• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

थांबला तो जिंकला

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 1, 2022
in कहीं पे निगाहें...
0

‘मार्मिक’च्या पुढच्या लेखाचा विषय काय असावा हा विचार करीत मी भिंतीवरील कॅलेंडरवर नजर टाकली तर, एक जूनला जागतिक धावण्याचा दिवस (ग्लोबल रनिंग डे) साजरा केला जातो असे कळले. मंदगतीसाठी बदनाम असणार्‍या कासवाचा दिवस साजरा केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात धावण्याचा दिवस साजरा करणे म्हणजे लग्नाचे आणि तेराव्याचे जेवण एकाच उत्साहाने जेवण्यासारखे आहे.
हल्ली सगळेच बिझी झाले आहेत. ज्यांच्याकडे काम आहे ते व्यग्र आहेतच, पण ज्यांच्याकडे कामधाम काहीही नाही ते मोबाईलवर अधिकच व्यस्त आहेत. प्रत्येक जण धावत आहे. कुणाला बस पकडायची आहे, कुणाला ट्रेन गाठायची आहे, कुणी तब्येतीसाठी धावताहेत, कुणी पैशासाठी धावताहेत, कुणी यशासाठी धावताहेत, कुणी सुखासाठी धावताहेत, आणि बरेचसे लोक, इतर लोक धावताहेत म्हणून धावताहेत. एक मात्र नक्की की, प्रत्येकाला आर्थिक, सामाजिक संपन्नतेची पुढची पायरी गाठायची आहे. म्हणून प्रत्येक जण धावत आहे.
आमच्या गावच्या देवळात सत्संगासाठी येणारे गुरुजी म्हणायचे, ‘गतिशीलता हेच जीवनाचे खरे लक्षण आहे. गतीमुळे जीवनात चैतन्य निर्माण होते, माणसाची प्रगती होते. बालकहो, पाण्याकडून काही शिका. पाण्याचा प्रवाह कधी थांबत नाही. मार्गात येणार्‍या अडथळ्यांना, ओलांडून किंवा वळसा घालून ते सतत पुढेच जात असते. आपणही पाण्यासारखे प्रवाही असायला हवे. पाणी वाहायचे थांबून साचून राहिले तर त्याचे डबके होते आणि त्याला दुर्गंधी येऊ लागते. वाहते पाणी पुढे नदीला आणि अंतिमतः समुद्राला जाऊन मिळते, सागरमय होते. त्या क्षुद्र प्रवाहाला दिव्यत्व प्राप्त होते.’ गुरुजींच्या प्रवचनावर सगळे माना डोलवायचे. पण मला काही केल्या गतिशीलतेचे अर्थात पळण्याचे महत्व कधी पटलेच नाही. म्हणजे बघा, पाणी जोवर वाहत होते तोवर ते अस्थिर होते. ते पाणी समुद्रात जाऊन थांबले तेव्हा जर त्याला स्थिरता आणि दिव्यत्व प्राप्त झाले असेल तर ही धावण्याची नसून थांबण्याची महती आहे अशी माझी लहानपणापासूनच समजूत आहे आणि मी अजूनही त्या समजुतीवरच थांबलो आहे.
लहानपणी मी शाळेत स्कूलबसने न जाता, बसच्या मागे धावत जायचो-यायचो. अशा प्रकारे मी रोज दहा रुपये वाचवत असे आणि वर्गातील इतर मुलांना फुशारकी मारून माझा हा पराक्रम सांगतही असे. एके दिवशी, वर्गातील अजय नावाचा एक मुलगा मला खोपच्यात घेऊन म्हणाला, अरे पेंद्या, बसच्या मागे धावत येण्यापेक्षा एखाद्या कारच्या मागे धावत आलास तर रोज पाचशे रुपयांची बचत करशील, हेलिकॉप्टरच्या मागे धावत आलास तर लाखो रुपयांची बचत करशील!… पुढे कधीतरी तो मुलगा घरून पळून निघून गेला. कुणी म्हणतात की तो संन्यासी बनला आहे. कुणी म्हणतात की तो आता उत्तरेत कुठल्यातरी प्रदेशाचा मुख्यमंत्री बनलाय. कुणी म्हणतात की त्याने बजेटपेक्षा कमी खर्चात असा एक एक्सप्रेस-वे बांधलाय की त्यातून पहिल्याच दिवशी शेकडो कोटी रुपयांची बचत झालीय. असेलही!
कुठल्याच प्रकारची स्पर्धा मला आवडत नाही. धावण्याची स्पर्धा तर अजिबातच आवडत नाही. एखाद्या हिंस्त्र पशूपासून, किंवा धर्मवेड्या जमावापासून जीव वाचविण्यासाठी पळणे सोडले तर इतर कशासाठीही पळणे मला मंजूर नाही. तुम्हाला उडता येत नसेल तर धावा, धावता येत नसेल तर चाला आणि चालताही येत नसेल तर सरपटा, पण पुढे जात रहा असं कुणा विद्वानाने सांगून ठेवलंय; पण इतके सव्यापसव्य करून जायचं कुठे आहे ते लोकेशन मात्र त्याने सांगितलं नाहीये.
