ग्रहस्थिती : हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीमध्ये, राहू, नेपच्युन मीन राशीमध्ये, मंगळ मिथुन राशीत, शुक्र, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शनि कुंभ राशीत, रवी, बुध, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : ८ फेब्रुवारी जया एकादशी, ९ फेब्रुवारी भीष्माद्वादशी, १० फेब्रुवारी सोमप्रदोष, १२ फेब्रुवारी माघ पौर्णिमा.
मेष : मनासारख्या घटना घडतील. युवा संशोधकांना, व्यावसायिकांना नव्या संधी मिळतील. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. अचानक धनलाभाच्या मोहात पडू नका. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळतील. नोकरी-व्यवसायात निर्णय घेताना अतिविश्वास टाळा. मित्रमंडळी, नातेवाईकांशी वाद टाळा. कलाकारांसाठी उत्तम काळ. संततीकडून चांगली बातमी कळेल. नव्या गाठीभेटींमधून कामे पुढे सरकतील. ज्येष्ठांच्या मतांचा आदर करा. वाहन जपून चालवा.
वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रमोशन मिळेल, पगारवाढ होईल, करियरचा आलेख उंचावेल. धार्मिक ठिकाणी भेट दिल्याने मनस्वास्थ्य उत्तम राहील. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. मौजमजेवर खर्च टाळा. आर्थिक नियोजनाला महत्त्व द्या. बँकेची कामे मार्गी लागतील. मनासारखी गोष्ट न घडल्यास नाराज होऊ नका. निर्णय डोळे उघडे ठेवून घ्या. ज्येष्ठांचे म्हणणे टाळून निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता आहे. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. कामानिमित्ताने विदेशात जाल. कामात घाई नको.
मिथुन : नोकरीत अधिकचे कष्ट समाधान देतील. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील, कामात आरोग्याची काळजी घ्या. तरुणांच्या कष्टाचे चीज होईल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. नाती सांभाळा, वितुष्ट टाळा. मध्यस्थी करणे टाळा. संशोधन, शिक्षण क्षेत्रात यशदायी काळ. क्रीडापटूंचा गौरव होईल. कलाकारांना नव्या संधी मिळतील. कुटुंबाशी बोलताना भान ठेवा. भागीदारीत विनाकारण संघर्ष टाळा. पर्यटनासाठी विदेशात जाल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जुन्या आजारांकडे लक्ष द्या.
कर्क : भाग्य उजळणार्या घटनांमुळे कामातला उत्साह वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांना स्पर्धेत यश मिळेल. लॉटरी, सट्टा, शेअरमधून चांगला लाभ मिळेल. नोकरीत कामाशी काम ठेवा. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. व्यवसायात शब्दाने शब्द वाढवू नका. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. नवीन गुंतवणुकीच्या विचाराला गती मिळेल. कुटुंबात उत्साही वातावरण राहील. वाद टाळा. खाण्याचा अतिरेक नको. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. आर्थिक आवक चांगली राहील. विदेशात जाण्याचे योग जुळून येतील. सरकारी कामे पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे चिडचीड होईल.
सिंह : नशिबाची साथ मिळाल्याने आर्थिक बाजू चांगली राहील. शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल. दांपत्यजीवनात आनंद वाढेल. विदेशात व्यवसाय विस्ताराची चर्चा पुढे सरकून कामाच्या संधी वाढतील. कला, संगीत क्षेत्रात गौरव होईल. नवीन संधी येतील. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करा. तरुणांचा उत्साह वाढेल. प्रेमप्रकरणात काळजी घ्या. जुने मित्र भेटतील. अनपेक्षित बातमी कळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. सहलीत खवय्येगिरी करताना विशेष काळजी घ्या. व्यवसायवृद्धीसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतील.
कन्या : नवी वास्तू घेण्याचे नियोजन पुढे जाईल. व्यवहारात योग्य खबरदारी घ्या, त्यात चूक नको. व्यवसायात सबुरीने घ्या. अरे ला का रे करू नका, काम बिघडेल. कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्या. आर्थिक बाजू भक्कम होईल. थकीत पैसे आल्याने खिसा खुळखुळेल. एखादे काम पूर्ण झाले नाही म्हणून नकारात्मक विचार करू नका. सार्वजनिक ठिकाणी मत व्यक्त करणे टाळा. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. सरकारी नोकरदारांसाठी यशदायी काळ. बदलीच्या प्रयत्नांना यश मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.
