ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, मंगळ मिथुन राशीत, रवी, शनि, कुंभ राशीत, केतू कन्या राशीत, बुध, शुक्र, राहू, नेपच्युन मीन राशीत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : १० मार्च आमालकी एकादशी, ११ मार्च भीमप्रदोष, १३ मार्च होळी पौर्णिमा, १४ मार्च धुलिवंदन.
– – –
मेष : तरुणांनी काम करताना भान ठेवावे. घरात शांत राहा. वाद टाळा. लॉटरी, सट्ट्यापासून दूर राहा. पर्यटनातून आनंद मिळेल. महिलांशी जपून बोला. खेळाडूंनी यशप्राप्तीसाठी योग्य नियोजन आणि कष्ट करावे. विज्ञानाशी निगडित व्यवसाय करणार्यांना चांगले आर्थिक लाभ होतील. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. करियरला आकार मिळेल. सरकारी कामे रेंगाळतील. व्यवसायात खबरदारी घ्या. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. गोड बोला, कामे हलकी होतील.
वृषभ : व्यवसायात यशप्राप्तीसाठी कष्ट घ्या. काम व वेळेचे नियोजन करा. कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करा. आर्थिक व्यवहारात खबरदारी घ्या. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना लक्ष द्या. नोकरीत कौतुक होईल. कामात चूक होऊ देऊ नका. नवीन मैत्री करताना काळजी घ्या. व्यवसायात यश मिळेल. नवीन ऑर्डर मिळून आर्थिक बाजू चांगली राहील. अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. मित्रांशी जेवढ्यास तेवढेच संबंध ठेवा. मुलांकडे लक्ष द्या. नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.
मिथुन : अडकलेली कामे सुटतील. तरुणांना शुभफळे मिळतील. व्यवसायात नव्या कल्पना सुचतील. कामासाठी बाहेरगावी जाल. नवीन ओळखी कामी येतील. छंदातून यश मिळेल. नोकरीत काम बोलेल. तरुणांना विदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळेल. ज्येष्ठांचा जुना आजार डोके वर काढेल. नियमात राहून काम करा. आयटीमध्ये कामानिमित्ताने विदेशात जाल. संशोधक, शिक्षकांना नव्या संकल्पना सुचतील. व्यवसायात यश मिळेल. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. सकारात्मकता वाढेल. मालमत्तेचा विषय अडकेल.
कर्क : तरुणांना यश मिळेल. आरोग्यक्षेत्रात उत्तम काळ. व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळा. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. ज्येष्ठांशी वागताना काळजी घ्या. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. मालमत्तेचे प्रश्न वाटाघाटीतून मार्गी लागतील. नवा व्यवसाय मार्गी लागेल. आर्थिक आवक कमी राहील. खर्च बेताने करा. लॉटरी, सट्टा यांच्यापासून दूरच राहा. रियल इस्टेट क्षेत्रात लाभ मिळेल. कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील. दांपत्यजीवनात कटकटी होतील. विदेशातील व्यवसायातून लाभ मिळेल. कोणाला सल्ले देऊ नका.
सिंह : कामाचा ताण वाढेल. ओढाताण होईल. आरोग्यावर परिणाम होईल. जवळच्या व्यक्तीबाबत एखादी बातमी कानी येईल. जुनी गुंतवणूक लाभ देईल. आर्थिक नियोजन करा. नोकरीत चांगले दिवस येतील. वरिष्ठ खूष होतील. प्रमोशन, पगारवाढीतून बक्षीस मिळेल. पत्नीचे सहकार्य मिळून घरात वातावरण उत्तम राहील. मुलांच्या वागण्या-बोलण्याने वाद होतील. खर्च वाढून मनस्वास्थ्य बिघडेल. नवीन नोकरी व्यवसायाची बोलणी पुढे सरकतील. इंजिनीअरना नवीन संधी मिळेल. मन ध्यानधारणेत रमवा. अचानक पैसे खर्च होतील.
