• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

    काँग्रेस कमबॅक करणार?

    विधानसभा जिंकल्या तरी लोकसभेची वाट खडतरच!

    श्रेय खेचण्याच्या हव्यासाची परिणती!

    चुनाव है तो मुमकिन है!

    चुनाव है तो मुमकिन है!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

  • भाष्य

    ‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

    कर्जबुडव्यांचे काय करायचे?

    ५०० डॉलरचे शूज!

    नाय, नो, नेव्हर…

    पत्रकार, ढाब्यावर या!

    आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

    Trending Tags

  • मनोरंजन

    लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

    मसाला चित्रपट रेसिपी

    ‘बँडिट क्वीन’ जिवंत आहे!

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मुंबई-ठाणे-नाशिकवर पुन्हा भगवा फडकला!

- योगेंद्र ठाकूर (गाथा शिवसेनेची)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 3, 2023
in गर्जा महाराष्ट्र
0

मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल २००२ सालच्या सुरुवातीला वाजले. भाजपबरोबर शिवसेनेची युती होती. तरी सर्व ताकदीनिशी या निवडणुकीत उतरण्यासाठी शिवसेना सज्ज झाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य हे की तत्कालीन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या संपूर्ण देखरेखीखाली शिवसेना प्रथम निवडणूक लढली आणि जिंकलीही.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गोरेगाव येथे न्यू स्टॅडर्ड इंजिनयरिंग उद्योगाच्या मैदानावर शिवसेनेने महिला, पुरुष आणि गटप्रमुखांच्या मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यात उपस्थित हजारो गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या प्रदीर्घ वाटचालीची माहिती सांगितली. मुंबईत शिवसेना नसती तर तुमच्यासारख्या मराठी माणसाचे काय झाले असते याचा विचार करा, अशी समजही दिली. ते म्हणाले की, मुंबईचे भवितव्य आता सेना कार्यकर्त्यांच्या हातीच आहे. तिकीट मिळाले नाही म्हणून पक्ष सोडायचा ही कृती बरी नाही. मुंबई महानगरपालिका निवडणूक हे मराठी माणसासाठी एक युद्धच असून ते कोणत्याही परिस्थितीत जिंकलेच पाहिजे असे आवाहन त्यांनी सर्व गटप्रमुखांना केले.
शिवसेनेने यावेळी धक्कातंत्र वापरले. उमेदवारांची नावे वृत्तपत्रात जाहीर होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी, ज्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचा आदेश दिला. त्यामुळे ज्यांची तिकिटे कापण्यात आली त्यांना पक्ष सोडण्यासाठी वेळच राहिला नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले की उमेदवार निवडीत नात्या-गोत्याचे राजकारण चालणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे काही ठिकाणी असंतुष्ट उमेदवारांनी बंड उभारले. निवडणुकांचे निकाल लागले. मुंबई महानगरपालिकेच्या २२६ जागांपैकी शिवसेनेला ९८, भाजपाला ३५ तर काँग्रेसला ६०, राष्ट्रवादीला १३, समाजवादी पार्टीला १७ आणि अपक्ष इतरांना ११ जागा मिळाल्या. शिवसेनेचे महादेव देवळे हे महापौर झाले. ठाण्यात शिवसेनेला ४६ तर भाजपाला १३, काँग्रेसला २२ आणि राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या. मुंबई व ठाण्याचा गड शिवसेनेने राखला.
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील शिवसेनेने मुसंडी मारली. १०८ जागांपैकी शिवसेनेला ३७ तर भाजपाला २२ जागा मिळाल्या. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. नाशिकच्या महापौरपदी शिवसेनेचे दशरथ पाटील विराजमान झाले. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील शिवेसना-भाजप युतीला यश मिळून तिथेही भगवा फडकला.
याच वर्षी महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. शिवसेनेने प्रचाराची राळ उठवली. प्रचारासाठी मनोहर जोशी खेड येथे गेले. तिथे त्यांनी जाहीर केले की कोकणातील मुसलमान हा सर्वसाधारणपणे शिवसेनेच्या बरोबर आहे. त्यावेळी २७ जिल्हा परिषदा आणि ३०७ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत युतीला ८-१० जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली. रायगडमध्ये शिवसेना सत्तेवर आली आणि अपेक्षा कारेकर या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकला. संभाजीनगर जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकला.
शिवसेनेचे राजकारण फक्त निवडणुका लढवून ते जिंकण्यापुरते नव्हते तर, गोरगरिबांना, शेतकर्‍यांना व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी होते. निवडणूक जिंकली तरी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हेच सूत्र कायम शिवसैनिकांनी लक्षात ठेवले.
