□ सुपार्या घेऊन प्रकल्प लादू पाहताय, ते होऊ देणार नाही – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
■ सुपार्या कातरून हातात देतील शिवसैनिक!
□ भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे – शरद पवार.
■ गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे हीच वेळ आली आहे, आता भाकरी जळून, करपून गेली आहे, पवार साहेब!
□ खारघर दुर्घटनेसंबंधी याचिकेची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; मिंधे सरकारच्या अडचणींत वाढ.
■ सदोष मनुष्यवधाचा अपराध दडपून दडपून किती दडपाल?
□ बारसू परिसरात दीड वर्षात १३३ परप्रांतीयांची जमीनखरेदी – विनायक राऊत यांचा आरोप.
■ म्हणून तर त्यांचे एजंट प्रकल्प रेटतायत राऊतसाहेब! आपल्याला गुजरात नंबर वन बनवायचा आहे ना!
□ ही लढाई परिवर्तनासाठी- संजय राऊत यांनी घेतली सत्यपाल मलिक यांची भेट.
■ संपूर्ण परिवर्तन होईपर्यंत ती थांबता कामा नये.
□ सत्यपाल मलिकांच्या घरी सीबीआय; पाच तास चौकशी.
■ नसती गेली तरच आश्चर्य होतं!
□ ईडीच्या कारवायांना हायकोर्टाचा लगाम; हसन मुश्रीफ यांना दिलासा.
■ तरी नव्याने नव्या ठिकाणी नव्या कारवाया करायला धावतीलच केंद्राचे भुभू!
□ मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासींना डबक्याचे पाणी.
■ हेलिपॅड पण आहे ना, ते नाही पाहणार नतद्रष्ट पत्रकार!
□ पालघरमध्ये नाल्यांवर बेकायदा बांधकामांची बजबजपुरी.
■ नाही तर नाले असतात कशासाठी?
□ भिवंडी उड्डाणपुलाखाली कचर्याचे ढीग.
■ कचरा हटवा, भिकारी तरी येऊन राहतील झोपड्या बांधून.
□ कर्नाटकात काँग्रेस निवडून आल्यास दंगली उसळतील – गृहमंत्री अमित शहा यांचे चिथावणीखोर वक्तव्य.
■ काँग्रेसला निवडून दिलंत तर आम्ही दंगली घडवू, असं म्हणतायत ते… आप क्रोनॉलॉजी समझिये.
□ भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा.
■ त्यांना सगळ्या पदांवरून हाकला, खासदारकी बरखास्त करा, किती देशाची लाज घालवाल?
□ आरटीई प्रवेशाचा पालकांना मन:स्ताप.
■ संस्थाचालक गोरगरीबांना सुखाने कसा देतील शिक्षणाचा समान हक्क. त्यासाठी झगडावेच लागेल.
□ बढत्या लटकून ठेवणार्या मिंधे सरकारचा भोंगळपणा; विनय कारगावकर यांना केवळ ४८ तासांसाठी महासंचालकपदी बढती.
■ वरिष्ठ पदावरून निवृत्तीचे फायदे मिळणार असतील, तर काही सेकंदांसाठी पद मिळालं तरी कोण नको म्हणणार आहे?
□ महापालिकेकडून कंत्राटदारांच्या बँक खात्याचे सुशोभिकरण केले जातेय – आदित्य ठाकरे यांचा मिंध्यांना टोला.
■ तिकडे सुशोभिकरण झालं की इकडे होणार ना आदित्यजी?
□ ४० गद्दारांपैकी अनेकांची मुले राजकारणात; मग हपाललेले कोण? – सुषमा अंधारे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल.
■ ताई, दुसर्यांची असते ती घराणेशाही, आपली असते ती कौटुंबिक परंपरा!
□ रेल्वेकडून अपंग प्रवाशांची कुचेष्टा; सीएसएमटी येथे एक्स्प्रेसचा डबा फलाटाला लावलाच नाही.
■ रेल्वेचा अपवाद नाही; आपला सगळाच सामाजिक व्यवहार अपंगांबद्दल जराही सहानुभूती नसलेला आहे. लोकलच्या अपंगांच्या डब्यात किती धडधाकट लोक निर्लज्जपणे चढतात ते पाहा. अपंगांना दिव्यांग म्हटलं की झाला सन्मान, असा आपला भंपक खाक्या आहे.
□ अतिक, अश्रफ यांना घेऊन जाणारे वाहन थेट रुग्णालयात का नेले नाही? सर्वोच्च न्यायालयाचा उत्तर प्रदेश पोलिसांना सवाल.
■ ते काय उत्तर देणार डोंबलाचं, हुशारीने रचलेल्या एन्काऊंटरच्या कथानकाचा स्क्रिप्टरायटर कोण आहे, हे तिथल्या चौथीतल्या पोरांनाही माहिती आहे, त्याची गचांडी सर्वोच्च न्यायालय तरी पकडू शकणार आहे का?
□ रायगडातील पर्यटनस्थळांची सुरक्षा रामभरोसे.
■ राज्यातल्या कोणत्या पर्यटनस्थळी सुरक्षा रामभरोसे नसते?