• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बदनाम सही, नाम तो हुआ

- तुषार शिंदे (मार्ग माझा वेगळा)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in मार्ग माझा वेगळा
0

स्थळ- पुण्यातील पत्र्या मारुती मंदिराचा चौक… आता खाऊ गल्ली म्हणून प्रसिद्ध झालेला हा परिसर… विशेष म्हणजे स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची इथे कायम गर्दी असते. याच चौकात एका कोपर्‍यातल्या दुकानावर पिवळ्या रंगात लावलेला बोर्ड जाणार्‍या येणार्‍या मंडळींचे लक्ष वेधून घेत असतो. त्या बोर्डवरील एका दाढीधारी माणसाचे चित्र खूपच लक्षवेधक… नेमके हे दुकान काय आहे हे जाणून घेण्यासाठी थेट त्या दुकानात गेलो… त्या दुकानाच्या काउंटरवर ठेवलेले कुल्हडचे कप, तिथे दरवळणारा वाफाळत्या चहाचा सुगंध, चहा पिण्यासाठी येणार्‍या मंडळींना वेगळा अनुभव देण्यासाठी तिथे सुरु असणारी जुनी-नवी हिंदी गाणी… सकाळपासून, संध्याकाळपर्यंत दुकानाच्या बाहेर चहाचा आस्वाद घेण्यासाठी असणारी तरुणाईची गर्दी… त्यामुळे अल्पावधीत ही जागा नावारूपाला आली आहे… तर ही आहे तुषार शिंदे आणि अभिषेक कुलकर्णी या दोन कॉम्प्युटर इंजीनियर तरुणांनी नोकरी सोडून वेगळा मार्ग निवडून एकत्र येत हट के स्टाइलने सुरु केलेल्या ‘बदनाम चाय’ नावाच्या दुकानाची गोष्ट… ओव्हर टु तुषार शिंदे…

अशी झाली सुरुवात

माझे लहानपण बुलढाण्यात गेले. तेव्हा पाचवीपर्यंतचे शिक्षण बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये पूर्ण केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादमधील देवगिरी कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर कॉम्प्युटर क्षेत्राकडे ओढा आल्यामुळे २०१५ ते १८ या तीन वर्षांच्या कालावधीत नागपूरच्या एनआयटीमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. शिक्षण सुरु असतानाच आपण एखादा व्यवसाय सुरु करावा, अशी इच्छा मनात निर्माण झाली होती. त्यामुळे त्या कॉलेजमध्ये शिकणार्‍या तीन मित्रांना हाताशी धरले आणि चौघेजण एकत्र येऊन ऑरगॅनिक फळभाज्या पुरवणारी एक कंपनी सुरु केली. तेव्हा नागपूरच्या आजूबाजूला असणार्‍या शेतकर्‍यांबरोबर या ऑरगॅनिक भाजीपाल्याचा पुरवठा करण्यासाठी करार केला. या माध्यमातून पहिल्या व्यवसायाची सुरवात केली. तेव्हा, नागपूर शहराच्या परिसरात या भाजीपाल्याचा पुरवठा आम्ही करत होतो. त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. यासाठी आम्ही वेबसाईट, अ‍ॅप, ऑनलाइन, ऑफलाइन प्लॅटफॉर्म याचा वापर करत होतो. व्यवसाय चांगला सुरु होता, त्यामधून थोडा बहुत फायदा देखील मिळत होता. तेव्हा शिक्षण सुरु होते त्यामुळे मला या व्यवसायाचा विस्तार कसा करायचा, त्यासाठी आवश्यक असणारा फंड कसा जमा करायचा याचा अनुभव नव्हता. कालांतराने या व्यवसायात हळूहळू तोटा होण्यास सुरवात झालीr. त्यामुळे हा तोटा वाढण्याच्या अगोदर तो बंद केलेला बरा असा विचार करून आम्ही तो व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. हा व्यवसाय सुरू असतानाच पदवीच्या तिसर्‍या वर्षाला असताना नागपूरच्या लक्ष्मीनगर भागात एका फ्लॅटमधून- जिथे आमची राहण्याची जागा होती- तिथेच ऑफिस उघडत एक सॉफ्टवेअर कंपनी सुरु केली होती. पण तिला देखील अपेक्षित यश मिळत नव्हते, कामे मिळत नव्हती. त्यामुळे हा प्रोजेक्ट देखील आम्हाला गुंडाळावा लागला होता. आमच्या चार मित्रांपैकी दोघेजण नोकरीसाठी हैद्राबादला, एकजण पुण्याला गेला.
व्यवसायातल्या तोट्यामुळे मी देखील तेव्हा आमच्या कॉलेजमधून बाहेर पडलेल्या एकाने सुरु केलेल्या कंपनीत डिझायनर म्हणून नोकरी सुरू केली. पहिलीच नोकरी होती, त्यामुळे पगार देखील १५ हजारापर्यंत हातात पडत होता. व्यवसाय सुरु करण्यासाठी तेव्हा काही कर्ज काढले होते. या पगाराच्या रक्कमेतून ते फेडले. घरातल्या मंडळींनी ते भरण्यासाठी काही मदत केली.