कन्या : भागीदारीत तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा. आरोग्याकडे लक्ष द्या. माध्यमांमध्ये काम करणार्यांना चांगली बातमी कळेल. नोकरीत अचानक चांगली बातमी कळून सकारात्मकता वाढेल. घरात एखादा छोटेखानी कार्यक्रम होईल, नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जपून व्यक्त व्हा. वाहन हळू चालवा. आर्थिक व्यवहारात चूक घडू शकते. अचानक धनलाभाची शक्यता आहे. नवी गुंतवणूक सावधपणे करा. कामानिमित्ताने प्रवास होईल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. वरिष्ठ खूष होतील आणि बक्षीस देतील.
तूळ : नोकरीत ताण वाढेल. आरोग्यावर परिणाम होईल. अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. पत्नीकडून मदत मिळेल. घरासाठी वेळ द्याल. प्रेमप्रकरणात काळजी घ्या. घरात तुमचेच चालेल. नवी गुंतवणूक पुढे ढकला. जुना आजार डोके वर काढेल. घरात शुभकार्य घडेल. नवीन व्यक्तीवर विश्वसून निर्णय घेऊ नका. मित्रांबरोबर मौजमजा कराल. वाद टाळा. संस्मरणीय घटनांमुळे आठवडा चांगला जाईल. कोर्टातले दावे मार्गी लागतील. मानसन्मान मिळेल. कलाकारांसाठी उत्तम काळ.
वृश्चिक : बोलण्याच्या जोरावर यश खेचून आणाल. व्यवसायात यश मिळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल. अचानक धनलाभ होईल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. नवीन वास्तूच्या खरेदीला गती मिळेल. तरुणांना यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. व्यवसायवृद्धी होईल. आर्थिक बाजू सांभाळा. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी मिळतील. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. अचानक धावपळ होईल. मित्रमंडळींशी चेष्टामस्करी टाळा.
धनु : व्यवसायात यश मिळेल. नोकरीत सुस्थिती राहील. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तरुणांना संमिश्र अनुभव येतील. मनासारख्या घटना घडतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. मन:स्वास्थ्य चांगले ठेवा, ध्यान-धारणा करा. चढउतार अनुभवाल. मोठा निर्णय घेण्याआधी कागदपत्रे तपासा. सोशल मीडियावर काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. व्यवसायात कल्पकतेला वाव मिळेल. विदेशात विस्ताराच्या प्रयत्नांना यश मिळेल.
मकर : आठवड्याच्या सुरुवातीलाच शुभ बातमी कळेल. तरुणांना मौजमजेतून आनंद मिळेल. व्यवसायात जपून पावले टाका. नोकरीत डोकेदुखी वाढेल. कामात एकाग्रता ठेवा. अति आत्मविश्वास दाखवू नका. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संगीतकार, कलाकारांना नव्या संधी लाभतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. खेळाडूंना यश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी जपून बोला. मित्रांशी वाद टाळा. ज्येष्ठांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. उधार उसनवारी नकोच. खर्चाला कात्री लावा. धार्मिक कार्यातून समाधान मिळेल.
कुंभ : मनशांती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा. किरकोळ वादांकडे लक्ष देऊ नका. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान होतील. तरुणांना सुखाचा काळ, इच्छा मार्गी लागतील. भाग्योदय होईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास कराल. काळजीपूर्वक नियोजन करा. व्यवहारात पारदर्शीपणा ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात चांगले अनुभव येतील. सहलीचे प्लॅन यशस्वी होतील. मानसिक त्रास देणार्या किरकोळ घटनांकडे दुर्लक्ष करा. नोकरीत यशदायक काळ अनुभवाल. घरात छोट्या समारंभात मित्र, नातेवाईक भेटतील. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या, उधार उसनवारी नकोच.
मीन : बोलताना नियंत्रण ठेवा. अनेक दिवसांपासून अडकलेले काम पुढे सरकेल. तरुणांसाठी यशदायी काळ. मन प्रसन्न राहील. घरात आनंदाच्या बातम्या कळतील. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळतील. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी काळजीपूर्वक व्यक्त व्हा. प्रवासात चोरी होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना दगदग सहन करावी लागेल. कलाकार, संगीतकार, ब्रोकर यांना चांगला काळ. व्यवसायात बुद्धीचातुर्याच्या जोरावर काम पूर्ण करा. विदेशात शिक्षणाचा विषय मार्गी लागेल. देवदर्शनाला बाहेरगावी जाणे होईल. खाणे-पिणे मापात ठेवा, म्हणजे झाले.