अमृता फडणवीस
माझेच मला नवल वाटते
हल्ली मला काय काय सुचते
वाण नाही पण गुण लागला
देवेंद्राची साथ असते
महात्मा गांधी झाले जुने
आत्ता मोदी दुसरे गांधी
माझ्या मनात घोळतेय आणखी
गोडसेंनाही द्यावी का संधी
म्हणजे फिट्टमफाट होईल
वरती दोघे मिठ्या मारतील
माझी कल्पनाशक्ती पाहून
रामदेव बाबा गालात हसतील
—– —– —–
चंद्रकांतदादा पाटील
डोक्यापासून पायापर्यंत
शाईप्रुफ घालतोय शिल्ड
बघतोय कोण फेकतोय शाई
सर्वांगावर लावलीय फिल्ड
फक्त शाईबाई सोडून
आपण कुणाला घाबरत नाय
आहे कुणाची हिंमत लेको
एका नाकात दोन दोन पाय
आम्ही सगळेच आहोत कठोर
नाही कधीच मागत क्षमा
चुकले असले नसले तरीही
जनतेलाच बनवतो मामा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
महागाईच्या मोर्चापासून
मला सगळेच नॅनो दिसते
सीएम साहेबांचे डोके म्हणजे
विझत चाललेली मॅचबॉक्स वाटते
घरी गेल्यावर अमृता म्हणजे
भातुकलीतील बार्बी वाटते
मी स्वत:ला आरशात पाहातो
समोर इंचभर रेष पुटपुटते
अशी कशी दिव्य दृष्टी
प्राप्त झाली आता मला
अंजन घातले कुणी डोळ्यात
लपून गेलो गोहातीला
—– —– —–
निर्मला सीतारामन
बजेट म्हणजे रेसिपीच असते
कित्ती आकडे डिशमध्ये असतात
प्रमाण कमी जास्त झाले तर
चव गेल्यावर पीएम बिघडतात
भरपूर असतात खानसामे
मला मदत करण्यासाठी
तरी लुडबूड असते माझी
अर्थाला चव येण्यासाठी
पीएम म्हणतात घाल तू मसाला
तोंड पोळून दे महागाईने
आतापर्यंत तेच मी केले
घाम फुटलाय बजेट वाचनाने
—– —– —–
अमित शहा
फडणवीस-शिंदे का घाबरता
बोम्मई अण्णा आपलाच अॅक्टर
सीमाप्रश्न तसाच ठेवू
सुप्रीम कोर्टाचा तो तर फॅक्टर
लांडीलबाडीत इतका हुशार
म्हणूनच त्याला केला सीएम
तुमचा दाढीवाला अगदीच शामळू
ओठांना लावून बसतो की गम
फडणवीस तुम्ही करा आवाज
तेवढीच तुमची दिसेल वट
सीमाप्रश्न सोडवूच सांगून
जनतेकडे मागा की वोट