ग्रहस्थिती : गुरु, हर्षल मेष राशीमध्ये, बुध धनु राशीमध्ये, प्लुटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शुक्र तूळ राशीत, रवि, मंगळ वृश्चिक राशीत. विशेष दिवस : ७ जानेवारी सफला एकादशी, १० जानेवारी अमावस्या प्रारंभ रात्री ८.११ वा. ११ जानेवारी अमावस्या समाप्ती सायंकाळी ५.२७ वा.
मेष : नववर्षाची सुरुवात चांगली होईल. कामातला उत्साह वाढेल. व्यवसायात चांगल्या घटना घडतील. नोकरीत उमेद वाढेल. वरिष्ठ कामावर खूष राहतील. गुरुबळ उत्तम राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ वाढवणार्या कल्पना सुचतील. त्यांत गुंतवणूक करताना नियोजन करून पुढे जा. कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल. प्रवासात काळजी घ्या, वस्तू जपा. काहीजणांना शेअर, लॉटरीमधून धनलाभ होईल.
वृषभ : घरात आनंद वाढेल, मुलांकडून कौतुकास्पद कामगिरी घडेल. उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नववर्षाच्या सुरूवातीला युवकांच्या मनासारख्या घटना घडतील, ऊर्जा वाढेल. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. नवीन वस्तूखरेदीचे नियोजन होईल. सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या. वाहन चालवताना घाई नको. पत्रकार, लेखकांचा उत्साह वाढवणारी घटना घडेल. व्यावसायिकांकडे कामाचा ओघ वाढेल.
मिथुन : आठवड्याच्या सुरूवातीला एखादी अनपेक्षित घटना घडून कामाचा उत्साह वाढेल. व्यावसायिकांची आर्थिक बाजू तगडी होईल. एखादे मोठे कंत्राट मिळेल. मित्रमंडळी मदतीसाठी हात पुढे करतील. घरासाठी अचानक खर्च वाढेल. अडकलेली सरकारी कामे पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात डोकेदुखी वाढेल. वाद घरापर्यंत येऊ देऊ नका. खेळाडूंना स्पर्धेत यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान होईल. शैक्षणिक कामे मार्गी लागतील. खाण्यापिण्याचा अतिरेक करू नका.
कर्क : सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात काम वाढेल. वेळापत्रक बिघडेल. आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. व्यावसायिकांचे येणे वसूल होईल. नोकरीत लहानशी चूक त्रासदायक ठरेल. काहीजणांना अचानक धनलाभ होईल. कुटुंबासाठी वेळ खर्च झाल्याने मन:स्थिती विचलित होऊ शकते. महिलांशी वागता-बोलताना खबरदारी घ्या. पैशाचा वापर जपूनच करा. शांतपणे कामे मार्गी लावा. कोर्ट-कचेरीत प्रलंबित प्रश्न पुढे सरकतील. महागडी वस्तू खरेदी कराल.
सिंह : सामाजिक क्षेत्रात उत्साह व कामाचा वेग वाढेल. नववर्षाची सुरूवात चांगली होईल. मित्र भेटतील, वेळ चांगला जाईल. नोकरीत कर्तृत्व उजळेल. पुरस्कार मिळून नावलौकिकात भर पडेल. धार्मिक कार्याच्या निमित्ताने दानधर्म कराल. घरात समारंभ झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शेअर ब्रोकर, इस्टेट एजंट, शेतीविषयक उपकरणांचे व्यापारी यांना लाभदायक काळ. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. कामात अरे ला का रे करू नका.
कन्या : नव्या वर्षात आर्थिक बाजू भक्कम होण्यास सुरूवात होईल. बँकेचा व्यवहार करताना योग्य ती काळजी घेऊनच पुढे जा. नव्या व्यवसायाच्या संकल्पना सुचतील. युवावर्गाला स्पर्धात्मक यश मिळेल. प्रकाशन, जनसंपर्क क्षेत्रात नव्या संधी येतील, त्यामधून उत्कर्ष घडेल. घरातील ज्येष्ठांबरोबर वाद घडू शकतात. मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. ध्यान, योगासाठी वेळ खर्च होईल. काहीजणांच्या बाबतीत अचानक खर्च वाढवणार्या घटना घडतील. नोकरीत शक्यतो वाद टाळा. दांपत्यजीवनात शुभ घटनांचे संकेत आहेत.