उच्च शिक्षणाची सुरुवात

नागपूरमध्ये नोकरी सुरु असतानाच घरातल्या मंडळींनी तू आता व्यवसायाच्या भानगडीत पडू नकोस, उच्चशिक्षण घे आणि नोकरी कर असा सल्ला दिला. त्यामुळे मी गेट परीक्षेची तयारी सुरु केली. ती परीक्षा दिली आणि भारतात ३७वी रँक मिळाली त्यामुळे मला कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.टेक करण्यासाठी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळाला. उच्चशिक्षण पुरे केले आणि एका फ्रेंच कंपनीत डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळाली. कंपनी चांगली होती, त्यामुळे वर्षाला २० ते २२ लाख रुपये पॅकेज मिळाले होते. नोकरी सुरु असतानाच मध्ये मध्ये बिझनेसचा विचार डोक्यात घोळायचा. पण पुढे काही व्हायचे नाही. त्या कंपनीत अडीच वर्ष नोकरी केली असेल. त्यानंतर हायपर सॉनिक या कंपनीची ऑफर आली, तिथे मॅनेजर म्हणून नोकरी केली. कंपनी बंगलोरची होती आणि वार्षिक पॅकेजही ३० लाख रुपयापर्यंत दिले होते. त्यामुळे सगळे उत्तमरीत्या सुरू होते.
कोविडची दुसरी लाट आली, तेव्हा सगळेच चित्र बदलले. आपण समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने औरंगाबादमध्ये मी वी केअर नावाने एक एनजीओ सुरु केली. कोविडच्या रुग्णांना जेवणाचा डबा पोहचवणे, अशासारखे उपक्रम सुरु केले. नोकरी सांभाळून काही मित्रांना एकत्र करून हे काम करत होतो. या कामासाठी दिवसातले आठ तास द्यायचो.

असा सुचला चहाचा व्यवसाय

२०२१ मध्ये कोविडची लाट ओसरली, तेव्हा आम्ही ग्रुपने कधी कधी चहा पिण्यासाठी जायचो. काहीतरी हटके व्यवसाय करावा, असा किडा डोक्यात घोळत होता. आत्तापर्यंत केलेल्या व्यवसायात अपयश मिळाले होते. आपण वेगळे काहीतरी करायला गेलो की फसतोय, हे लक्षात आले होते. त्यामुळे आता तसे न करता आपल्या डोळ्यासमोर जे व्यवसाय सुरु आहेत त्यामधलाच एक निवडायचा आणि तो करायचा, असे ठरवले. व्यवसायाचा शोध घेत असताना डोळ्यासमोर आला तो चहावाला… चहाच्या ठेल्यावर चांगली गर्दी असते… चांगल्या चवीचा चहा पिण्यासाठी लोक नवीन जागा शोधात असतात. आपण देखील हाच व्यवसाय वेगळ्या पद्धतीने केला तर त्यामध्ये यश मिळू शकेल, असा आत्मविश्वास वाटत होता. त्यामुळे चहाचा धंदा करून पाहू, म्हणून प्रयत्न सुरु केले.
औरंगाबादमधील कॅनॉट प्लेस भागात खाण्याची दुकाने आहेत, तिथे चांगली गर्दी असते. त्यामुळे याच भागात दुकान सुरु करायचे ठरवले. त्या ठिकाणी एक भाड्याची जागा उपलब्ध होती. ती मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. ती जागा मिळावी, म्हणून मी त्या जागा मालकांना दररोज फोन करत होतो. पण त्यांच्याकडून आज, उद्या असे सुरु होते. अखेरीस हो नाही हो नाही करत त्याला अखेर मुहूर्त मिळाला आणि ती भाड्याची जागा मिळाली.
चहाचा व्यवसाय करायचा हे नक्की झाले होते, पण त्याचे नाव काय ठेवायचे हे काही ठरत नव्हते.

