अशी आहे ग्रहस्थिती
राहू-शुक्र-हर्षल मेषेत, रवि-बुध वृषभेत, केतू तुळेत, शनि (वक्री) कुंभेत, प्लूटो मकरेत, गुरु-मंगळ-नेपच्यून मीनेत, चंद्र कर्केत त्यानंतर सिंह कन्या आणि तुळेत. दिनविशेष – १० जून निर्जला स्मार्त एकादशी.
राशीभविष्य कालावधी : ४ ते ११ जून २०२२
मेष – आगामी काळ संमिश्र घटनांचा राहील. ५ आणि ६ या तारखांना गुरु-चंद्र नवपंचम योग कौटुंबिक सौख्याचा राहील. मातृसौख्य लाभेल. कुटुंबात आनंददायी कार्यक्रम होईल. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. अपेक्षापूर्ती होईल. स्वभाव खर्चिक राहील. खर्च करताना काळजी घ्या. विद्यार्थीवर्गासाठी उत्तम काळ आहे. कर्जासंदर्भातील कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. गुरुकृपेमुळे फार त्रास जाणवणार नाही. लाभातील शनी महाराजांमुळे आर्थिक चिंता राहणार नाही.
वृषभ – खेळ, गायन, वादन, संगीत, नृत्य, यात विशेष रुची असणार्यांना बुधादित्य योगाचा चांगला फायदा होईल. कामाच्या संधी चालून येतील, त्यातून प्रसिद्धी व पैसे मिळतील. नावलौकिक वाढले. एखादा पुरस्कारही मिळेल. योगकारक शनिमुळे व्यवसायाची घडी चांगली बसेल. नवी कामे मिळतील, त्यातून उलाढाल वाढीस लागेल. भागीदारीतून चांगले लाभ मिळतील. सासुरवाडीकडून लाभ मिळतील. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीत मित्रांची मदत होईल. पत्नीच्या हौसेखातर नव्या वस्तूची खरेदी होईल.
मिथुन – चांगला काळ आहे. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल. लष्करी कर्मचार्यांना सन्मान मिळेल. लाभात राहू-शुक्र असल्याने सट्टा, शेअरबाजारात यश मिळेल. लोभीपणा करू नका. परदेशात स्थायिक असणार्यांसाठी चांगला काळ आहे. घरात आर्थिक मदत करावी लागेल. दशमस्थानातील मंगळ बक्षीसरूपाने चांगले आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. किचकट कामात वडीलबंधूची चांगली मदत मिळेल.
कर्क – सकारात्मक ऊर्जा मिळेल. दोन कामे जास्तीची होतील. ४ आणि ५ तारखेचा गुरु-चंद्र-मंगळ नवपंचम योग व्यवसायात आणि नोकरीच्या माध्यमातून लाभदायक ठरेल. नोकरीत बदलीचा मार्ग मोकळा होईल. नोकरीनिमित्त प्रवास घडेल. अपेक्षापूर्ती होईल. नवीन वाहन खरेदी कराल. समाजकारण, राजकारणात चांगले लाभ होतील. यात्रा घडेल. उच्चशिक्षणाचे प्रयत्न यशस्वी होतील. गुरुकृपा लाभेल. कीर्ती वाढेल.
सिंह – ‘म्हणाल ती पूर्व दिशा’ असा तुमचा दबदबा राहील. रवि दर्शन भावात, रवि बुधादित्य योगात. त्यामुळे सरकारी क्षेत्रात दबदबा वाढलेला दिसेल. कमिशन एजंट, दलालांसाठी लाभदायक आठवडा आहे. घरात मोठी कार्ये पार पडतील. मुद्रणालय, स्टेशनरी व्यावसायिकांना फायद्याचा काळ आहे. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. कामानिमित्त प्रवास होतील. दानधर्म, देवदर्शन घडेल.