तूळ : घरात शुभवार्ता कानावर पडून उत्साह वाढेल. आर्थिक बाजू उत्तम राहील. व्यावसायिकांना विदेशातून कामाची संधी मिळेल. नोकरीत कामात लक्ष द्या. मनवास्थ्य उत्तम ठेवा. शेअर, सट्टा, लॉटरीपासून दूर राहा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात काळजी घ्या. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. धारदार वस्तू हाताळताना काळजी घ्या. अभियांत्रिकी क्षेत्रात नव्या संधी मिळू शकतात.
वृश्चिक : मित्रांबरोबर वागताना-बोलताना काळजी घ्या. गैरसमजातून वाद घडू शकतात. व्यावसायिकांना जोरदार यश मिळेल. नोकरीत पगारवाढीचे पत्र हातात पडेल. नव्या कामात भरपूर कष्ट घ्यावे लागतील. गुंतवणुकीच्या प्रलोभनाला फसू नका. मौजमजा, चैनीवर पैसे खर्च करण्याकडे कल राहील. कुणाला फुकटचा सल्ला देऊ नका. कौटुंबिक जीवनात सुख मिळेल.
धनु : नोकरीत वातावरण चांगले राहील. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ पाठीवर शाबासकीची थाप देतील. हुरूप वाढेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. व्यावसायिकांची कामे रेंगाळतील. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. एखाद्या प्रश्नात नातेवाईकांकडून मदतीचा हात पुढे येईल. महिलांनी आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. तरूणांना पेचात टाकणार्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. नव्याने भागीदारीचे नियोजन पुढे ढकला. खर्च वाढतील. विवाहेच्छुकांचे लग्न जमेल.
मकर : नोकरी-व्यवसायात मानसन्मान वाढेल. नवी जबाबदारी मिळेल. नियोजन केल्यास वेळ आणि पैसे या दोन्हीची बचत होईल. मानसिक चलबिचल वाढू देऊ नका. ध्यानधारणा, मन:शांती शिबीरात मन रमवाल. बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगला काळ. कवी, संगीतकार, चित्रकारांचा मानसन्मान वाढेल. व्यवसायात थकीत येणे मिळेल. नव्या नोकरीसाठीची मुलाखत यशस्वी ठरेल. सरकारी काम्ाांत नियमांचे उल्लंघन करू नका, कायदेशीर कटकटी मागे लागतील.
कुंभ : व्यावसायिकांना यशदायक काळ. काहीजणांना अचानक धनलाभ होईल. नोकरीत थोडे सबुरीने घ्या. आपणच बरोबर आहोत, अशी भूमिका घेण्याचे टाळा. तरुणांचा उत्साह वाढवणार्या घटना घडतील, अतिविश्वास टाळा. त्यामधून वादाचे प्रसंग घडू शकतात. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न सुरू असेल तर त्याला यश मिळेल. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाणे होईल, त्यामधून मानसिक समाधान मिळेल. घरात शुभकार्ये घडतील. अडकलेली सरकारी कामे पूर्ण होतील. त्याचा वेगळाच आनंद मिळेल.
मीन : कोणत्याही कारणामुळे मानसिक स्वास्थ्य खराब होऊ देऊ नका. नव्या वर्षाची सुरूवात चांगली होईल. आगामी काळात तुम्हाला भरपूर काम करावे लागणार आहे. भरपूर धावपळ होऊ शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारे काम मध्यस्थाच्या माध्यमातून मार्गी लागेल. कागदपत्रावर सही करताना काळजी घ्या, वास्तूचे व्यवहार पुढे ढकला. भावनेमध्ये गुंतून चुकीचा निर्णय घेतला तर तो महागात पडू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवा, कामापुरतेच बोला. मुलांच्या बाबतीत एखादी शुभघटना कानावर पडेल. मामा-मावशींकडून मदत होईल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या मताचा आदर करा.