• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

भिक्षुकशाही पिळवणुकीचा साक्षात्कार

- सचिन परब (प्रबोधन-१००)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 4, 2022
in प्रबोधन १००
0

राजवाडे प्रकरणावर व्याख्यानं देण्यासाठी प्रबोधनकार छोट्या गावांपर्यंत पोचले. तिथे त्यांना बहुजन समाजाची होणारी पिळवणूक दिसली. त्यामुळे ते ब्राह्मणेतर चळवळीकडे आकर्षून घेतलं.
– – –

`कोदंडाचा टणत्कार अथवा भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी!` या ग्रंथातून प्रबोधनकारांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या ब्राह्मणी इतिहासलेखन पद्धतीला जोरदार धक्का दिला. त्यांनी नव्या दृष्टिकोनाच्या इतिहासलेखनाची झलकही याच पुस्तकातून दाखवून दिली. या पुस्तकाने राजवाड्यांच्या इतिहासातलं जातवर्चस्ववादाचं ढोंग उघडं पाडलं होतं. त्याला भरभक्कम लोकप्रियताही मिळाली. प्रबोधनकारांचं धाडस अपूर्व असल्यामुळे इतिहास संशोधकांमध्येही याची चर्चा घडत राहिली. राजवाडेंची मांडणी चुकीचं असल्याचं विविध पातळ्यांवर सिद्ध करून दाखवण्यातही प्रबोधनकार यशस्वी ठरले.
दुसरा कोणताही इतिहास संशोधक असला असता तर तो आपल्या लेखनाच्या या यशामुळे समाधानी झाला असता. पण प्रबोधनकार फक्त संशोधक नव्हते तर कार्यकर्तेही होते. लोकांवर झालेला अन्याय बघून त्यावर फक्त लेखणी चालवून शांत बसणार्‍यातले ते नव्हते. त्यांनी त्यांच्या पुस्तकातला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी कंबर कसली. जहाल लेखनशैलीबरोबरच त्यांनी त्यापेक्षाही तिखट अशी वक्तृत्वशैलीही विकसित केली होती. तिच्या जोरावर त्यांनी राजवाडे प्रकरणाच्या निमित्ताने जागृती करण्यासाठी जाहीर व्याख्यानं देत महाराष्ट्रभर दौरा केला.
नाटक कंपनीच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पायाखाली घातला होताच. गावोगाव फिरणं त्यांना नवीन नव्हतंच. पण आता त्याला दिशा मिळाली होती. लोकांना त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी आता त्यांना फिरायचं होतं. त्यासाठी ते नागपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती अशा विदर्भाच्या मुख्य शहरात पोहोचलेच. शिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर ते बेळगावपर्यंतही त्यांची तोफ धडाडली. त्यांच्या जाहीर व्याख्यानांना अर्थातच तुडुंब प्रतिसाद मिळत होता.
इतिहासाच्या स्वार्थी विद्रूपीकरणावर स्पष्टपणे बोलणारे विद्वान त्यावेळी नव्हतेच. इतिहासाच्या नावाखाली गुलामी कशी बिंबवली जाते, ते प्रबोधनकारांच्या निमित्ताने पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे व्याख्यानांमधून सांगत होतं. त्यांची शैली प्रभावी होतीच. कुणालाही नामोहरम करण्याची धार त्यांच्या शब्दांत होती. वादविवादात कुणाला हार जाण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे बहुजन समाजातले लोक त्यांच्या भाषणांमुळे भारावून गेले नसते तरच नवल. प्रबोधनकार सांगतात तसं या व्याख्यानांच्या निमित्ताने त्यांचा शेकडो ब्राह्मणेतर बांधवांशी ऋणानुबंध जुळला. विशेष म्हणजे, ते या निमित्ताने फक्त छोट्या मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित राहिले नाहीत. शहरांमध्ये त्यांची भाषणं ऐकणारे बहुजन समाजातले लोक आसपासच्या गावांमध्येही व्याख्यानं आयोजित करत. त्यात ते सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक पुनरुत्थानाविषयी बोलले.
