• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बेलगाम बाहुबली!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 5, 2023
in फ्री हिट
0

२१,अशोका रोड, जनपथ, संसद मार्ग क्षेत्र, नवी दिल्ली, दिल्ली ११०००१… हा पत्ता आहे देशातील एका नामांकित खासदाराचा… जो सध्या माध्यम आणि समाजमाध्यम दोन्हीकडे सर्वाधिक चर्चेत आहे… सत्ताधारी पक्षाचाच तो खासदार असल्याने (हा मजकूर लिहीत असताना त्यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याची बातमी आली आहे, पण तेवढ्याने काही होणार नाही) त्याला खुर्चीवरून दूर करणं इतकं सोपं नाही… तसा राजकारण हा त्याचा पेशा असला तरी गेली अनेक दशकं गुन्हेगारी जगताशी त्याचे संबंधही जगजाहीर आहेत. म्हणूनच ‘बाहुबली नेता’ असं त्याला संबोधल्यास वावगं ठरणार नाही. एखाद्या वेबसीरिजला साजेसाच हा असामी.
त्याच्या बंगल्यात दिवसभर समस्या आणि प्रश्न घेऊन येणार्‍या नागरिकांची रीघ सुरू असते. गेली तीन दशकं खासदार असणार्‍या या नेत्याचा हा पत्ता गेली १२ वर्षं आणखी एका संघटनेचा अधिकृत पत्ता आहे. ती संघटना म्हणजे भारतीय कुस्ती महासंघ. एक प्रकारे ही त्याची जहागिरीच. नाव तर ऐकलंच असेल… ब्रिजभूषण शरण सिंह!
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत जानेवारी २०२३मध्ये ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंच्या एका गटानं ब्रिजभूषण यांच्याविरोधात जंतर मंतर येथे रणशिंग फुंकलं. ही संघटना बरखास्त करावी आणि ब्रिजभूषण यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करून त्वरित अटक करावी, ही निदर्शकांची प्रमुख मागणी होती. या घटना गेली १० वर्षे सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. सरकारनं कोणतीही कारवाई न केल्यामुळे आंदोलनकर्ते पुन्हा सरसावले. यात विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, संगिता फोगट या देशाचं नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोशन करणार्‍या कुस्तीपटूंचा समावेश असल्यानं त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे.
काही महिन्यांपूर्वी क्रीडा मंत्रालयानं एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमली. या प्रकरणाची चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर करण्यात आला. मग समिती विसर्जित झाली. पण अहवाल जाहीर झाला नाही. महासंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली. पण कारवाई झाली नाही. त्यामुळेच कुस्तीपटूंनी पुन्हा दंड थोपटले आणि आंदोलन सुरू केलं.
खेळाडूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये, त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळते, असं अत्यंत संतापजनक आणि शहाजोग आवाहन भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आणि खासदार पी. टी. उषा यांनी केलंय. पण कुस्तीपटूंच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळतंय. या वादंगाच्या केंद्रस्थानी असलेला ब्रिजभूषण नेमका कोण? हा प्रश्न म्हणूनच ऐरणीवर येतो.
ब्रिजभूषण शरण सिंह यांचा जन्म गोंदा जिल्ह्याातला. सत्तरच्या दशकात अवध विद्यापीठाच्या विधी शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी राजकारणाची कास धरली. कुटुंबात काँग्रेसचं वातावरण असलं तरी त्यांना सुरुवातीपासून भाजपाचं आकर्षण. नव्वदीचं दशक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं. मंडल आयोगावरून राजकारण तापलेलं, तर याचवेळी राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणही तीव्र होतं. राम मंदिर रथयात्रेसह लालकृष्ण अडवाणी हे गोंदा जिल्ह्यात आले आणि ब्रिजभूषण यांचं नशीब पालटलं. मूळ चालक आजारी पडल्यानंतर ब्रिजभूषण यांना यात्रेचा एक भाग म्हणून रथ चालवण्यासाठी नेमण्यात आलं. त्यामुळे ते अडवाणी यांच्या जवळ आले. नंतर गोंदा मतदारसंघातून भाजपाकडून ते प्रथमच लोकसभेत निवडून आले आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
ब्रिजभूषण या सामर्थ्यशाली नेत्याला गुन्हेगारी पार्श्वभूमीही लाभलेली आहे. त्यामुळेच भाजपाकडून तब्बल पाच वेळा आणि समाजवादी पार्टीकडून एकदा अशा एकूण सहा वेळा ते खासदारपदी विराजमान होऊ शकले. २००४मध्ये बलरामपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकणार्‍या ब्रिजभूषण यांनी २००८मध्ये भाजपाशी काडीमोड घेत समाजवादी पार्टीशी संधान बांधले आणि २००९मध्ये त्यांच्याकडूनच केसरगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत ती जिंकलीही. २०१४मध्ये मोदी लाटेचा अंदाज घेत ते भाजपात परतले आणि पुन्हा लोकसभेवर जाण्याची परंपरा कायम राखली.
जातीआधारित व्यवस्थेमुळे आणि विकासकामांमुळे ब्रिजभूषण हे गोंदा, बलरामपूर, अयोध्या आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील मसिहा म्हणजेच पालनकर्ते म्हणून ओळखले जातात. अर्थात यासाठी त्यांची ‘मसल पॉवर’सुद्धा उपयुक्त ठरते.
