ग्रहस्थिती : गुरु, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ मिथुन राशीत, प्लूटो मकर राशीत. दिनविशेष : ५ एप्रिल दुर्गाष्टमी, ६ एप्रिल श्रीराम नवमी, ८ एप्रिल कामदा एकादशी, १० एप्रिल प्रदोष आणि श्री महावीर जयंती.
– – –
मेष : घरात शुभकार्यामुळे आनंद वाढेल. नातेवाईक, मित्र भेटतील. व्यवसायात वृद्धी होईल. घाईने निर्णय घेऊ नका. भावंडांशी जमवून घ्या. कुरबूर टाळा. पत्नीच्या मदतीने काम मार्गी लागेल. नव्या कल्पना आकाराला येतील. तरुणांना यशदायी काळ. नोकरीत कामाचा ताण येईल, प्रवास करावा लागेल. उन्हाळ्यात आरोग्याकडे दुर्लक्ष नको. मनासारख्या घटना घडतील. आर्थिक बाजू चांगली राहील. रागावर नियंत्रण ठेवा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : कामाचे कौतुक होईल, आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना अपेक्षित यश मिळेल. अहंकारी वृत्ती प्रगतीसाठी घातक ठरेल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन घर घेण्याच्या दिशेने प्रगती होईल. बँकेची प्रलंबित कामे, सरकारी कामे पुढे सरकतील. व्यवसायात संधीतून अर्थलाभ होईल. तरुणांना नोकरी मिळेल. घरात कामाचा ओघ वाढेल. पत्रकार, लेखक, संपादक, प्रकाशकांसाठी चांगला काळ. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या, वेंधळेपणामुळे फसगत होईल. छंदामुळे नावलौकिकात भर पडेल.
मिथुन : नोकरीत कामाचे कौतुक होईल. पगारवाढ, बढतीचे योग आहेत. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. अति आत्मविश्वास टाळा. व्यवसायात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. उधार उसनवारी टाळा. अनोळखी व्यक्तीवर विश्वासून आर्थिक व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. सट्टा, लॉटरीपासून दूर राहा. नवीन नोकरी मिळेल. नवा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा पूर्ण होईल. घरात विचार करूनच निर्णय घ्या. मुलांकडून चांगली बातमी कळेल. शिक्षण, संशोधन क्षेत्रात उत्तम काळ.
कर्क : तरुणांना अपेक्षित फळे मिळतील. नोकरी मिळेल. घरात आनंद वाढेल. मौजमजेवर खर्च होईल. कलाकारांचा सन्मान वाढेल. घरात ज्येष्ठांचे ऐका. मित्रमंडळींपासून दोन हात दूर राहा. कामानिमित्ताने विदेशात जाल. उच्चशिक्षणाचे प्रयत्न सार्थकी लागतील. नोकरीत कामाकडे लक्ष द्या. गुंतवणूक करताना काळजी घ्या. जुनी मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रे तपासा. खेळाडूंना यशदायी काळ. सार्वजनिक जीवनात काळजी घ्या. कुटुंबात शांती आणि संयम ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा.
सिंह : अनपेक्षित धनलाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. वायफळ खर्च टाळा. घरासाठी अचानक खर्च होईल. आर्थिक नियोजनात चुका करू नका. महिलांना अपेक्षित यश मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. घरामध्ये तुमच्या मताला मान न मिळाल्याने चिडचिड होईल. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात कार्यक्षेत्र वाढेल. आध्यात्मिक कार्यातून शांती लाभेल. नोकरीत वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. प्रेम प्रकरणात वाद होतील.
कन्या : मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात चांगले यश मिळेल. आर्थिक बाजू चांगली राहील. तरुण जल्लोष करतील. मित्रांशी व्यवहार करताना काळजी घ्या. कोणाला सल्ले देऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. शेअर, लॉटरीमधून कमाई होईल. नातेवाईकांसाठी धावपळ करावी लागेल. लहान गोष्टींचा फार विचार करू नका. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. कवी, संगीतकार, कलाकारांसाठी उत्तम काळ. नोकरीनिमित्ताने प्रवास घडेल. खिसापाकीट सांभाळा. व्यवसायात आवक चांगली राहील. शब्दावर नियंत्रण ठेवा.