या निमित्ताने प्रबोधनकारांचा महाराष्ट्रातल्या छोट्या गावांशी पहिल्यांदाच जवळून संपर्क आला. तोवर ते मुंबई आणि पनवेल इथेच राहिले होते. नाटकांसाठी आणि इतरही नोकरीधंद्यासाठी ते प्रामुख्याने शहरांमध्येच गेले होते आणि प्रामुख्याने पांढरपेशा लोकांपुरतंच त्यांचं अनुभवविश्व मर्यादित होतं. आता मात्र त्यांना मिळणारा अनुभव वेगळा होता. ते लिहितात, `याच दौर्‍यात मला बहुजन समाजाच्या हलाखीचा आणि भिक्षुकशाही पिळवणुकीचा साक्षात्कार झाला. शहरातील रूढीचा धिंगाणा संभावितपणाच्या सफेदीखाली फारसा दिसत नसला, तरी तालुक्यांच्या नि खेड्यांच्या ठिकाणी रूढीचे बंड जबरदस्त चालू असे.` मुंबईतल्या महानगरी वातावरणात जातींच्या नावाने चालणारा अन्याय नव्हता असं नाही. पण इथे स्वतःच्या उन्नतीच्या खूप संधी उपलब्ध असल्यामुळे त्याचा विखार जाणवत नव्हता. पण प्रबोधनकार मुंबई सोडून खेडोपाडी फिरू लागताच, त्यांना जातीभेदामुळे होणारा अन्याय स्पष्ट दिसू लागला.
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत पाहिलेली सामाजिक परिस्थिती प्रबोधनकारांनी अशी वर्णन केलीय, `शिक्षणाचा अभाव असल्यामुळे गावचे कुळकर्णी, मारवाडी, सावकार, वकील, व्यापारी शेतकर्‍यांना पिळून मळून काढण्यात बेदरकार बनलेले. त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत चालत नसे. कोठेही जा, जो भेटेल तो कोर्टाच्या तारखांच्या तारांच्या भेंडोळ्यात गुरफटलेला. गावकीची भांडणे, जमीनदाव्यांची भांडणे, कुळकटीच्या कटकटी ठिकठिकाणी सारख्या चाललेल्या. अस्पृश्यांच्या हालांची तर परमावधी. शिवाय, त्यांच्या त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठतेचे झगडे.`
प्रबोधनकार लिहितात की त्या काळात मुंबईच्या लोकांना असं शोषण महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमध्ये सुरू असेल याची कल्पना स्वप्नातही येणं अशक्य होतं. त्यामुळे कोणी या अन्यायांमुळे होणारी हलाखी आपल्या भाषणं किंवा लेखनातून वर्णन केली, तर ती खोटी किंवा अतिशयोक्त मानली जात असे. प्रबोधनकार सांगतात त्यानुसार आणखी वाईट म्हणजे `शहरी शहाणे त्यालाच वेड्यात किंवा ब्राह्मणद्वेष्ट्यांत काढून मोकळे व्हायचे.` कुणी ब्राह्मणद्वेष्टा असल्याचं सांगितलं की त्याला वेगळं खोटं ठरवावं लागत नसे. आजही लागत नाही. त्यामुळे वास्तव सांगूनही बहुजन समाजातल्या शिक्षितांना खोटं ठरवणं सोपं होतं. सामाजिक सुधारणांच्या चळवळी त्या काळात प्रामुख्याने शहरांमध्येच सुरू होत्या. पण प्रबोधनकारांनी लिहिलंय की शहरी लोकांना अशा सामाजिक सुधारणांची खरं तर काही गरजच नसते. परिस्थिती बदलते त्यानुसार शहरातली माणसं आपोआप बदलत जातात. त्यामुळे प्रबोधनकारांना त्या काळात सर्वाधिक आवश्यकता वाटली ती मागासलेल्या बहुजन समाजाच्या सर्वांगीण जागृतीची.
