर) अशा वेगवेगळ्या कलाकुसरींची माहिती होत गेली. सिनियर मुलांना त्यांच्या कामात मदत करताना मला ‘स्क्रॅप सेक्शन’ या अलिबाबाच्या गुहेची माहिती झाली. मग काय रोज खुल जा सिम सिम म्हणत स्क्रॅप डिपार्टमेंटमधे जाऊन मिळतील त्या धातूचे तुकडे जमा करून त्यावर प्रयोग करायचो. याच प्रयोगातून एक की-चेन बनवली.
कॉलेजचं पहिलं वर्ष संपून सुट्या लागल्या होत्या, तेव्हा एक ऑर्डर मिळाली. एका मित्राला त्याच्या मैत्रिणीला एटीएम कार्डवर प्रेमाचा संदेश लिहून गिफ्ट करायचं होतं. सरांना फोन करून तांब्याचा पत्रा आणि एनग्रेविंगचं सामान कुठे मिळेल याची माहिती घेतली आणि मित्राला हवं होतं तसं कार्ड बनवून दिलं. या कामाचे पाचशे रुपये मिळाले आणि खर्च आठशे रुपये झाला. यातून एनग्रेविंगचं सामान आता माझ्याकडे होतं. घरच्या घरी अनेक गोष्टी बनवून पाहिल्या. कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात इतर मुलं मेटल वर्क्स डिपार्टमेंटची ओळख करून घेत होती, तेव्हा मी सिनियर मुलांसोबत विविध धातूंवर प्रयोग करून वस्तू बनवित होतो. तयार केलेल्या वस्तू विकायला सेल्फ प्रमोशन करायला सुरुवात केली. ब्रेसलेट तयार करून ते स्वतःच्या हातात घालून मिरवू लागलो. आकर्षक डिझाईन आणि माफक दर यामुळे मित्रमंडळींकडून ऑर्डर मिळू लागल्या.‘
इमिटेशन ज्वेलरीमधे इतके पर्याय असताना लोक राहुलकडून वस्तू का विकत घेत होते? राहुल म्हणाले, ‘इतर कुठेही मिळत नाहीत अशा वस्तू मी बनवायचो. डिझाईनवर आधीपासूनच माझी हुकूमत होती. दरवेळी मी काहीतरी भन्नाट कल्पना घेऊन वस्तू बनवायचो. याच आउट ऑफ द बॉक्स विचारसरणीचा फायदा मला विविध स्पर्धांत झाला. कॉलेजात मेटल वर्क्सचा राहुल सावंत म्हणजे हरहुन्नरी विद्यार्थी अशी ओळख होऊ लागली. २०१६च्या वार्षिक कला प्रदर्शनात यशवंत भावसार आणि अभिजित साळुंखे सरांनी मला स्टॉल लावण्याची परवानगी दिली. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती. आजवर स्पर्धांतून कला सादर केली होती, पण वार्षिक कला प्रदर्शनात मांडलेला स्टॉल म्हणजे आपली कला थेट समाजात पोहोचवण्याची संधी होती. उत्साहाने कामाला सुरुवात केली. आतापर्यंत मी जे दागिने बनवले, त्यांचं वेगळेपण म्हणजे, ते बनवण्यासाठी वापरले जाणारे धातू आणि पुरातन डिझाईन. अगदी जुन्या काळातल्या डिझाईनकडून प्रेरणा घेऊन केलेल्या मॉडर्न डिझाईन ही माझी खासियत आहे. तांब्यापितळेमुळे येणार्‍या रस्टी लुकने दागिने खुलून दिसतात. त्यामुळे धातू आणि डिझाईन हेच असावं, हे नक्की होतं. विद्यार्थी असल्यामुळे वस्तूविक्रीतून फार पैसे मिळविण्याची अपेक्षा नव्हती. माझी फी आणि कॉलेजचा खर्च यातून निघावा असा उद्देश असल्याने दागिन्यांच्या किंमतीही मी माफक ठेवल्या होत्या.