शेतकर्यांकच्या विविध मागण्यांसाठी व लोकशाही आघाडी सरकारच्या जनहिताविरोधी निर्णयाच्या निषेधार्थ सिंदखेडा तालुका शिवसेनेच्या वतीने ११ मार्च रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. सुलवाडे बॅरेज, सारंगखेडा बॅरेज, वाडी-शेवाडी प्रकल्प, अमरावती प्रकल्प, जामफळ धरण प्रकल्प ही कामे निधीअभावी बंद आहेत. ती तत्काळ सुरू करावीत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अनाठायी वीज बिल, कृषी पंपांना विद्युत पुरवठा नाही, लोडशेडिंग यासारखे घेतलेले निर्णय थांबवावेत, रोहयोची कामे सुरू करावीत. शेतकर्‍यांना कापसाला २३०० व २०५०चा हमीभाव मिळावा, कापसाचे १०० टक्के पेमेंट त्वरित अदा करावे. धुळे हा दुष्काळी जिल्हा असून येथील आणेवारी कमी असतानाही शेतकरी बांधवांवरील कर्जवसुली थांबवावी, जिल्हा विकास निधी फक्त ४० टक्क्यांवर आणला तो वाढवावा, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठ्याचे वीज बिल कमी करावे, विद्युतपुरवठा खंडित करू नये, रेशनिंगवरील पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत, जीवन प्राधिकरणाच्या बंद योजना सुरू कराव्यात, सोनगीर ग्रामीण रुग्णालय त्वरीत कार्यान्वित व्हावे, जलशुद्धीकरण केंद्राला त्वरित मंजुरी मिळावी, रस्ते कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ५० पैशांच्या आत ज्याची ‘आणेवारी’ असेल अशा शेतकरी बांधवांना ‘पीकविमा’ मिळावा. आदी मागण्यांसाठी शिवसेनेचा प्रचंड मोर्चा सिंदखेडा तहसील कार्यालयावर सकाळी नेण्यात आला. यावेळी तहसीलदारांनी स्वत: येऊन निवेदन स्वीकारले. शिवसेनेच्या दणक्याने राज्यातील पावाच्या किंमती घसरल्या व त्याचा फायदा लाखो गोरगरीब ग्राहकांना मिळाला. एका रुपयाचा पाव ७५ पैसे तर, ८०० ग्रॅमच्या आवरणातील १५ रुपयांचा पाव १४ रुपयांना मिळाले.
दरम्यान, मालेगाव येथे शिवसेनेची निदर्शने मालेगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘राष्ट्रगीत’ व ‘वंदे मातरम’ सादर करण्यास विरोध करणार्‍या जनता दल व समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांसह महापौर निहाल अहमद यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशी प्रमुख मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित शिवसेनेच्या निदर्शनाप्रसंगी करण्यात आली.
मराठी अस्मितेचा ऐतिहासिक ठेवा असेलेले ‘भारतमाता’ चित्रपटगृह वाचविण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाचा दणका दिला. गेल्या तीन पिढ्या मराठी माणसाचे भावनिक नाते जुळलेल्या या चित्रपटगृहाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला होता. ही अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी शिवसेना सज्ज झाली. जनतेचा प्रश्न सोडवित असताना मराठी चित्रपटप्रेमींना देखील न्याय दिला. मराठी अस्मिता, भाषा या बरोबरच कला व संस्कृती रक्षकाची भूमिकाही शिवसेना वठवत होती. दरम्यान, कामगारविरोधी अहवालाची होळी, कामगारविरोधी कायदा संसदेत मंजूर झाला तर केंद्रातील सरकार खुर्चीवरून खाली खेचू, मग ते कोणाचेही असो असा खणखणीत इशारा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिला. कामगारांच्या साक्षीने कामगार आयोगाच्या अहवालाची होळी करण्यात आली.
९ एप्रिल आणि १० एप्रिल २००२मध्ये शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचे महाशिबीर शिर्डी येथे झाले. या महाशिबिराचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
या निवडणुकीपूर्वी शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ, कमांडर दत्ताजी साळवी यांचे निधन झाले होते. त्यावेळी ‘झंझावात शांत झाला’ हा अग्रलेख ‘सामना’मध्ये लिहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. निवडणूक प्रचारादरम्यान दत्ताजींची उणीव भासली तरी इतर नेत्यांनी उद्धवजींना साथ देऊन मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवला. शिवसेनाप्रमुखही या निवडणूक प्रचारात उतरले होते. शिवसेनाप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निवडणुकीची जी जबाबदारी टाकली ती उद्धवजींनी सार्थ करून दाखवली.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी केलेली व्यूहरचना, प्रचारात घेतलेली आघाडी, उमेदवारांची योग्य निवड, शिवसेना नेते मनोहर जोशी, सुभाष देसाई, राज ठाकरे, नारायण राणे आदींना साथीला घेऊन निर्माण केलेला ‘भगवा झंझावात’ याचा हा विजय होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

भारत गौरव यात्रा : एक तरी ‘वारी’ अनुभवावी

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेच एकमेव ‘हिंदुहृदयसम्राट’!

December 7, 2023
गर्जा महाराष्ट्र

प्रदूषणाचे हटवा गदळ, नाहीतर चिरनिद्रा अटळ!

December 2, 2023
बाळासाहेबांवर अँजिओप्लास्टी!
गर्जा महाराष्ट्र

बाळासाहेबांवर अँजिओप्लास्टी!

October 5, 2023
गर्जा महाराष्ट्र

उद्धव ठाकरे लढाईत आणि तहातही जिंकले!

September 29, 2023
Next Post

भारत गौरव यात्रा : एक तरी ‘वारी’ अनुभवावी

बाईपण ‘का' भारी देवा?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023

कर्जबुडव्यांचे काय करायचे?

December 7, 2023

नरेंद्र मोदी हे खरे काँग्रेसनिष्ठ!

December 7, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

टपल्या आणि टिचक्या

December 7, 2023

‘धर्मवीर-२’ गद्दारीच्या उदात्तीकरणासाठी!!

December 7, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.