कन्या – सरकार दरबारी अडकलेली कामे पूर्ण होतील. दशमेश बुध भाग्यात, रविबुधादित्य योगात, त्यामुळे सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळतील. संशोधकांसाठी चांगले दिवस आहेत. प्रयोग यशस्वी होईल. लेखक, राजकारणी यांना उत्तम काळ आहे. आनंदी राहाल. ५ आणि ६ तारखांना अनपेक्षित लाभ मिळतील. विवाहेच्छुकांचे लग्न जुळेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. नस्ती आफत ओढवून घ्याल.
तूळ – शुक्र वक्री शनिच्या दृष्टीत, राहू आणि हर्षल सप्तमात त्यामुळे व्यवहार करताना सावध राहा. विचार करून निर्णय घ्या. शनि पंचमात वक्री असल्यामुळे संततीच्या बाबतीत तापदायक बातमी मिळेल. प्रेमप्रकरणात अपयश संभवते. डोळ्याचा त्रास होऊ शकतो. नोकरीत अधिकार मिळेल. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.
वृश्चिक – ज्योतिष शास्त्राची आवड असणार्यांना अतिउत्तम आठवडा आहे. नवे लिखाण होईल. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांना चांगला काळ आहे. खेळाडूंना चांगले यश मिळेल. सन्मान होईल. सार्वजनिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. डॉक्टरांसाठी चांगला काळ आहे.
धनू – गुरु चतुर्थ भावात असल्याने गृहसौख्य लाभेल. महागडी वस्तू खरेदी कराल. नवी वास्तू घेण्याचे नियोजन कराल. शेती व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळेल. स्थावर मालमत्तेमधून मिळणारे उत्पन्न वाढेल. घरात एखादे शुभकार्य घडेल. वक्री शनि तृतीय भावात असल्याने प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. भावाबरोबर मतभेद होतील. शुक्र-राहू-हर्षल पंचमात असल्याने जुगार-व्यसनात पैशाची उधळपट्टी होईल.
मकर – आर्थिक गणिते चुकतील. काळजी घ्या. ४ जूनपासून शनि महाराजांचे वक्री भ्रमण धनस्थानात होत आहे. साडेसातीचा काळ आहे. शनीची वक्र दृष्टी सुखस्थानावर, शुक्र-हर्षल-राहू सुखस्थानात त्यामुळे कुटुंबात कलह होईल. गुरुचे पाठबळ चांगले राहील. त्यातून आर्थिक पाठबळ मिळेल. पंचमातील रविबुधादित्य योग विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळवून देईल. उच्चशिक्षणाची संधी मिळेल. वारसाहक्काने मिळणार्या प्रॉपर्टीच्या बाबतीत मतभेद होतील. आईची काळीज घ्या. प्रवास फायदेशीर ठरतील.
कुंभ – नवे विचार आणि नव्या दिशा सापडतील. दशमेश मंगळ-गुरु-चंद्र नवपंचम योगामुळे चांगल्या संधी चालून येतील. पराक्रमात राहू-शुक्र कला साहित्य यात यश मिळवून देईल. रविबुधादित्य योगामुळे गृहजीवन सुखी राहील. नातेवाईक, मित्रमंडळींकडून चांगली मदत मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. व्यवसायात, नोकरीच्या ठिकाणी स्पर्धक कमजोर ठरतील. राजकारणात यशस्वी व्हाल.
मीन – भरपूर प्रवास करावा लागेले. त्यात पैसे खर्च होतील. संचित रक्कम व्यवसायात लावावी लागेल. फायदा तोटा याचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. वायफळ पैसे खर्च करू नका. कुणालाही मदत करण्याआधी दहावेळा विचार करा. मित्रांनी दिलेला सल्ला अडचणीचा ठरेल, सावधगिरीने पावले टाका. भाग्येश मंगळाचे गुरु-नेपच्यूनबरोबरचे भ्रमण होत असल्याने धार्मिक कार्य घडेल.