मी अतिशय काटकसरी मनुष्य आहे. आपण शक्यतोवर झोपून किंवा बसून राहावे आणि जमेल तितकी ऊर्जेची बचत करावी असं माझं मध्यमवर्गीय मत आहे. लोकांना मोठेपणी ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असे उमाळे येतात. मला मात्र प्राथमिक शाळेत असल्यापासूनच बालपणीच्या काळाचे महत्व पटले होते. हिंदी सिनेमात, पळता पळता हिरोला मोठे होताना पाहिलेले असल्यामुळे, आपण धावलो तर धावता धावता सिनेमाच्या हिरोसारखे मोठे होऊ आणि आपलं रम्य बालपण हरपेल या भीतीने मी लहानपणी कधी पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला नाही.
मी शेवटचा कधी धावलो होतो हे आठवू जातो, तेव्हा मला दोन घटना आठवतात. पहिली घटना दोन वर्षांपूर्वीची. ताजा-ताजा लॉकडाऊन लागला होता. अमुकतमुक कागदपत्रे असतील तरच घराबाहेर पडता येईल असा केंद्र सरकारने फतवा काढला होता. राज्य सरकार, महापालिका आणि स्थानिक पोलीस आपापल्या परीने त्या फतव्यात भर घालून कन्फ्युजन वाढविण्याच्या लौकिकाला ते जागले होते. महत्प्रयासाने कलेक्टर ऑफिसकडून मिळालेल्या त्या परवान्याचा प्रिंटआउट हाती नाचवत मी हर्षतिरेकाने तोंडाला मास्क लावून ‘युरेका युरेका’ असं ओरडत, धावत-धावत रस्त्यावर गेलो तर नाक्यावरील पोलिसाने दोन रट्टे दिले अन म्हणाला, ‘अय आर्किमिडीज, घराबाहेर पडताना बाकीचे पण मास्क घालावयाचे असतात!’
दुसरी घटना मागील आठवड्यातीलच आहे. माझा मोबाईल अनलॉकावस्थेत सोफ्यावर राहिला होता आणि बायको तिथे बाजूलाच बसलेली होती. हे म्हणजे बृजभूषण सिंह आणि राज ठाकरेंनी शेजारी-शेजारी भाड्याने घर घेण्याइतकी डेंजर गोष्ट आहे. हे लक्षात येताच मी जिवाच्या आकांताने मोबाईलकडे धावलो. मला तसे धावत येताना पाहून बायको माझा मोबाईल उचलून, लॉक करून माझ्या हाती परत देत म्हणाली, मला माझेच प्रॉब्लेम संपत नाहीत रे, तुझ्या मैत्रिणींचे प्रॉब्लेम मी कशाला वाचू?
गरज नसताना धावल्याने ऊर्जेचा अपरिमित नाश होत असून अशा प्रकारे राष्ट्रीय साधनसंपत्ती वाया घालविण्यास माझा सक्त विरोध आहे. नाक्यावरील भाजी आणण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाणारी माणसं, स्वतःला फिटनेस प्रिâक म्हणवून घेतात आणि पहाटे उठून डिझायनर टीशर्ट-शॉर्ट्स घालून मैलोन-मैल कुत्रा मागे लागल्यासारखे धावत सुटतात. इतकंच नव्हे तर, रोजच्या कामाच्या धबडग्यात आपण हव्या तितक्या वेगाने, हवे तितके अंतर नियमितपणे चालतोय, पळतोय की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी लोकांनी स्वतःहून हातावर स्मार्टवॉच नावाचा कुत्रा बांधून घेतलाय.
हे धावणं केवळ कामाधामासाठी होतं असं नव्हे तर हौसेमौजेचीही तीच गत आहे. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेण्याऐवजी आपल्याला धावत पळत अधिकाधिक पर्यटनस्थळांना भेटी देण्यात स्वारस्य असतं. म्हणूनच अठरा दिवसांत एकवीस युरोपीय देशांत फिरवून आणणार्‍या कंडक्टेड टूर्स फक्त भारतातूनच निघू शकतात.
सगळ्यांनाच धावण्याच्या रोगाचा संसर्ग झालेला असल्याने न धावणार्‍या माझ्यासारख्या निरोगी माणसांना उगीचच न्यूनगंड येतो. कधीतरी वाटते की, एखादा खरमरीत लेख लिहून या धावणार्‍या मंडळींची अंडीपिल्ली बाहेर काढावीत. पण मग मी मलाच समजावतो की, जाऊ दे, आपल्यासारख्या साधा चालण्याचा व्यायामही न करणार्‍याने धावण्यावर लिहिणे म्हणजे विदर्भ मराठवाड्यातील माणसाने, धो-धो पावसामुळे उडालेल्या हाहाकारावर कविता लिहिण्यासारखे आहे.