तूळ : नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. अहंकार दूर ठेवा. कलाकारांना शुभवार्ता कळेल. अडकलेले काम ओळखीतून पूर्ण होईल. कायदेशीर प्रश्न सुटतील. गुंतवणूक लाभदायक ठरेल. नोकरीत आपले म्हणणे रेटू नका. मित्रमंडळींना मदत करताना विचार करा. एखादे काम बळजबरीने पुरे करण्याचा अट्टहास नको. व्यवसायात प्रगती होईल. पोथीवाचनातून शांती मिळेल. घरातील कामासाठी धावपळ होईल. व्यवसायात नवीन ओळखीच्या माणसांबरोबर जपून व्यवहार करा.
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात चांगली फळे मिळतील. कामात सकारात्मकता ठेवा. नव्या संकल्पना पुढे नेताना वाढीव श्रम घ्या. मित्रांशी बोलताना काळजी घ्या. अर्थाचा अनर्थ टाळा. नातेवाईकांकडून फारशा अपेक्षा नकोत. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. नवीन गुंतवणूक करताना सावधान. विदेशात व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नांना चांगली गती मिळेल. सरकारी कामे सहज पूर्ण होतील. मुलांचे वागणे डोकेदुखी वाढवेल. त्यांच्याकडे लक्ष द्या.
धनु : आर्थिक नियोजनात लहान चूक डोकेदुखी वाढवेल. ज्येष्ठांच्या शब्दाला मान द्या. कामात काळजी घ्या. विवाहेच्छुकांसाठी उत्तम काळ. व्यवसायात कल्पकतेला वाव मिळेल. विदेशात विस्ताराच्या प्रयत्नांना यश मिळेल. मोठा निर्णय घेताना आधी कागदपत्रांची तपासणी करा. सोशल मीडियावर काळजी घ्या. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. शांतपणे विचारपूर्वक निर्णय घ्या. मन:स्वास्थ्य चांगले ठेवा, ध्यानधारणा, योगा यांना प्राधान्य द्या. व्यवसायात चढउताराचा काळ अनुभवाल. त्यामुळे आर्थिक नियोजन योग्यपणे करा.
मकर : आर्थिक बाजू चांगली राहील. येणे वसूल होईल. कामात त्रुटी नको. मुलांनी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे. नोकरी, व्यवसायात कामाचा आढावा घ्या. त्रुटी दुरुस्त करा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे लक्ष द्या. दानधर्म कराल. सावर्जनिक ठिकाणी जपून व्यक्त व्हा. अचानक धनलाभ होईल. मौजमजा टाळा. व्यवसायात उत्कर्षाचा काळ. तरुणांना, खेळाडूंना यशदायक काळ. बांधकाम क्षेत्रात उत्तम अनुभव येतील. थकीत येणी वसूल होतील. हातून समाजसेवा घडेल. आठवड्याअखेरीस अचानक खर्च वाढेल.
कुंभ : चित्रकार, लेखक, पत्रकारांसाठी चांगला काळ. घरात आनंदी वातावरण राहील. छोट्या समारंभात आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आपल्या कल्पनाच्या जोरावर यश मिळवाल. कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. प्राध्यापकांना नवीन संधी मिळू शकते. मिष्टान्नभोजनाचा योग आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. कलाकारांसाठी यशदायी काळ. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाल. सामाजिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील. मित्रमंडळांrना नाराज करू नका. त्यांच्याशी चेष्टामस्करी टाळा. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. खेळाडूंसाठी चांगला काळ.
मीन : आपलीच बाजू लावून धरू नका. महत्वाची कामे पुढे सरकतील. महिलांशी बोलताना काळजी घ्या. मनासारखी गोष्ट घडली नाही, म्हणून अडकून पडू नका. नोकरी व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल. पत्रकार, कवी, लेखक, खेळाडू, राजकारणी यांच्यासाठी चांगला काळ. शुभघटना कानी येईल. घरातले वातावरण छान राहील. पती-पत्नीने सामंजस्य दाखवावे. कोणतीही गुंतवणूक करताना जपून. धार्मिक कार्याला वेळ द्याल. तरुणांसाठी चांगला काळ. खाण्याचा अतिरेक करू नका. ध्यानधारणा, योगासाठी वेळ द्या.