घरच्या मंडळींना चेष्टा वाटली

दरम्यान, माझ्या डोक्यात पुन्हा एकदा व्यवसायाचे खूळ घुसले आहे, हे घरच्यांना समजले तेव्हा त्यांना ती चेष्टा वाटली होती. मी चहाचा व्यवसाय करणार असल्याचे समजले, तेव्हा ते म्हणाले, तू चहाचा व्यवसाय काय करतोयस? दुसरा कोणता तरी व्यवसाय कर.. तू चहाचा व्यवसाय करशील तर नातेवाईकांमध्ये नाव बदनाम होईल. हा संवाद माझ्या डोक्यात बसला. त्यामधला ‘बदनाम’ हा शब्द माझ्या चांगला लक्षात राहिला आणि याच नावाने आपण चहाचा व्यवसाय सुरु करण्याचे निश्चित केले.

मसाल्याचा फॉर्म्युला…

चहाचा व्यवसाय सुरु करण्याचे पक्के केले तेव्हा आपल्या चहाचा फॉर्म्युला, मसाला कसा करायचा याचे संशोधन सुरु केले होते. जवळपास दीड महिना मसाला तयार करण्याचा कार्यक्रम अव्याहत सुरु होता. सुरवातीला काजू, बदाम टाकून मसाला तयार केला. पण तो काही आवडला नाही. लवंग, इलायची अशा अनेक गोष्टींचा वापर करून चहाचे मसाले तयार करत होतो, पण काही केल्या आम्हाला अपेक्षित असणारा फॉर्म्युला काही फिट होत नव्हता. चहाच्या दुकानाच्या उद्घाटनाचा दिवस येऊन ठेपला होता, त्याच्या आदल्या रात्री आम्हाला मसाल्याच्या फॉर्म्युला सापडला. ‘बदमान चाय’च्या पहिल्या आउटलेटच्या उद्घाटनाच्या दिवशी चहाप्रेमी मंडळींची चांगली गर्दी होईल, असा विश्वास होता. पण त्या दिवशी औरंगाबादमध्ये संध्याकाळी सहा वाजता सुरु झालेला पाऊस रात्री साडेदहा वाजेपर्यंत नॉनस्टॉप पडत होता. त्यामुळे आमचा मूड गेला…
दुसर्‍या दिवशी हळूहळू चहा पिण्यासाठी मंडळी येऊ लागली. आम्ही त्या आऊटलेटवर किशोरकुमारची गाणी लावण्यास सुरवात केली. हळूहळू ती गाणी ऐकण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी लोक तिथे येऊ लागले. कालांतराने छोटेखानी बुकफेअर, जुने कपडे दान करण्याचा उपक्रम राबवण्यास सुरवात केली, त्यामुळे आपसूकच तिथे गर्दी वाढू लागली. विशेष म्हणजे तरुण मंडळींना ही जागा विशेष भावू लागली, आपली वाटू लागली.
‘बदनाम चाय’ नावाची संकल्पना तरुण मंडळींना अपील करणारी ठरली आहे, ती त्यांना आपली वाटत आहे. सध्या पुण्यात आणि औरंगाबादमध्ये चार ठिकाणी आउटलेट सुरु झालेली आहेत. इथे मिळणार्‍या ‘बदनाम चहा’ची किंमत आहे दहा रुपये. याखेरीज इथे चॉकलेट चहा, इलायची चहा, गुळाचा चहा असे प्रकार उपलब्ध आहेत. इथले वैशिष्ट्य म्हणजे इथे चहा देण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर केला जातो आणि ग्राहकांना तो कुल्हडमधून दिला जातो. बदनाम चहाची चव तरुण मंडळींबरोबरच आबालवृद्धांच्या जिभेवर उतरली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या या चहाला आता कानपूर, अलाहाबाद, हैद्राबाद, सुरत या ठिकाणाहून मागणी येऊ लागली आहे. या व्यवसायाचा विस्तार करण्याचे ध्येय आहे, पण ते टप्याटप्याने… भविष्यात हा चहा विदेशात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

शब्दांकन – सुधीर साबळे

Previous Post

मंगेशकर-ठाकरे ऋणानुबंध!

Next Post

म्युच्युअल फंडांतून प्रत्यक्षात मिळालेला लाभ

Related Posts

मार्ग माझा वेगळा

अपयशातून यशाकडे झेप

September 22, 2022
मार्ग माझा वेगळा

माझे विश्व…

July 28, 2022
मार्ग माझा वेगळा

सेंद्रिय शेतीतील मार्केटिंग

July 1, 2022
मार्ग माझा वेगळा

वाढलेल्या वजनाने दाखवली व्यवसायाची दिशा

June 16, 2022
Next Post
म्युच्युअल फंडांतून प्रत्यक्षात मिळालेला लाभ

म्युच्युअल फंडांतून प्रत्यक्षात मिळालेला लाभ

डेडलाइन सांभाळून, झपाटून काम करणारे नंदकुमार टेणी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.