तूळ : आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. लहान त्रास डोकेदुखी वाढवतील. व्यवसायात यश मिळेल. आर्थिक बाजू सक्षम राहील. नव्या ओळखीतून जुने काम मार्गी लागेल. घरात आणि बाहेर वादाचे प्रसंग टाळा. व्यवसायाचा विदेशात विस्तार होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. तरुणांच्या मनासारख्या घटना घडतील. मुलांकडून शुभ बातमी कळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. शिक्षण क्षेत्रात नव्या संधी मिळतील.
वृश्चिक : मनासारखी कामे होतील, आत्मविश्वास वाढेल. नातेवाईक, मित्रांचे सहकार्य मिळेल. तरुणांना यशदायी काळ. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. जवळच्या व्यक्तीबाबत चांगली बातमी कळेल. लेखक, साहित्यिकांचा हुरूप वाढेल. सार्वजनिक ठिकाणी बोलताना काळजी घ्या. व्यवसायात कामाचा ओघ वाढेल. घरात वेळ द्या. नोकरी मिळेल. वादात मध्यस्थी करू नका. व्यवसायात नोकरवर्गाकडून त्रास होईल. वावदूक खर्च टाळा. प्रेमप्रकरणात कटू अनुभव येतील.
धनु : मनाची प्रसन्नता वाढेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. व्यवसायात नियोजनपूर्वक काम करा. आश्वासने देऊ नका. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. घरात नियोजनपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आव्हानांवर चाणाक्ष पद्धतीने मार्ग काढा. विदेशात नोकरी मिळेल. आंधळा विश्वास ठेवून व्यवहार करू नका. सरकारी कामे मार्गी लागतील. नव्या ओळखीतून फायदा होईल. समाजकार्यात वेळ खर्च होईल. शेअर, रियल इस्टेट व्यवसायात चांगला काळ. कलाकारांसाठी उत्तम काळ.
मकर : तुम्ही करत असलेल्या व्यवसायात यश मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. मामाची मदत होईल. शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. ध्यानधारणा, योगायामधून समाधान मिळेल. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. घरात जमवून घ्या. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. मित्रांसोबत भटकंती होईल. वादात मध्यस्थी टाळा. नव्या व्यवसायाची घडी बसेल. सामाजिक कार्यात मन रमवाल. मुलांकडून आनंदवर्धक बातमी कळेल. घरात आनंद साजरा होईल. दांपत्यजीवनात सुख मिळेल. कलाकार, संगीतकार, चित्रकारांसाठी उत्तम काळ.
कुंभ : आर्थिक घडी भक्कम होईल. पैसे कसेही खर्च करू नका. घरासाठी वेळ खर्च कराल. दांपत्यजीवनात किरकोळ कुरबुरी घडतील. आरोग्य सांभाळा. नियमात राहूनच काम पूर्ण करा. मित्रमंडळींशी अधिक जवळीक नको. आनंददायी घटना घडेल. व्यवसायात प्रगती होईल. नवीन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. नातेवाईकांमध्ये कटुता निर्माण होईल. कलाकारांना यशदायक काळ. मनासारखी नोकरी मिळेल. आर्थिक गुंतवणूक टाळा. सामाजिक जीवनात सन्मान मिळेल. उधार उसनवारी देणे टाळा.
मीन : सामाजिक कार्यातून प्रगती कराल. तरुणांनो, अधिक कष्ट घ्या. बँकेची कामे उशिराने झाल्याने चिडचिड होईल. संयम राखा. कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. व्यावसायिकांना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागेल. कुणाच्या सल्ल्याने निर्णय घेऊ नका. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत कामाचा ओघ वाढेल. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काळजी घ्या. धार्मिक कार्यामधून समाधान मिळेल. नव्या लोकांच्या गाठीभेटी होतील.