ब्रिजभूषण २०११पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांची दोन्ही मुलंसुद्धा तशी चर्चेतलच. प्रतीक हा गोंदाचा भाजपा आमदार, तर करण महासंघाचा उपाध्यक्ष. १९९६मध्ये ब्रिजभूषण तुरुंगात असताना भाजपानं त्यांची पत्नी केतकी देवी सिंग यांना तिकीट दिलं. तीसुद्धा ७० हजारांच्या मताधिक्यानं निवडून आली होती. ब्रिजभूषण यांच्या गोंदा, बस्ती, बहराईच आणि अयोध्या या भागांमध्ये ५०हून अधिक शिक्षणसंस्था आहेत. नवाबगंजमध्ये त्यांनी नंदिनी नगर महाविद्यालय बांधलं. मग त्याचा एक-दीड किलोमीटर अंतरापर्यंत विस्तार केला. या महाविद्यालयाच्या सीमारेषा विस्तारतच असल्याचं म्हटलं जातं. ब्रिजभूषण यांची जमीनदारीही या भागात सर्वपरिचित आहे. असंख्य नागरिकांनी त्यांच्या जाfमनी ब्रिजभूषण यांना विकल्या आहेत. शरयू आणि घाघरा नद्यांमधून वाळूचं उत्खनन करण्यासाठी ते आपल्या प्रभावाचा वापर करतात. याशिवाय मद्याचे ठेके आणि कोळशाच्या खाणी यातही त्यांना रस आहे.
२०२१मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेप्रसंगी एका कुस्तीपटूच्या कानशिलात लगावल्याची चित्रफीत चर्चेत आलेली. पण ताज्या लैंगिक शोषण प्रकरणांमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरोधात इतका काळ हे आरोप का झाले नाहीत? तर भीतीमुळे!… हेच कारण आंदोलनकर्ते माध्यमांना सांगतात. या भीतीचं कारण स्पष्ट करायला ब्रिजभूषण यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र पुरेसं ठरतं. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, ब्रिजभूषण यांच्यावर चार प्रलंबित खटले आहेत, तर ३०हून अधिक गुन्हेगारी खटल्यांमध्ये त्यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे तुरुंगात जाण्याचं भय त्यांनी कदापि बाळगलं नाही. त्यांनी अनेक बेकायदेशीर कृत्य केली. पण राजकीय संरक्षणामुळे ते अढळ राहिले.
ब्रिजभूषण यांचा १९९२मध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्याच्या प्रकरणात सहभाग होता. ज्यामुळे त्यांना इतर ३९ जणांसह ‘सीबीआय’ने अटक केली होती. पण २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांना आरोपमुक्त केलं. ‘बाबरी मशीद पाडल्यानंतर मुलायमसिंग यांनी अटक केलेली मी या भागातील पहिलाच माणूस. तसंच सीबीआयने अटक केलेलाही मीच पहिला,’ अशा फुशारक्या ते नेहमीच मारतात.
ब्रिजभूषण यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंधसुद्धा सर्वश्रुत आहेत. दाऊद इब्राहिमच्या मेव्हण्याची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना मारण्यासाठी जे. जे. हॉस्पिटल शूटआऊटमध्ये दाऊदला सहाय्य केल्याबद्दल १९९६मध्ये ब्रिजभूषण यांना ‘टाडा’ लावून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. १९९९मध्ये त्यांची या प्रकरणातून सुटका झाली होती. गेल्या वर्षी ‘द लल्लनटॉप’ या वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजभूषण यांनी आपला घनिष्ठ मित्र रविंदर सिंगला गोळ्या घालून ठार मारणार्‍या व्यक्तीची हत्या केल्याची कबुली देत खळबळ माजवली होती. गतवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केल्यानंतर ब्रिजभूषण यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच अयोध्येत पाऊल ठेवा, असा इशारा दिला होता.
पक्षाकडून तिकीट मिळो अथवा न मिळो, आपणच इथले खासदार, हा ब्रिजभूषण यांचा सरळ फंडा आहे. सहावेळा सलग खासदारकी मिळवल्यामुळे ते स्वत:ला पक्षापेक्षा मोठा समजतात, हा आरोप त्यांच्यावर खासगीत केला जातो.
ब्रिजभूषण यांचे पराक्रम काही वेळा भाजपालाही अडचणीचे ठरले. २००९मध्ये भाजपाचे खासदार असताना अणुकराराच्या विश्वासदर्शक ठरावाप्रसंगी त्यांनी काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या बाजूनं मतदान केलं होतं. याचप्रमाणे बाबा रामदेव यांना ‘भेसळखोरांचा राजा’ संबोधलं होतं. याशिवाय उत्तर प्रदेशमधील आदित्यनाथ सरकारच्या पूर नियोजनावर तोफ डागताना त्यांनी कसलीही तमा बाळगली नाही. जनतेचं आदित्यनाथ यांना काहीच घेणंदेणं नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचं म्हटलं जातं आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर ब्रिजभूषणसारख्या लोकप्रिय नेत्याची नाराजी ओढवून घेणं भाजपाला परवडणारं नाही. त्यामुळेच हे प्रकरण पुढे कोणता रंग दाखवते, हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

[email protected]

Previous Post

रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Related Posts

फ्री हिट

एशियाडमध्ये छोटे शेर… ऑलिम्पिकमध्ये ढेर…

September 21, 2023
फ्री हिट

प्रो-गोविंदाचे स्वागत, पण…

September 9, 2023
फ्री हिट

संकेत सरगर शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित

August 31, 2023
फ्री हिट

आनंदचा प्रज्ञावान वारसदार

August 31, 2023
Next Post

टपल्या आणि टिचक्या

रिफायनरी रेटली, बारसू पेटले!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.