प्रबोधनकारांना अपेक्षित असलेलं काम ब्राह्मणेतर चळवळ करत होती. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या परिसरांत काही ठिकाणी या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी चालवलेल्या उपक्रमांकडे प्रबोधनकारांचं लक्ष वळलं. प्रबोधनकार सांगतात तसं या चळवळीने त्यांना आकर्षूनच घेतलं. प्रबोधनकार स्वतः चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातले. त्यामुळे त्यांना त्या अर्थाने जातीय पिळवणुकीचा तसा फटका बसला नव्हता. तरीही त्यांना ही परिस्थिती महत्त्वाची वाटली. त्याचं कारण सांगताना ते लिहितात, `कायस्थ प्रभू जमात किती झाली तरी पिढ्यान पिढ्यांची राजकारणी, कर्तबगार आणि विशेष म्हणजे बोलकी (आर्टिक्युलेट). सरकार दरबारी वजन नि अधिकारी असलेली. त्यांच्यावरही जेव्हा कंपूवाले शहरी ब्राह्मण मन मानेल ते जाहीर आक्षेप घेऊन बदनाम करण्याचा हिय्या करतात. तर निरक्षर आणि मुक्या बहुजन समाजांवर काय कहर उसळत असेल, याची सहज कल्पना करता येण्यासाठी होती.` कायस्थ प्रभूंवर झालेल्या निराधार आरोपांची उत्तरं प्रबोधनकार व्याख्यानांमधून देत होते. पण ज्या समाजांचा कैवार घेण्यासाठी प्रबोधनकारांसारखा संशोधक, अभ्यासक, वक्ता अथवा लेखकच नव्हता, त्यांच्यावरचे आरोप खरेच मानले जात होते. तो समाजही ते खरं मानून स्वतःचा स्वाभिमान खच्ची करून घेत होता. कायस्थ प्रभूंसारख्याच सुशिक्षित असणार्‍या आणि सामाजिक उतरंडीवर वरचं स्थान असणार्‍या दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत, शुक्ल यजुर्वेदी (पळशे) आणि मराठा यांच्यावरही ब्राह्मणी संशोधक निराधार आरोप करत असल्याचं प्रबोधनकारांनी नोंदवलंय. त्या आक्षेपांना जाहीरपणे उत्तर देण्यात काही तरूण पुढे आलेही होते. पण यांच्यापैकी कुणाच्याही हातात वर्तमानपत्रं नव्हती, ही परिस्थिती देखील ते आवर्जून सांगतात. माध्यमं हातात असणारे आताही खोट्याचं खरं करून सांगतात, तसंच तेव्हाही घडत होतं.
मुळात ब्राह्मणेतर चळवळ ही महात्मा जोतिबा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा नवा अविष्कार होती. भटी सावकारशाहीचा फास बहुजनांना कसा नेस्तनाबूत करतोय, हे जोतिबांनी आधीच सांगून ठेवलं होतं. ब्राह्मणी पिळवणुकीच्या विरोधातला तो आधुनिक भारतातला पहिला विद्रोह होता. `शेतकर्‍याचा असूड`मधे त्यांनी बहुजनांच्या हलाखीचं कारण हे जातिव्यवस्था असल्याचा सिद्धांत मांडला.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नीतिविना गती गेली, गतीविना वित्त खचले
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले
या जोतिबांनी मांडलेल्या सूत्रात फक्त शिक्षण नसल्यामुळे शूद्रांची अवनती झाल्याचा एक वरवरचा निष्कर्ष काढला जातो. पण त्यापुढचं त्यांनी केलेलं विवेचन समजून घेतलं तर लक्षात येत की जातिव्यवस्थेने शूद्रांकडून शिक्षण तर हिरावून घेतलंच, पण व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्यही संपवलं, त्यातून शूद्र रसातळाला गेल्याचं जोतिबांना सांगायचंय. हे सगळं प्रबोधनकारांनी स्वतः गावोगाव फिरताना पाहिलं आणि तेही जोतिबांनी सांगितलेल्याच निष्कर्षाला पोचले. प्रबोधनकारांनी हा निष्कर्ष एका वाक्यात सांगितलाय. तो म्हणजे, `ब्राह्मणेतर समाजाची पहिली गरज एकच, भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता.` प्रबोधनकारांनी केलेलं वाचन, डोळे उघडे ठेवून केलेली निरीक्षणं, समाजस्थितीची स्वतंत्र चिकित्सा, यामुळे ते या निष्कर्षाला आले नसते तरच नवल. कारण तेच वास्तव होतं. पण हे काम सोपं नसल्याची जाणीव त्यांना होती.
बहुजनांच्या जागृतीचं काम करताना, भिक्षुकशाहीची चिंधड्या उडवताना आपल्याला लोकप्रियता मिळणार नाहीच, उलट छळाला सामोरं जावं लागेल, हेही त्यांना माहीत होतं. त्या सगळ्याची तयारी ठेवून त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. तेव्हा त्यांची मनोवस्था वर्णन करताना त्यांनी लिहिलंय, ते बहुजन समाजातल्या प्रत्येक समाजसुधारकाने आपल्या मनावर कोरून ठेवायला हवं.
प्रबोधनकार लिहितात, `लोकप्रियतेचा मोह दहा योजने दूर लाथाडून केल्याशिवाय ते साधणारे नव्हते. लोकांचे काय, आज ज्याला ते डोक्यावर घेऊन नाचतील, त्यालाच ते उद्या लाथाडतील. ज्याचा एकदा ते मनस्वी छळ करतील, त्याचाच आणखी दोनतीन पिढ्यांनी महात्मा म्हणून उदो उदो करतील. म्हणून ज्याला काही समाजकार्य करायचे असेल, त्याने प्रथम लोकमताच्या बागुलबुवाचा मनोमन पक्का बंदोबस्त करावा लागतो.`
या विचारांपर्यंत पोचण्यासाठी त्यांना त्या काळातले आघाडीचे समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या विचारांचा आधार मिळालेला दिसतो. त्यांची पुस्तकं वाचताना प्रबोधनकारांना समाजसुधारकांना उपयुक्त ठरेल असं एक सूत्र सापडलं होतं. ते त्यांनी आपल्या लिखाणात वारंवार वापरलं. बहुजन समाजाला जागं करताना आपल्याला मलबारी सांगतात, भोगावं लागेल, याची जणू खूणगाठच त्यांनी बांधली होती. मलबारियांचं ते सूत्र असं, `आज प्रत्येक हिंदू सुधारकाची अशी खात्री पटलेली आहे की एखादी सुधारणा प्रत्यक्ष घडवून आणण्याच्या कामी स्वतः झगडणे म्हणजे स्वतःच्या गळ्यावर सुरी फिरवून आपल्या निरपराध कुटुंबाचा सर्वनाशच करून घेण्यासारखे आहे.`
भिक्षुकशाही पिळवणुकीच्या विरोधात उभं राहणं, म्हणजे स्वतःच्या कुटुंबाच्या सर्वस्वाची होळी करण्यासारखं होतं, ही जाणीव प्रबोधनकारांना होती. त्यासाठी ते सज्ज झाले होते.

Previous Post

विपर्यास कसला, माफी मागा!

Next Post

बैलगाडीपेक्षा रिक्षा बरी होती!

Related Posts

प्रबोधन १००

`प्रबोधन’मधील श्रीधरपंत टिळक

May 8, 2025
प्रबोधन १००

खरा लोकमान्य

May 5, 2025
प्रबोधन १००

सहभोजनाची क्रांती

April 25, 2025
प्रबोधन १००

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

April 11, 2025
Next Post
बैलगाडीपेक्षा रिक्षा बरी होती!

बैलगाडीपेक्षा रिक्षा बरी होती!

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.