प्रदर्शनाची तारीख जवळ येत होती, ब्रँड नेम काय असावं हे ठरत नव्हतं. वाटलं, आपली संस्कृत विषयाची आवड, प्रॉडक्टचं मटेरियल, डिझाईन यांची सांगड घालणारं आधुनिक नाव असावं. ‘ताम्र-कांस्य’ हे नाव सुयोग्य वाटलं. स्टॉलचा पहिलाच प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला. त्यामुळे हुरूप वाढला. काही दिवसांनी महाराष्ट्र टुरिझम बोर्ड प्रदर्शनात आमच्या कॉलेजला स्टॉलसाठी जागा मिळाली, इथे माझ्या दागिन्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला. दागिन्यांनी भरलेले ट्रे भराभर रिकामे होतं होते. एकरकमी दहा हजार रुपयांची विक्री झाली. विश्वास बसत नव्हता, आजवर एकेक दागिना विकून शंभर दोनशे रुपये मिळवणारा मी हातात चक्क स्वकमाईचे दहा हजार घेऊन उभा होतो. वारंवार पैसे मोजून बघितले… खरंच दहा हजार होते.. आपणही काहीतरी करू शकतो हा आत्मविश्वास त्या दिवशी आला.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने माझ्याशी संपर्क साधला. त्यांना आमच्या दागिन्यातील वेगळेपण भावलं. त्यांनी मला त्यांचा अधिकृत सेलर म्हणून मान्यता दिली. संग्रहालयातील शॉपमध्ये माझी आभूषणे आजही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संग्रहालयाच्या मागणीनुसार मोहेंजदडो आणि हडप्पा संस्कृतीच्या प्रतिकृती दिसणारे दागिने आणि वस्तू मी बनवून द्यायला सुरुवात केली. माझी पहिली ऑर्डर तीस हजार रुपयांची मिळाली. या कामात यशवंत सरांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडून डिझाईन प्रोसेस, प्रॉडक्ट बेस आणि कमर्शिअलायझेशन कसं करायचं हे शिकलो. वस्तुसंग्रहालयाच्या कामाने माझ्या व्यवसायाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली.
कॉलेजचं आता शेवटचं वर्ष होतं. आजपर्यंत कोणीही या कोर्समध्ये व्यावसायिक अँगल विचारात घेतला नव्हता. त्यामुळे प्रबंधासाठी (थीसीस) मी कमर्शिअलायझेशन ऑफ मेटल वर्क प्रॉडक्ट्स हा विषय निवडला. या थिसिसमध्ये मेटल वर्कमध्ये संभाव्य मार्वेâट आणि माझा चार वर्षांचा प्रवास नमूद केला, जेणेकरून या शाखेत येणार्‍या मुलांना मार्गदर्शन मिळेल.
२०१८ला कॉलेज पूर्ण झाल्यावर अजून जोमाने काम सुरू केलं. मॉडर्न, अँटिक आणि ट्रायबल असा त्रिवेणी संगम करून मी माझ्या डिझाइन्सचा विचार करतो. २०१८ला सनफ्लॉवर इयरिंग बनवली होती, जे आजही सर्वात जास्त मागणी असलेलं प्रॉडक्ट आहे. व्यवसाय करताना सतत नावीन्यपूर्ण गोष्टी आणणं हे खूप महत्त्वाचं आणि कौशल्याचं काम आहे, हे लक्षात घेऊन आम्ही तर्‍हेतर्‍हेचे डिझाईन आमच्या ग्राहकांसाठी आणले आहेत, जसे कर्मा इयरिंग, ताम्र पंखम, ताम्र पर्णम, रोप रिंग स्टड, ट्रायबल स्टड, चांदबाली, ग्रीक डिझाईन्सचे पूर्ण साज, इंडो ग्रीक डिझाईनर साज, दागिन्यांचे हे प्रकार महिलावर्गाच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.’
आज कोणत्याही प्रदर्शनात दर दोन स्टॉलनंतर एक इमिटेशन ज्वेलरी विक्रीचा स्टॉल असतो. तुमचं वेगळेपण काय आणि स्पर्धेत तुमचा ब्रँड टिकेल का, या प्रश्नावर राहुल म्हणतात, ‘इमिटेशन ज्वेलरीत सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईन कॉपी करून दागिने बनविण्याकडे कल असतो. माझं वेगळेपण हे आहे की माझी डिझाईन ओरिजिनल असते. सोन्याचे दागिने बनवायला जितकी मेहनत आणि कष्ट लागतात तितकीच मी ताम्र-कांस्यचे दागिने बनवायला घेतो. मला किती छान डिझाईन येतं यापेक्षा लोकांच्या दृष्टीने ते डिझाईन किती अट्रॅक्टिव्ह आहे हे मी पाहतो. माझे ग्राहक जेव्हा माझं कलेक्शन परिधान करून बाहेर जातील तेव्हा चारचौघांमध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसायला