ग्रहस्थिती : मंगळ मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, केतू तुळेत, रवि, बुध, हर्षल राहू मेष राशीत, शुक्र वृषभेत, गुरु आणि नेपच्युन मीन राशीत, शनि कुंभेत. विशेष दिवस : ५ मे रोजी बुद्ध पौर्णिमा, ८ मे रोजी संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय- रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी.
मेष : अनेक दिवसांपासून मनात असलेल्या गोष्टी पूर्ण होतील. अनपेक्षित धनलाभ होईल. तरुणांसाठी उत्तम काळ. व्यवसायात वृद्धी घडेल. लेखक, कवी, नाटककार, पत्रकार यांचा सन्मान होईल. घरातील किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. मन प्रसन्न होईल. अचानक खर्च वाढेल, पण आवक चांगली राहील. संततीकडे लक्ष द्या. दानधर्म कराल. नोकरीच्या ठिकाणी कौतुक होईल.
वृषभ : नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार मार्गी लागेल. विवाहेच्छुंची लग्न जमतील. नवीन ओळखींतून चांगला फायदा होईल. शेअर, जुगारापासून लांब राहा. अन्यथा मोठा फटका सहन करावा लागेल. ज्येष्ठांच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. काहींना घबाडयोग आहे. भावाचा वा बहिणीचा भाग्योदय होईल. शेती क्षेत्रात चांगले दिवस आहेत. कलाकार, गायकांना मानसन्मान लाभेल. घरातील किरकोळ कटकटींकडे लक्ष देऊ नका.
मिथुन : कुटुंबाला वेळ द्याल. नोकरीच्या ठिकाणी वाणीवर नियंत्रण ठेवा. गैरसमज निर्माण होऊ शकतो. लोखंड व्यवसायात लाभ मिळेल. खेळाडूंना यश मिळेल. पत्नीचे सहकार्य मिळेल. एखादे जुने काम झटकन मार्गी लागेल. नवा व्यवसाय करण्याच्या बाबतीत थोडे थांबून निर्णय घ्या. अन्यथा नसत्या समस्या उभ्या राहतील. उधार उसनवारी टाळा. आताची बचत भविष्यात कामाला येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
कर्क : आठवड्याची सुरुवात कंटाळवाणी होईल. अचानक खर्च वाढल्याने चिडचिड होईल. उत्तरार्ध मात्र उत्साहवर्धक राहील. रेंगाळलेली कामे अचानक पूर्ण झाल्याने आवक वाढेल. कुटुंबाला घेऊन सहल कराल. धार्मिक यात्रेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. संततीकडून उल्लेखनीय कार्य होईल. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जावे लागेल. प्रेमात वाद विकोपाला जाऊ शकतात. सावध राहा. व्यावसायिकांना उत्तम लाभ देणारा काळ आहे.
सिंह : कामाचा आवाका वाढेल. नवीन व्यवसाय, नोकरीच्या संधी चालून येतील. अनपेक्षित शुभ घटना घडेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. लेखक, कलाकारांचा सहवास मिळेल. खरेदी-विक्री एजंट, वैद्यकीय व्यावसायिक, अभियंते यांच्यासाठी उत्तम काळ. अचानक धनलाभ होईल. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. पत्नीबरोबर कुरबुर होण्याची शक्यता आहे. तुटेपर्यंत ताणू नका. मानसिक शांती ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.
कन्या : मेहनतीला फळ मिळेल. मनासारख्या घटना घडतील, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीत वादाचे प्रसंग घडतील. शब्दाने शब्द वाढवू नका. सरकारी कर्मचार्यांना चांगले दिवस आहेत. कोर्ट-कचेरीतील दावा मार्गी लागेल. करमणुकीवर पैसे खर्च कराल. उकाडा वाढल्याने उष्णतेच्या विकारांचा सामना करावा लागेल. आरोग्य सांभाळा. नवे वाहन खरेदी कराल. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल, पण वायफळ खर्च टाळा.
तूळ : आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी येईल. नोकरीत वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. रेंगाळलेला विषय मार्गी लागेल. व्यवसायात चलती राहील. नव्या ऑर्डर मिळतील. विदेशातील कामांतून चांगले लाभ मिळतील. मित्रांबरोबर वाद होऊन नात्यामध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात निर्णय घेताना सावध राहा. प्रेम प्रकरण वेगळ्या वळणावर जाईल. थोडे सांभाळून राहा.
वृश्चिक : कामात आळस जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी आनंददायी बातमी कानावर पडेल. नोकरी-व्यवसायात हेका चालवू नका. शत्रूच्या कारवायांवर नजर ठेवा. घरात सबुरीने घ्या. आर्थिक बाजू चांगली राहील. अवास्तव खर्च नकोच. सामाजिक कामासाठी भरपूर वेळ द्याल.कर्ज झटपट मंजूर होईल. प्रवासात अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद टाळा. फसवणूक होण्याची शक्यता आहे.
धनू : राग उफाळून आणणार्या घटना घडतील. राग येणार नाही असेच वर्तन ठेवा. म्हणजे मनही शांत राहील. या आठवड्यात मानसिक स्वास्थ्य खराब होईल. सकारात्मक राहा. मन शांत ठेवा. त्यासाठी खास उपाययोजना म्हणून योगा, ध्यान याकडे लक्ष द्या. व्यवसाय-नोकरीबद्दल घाईने निर्णय करू नका. आप्तेष्टमित्रांशी सल्लामसलत करूनच पुढचे पाऊल टाका. नोकरांच्या कामाकडे बारीक लक्ष ठेवा. विवाहेच्छुकांसाठी काळ चांगला राहील.
मकर : व्यवसायात मोठ्या प्रमाणात चढ-उतार जाणवतील. आर्थिक नियोजन करणे महत्वाचे राहील. वायफळ खर्च टाळा. नोकरीच्या शोधातील तरुणांना मनासारखी संधी मिळेल. शत्रूवर विजय मिळवाल. निर्णयात घाई नको. वास्तूचे प्रश्न मार्गी लागतील. गायक, कलाकारांना नव्या संधी मिळतील. कुटुंबासाठी भरपूर वेळ द्याल. नोकरीच्या ठिकाणी किरकोळ कुरबुरी होतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळून घ्या.
कुंभ : कोणतेही निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. कारण त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतीही कृती विचारपूर्वक करा. दुसरे म्हणजे आपले मत इतरांवर लादू नका. अडचणीचा प्रसंग आला तरी तो चातुर्याने सोडवा. व्यावसायिकांना आपल्या धंद्यात चांगला लाभ मिळेल. आर्थिक नियोजन करा. सामाजिक कार्यासाठी भरपूर वेळ द्याल. त्यातून नव्या लोकांची ओळख होईल, भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळेल.
मीन : शुभ घटना कानावर पडतील. जुन्या मित्रांबरोबर गेट टूगेदर होईल. घरासाठी वेळ खर्च कराल. मार्केटिंग क्षेत्रात उत्तम काळ आहे. अचानक धनलाभ होईल. शेअर, जुगार, सट्टा या माध्यमातून चांगली आर्थिक आवक होईल. संततीकडून चांगली बातमी कानावर पडेल. अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. नवी नोकरी शोधणार्यांना मनासारखी नोकरी मिळेल. कुटुंबातील मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होईल.