• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in टपल्या आणि टिचक्या
0

□ टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाचा राजकीय वापर झाला, रश्मी ठाकरे यांनी केलेल्या पूजेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी.
■ तुम्ही मुख्यमंत्रीपदाचं कामधाम सोडून गणेशोत्सवापासून या मंडपातून त्या मंडपात सदा वणवण करत फिरताय ते भक्तिभाव उचंबळून आल्यामुळे की काय!

□ मोदींना घराणेशाही संपवायची आहे, मी पण घराणेशाहीचे प्रतीक आहे, पण ते मला संपवू शकणार नाहीत. : पंकजा मुंडे.
■ नुसता बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे हो पंकजाताई… त्यांनी घराणेशाही हा शब्द उच्चारला की तुम्ही ‘जय अमित शहा’ एवढं म्हणा! विषय कट्!

□ घरगुती ग्राहकांना यापुढे फक्त १५ सिलिंडर मिळणार.
■ १५वा संपला की गटार शोधायचं जवळचं आणि टाकायचा पाइप! गॅसच गॅस! शिजवा काय शिजवायचं ते!

□ काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायला निघालेल्या अशोक गेहलोत यांची तलवार म्यान, सोनियांची माफी मागितली.
■ काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे बंडोबा थंडोबा झाले!!

□ जपानी बुलेट ट्रेनपेक्षा स्वदेशी वंदे भारत ट्रेन अधिक वेगवान, ताशी १०० किमी वेग पकडण्यासाठी लागतात फक्त ५३ सेकंद!
■ तरी पण देशाच्या बोडक्यावर एक लाख कोटींचं कर्ज चढवून बुलेट ट्रेन येणारच… हौसच तेवढी दांडगी आहे विश्वगुरूंची.

□ भारताची अर्थव्यवस्था ट्रिलियन्समध्ये जाईल. पण माझ्यासारखा भिकारी त्याच्यात काहीच करू शकणार नाही : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.
■ राज्यातल्या सगळ्या भिकार्‍यांची ‘आमचं घर’ म्हणून राजभवनासमोर रांग लागेल हो अशाने! द्याला का त्यांना तुमच्या ‘झोपडी’त जागा?

□ ९० दिवसांत मुंबईचा कायापालट करू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जिंकवून आणण्याची सुपारी पूर्ण केलीच पाहिजे… नाहीतर शोभेचं मुख्यमंत्रीपदही जाईल.

□ रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पुन्हा वाढ.
■ एक दिवस गृहकर्ज घेतलेले लोक वैतागून घरं विकायला सुरुवात करतील तेव्हा अर्थव्यवस्थेचं कायमचं बंबाळं वाजेल!

□ शिवसेनेचा दसरा मेळावा एकच… शिवतीर्थावरच : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
■ तोतयांचा दसरा मेळावाही एकच… तो एकदाच होणार… पुढच्या दसर्‍याला टांगा पलटी, घोडे फरार झालेले असणार…

□ दांडिया आणि गरब्यासाठी लाऊडस्पीकरची गरज नाही : हायकोर्टाचे परखड मत.
■ ते दांडिया आणि गरब्याचा गदारोळ संपेपर्यंत कोणाच्याही कानावर पडायचे नाही, नंतर पडून उपयोगाचे नाही…

□ पंतप्रधानांकडून फाइव्ह-जी सेवेचा शुभारंभ.
■ आता भाजपच्या आयटी सेलचा बनावट बातम्यांचा कचरा तुमच्या मोबाइलमध्ये पोहोचणार आणखी वेगाने!

□ टक्केवारीसाठी प्रकल्पांची अडवणूक नको : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ ते काय ते वरती सेटिंग होऊन जाईल, तुम्ही फक्त रेटा!

Previous Post

विसरा महाग भाजी, घ्या स्वस्त फाइव्ह जी!

Next Post

टोळधाड हटवा! महाराष्ट्र वाचवा!!

Next Post

टोळधाड हटवा! महाराष्ट्र वाचवा!!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.