हवं. लोकांचं लक्ष वेधून घेण्यात माझी आभूषणे यशस्वी ठरली तरच ती मेहनत सफल झाली मी असं समजतो. कोणताही नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्याआधी आमची तीन महिन्यांची प्रोसेस असते. डिझाईन तयार झाल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातली ५० ग्राहकांना गुगल फॉर्मवर त्यांचे डिझाईन पाठवून या डिझाईनला किती मार्क द्याल, हा दागिना तुम्हाला विकत घ्यावासा वाटेल का, डिझाईनच्या किंवा लुकच्या दृष्टीने तुम्हाला काय आवडलं, असा सर्वे आम्ही करतो. याचा आम्हाला खूप फायदा होतो. पन्नास लोकांनी ते अप्रूव्ह केलं तर हे प्रॉडक्ट माझ्या ग्राहकांना नक्कीच आवडेल अशी खात्री वाटते. मी एकदा तांब्याचा चाफा बनवला होता आणि तो दिसायला इतका सुंदर होता की मला वाटलं हा हातोहात संपेल, मी त्याचं भरपूर प्रोडक्शन केलं. पण लाँच केल्यावर त्या चाफ्याला कोणी हातातही घेऊनही पाहीलं नाही. त्याचा एक डेड स्टॉक तयार झाला. यातून शिकून मी या सर्वे पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली. एखाद्या गोष्टीवर मी तीन महिने अभ्यास करतो, त्याच्यावर काम करतो आणि फिनिश प्रोडक्ट देतो, तेव्हा ते ट्रेण्ड सेटर ठरतं. कॉपी केलेले प्रॉडक्ट कधी ट्रेण्ड सेटर बनू शकत नाहीत. आमच्या कर्मा इयरिंगची मार्केटमध्ये चर्चा झाली. खूप सेलिब्रिटींनी ते इयरिंग्ज शोकेस केले. आमच्या नथी देखील खूप विकल्या गेल्या. लिमिटेड एडिशन ग्रीक सेट हे ताम्र कांस्यच प्रीमियम प्रॉडक्ट आहे.
२०१६मध्ये ‘ताम्र-कास्य’ आणि २०१८मधे ‘रजत स्पर्श सिल्व्हर ज्वेलरी’ हे ब्रँड लाँच झाल्यापासून विक्री चढत्या क्रमाने होती. मार्केट अधिक वाढावं म्हणून फेब्रुवारी २०२०मध्ये आम्ही ऑनलाईन मार्केटमध्ये उतरून अधिक प्रमाणात दागिने बनवायला सुरुवात केली.. पण वेबसाईट लॉन्चिंगनंतर लगेच लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे दागिन्यांची ऑफलाईन मागणी घटली. वेबसाईट ट्रॅफिक वाढायला काही महिन्यांचा अवधी लागला. नुकसान होताना दिसत होतं, पण कठीण काळ कधीतरी संपतोच यावर विश्वास ठेवून या काळात उत्पादनात अजून वैविध्य आणत गेलो, स्टॉलऐवजी आता वेबसाईटवर दागिने सजवून मांडू लागलो. हळूहळू ऑनलाईन ऑर्डर्स यायला लागल्या. चातुर्मास आला तसे सणांच्या निमित्ताने मागणी अजून वाढली. रक्षाबंधनच्या आधी एक नवीन कल्पना सुचली, ताम्र कांस्यने आजवर राखी बनवली नव्हती. ती बनवण्याचं ठरवलं. वेळ कमी होता. सुचलेली कल्पना ताबडतोब अमलात आणली नाही तर ती कालबाह्य होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्षाबंधनपर्यंत मोठ्या संख्येने राख्या कशा बनवाव्यात, यावर वर्कशॉपमध्ये बसून विचार करत होतो, डोळ्यांसमोर वर्तुळाकार, लंबगोल, त्रिकोणी निरनिराळ्या आकारांचे कानातले होते, त्यांचा आकार फॅन्सी राखीसारखाच होता… युरेका!!!! एका कानातल्या सेटपासून दोन राख्या तयार झाल्या असत्या. जेवढ्या राख्या उत्पादनाचा मी विचार करत होतो, त्याच्या तिप्पट राख्या माझ्याकडे तयार होत्या. बाप्पाचे आभार मानले आणि ताम्र कांस्यच्या राखी बाजारात आणल्या. हां हां म्हणता राख्या संपल्या. हा प्रतिसाद घरच्यांनाही अचंबित करून गेला. इतकी वर्ष मी मेहनतीने स्वतःचा खर्च भागवत होतो, याचं बाबांना कौतुक होतं; पण लॉकडाऊनमध्ये कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले तेव्हा मला मिळत असलेला प्रतिसाद आणि उत्पन्न पाहून बाबांना माझा अभिमान वाटला. हा ताम्र कांस्यने दिलेला आयुष्यातला भरजरी क्षण. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. आई बाबांसोबतच माझी पुतणी रिया जाधव आणि सहाय्यक अजय महामुने यांची ब्रँड बिल्डिंगमध्ये मोलाची मदत आहे.
परदेशात भारतीय संस्कृतीची ओळख राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील पारंपरिक कलेने करून दिली जाते.कोट्यवधी रुपयांच्या हस्तकला वस्तू दरवर्षी एक्सपोर्ट केल्या जातात, यात महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने, कलाकुसर केलेल्या वस्तूंचे प्रमाण खूप कमी आहे. ताम्र कांस्यच्या दागिन्यांना परदेशातून मागणी सुरू झाली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा माझ्या डिझाइन्समध्ये मॉडर्न पद्धती आणि आकर्षक मार्वेâटिंग करुन ही कला जगभर मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय. माझ्या प्रॉडक्टसाठी विविध शहरांतील हँडीक्राफ्ट शॉप्समध्ये फ्रेंचाईजी शॉप मॉडेल्स योजना सुरू करण्याचा विचार आहे. माझा ब्रँड इतर राज्यातील लोकांपर्यत नेण्यासाठी मी माझे कलेक्शन्स घेऊन बंगलोर, कोलकाता मैसूर अशा भारतातील मोठ्या जत्रा आणि एक्जीबिशन्समधे भाग घेत असतो. या ठिकाणी आम्हाला ग्राहकांचं प्रेम आणि मोठा प्रतिसाद मिळतो आहे.’
आमच्या आजीकडे रोजच्या वापरासाठी शंभर तोळे सोनं होतं, इथपासून सोन्याचे दागिने सणावारीच शोभून दिसतात, इथवर सोन्याच्या दागिन्यांचा प्रवास येऊन ठेपला आहे. पूर्वी सण समारंभही मोजकेच असायचे. कुणी किती दागिने घातले आहेत याची चर्चा व्हायची. पण कालांतराने सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी ऑफिसमधील पार्टी असो किंवा गेट-टुगेदर, नेहमी वेगवेगळ्या कपड्यांसोबत वेगवेगळी आभूषण घालणं ही काळाची गरज बनली. त्यातूनच इतरांपेक्षा आपला लुक हट के असणं क्रमप्राप्त झालं आणि या गरजेपोटी जन्म झाला इमिटेशन ज्वेलरीचा. दोन दशकांपूर्वीपर्यंत ज्यांना खोटे दागिने म्हणून हिणवलं जायचं त्या इमिटेशन ज्वेलरीचा उद्योग भारतात सध्या दहा हजार कोटींचा आहे. कोविडनंतर नोकरी करणार्‍या प्रत्येकाला व्यवसाय करण्याची इच्छा आहे. कमी भांडवल आणि कलेची हौस पूर्ण करणारा व्यवसाय म्हणून इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे. धंदा चालतोय म्हणून त्या धंद्यात पडण्यापेक्षा, तुम्ही त्या व्यवसायात काय वेगळेपण आणू शकता याचा विचार करा. राहुल सावंत या मराठी मुलाने हाच विचार केला म्हणूनच त्याच्या ताम्र कांस्य ब्रँडला आज सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

कसे विसावाल या वळणावर?

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

October 5, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

करिअरची गवसली वाट

July 27, 2023
Next Post

कसे विसावाल या वळणावर?

फर्नांडिस, पवार आणि ठाकरे एकत्र

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.