केवळ फिट राहण्यासाठी कुणी धावत असेल तर ते समजण्यासारखे आहे. आपला मार्ग निर्धोक करून पुढे जायची इच्छा नैसर्गिक आहे. पण दुर्दैवाने तसं नाहीये. आपल्याला इतरांना हरवून पुढे जायचं आहे. आपल्याला इतरांच्या वाटेत काटे पसरवून पुढे जायचं आहे. आपल्याला केवळ काही हवं आहे, इतकंच नाही तर आपल्याला ते इतरांच्या आधी हवं आहे. म्हणून आपण धावत आहोत. अधिक चांगली नोकरी, अधिक मोठं पद, अधिक व्यवसाय, अधिक पैसा, अधिक मोठा बंगला, अधिक आलिशान कार अशा नवनवीन सीमारेषा ठरवून तिथपर्यंत धावत इतरांच्या आधी पोहोचण्यासाठी आपला आटापिटा आहे.
या पळायच्या रोगाची बाधा केवळ वैयक्तिक आयुष्यालाच नव्हे तर सामाजिक, राजकीय जीवनालाही झाली आहे. एक भारतीय या नात्याने, आपल्या समृद्ध भाषा आपल्याला टिकविता आल्या नाहीत. गणित-विज्ञानात आपण फारसे दिवे लावले नाहीत, आपल्या भूगोलावर अजूनही आपला पूर्णपणे ताबा नाहीये, समाजातील एका घटकाला आपण पशूपेक्षा देखील हीन वागणूक देत आलोय, खर्‍या इतिहासातून काही शिकण्याऐवजी आपल्याला सोयीचा इतिहास नव्याने लिहायचा आहे… ज्यावर काही काम करता येईल, सुधारणा करता येईल असे इतकं सारे विषय असताना आपण मंदिर-मस्जिद-भोंगे अशा गोष्टींवर चर्चा, वाद, भांडणे करतो आहोत. कारण आपल्याला सत्यापासून दूर पळायचं आहे!
जे आपल्याला आपल्या आयुष्यात साध्य करता आलं नाही ते आपल्या मुलांनी करावं म्हणून आपण त्यांच्या बालपणाचा बळी देऊन, त्यांनाही या स्पर्धेत उतरवून धावायला लावतो. स्पर्धेची आणि धावण्याची आपल्याला इतकी खुमखुमी की आपण गोष्टीतल्या कासवालाही वेगवान सशासोबत शर्यत घ्यायला लावतो. मी म्हणतो का? अशी शर्यत लावून हार-जीतच्या मागे पळविण्याऐवजी सशाने आणि कासवाने नदीकाठी हिरवळीवर एकत्र बसून आपापल्या आवडत्या पेयाचे एखाद-दोन प्याले रिचवून या सुंदर जीवनाचा आनंद घ्यायला काय हरकत आहे?
‘थांबला तो संपला’ असं म्हटलं जाते. सतत काही ना काही उद्योग करीत राहणे ही जिवंतपणाची खूण मानली जाते. हे बर्‍याच अंशी खरं असलं तरी एखादा व्हिडीओ पाहत असताना अधिक महत्वाचं काही काम आलं की आपण ‘पॉज’ बटन दाबून तो व्हिडीओ थांबवतो. असा पॉज आपल्याला आपल्या आयुष्यात घेता यायला हवा. आपण कुठून आलो, कुठे आहोत, कुठे आणि का चाललोत ह्याचा विचार करण्यासाठी काही काळ न धावता एका जागी थांबणे, पॉज घेणे गरजेचे आहे.
आपण हा पॉज नाही घेतला तर देव म्हणा, निसर्ग म्हणा (किंवा अगदीच नास्तिक असाल तर हिग्ज बोसॉन पार्टिकल म्हणा) एखादं आजारपण, एखादा अपघात किंवा कोरोनासारखी एखादी महामारी पाठवून आपल्याला सक्तीचा पॉज घ्यायला लावतो. काही काळासाठी स्वतःहून घेतलेला किंवा सक्तीने लादलेला हा ‘पॉज’, आपल्या धावण्यातील आवश्यक काय आणि अनावश्यक काय हे ठरविण्यासाठी आपल्याला वेळ देतो आणि नव्या दमाने धावण्याची ताकद देतो. स्वतःला ‘लंबी रेस का घोडा’ समजून अतिआत्मविश्वासापोटी मनाचा आणि शरीराचा विचार न करता ‘क्षणभर विश्रांती’ घेतली नाही तर कायमसाठी थांबण्याची वेळ येईल. ती तुम्हां आम्हांवर इतक्यात येऊ नये बस्स!

[email protected]

Previous Post

व्यंगचित्र क्षेत्रातले राजा हरिश्चंद्र

Next Post

खवय्यांच्या आवडीचा कुर्मा

Related Posts

कहीं पे निगाहें...

निंदकाचे घर…

October 6, 2022
कहीं पे निगाहें...

रात्रीच्या गरबात असे…

September 22, 2022
कहीं पे निगाहें...

शिक्षकांच्या बैलाला…

September 8, 2022
कहीं पे निगाहें...

देवा हो देवा!

August 25, 2022
Next Post

खवय्यांच्या आवडीचा कुर्मा

धागे-दोरे

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.